एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागातला कुहू, दिग्याकाका-प्रभात यांचा पोरकटपणा असह्य होता. तिघांना ऑलिंपिक्सच्या बीक्सिंग रिंगमध्ये ढकलून द्यावे असे वाटत होते.

लिसन काकू राधाला विचारते कि तुला काय झाले आहे? तू अलिप्त का वागत आहेस? त्यावर राधा सांगते कि काही नाही. आय एम अॅब्सोल्युट्ली ऑलराइट. काकू म्हणते मला नाही तसं वाटत पण तुला जेव्हा कधी सांगावसं वाटेल तेव्हा सांग मला.

मध्ये ब्रेक आला म्हणून मी रेकॉर्ड केलेले बघायला घेतले ते नेमके त्या शॉटलाच संपले. लगेच पिंजरा चालू झाले. परत लावे परेन्त जे चालू होते तिथे ब्रेक संपून सर्व डायलॉग पण संपले. व आठ वाजता एक बाई गाणे गाते ते सुरू झाले. झुंजु मु ंजु झाले इत्यादी. पोपटच.

आजच्या लोकसत्तेत घनावर आर्टिकल आहे. फोटोत बारीक व रुबाबदार दिसतो. लेख ही चांगला आहे.
घना फॅन्स साठी.

आज भिजत घोंगडं हा शब्द विआने वापरला. माबो इफेक्ट काय?

'भिजत घोंगडं' हा प्रचलित मराठी शब्द (वाक्प्रचार) आहे. माबोचा काय संबंध? Uhoh

चॉकलेटअबीरला सगळ्यांचे निरोप घेता घेता दोन एपिसोड लागले. राधाने आजपासून निरोप घ्यायला सुरूवात केली तर महिनाभरात मालिका संपेल.

'भिजत घोंगडं' हा प्रचलित मराठी शब्द (वाक्प्रचार) आहे. माबोचा काय संबंध?<<<
हुश्श... कुणालातरी इथे एक शब्द वापरला की लेखकाच्या शब्दसंपत्तीत भर पडते हा गोड गैरसमज आहे हे लक्षात येतंय Wink

जाता जाता अबिरने त्या माईआज्जीचे कान टोचले हे पाहून मला फार बरं वाटलं. उगाच 'आता माझं वय झालंय, रिटायर्ड व्हायला पाहिजे' असं म्हणत नाटक करत असते. राधा आणि घनाचा समझोता झाला की हीच पतवंडाचं तोंड पहायचं आहे म्हणून धोशा लावेल. तिच्या खोलीतल्या कोपर्‍यातल्या देव्हार्‍यातल्या देवांची पूजा कोण करतं देव जाणे. ही तर सदोदित स्वेटर आणि मोजे घालून बिछान्यावर बसलेली असते.

राधाने घनाला 'डू द नीडफूल अ‍ॅन्ड डू इट फास्ट' म्हणून सुनावलं ते बरं केलं. पण मग 'मी आणि घना एकत्र असू अशी देवाजवळ प्रार्थना कर' वगैरे पुळचटपणा कश्यासाठी? प्रेम हे दानासारखं सत्पात्री असावं लागतं. ज्याला आपली किंमत नाही अश्या माणसावर जीव टाकून कशाला आपली फरपट करून घ्यायची? अशक्य आहे.

रच्याकने, घनाचा बॉस त्याच्या आत्यावर कॉलेजात प्रेम करणारा असणार काय? नाहीतर उरलेल्या एपिसोडमध्ये त्यांचं कसं जमवणार?

छन्न पकैय्या छन्न पकैय्या छन्न के उपर पावली
घना आणि राधामाऊलीच्या प्रकरणाचा लवकर सोक्षमोक्ष लावा हो राजवाडेमाऊली.

बॉस हाच उल्काचा नियोजित वर असावा नाहीतर शेवटच्या काही भागात त्याला आणायचं कारण दिसत नाही.
पण एक प्रॉब्लेम आहे
उल्का त्याच्या जोक्सवर हसणार का?

अबिरने त्याला राधा आवडते हे सांगून नक्की काय मिळवलं ? म्हणजे तो जे म्हणाला होता शेवटचा प्रयत्न (असचं काहीतरी) करून एक्झिट घेणार ते हेचं का ?

अबिरने त्याला राधा आवडते हे सांगून नक्की काय मिळवलं ? म्हणजे तो जे म्हणाला होता शेवटचा प्रयत्न (असचं काहीतरी) करून एक्झिट घेणार ते हेचं का ?
>>>> +१

त्याला वाटले न्युज घनाच्या कानापर्यंत जाईल आणि घना त्याचा रोजचा गोंधळट चेहरा टाकुन नविन चेहरा धारण करेल.. पण त्याचा बार फुसका निघाला, घनापर्यंत बातमी पोचलीच नाही, ना ती राधापर्यत पोचली..

त्याला वाटले न्युज घनाच्या कानापर्यंत जाईल आणि घना त्याचा रोजचा गोंधळट चेहरा टाकुन नविन चेहरा धारण करेल.. पण त्याचा बार फुसका निघाला, घनापर्यंत बातमी पोचलीच नाही, ना ती राधापर्यत पोचली..

नाहीतर उरलेल्या एपिसोडमध्ये त्यांचं कसं जमवणार?>>>पाहताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडतील ते दोघे, आणि कुहूच्या लग्नात आत्या पण लग्न करून टाकेन...हाकानाय!

प्रभातने कुहूला रडवलं तर, प्रभातने घनाला क्षणोक्षणी मुजरा करायचा... ह्या इक्वेशननुसार, राधाला उठसूठ रडवल्यामुळे
घनाने मानवला सतत मुजरा करायला होवा Wink Proud

काल आसावरी आत्याचा भाग फार आवडला. पहिल्या कुहू बरोबरच्या सीन मध्ये आहे तशीच सेम साडी आहे माझ्याकडे. दुसर्‍या सीन मध्ये साडी बदलली पण ब्लाउज तोच? इतकी काय कंटिनुटी!
पण ती जे काय बोलली राधाबरोबर ते अगदी परफेक्ट. काही गरजच नाही दुसरे बोलायची.
आमच्या वयाच्या बायकांचा स्टिरीओटाईप बरोब्बर पकडला आहे राजवाड्यांनी. दिल खुष.

बरें आज रमेची मंगळागौर असून खेळ वगैरे ही आहेत. तस्मात अर्धा तास लवकर टीव्ही लावा.
हटुस्श बाई हटुश्श. Happy

<<< एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ऑगस्टअखेर संपणार

हरे राम!!! म्हणजे ११ ऑगस्टला संपणार ऐकले होते, त्यात आणखी २- २ १/२ आठवडे पाणी घालून लांबवली वाटते.

संपदा 'खास लोकाग्रहास्तव' बरं का! Happy अश्विनीमामी अनुमोदन. मलाही असंच वाटलं.

कालचे दोघांचे तांबडेभडक ड्रेसेस पाहून मला एक गाणं आठवलं 'लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला, ऐका लाला गातो गाणी लाल्लाल्लाल्लाला' Happy

बाकी, देवकीमाऊलीला काळजी करायला नवं कारण मिळालंय - राधाने पटकन साडी कशी निवडली. माझ्या आजीच्या शब्दात सांगायचं तर 'माळरानावर उन फुकट जातंय' म्हणून काळजी करणारा हा 'चिंतातुर जंतू' आहे.

ऑगस्ट अखेर संपायची फक्त 'शक्यता' आहे.

लोकसत्तेत हे आलंय-

महाराष्ट्राभर आवडीने पाहिली जाणारी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आता प्रेक्षकांची रजा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. झी मराठीवर सुरू असलेली ही ‘दुसरी गोष्ट’ आता अंतिम टप्प्यात आली असून २५ ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही मालिका २५ जुलै रोजीच समाप्त होणार होती. मात्र प्रेक्षकांच्या या मालिकेतील भावनिक गुंतवणुकीचा विचार करून खास लोकाग्रहास्तव ही मालिका आणखी महिनाभर पुढे चालवण्यात आली आहे. मालिका अंतिम टप्प्यात आली असली तरी घना आपल्या प्रेमाचा ‘इजहार’ करणार का, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच आहे.

किप गेसिंग- शेवटही आणि शेवटाची तारीखही! Proud

आत्या आणि बॉस. येस्स. घनाच्या अमेरिकन ड्रिमचा एकमेव फायदा! Wink

हे लोकाग्रह करणारे लोक्स म्हणजे झुमरितलैयासे चिंकू पप्पू, टींकू और उनके मम्मी पापा किंवा
सातार्‍याहून अशोक कुमार आणि हेमामालिनी चव्हाण ( जुने आपली आवड मध्ये नेहमी ऐकलेले नाव.नो ऑफेन्स मेंट.) असतात का?

राधा घना ला अमेरिकेस पाठवून बाकी काळे कुटुंबाची स्टोरी अव्याहत चालू ठेवता येइल. ज्ञाना, मग ते लिंबू टिंबू ची लग्ने, दिग्याची दाढी वाढणे अबीर परत येणे, उल्का आत्याचे लग्न वगैरे काहीही करता येइल. पुढील वर्शी कुहूची मंगळागौर कम डोजे एकदम. तिथे तिची कविता आता येइल माझे बाळ .... असे काहीतरी मग एकदम राधा घना परत येतील. जाने तू या जाने ना मधल्यासारखे.
क्या बोलते?

Pages