निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
आपले आपणच कसे अभिनंदन करायचे
आपले आपणच कसे अभिनंदन करायचे | तरीपण करतोच !! सगळी प्रचि छानच आहेत.
शशांक या नावाच्या खुप गमतीजमती आहेत. काही नावे भारतीय नावांचा सन्मान करणारीही आहेत (शाल्मली, मोह, अशोक, शेवगा ) पण काहीवेळा कुणा वनस्पति शास्त्रज्ञाचा सन्मान करणारी पण आहेत.
इथल्या झाडांबद्दल लेख लिहायला घेतलाय. बघू या, या रविवारी पूर्ण करेन बहुतेक.
शशांक , शांकली, छान माहिती.
शशांक , शांकली, छान माहिती.
शांजू, मला सांग, दिनेशदानी आपल्यासाठी पाठवलेला खजिना तुझ्याकडे आला का?
इथल्या झाडांबद्दल लेख लिहायला
इथल्या झाडांबद्दल लेख लिहायला घेतलाय. बघू या, या रविवारी पूर्ण करेन बहुतेक.>>>>>>>>>>व्वा! वाट पहायला सुरुवात.
शशांक,शांकली.. इंटरेस्टिंग
शशांक,शांकली.. इंटरेस्टिंग माहिती!!
वॉव्..दिनेश दा.. लाँग अवेटेड लेख..
शशांक, शांकली उत्तम माहिती.
शशांक, शांकली उत्तम माहिती. (काश इतक्या इंटरेस्टींगली कॉलेजात शिकवलं असतं तर)..
बाकी सर्व प्रचि पण सुरेखच..
बघू या, या रविवारी पूर्ण करेन बहुतेक.>>>>> वाट बघतोय
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे !!!
प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव
प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे !!! >
सर्वांचेच फोटो मस्त! शशांक,
सर्वांचेच फोटो मस्त! शशांक, शांकली माहिती आवडली.
वर्षू, मला त्या फुलाचे नाव माहित नाही. (मी या बाबतीत एकदम ढ आहे.) पण ईथले निप्रेमी सांगतीलच.
बॉटॅनिकल लॅटिन नावाचा एक विषय
बॉटॅनिकल लॅटिन नावाचा एक विषय असायचा वनस्पती शास्त्र शिकताना.
Nigrum म्हणजे काळा रंग . काळ्या मिरीला पायपर नायग्रम ( पुल्लींगी रुप ) म्हणतात. पण फुलझाडांना मात्र नायग्रा ( स्त्रीलिंगी ) म्हणतात.
मेपलच्या सर्वात कॉमन झाडाला एसर पामॅटम नाव आहे - पाम सारखी पाने असणारा म्हणून.
पण एक जातीच्या पाम झाडाला पाम एसरिफोलिया असेही नाव आहे त्याची पाने मेपल सारखी दिसतात म्हणून.
नवीन स्पेसीज शोधून काढल्या / नोंदवल्या की त्याचे नाव ठरवायचा हक्क त्या संशोधकाकडे जातो असा संकेत आहे. फोर्सिथिया, पॉइनसेटा हे त्याची काही प्रसिद्ध उदाहरणे.
दहाव्या भागाबद्दल सर्व नि ग
दहाव्या भागाबद्दल सर्व नि ग प्रेमींचे अभिनंदन!
हा वेल बघायला मिळाला नुकताच. याला समुद्र अशोक म्हणतात ना? फ्लॉवर्स ऑफ इंडिया वर नाव वेगळं दिलंय. http://www.flowersofindia.net/catalog/slides/Elephant%20Creeper.html
आत्ताच एक अनपेक्षितरित्या
आत्ताच एक अनपेक्षितरित्या सुखद धक्का मला मिळाला; तो म्हणजे पुण्यातला टेटू या झाडाचा पत्ता मिळाला!! याचि देही याचि डोळा मला अगदी मनसोक्त दर्शन झालं या अनोख्या आणि अतिशय दुर्मिळ अस्सल देशी वृक्षाचं! ताथवडे उद्यानाच्या गेटकडे पाठ केली की समोर मीरा नावाची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या दारातच हा नवलाचा वृक्ष आहे. आणि आत्ता चक्क फुलावर आहे. शिवाय मागीलवर्षीच्या हत्तीच्या सुळ्यांसारख्या दिसणार्या शेंगापण बाळगून आहे. हा रात्री फुलणारा वृक्ष असून याची फुलं आमसुली रंगाची उभ्या गुच्छात येणारी असतात. पण ती फार दुर्गंधी असतात. वाघळांमार्फत याचं परागीवहन होतं. याचं बोटॅनिकल नाव आहे Oroxylum indicum
दिनेशदा (मी मुद्दामच प्राजक्ताचं उदाहरण दिलं! :डोमा:)
मेधा, मस्त माहिती!!
आणि दिनेशदा आता रविवारची आम्ही वाट बघतोय...
ही जागू कुठे गेलिये पण?.......................
गौरी, हा समुद्रशोक नाहीये ग.
गौरी, हा समुद्रशोक नाहीये ग. समुद्रशोकाची वेल नसते, त्याच झाड असत. त्याच्या फुलाचा फोटो मी निसर्गाच्या गप्पा भाग ९ पान नंबर ३१ वर टाकला आहे. अजून चांगल्या प्रचिंसाठी जिप्स्याला पिडणे. तो पूर्ण झाडाचा पण फोटो टाकेल.
शांकली, आमसुली रंगाची आणि
शांकली, आमसुली रंगाची आणि दुर्गंधीयुक्त फुले, ब्रम्हदंडाची पण असतात. त्याच्या फळाचे वर्णन जी.ए. नी दोरीला बांधलेला वरवंटा असे केले होते. त्याचे झाड मुंबईत, दादरला पारसी कॉलनीमधे आहे.
दुर्गंधी आपल्यासाठी, वटवाघळांसाठी ते आमंत्रणच. तो रंग, तो वास, तो आकार सगळे त्यांच्यासाठीच.
मुंबईतला हा भाग अजून हिरवागार आहे. एवढी दुर्गंधी असूनही, तिथल्या रहिवाश्यांनी ते टिकवलेय, हेच नवलाचे, आहे.
जागूची चौकशी करत रहायला हवी. साधना प्लीज !
गौरी, हा समुद्रशोक नाहीये ग.
गौरी, हा समुद्रशोक नाहीये ग. समुद्रशोकाची वेल नसते, त्याच झाड असत. त्याच्या फुलाचा फोटो मी निसर्गाच्या गप्पा भाग ९ पान नंबर ३१ वर टाकला आहे.>>>>>>>> उजु, माझ्या ऑफिसमधे हि झाडे आहेत. बर् याच प्रमाणात. त्यावर लिहिलेले नाव "समुद्री ओक".
प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे. +१
दिनेशदा रविवारची वाट पहात आहे.
अरे वा ! दहावा भाग सुरु झाला
अरे वा ! दहावा भाग सुरु झाला पण !! सर्वांचे अभिनंदन !
जागू का बरं दिसत नाही ?
सगळे फोटो उत्तम !!!
प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव
प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे>>>>>>
आपल्या नि ग वर अनेकजण असे
आपल्या नि ग वर अनेकजण असे असतील की ज्यांना बायनॉमिअल सिस्टिम माहिती नसेल. (कृपया कोणी गैरसमज करुन घेऊ नये.) मी खाली एक उदाहरण देत आहे ज्यात हे सगळ्यांना पटकन कळू शकेल.>>>>>मनापासुन धन्यवाद शशांक माझी एक मैत्रिण बोटॅनिकलची प्रोफेसर आहे. तीने मला हे सांगितलं होतं. पण इतक्या चांगल्याप्रकारे मला नाही समजवता आलं असत. खुप खुप धन्स.
आवडल्यास पुढे काही उदाहरणे देऊन सांगेन.>>>>>नेकी और पूछ पूछ अजुन येऊ द्या. आम्ही वाचकाच्या भुमिकेत सदैव तय्यार.
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे !!!>>
हे सहिये दिनेशदा.
या पुढील गोष्टी ब-याच जणांना
या पुढील गोष्टी ब-याच जणांना माहिती असतीलच किंवा गुगलूनही मिळेल.
botanikos - in ancient greek means pasteure, grass, fodder, plant यावरुनच आले बॉटनी. वनस्पतींच्या अभ्यासाचे शास्त्र.
zoo - in ancient greek means animal - हे दोन्ही मिळून झूलॉजी - प्राणीशास्त्र
logos - knowledge
arthron in greek means joints, podos means leg - Arthropoda - animals with jointed legs - कीटक
bios in greek means life - यावरुन बायॉलॉजी
आपले सूर्यफूल, झेंडूचे फूल, अॅस्टर तसेच कॉसमॉस फ्लॉवर, एकदांडी - अशी अजूनही लिस्ट वाढवत नेली की तयार होईल एक फॅमिली - कूळ - Asteraceae (aster in greek means star). या कुळातील नेमका झेंडू हवा असेल तर होईल हे नाव Tagetes erecta. तर अशा पद्धतीने एकाच कुळात अनेक जेनरा (जिनसचे अनेकवचन) येतात. या टॅजेटस जिनसमधेही अनेक सबस्पिसिज असतात. पण हे Tagetes erecta नाव घेतले की एकच फूल किंवा वनस्पतीसंबंधी तुम्ही बोलत आहात हे जगात कोणालाही लक्षात येईल.
इति वर्गीकरणनामे प्रथमोध्यायः ||
टीप - बोटॅनिस्ट, दिनेशदा, साधना, शांकली, इ. तसेच अजून कोणी जाणकार यात भर घालतीलच व कोणाच्या तांत्रिक शंकांना उत्तरे देतील. मी फक्त शशांक उवाच (सूतोवाच च्या चालीवर) केले आहे (मी फार जाणकार नाही).
सुप्रभात. प्राजक्ताचे
सुप्रभात.
प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे
हो आता खरच माझी चौकशी करत जा हो मधुन मधून ४ दिवस ऑफिसला थकवा येतो म्हणून नाही गेले. सोमवारपासुन जाणार आहे. तेंव्हा माबो रेग्युलर. सध्या ४ दिवस आईकडे येउन जाऊन आहे म्हणुन माबोवर नाही. पण आई कडे गेल्यावरपण जेवणानंतरच्या वेळेत फुलपाखरांच्या मागे फोटो काढत धावते
सगळे कसे आहात ?
जिप्स्या तुझा कोलाज नाही आला अजुन पाठव लवकर. मी हा असाच टाईमपास कोलाज बनवला. अजुन कोणाकडे पुस्तकातले छान उतारे असतील तर तेही मला मेल करा म्हणजे मी ते फ्रंट पेजवर टाकते.
शशांक इथ अशा चांगल्या
शशांक इथ अशा चांगल्या गोष्टींचा क्कोण्ण्णाला राग येत नाही. येउद्यात की अजुन माहिती. काय निगप्रेमींनो?>>>>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी मोनाली!
आणि शांकली........प्राजक्ताची "फोड" छान आहे. इन्टरेस्टिग!
व्वॉव्व जागू केम बॅक!! फूल
व्वॉव्व जागू केम बॅक!! फूल फार सुंदर!!!!..... ऑर्किडची आठवण करून देणारं!!
असाच टाईमपास कोलाज बनवला >>>>
असाच टाईमपास कोलाज बनवला >>>> 'टाईमपास' काय जागू ?, मस्तच जमलाय - भारी आहे हा, काढू नकोस.
जिप्सीचा आलाच तर पुढच्या भागासाठी ठेव.
ओ हाय जागु... तुला शोधतच होतो
ओ हाय जागु... तुला शोधतच होतो आम्ही सगळे...
असाच टाईमपास कोलाज बनवला >>>>
असाच टाईमपास कोलाज बनवला >>>> 'टाईमपास' काय जागू ?, मस्तच जमलाय - भारी आहे हा, काढू नकोस>>>>हो हो खरंच. मी पण हेच लिहायला आलो होतो.
रच्याकने, जागू मला एक मिस कॉल दे ना मी. समहाऊ तुझा नंबर नाही मिळत आहे.
शांकली, प्राजक्ताला बॉटनीत
शांकली, प्राजक्ताला बॉटनीत म्हणतात निक्टॅन्थस अर्बोर ट्रिस्टिस! (आपलं प्राजक्त किंवा पारिजातक छान आहे नै?) Nyctanthes arbor tristis पण या बोटॅनिकल नावाची फोड अशी आहे रात्री उमलणारा आणि- टपटप अश्रू गाळणारा! कारण याची फुलं इतकी नाजूक आहेत; की सूर्योदयानंतर लगेच झाडापासून गळून पडतात जणू काही झाड अश्रूच गाळतंय!! बोटॅनिकल नावांची अशी एक वेगळीच गंमत असते. आणि अशी फोड समजली की ती नावं अवघड न वाटता त्यांची पण मजा घेता येते.>>>>
गूगलवर Nyctanthes arbor tristis शोधून पाहिले. छान प्राजक्ताची फुले. याचे देठ वेगळे करून त्यापासून रंग तयार करतात. तसेच याच्या पानांचा ऑषधी उपयोग आहेत. (ताप, सर्दी)
http://chestofbooks.com/health/materia-medica-drugs/Hindus-Materia-Medic...
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे !!!>>
>>>>>>>>>>दिनेशदा पटलं!
प्राजक्तस निप्रेमस - हे
प्राजक्तस निप्रेमस - हे प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव...
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल
शांकली, प्राजक्ताचे बोटॅनिकल नाव काहिही असू दे, इथले नाव मात्र जागू आहे !!!>>>>>..:हाहा: अगदी खरं
जागू, मस्त फुल. कशी आहेस ग?
जागू, मस्त फुल.
कशी आहेस ग? जरा संपर्कातून तुझा मो. नं पाठव. माझा मो. बंद आहे.
Pages