Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता तुकोबांना सदेह स्वर्गात
आता तुकोबांना सदेह स्वर्गात न्यायला पुष्पक विमान आलं तसं घनाला न्यायला एयरफोर्स वन येतं असं दाखवा आणि संपवा हे दळण एकदाचं.
>>
छन्न पकैय्या छन पकैय्या अकलपे
छन्न पकैय्या छन पकैय्या अकलपे पड गये ताले
संभल जाओ अमेरिकावालो के आ रहे है घनश्याम काले
हा हा हा स्वप्ना लईच भारी
हा हा हा स्वप्ना लईच भारी
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना.. ओएमजी..जिवंत
स्वप्ना..
ओएमजी..जिवंत असेपर्यंत मालिका चालू म्हणजे जरा फारच अति झालं..थोडक्यात आवरो..!
अंजली, संपदा, मुग्धा >>आम्ही
अंजली, संपदा, मुग्धा
>>आम्ही जिवंत असेपर्यंत ही मालिका चालू असावी
अशी पोस्ट करणारे सगळे बहुधा स्वप्नील जोशीचे मित्र-मैत्रिण असावेत.
>>आत्या तर प्रचंड डोक्यात
>>आत्या तर प्रचंड डोक्यात जाते. काय ते सारखं सारखं 'जमाईबापू कुठे आहेत'. स्वतःचा नवरा काय करतोय ते माहित आहे का हिला? आता तर इथेच ठाण मांडून बसलेय. परत हे कमी म्हणून मध्येमध्ये हिंदी पेरते. कहर आहे!
स्वप्ना
माझ्या नात्यातलेच काही मध्य प्रदेशातले (इंदूर, भोपाळ) आहेत. ते सुद्धा आत्याबाईंची धेडगुजरी भाषा ऐकून वैतागलेत
स्वप्ना
स्वप्ना जबरदस्त!!!!!!!!
घनाच्या आई बाबांची reaction बघुन हा अमेरिकेला नाही तर दाऊद इब्राहीमच्या टोळीत सामिल व्हायला जात आहे अशी मला शंका आली.
अशी पोस्ट करणारे सगळे बहुधा
अशी पोस्ट करणारे सगळे बहुधा स्वप्नील जोशीचे मित्र-मैत्रिण असावेत. >> मित्र-मैत्रीणी इतक्या बिनडोक नसतील. त्या त्याच्या ड्यु-आयड्या असतील.
भाटेकाकुंच्या तोंडी असलेले
भाटेकाकुंच्या तोंडी असलेले संवाद बर्यापैकी चांगले होते. मुलगा खोटं बोलायला लागणे यातील आपली चूक, तगमग आणि व्यथा छान व्यक्त झाली होती.
आत्तीमध्ये क. न. ते जुन्या सुकन्येची झाक दिसली.
स्वप्ना , नताशा, माधव
स्वप्ना , नताशा, माधव
काल हाय स्ट्रीट फिनिक्सला
काल हाय स्ट्रीट फिनिक्सला गेलो होतो तेव्हा तिथे बहुतेक राधाच्या आत्याबाई आल्या होत्या. गर्दी होती त्यामुळे नक्की सांगता येत नाही. 'जमाईबापू कुठे आहेत' असं विचारण्याचा फार मोह झाला होता
प्रोमोमध्ये दाखवत आहेत की राधा घनाकडे डिव्होर्सची प्रोसेस सुरु करण्याबद्दल विषय काढते. आता हे मनापासून आहे की नुस्तं त्याला जागं करायला आहे ते कळेल. वर हा ठोंब्या 'पण माझं अजून अमेरिकेला जायचं फिक्स झालेलं नाही' असं काहीतरी म्हणतो. म्हणजे राधाने ह्याचं सगळं व्यवस्थित मार्गी लागेपर्यंत थांबायचं का काय? किती स्वार्थी माणूस आहे हा.
म हा न आ च र ट मालिका
म हा न आ च र ट मालिका
त्याला मनापासुन फारकत नकोच
त्याला मनापासुन फारकत नकोच आहे राधापासुन. राधाची गरज ह्या दोन्ही कुटुंबांना आहे असं त्याला वाटतय ना. हा पण एक स्वार्थीपणाच.
शिवाय परवाच्या एपिसोडमधे घना आईला मी एकटा जाइन असं म्हणतो तेव्हा तिने काय गहजब झाल्याचं दाखवलय. लोकं जात नाहीत का एकटी?? मी तर म्हणते घरच्यांनी त्याला म्हणावं जा तू एकदा अमेरिकेला. असं पण घनासारखं कॅरेक्टर अमेरिकेला फार दिवस एकटं नाही राहु शकणार.
'पण माझं अजून अमेरिकेला जायचं फिक्स झालेलं नाही' >> ह्यावर राधाने आज त्याला सुनावलं पाहिजे जाम.
तो पण राधात गुंतलाय हे त्याने
तो पण राधात गुंतलाय हे त्याने कबुल केले की! त्यामुळे स्वार्थी नाही वाटला पण मूर्ख वाटला.
आपल्या घरच्यांना राधाची गरज आहे म्हणून तिला अमेरीकेला न्यायचे नाही हा मात्र स्वार्थीपणा.
एकूणात घना गंडला आहे.
एकूणात घना गंडला आहे. मेलोड्रामा मात्र आवरा. इलाकाकू आणि आजी- अती करत आहेत!
आता परिक्षा चिन्मय मांडलेकर आणि मनुस्विनीची आहे!
घनाच्या आईवडिलांनी "जातो आहेस
घनाच्या आईवडिलांनी "जातो आहेस तर जा बाबा एकदाचा अमेरिकेला" हा पवित्रा घेतला ते बरं केलं. राधानेही फारसं महत्त्व देऊ नये. माझी आजी म्हणायची तसं घनाला 'कळेल आता गोरीचं गोरेपण'
मनमोहन सिंग ऑफिसात येऊन
मनमोहन सिंग ऑफिसात येऊन खुर्चीवर बसतात न बसतात तोच फोन वाजतो.
मनमोहन सिंग: हॅलो, हॅलो, कोण बोलतंय?
पलीकडूनः बस काय सरजी, ओळख्लं नाही? मी ओबामा बोलतोय
मनमोहन सिंग: (थोड्या घुश्श्यात) आता काय बोलायचं राहिलंय बाकी? ते पण बोलून टाका
ओबामा: बाप रे! आज एकदम भडकू मूडमध्ये? सोमवार सकाळ म्हणून की काय?
मनमोहन सिंग: कसली सकाळ? तुम्ही सगळा आठवडा नासवला आमचा. आधी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पहावं माणसाने आणि मग दुसर्याच्या भानगडीत नाक खुपसावं.
ओबामा: चिडू नका हो. असं बघा, आमच्या पायाखाली बरंच काही जळतंय. त्याच्या धुराकडे आमच्या जनतेचं लक्ष जाऊ नये म्हणून तुमच्या इकॉनॉमी आणि पॉलिसी बद्दल बोललो हो. आता तुम्हाला पटवून द्य्यायला काय करू?
मनमोहन सिंग: कृपा करून आणखी काही करू नका. केलीत तेव्हढी मेहेरबानी पुरेशी आहे.
ओबामा: तरी पण गरीबासाठी काही सेवा असेल तर सांगा.
मनमोहन सिंग: हं, तसं एक काम आहे खरं. आमच्या देशात एक घन:श्याम काळे म्ह्णून मुलगा आहे बरं का. त्याला किनई तुमच्या देशात यायची फार फार इच्छा आहे. गेले १०-१२ वर्ष प्रयत्न करतोय. पण जमत नाहिये. आता कुठे त्याला एक ऑफर आली आहे. व्हाईट हाऊसकडून एक लेटर मिळालं तर बरं होईल. म्हणजे कुठे माशी शिंकणार नाही.
ओबामा: एव्हढंच ना, आत्ता देतो लेटर. पण हा काळे काय बायकोचा नातेवाईक आहे का?
मनमोहन सिंग: अनुभवाचे बोल वाटतं? नाही, पण आजकाल त्याच्या अमेरिकेला जाण्यावरून बरीच चर्चा चालली आहे. सरकार ह्याबाबत काही करत नाही अशी ओरड सुरु व्हायच्या आत आपलं काम केलेलं बरं, काय?
ओबामा: अगदी अगदी. काम झालंच म्हणून समजा. आता हसा बघू.
मनमोहन सिंग हसतात. आणि ते पाहून आत आलेला त्यांचा खाजगी सचिव बेशुध्द पडतो.
--------
न्यूज चॅनेल्सवर ब्रेकिंग न्यूज - प्रधानमंत्रीजीके निजी सचिव यकायक बेहोश. क्या नयी चाल चल रहा है पाकिस्तान?
स्वप्नील जोशीचं फेसबुक पेज - मालिकेत लवकरच एक ट्विस्ट येणार. बघत रहा 'एका लग्नाची दुसरी गोष्ट'
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना
स्वप्ना >>>>>>>>>> काय
स्वप्ना >>>>>>>>>> काय बोलायचे ह्यावर???? solid
>>मनमोहन सिंग हसतात. आणि ते
>>मनमोहन सिंग हसतात. आणि ते पाहून आत आलेला त्यांचा खाजगी सचिव बेशुध्द पडतो.
स्वप्ना
स्वप्ना.....................
स्वप्ना..................... किती हसवशील....
(No subject)
(No subject)
घना त्यागमूर्ती पोझ घेवून 'मी
घना त्यागमूर्ती पोझ घेवून 'मी इतका स्वार्थी नाही' म्हणणं म्हणजे स्वत:ला फसवण्याचा उत्तम नमुना आहे. नोकरीसाठी लांब जाणाऱ्या प्रत्येकालाच हा प्रश्न सोडवावा लागतो. काही लोक जायचं रद्द करतात. काही इथल्यांना नशिबावर सोडून जातात, आणि काही '२ ध्रुवांवर' संसार करतात. पण तुझी इथे जास्त गरज आहे, म्हणून कोणी घटस्फोट घेत नाहीत! आणि घटस्पोट घेतल्यावर राधाला काळे कुटुंबियांची काळजी घेण्याचं कारण काय? कि आत्याचा घटस्फोटित नवरा जसा अजूनही त्यांच्याशी जोडून राहिला आहे, तशीच परंपरा राधाही पुढे नेईल अशी खात्री घनाला वाटते आहे?
त्या अबीरच पुढे काय करावं हे बहुतेक लेखक मंडळींना सुचत नाहीये. त्यामुळे त्याला नुसताच चक्का टांगल्यासारखा टांगला आहे.
स्वप्ना, जबरदस्त !!!. गेले २
स्वप्ना, जबरदस्त !!!. गेले २ महिने सिरीयल बघण्यापेक्षा इथली चर्चा, त्यातही तुझ्या पोस्ट्स, वाचून जास्त मजा येत आहे. (ही माझी पहिलीच प्रतिक्रिया. आज प्रतिक्रिया दिल्यावाचून राहावलंच नाही.)
आजचा सु.काकूचा संवाद 'तू
आजचा सु.काकूचा संवाद 'तू भाउजींना सांग, माझ्या मुलीचे लग्न आहे. मी वरमाय ??? आहे'
मंडळी, धन्स! माधव, अगदी अगदी.
मंडळी, धन्स!
माधव, अगदी अगदी. ही मालिका इतकी संथ चालली आहे की लेखिका, दिग्दर्शक आणि कलाकार सगळेच झोपलेत बहुतेक
अबीर शेवटचा धक्का देणार
अबीर शेवटचा धक्का देणार म्हणजे राधाला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तिला सांगणार बहुतेक.
त्या कुहूचा साखरपुडा कशाला करताहेत? लगेच लग्न लावून टाका म्हणावं नाहीतर बाशिंग बांधून बांधून तिचा गुडघा दुखायला लागेल.
Pages