एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधाच्या व्यक्तिरेखेबद्दल स्वप्नाला अगदी अगदी. तो बिलगून रडण्याचा सीन अगदीच नाही आवडला. आणि ते घनाचं तिला लहान मूल असल्यासारखं ट्रीट करत समजावणं.. 'आईचा वाढदिवस विसरल्याचा सीन बरा जमला.. करा रिपीट'टाईप वाटलं ते सगळं!
<< श्रद्धा + १

राधा तिच्या पपांबद्दल किती हळवी आहे हे ते लोक जाणतात. तिच्या ह्या वीक पॉईंटचा चुकीचा वापर करणं किती निर्दय आहे! घरातलेच लोक 'संसार वाचवण्या'च्या महान कामासाठी ही असली पावलं उचलतील का? एवढंच असेल, तर दोघांना समोरासमोत बसवून सोक्षमोक्ष लावतील ना काय तो. घनाला मुलाखतीला जाऊ न देणं, राधाला पपा गंभीर आजारी आहेत असं सांगणं.. आपल्याच मुलांच्या भावनांशी हे असं खेळणं म्हणजे अगदीच थम्ब्ज डाऊन!

<<< पौर्णिमा +१

राडा झालाय खरच सिरियल चा , बरेच वर्षांनी, ते ही नेट वर पुढच्या एपिसोड ची वाट पहात ही सिरियल पहायला सुरवात केली पण लुक्स लाइक अता माझ्या इंटेरेस्ट चं काही दिसत नाहीये !
सुरवातीला ही सिरियल 'ससुराल गेन्दा फुल' पेक्षा उजवी आणि प्रॅक्टिकल वाटली, राधा सुध्द्दा सुहाना पेक्षा उजवी वाटली पण 'सगेफु' मधे सुहाना बरीच प्रामाणिक राहिली कॅरॅक्टर शी.. इथे सगळाच जाम लोचा झालाय ! Uhoh

कालचा उल्काआत्याचा शेवटचा संवाद भारी होता - 'तू परिस्थीतीनुसार सल्ला घ्यायला माणूस निवडतोस' अशा अर्थाचा.

आता राजवाड्यांच्या परिक्षेचा काळ सुरू झालाय. मालिका इथपर्यंत तरी छान झाली. पण आता राजवाड्यांची नेहमीची लक्षणे दिसायला लागली:
मालिकेत पाणी घालून कथानक पुढे न सरकणे
शेवट काय होणार हे लक्षात यायला लागणे
आणि तोच शेवट साधताना मालिकेचा प्रचंड पोपट होणे

यावेळेस तरी सावरतात का ते बघायचे.

एक माणूस आपल्या फक्त भूतकाळातच असलेल्या, (तेव्हाही फार अर्थपूर्ण नाते नसलेल्या) आणि आता हयातच नसलेल्या व्यक्तीला दिलेल्या शब्दापोटी शक्य होत नसतांनाही सर्व ताण सोसून अमेरिकेला जाण्यासाठी आटापिटा करतो आहे. एक बाई, जिला स्पष्ट शब्दात अनेक वेळा त्याने नकार दिल्यावरही ती त्याच्या मागे-मागे फिरतेच आहे..

आणि हे आत्यंतिक इमोशनल अत्याचार झालेले कपल म्हणते- "आमचं वेगळंय.. आम्ही प्रॅक्टिकल आहोत.." Rofl

काल ते अबीर स्क्रीन वर आल्यावर खाली डँबिसची जाहिरात आलेली.

अजून दहा वर्षात मुक्ता ला आत्तीचे रोल मिळतील का? आतीचा चेहरा किती बोजड होत चालला आहे. आसावरी मस्त बोलली काल. आवडले.

बरे घला इंटरव्ह्यू ला अस्ले कपडे घालून जाणार का? चौकडीचा शर्ट तो ही पोटावर घट्ट. तो तयारी म्हणून कपाटातून अनेकानेक भयानक शर्ट काढत होता. भारतात पण घेणार नाहीत. इथे तर ओबामा खोळंबलेत. पेंटागॉन मिस्ड कॉल देते आहे, वॉलस्ट्रीट बंद पडणार हा नाही गेला तर अशी इमरजन्सी आहे.

आजच्या एपिसोडमध्ये प्राचीआत्या आणि पपा दोघंही राधाला पण दोष देताहेत. वास्तविक तिनी प्रेमाची घनाजवळ कबूली देऊन तिला लग्न टिकवायचं आहे हे सूचित केलं आहे. हे विनोदकाकांनी माईआजींना सांगितलं आहे. पण( लबाड ) माईआजी हे प्राचीआत्याला सांगत नाहीत. त्यामुळे प्रा.आ. आणि पपा ' जमाईबापू ' किती चांगले चं तुणतुणं वाजवताहेत. वास्तविक राधातला हा बदल त्यांना कळला तर... " अरे ! आधी कशी होती राधा ! हीचं सासरच्या लोकांशी कसं जमेल याची केवढी चिंता वाटत होती. त्या भरात ' जावईबापूंना ' तिला वठणीवर आणा असं सांगितलं होतं, पण आता तर तीच त्याला वठणीवर आणणार असं दिसतंय. " असले संवाद पपांच्या तोंडी असायला पाहिजेत. ( आणि पुढे योग्य वेळी पपांनी ते त्या ठोंब्या घनाला ऐकवायला पाहिजेत) राजवाड्यांनी त्यांच्या नायिकेला एवढं बदलायला लावलं पण त्या बदलाचं श्रेय मात्र ते तिला देत नाहीयेत. एवढी नायिका प्रधान मालिका असूनही. ( आजपर्यंत एकही एपिसोड राधाशिवाय नाहीये.)असो.
हे लिहीण्याचं कारण नेहमीचंच... कुणी संबंधित लोकं हे वाचत असतील तर....

कालचा उल्काआत्याचा शेवटचा संवाद भारी होता - 'तू परिस्थीतीनुसार सल्ला घ्यायला माणूस निवडतोस' अशा अर्थाचा.>>>> +१. मलापण जाम आवडल...:)

बरे घला इंटरव्ह्यू ला अस्ले कपडे घालून जाणार का? चौकडीचा शर्ट तो ही पोटावर घट्ट. तो तयारी म्हणून कपाटातून अनेकानेक भयानक शर्ट काढत होता. >> अ मा , त्या शर्ट चे हात पण फोल्ड केलेले तसेच होते ..

आपला प्रेमाचा आदर नसलेल्या नात्यात इतकं पिघळणं , ते ही आताच्या काळात दाखवलेली मुलीचे (पात्र) म्हणून जराही आवडले नाही.
पण काही मुली खर्‍याच इतक्या वेड्या असतात ना, .. ज्या इतक्या उच्चशिक्षित, भरपूर स्वतंत्र विचारांच्या( ?) असतात , करीयर मध्यी पुढे पन अश्या मुर्खांच्याच प्रेमात पडतात. Sad

कालचा उल्काआत्याचा शेवटचा संवाद भारी होता - 'तू परिस्थीतीनुसार सल्ला घ्यायला माणूस निवडतोस' अशा अर्थाचा.>>>> +१. मस्तच.

काल रात्री जागून मागच्या आठवड्याचे सगळे एपिसोडस युट्यूब वर पाहिले. राधाच्या खंबीर व्यक्तिरेखेची जी गफलत करून ठेवलीये त्याबद्दल स्वप्नाच्या आणि त्याला अनुसरून वरच्या पोस्ट्स ना >>>> अगदी अगदी..
पण तिचा अभिनय खरंच माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाच्या मनाचा ठाव घेऊन जातो कधी-कधी. मी थोडी मागे जात्ये खरं पण ती खिडकीत उभे असतानचा प्रसंग बघून मन नुसतं हेलावून नाही गेलं, मी अक्षरश: ओक्साबोक्शी रडले..
माहित नाही का ते.. नंतर माझंच मला वाटलं की मी खूप अतिरेकी रिअ‍ॅक्ट झाले पण ही तिच्या अभिनयसामर्थ्याला एका सामान्य व्यक्तीच्या विचारांकडून गेलेली दाद होती असा मला वाटतं..

उल्का आत्याचा संवाद-> १००% पटेश.. Happy
'घना, तू ना, परिस्थितीनुसार माणूस निवडतोस सल्ला घ्यायला (...) म्हणजे मग तुला, तुला हवं तेच उत्तर बर्रोबर मिळतं' = 'घना'च्या व्यक्तिमत्त्वाचा core point!!

कालचा उल्काआत्याचा शेवटचा संवाद भारी होता - 'तू परिस्थीतीनुसार सल्ला घ्यायला माणूस निवडतोस' अशा अर्थाचा.>>>> ++++++१. सही एकदम .

कालचा उल्काआत्याचा शेवटचा संवाद भारी होता - 'तू परिस्थीतीनुसार सल्ला घ्यायला माणूस निवडतोस' अशा अर्थाचा.>>>> +१.

घनाचे बाबा: "तू अँटार्क्टिकाला जरी गेलास ना.........." Rofl

झाला एकदाचा सिलेक्ट! प्रेक्षक सुटले. हा जाईल न जाईल त्याला फारसे महत्व उरले नाही. Wink
आजच्या भागात मात्र भावनांचा रतीब घातला त्याच्या आईने. Wink

घनाची खरी पंचाईत आता होईल, घरचे म्हणतात जा बाबा एकदाचा, राधाही तुटक वागतेय.. भोग म्हणावे आपल्या कर्माची फळे.

खात्रीदायक सुत्रांकडून कळलय की ही मालिका ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपणार आहे. राजवाडेनी एका मुलाखतीत सांगितलय म्हणे. (हा बाफ वाचून खूप परिणाम झालेला दिसतोय)

मी ही सिरियल आई बाबा पाहत असतात तेंव्हा अधुन मधुन ऐकते, पाहण्याची इच्छा होत नाही. चाचरत बोलणं तर डोक्यात जातं.

परवा चेपुवर स्वप्नील जोशीचं पेज पाहत होते, त्यावर त्याने लोकांना विचारलं होतं तुम्हाला ही मालिका कधी संपावी असं वाटतं, तर ७०-८०% लोकं रडायलाच लागली, संपवू नका संपवू नका, आम्हाला घना आणि राधाची खूप आठवण येईल, आम्ही जिवंत असेपर्यंत ही मालिका चालू असावी, आणि अजून काय काय रिप्लाईज रे देवा! म्हटलं असल्याच लोकांमुळे केकता सारखी लोकं तयार होतात. रिप्लाय करणार्‍या लोकांनी ८० च्या दशकातल्या १३ भागाच्या, आठवड्यातून एकदाच लागणार्‍या सिरियल्स कधी पाहिल्या नव्हत्या वाटतं!

मालिका जर आधी सारखी चांगली चालु राहिली असती तर मलाही चालुच रहावी असं वाटलं असतं पण अता टु मच होतय :(.

मलापण घनाचं ते चाचरत बोलणं खूप डोक्यात जातं. एवढं एक वाक्य सरळ बोलता येत नसेल त हा बाबा ईंटव्ह्यु मध्ये काय दिवे लावणार आहे. अमेरिकेतले हायस्कूल ग्रॅज्युएटस् सुद्धा किती आत्मविश्वासानी बोलतात, मग त्यांचं वय काहीही असो Proud आणि हा! आणि ते वाक्य बोलून झाल्यावर ९१ मिनीटांनी "राधा" म्हणणं पण तेवढंच डोक्यात जातं.

आणि ते वाक्य बोलून झाल्यावर ९१ मिनीटांनी "राधा" म्हणणं पण तेवढंच डोक्यात जातं.

ती त्याची सिग्नेचर स्टाईल आहे. वाक्य बोलुन झालं की ते कोणाला उद्देशुन बोललेला हे त्याला स्वतःला कळावं म्हणुन तो ९१ मिनिटांनी त्या व्यक्तीचे नाव घेतो. आईशी बोलतानाही आयडी हा शब्द ब-याच वेळाने उच्चारलेला ऐकलाय..

परवा चेपुवर स्वप्नील जोशीचं पेज पाहत होते, त्यावर त्याने लोकांना विचारलं होतं तुम्हाला ही मालिका कधी संपावी असं वाटतं, तर ७०-८०% लोकं रडायलाच लागली, संपवू नका संपवू नका, आम्हाला घना आणि राधाची खूप आठवण येईल, आम्ही जिवंत असेपर्यंत ही मालिका चालू असावी

मग हा रिअ‍ॅलिटी शो होईल, घनाराधाची मुले, त्यांची मुले इ.इ.... इSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSss

आम्ही जिवंत असेपर्यंत ही मालिका चालू असावी, >>> कहर!! Rofl

त्यांना गेट वेल सून!

एलदुगो पेज म्हणतं ११ ऑगस्ट. राजवाडे म्हणतात ऑगस्टचा शेवट. म्हणजे ११ ते ३१ ऑगस्ट कृष्णधवल आणि रंगीत अनुक्रमे 'तेव्हा आणि आता' येणार! तयार रहा! Biggrin

मी बरेच दिवस पाहिली नाहि मालिका. >> + १
>>>>>>>>>>>>>>>>

+१००० ....... मी फक्त हा धागा वाचतोय हल्ली....... नाहीतर घरात असलोच तर आईच्या कृपाप्रसादाने "देवयानी" बघावी लागतेय....... तशी देवयानी राधापेक्षा बरी आहे दिसायला Proud Wink

कुहूचं काही आलं की अपडेट्स द्या लोक्स.... बाकी बघण्यातला इंटरेस्टच संपलाय Sad

राजवाडे म्हणाले होते "आहे ते संपवतोय"..... खरंच संपवायच्या मार्गाला दिसतायत....... Wink

म्हणजे ११ ते ३१ ऑगस्ट कृष्णधवल आणि रंगीत अनुक्रमे 'तेव्हा आणि आता' येणार! तयार रहा! <<<< छ्या! सहा महिन्याच्या छोट्याशा मालिकांना काय 'तेव्हा आणि आता' करतात? एकताबाई बघा, सहासहा वर्षं नायकनायिकेच्या जोड्यांचे अगणित परम्युटेशन-कॉम्बिनेशन्स दाखवतात, त्यांना कध्धीच नाही पडली गरज 'तेव्हा आणि आता'ची. यामुळेच मराठी माणूस, मराठी मालिका, मराठी प्रेक्षक मागे राहतात. Proud

राजवाडे - मुक्ता जोडीचा सोबत उपेंद्र आनंद इंगळे "बदाम राणी गुलाम चोर" २० तारखेला येतोय..... काही भाग बघायला मिळाले... Happy धमाल येणार आहे.... !!!!! (माकडाच्या हाती शँपेनवर बेतलेला).

नक्की पाहूया Wink (म्हणजे आपापली तिकिटे काढून....... नेटवर अजिबातच नाही Proud )

>>तो तयारी म्हणून कपाटातून अनेकानेक भयानक शर्ट काढत होता. भारतात पण घेणार नाहीत. इथे तर ओबामा खोळंबलेत. पेंटागॉन मिस्ड कॉल देते आहे, वॉलस्ट्रीट बंद पडणार हा नाही गेला तर अशी इमरजन्सी आहे.

>>वाक्य बोलुन झालं की ते कोणाला उद्देशुन बोललेला हे त्याला स्वतःला कळावं म्हणुन तो ९१ मिनिटांनी त्या व्यक्तीचे नाव घेतो.

Proud उल्काआत्याचा संवाद सॉलिडच होता. खेटराने मारल्यासारखा चेहेरा झाला घनाचा. त्याला आधीच असं अधनंमधनं फटकावलं असतंन तर ही वेळ नसती आली.

घनाचे दोन्ही काका त्याच्या मातापितरांना तो अमेरिकेला जायचं म्हणतोय ते सांगायला येतात तेव्हा भाटेकाकूंनी जगबुडी आल्याचा अभिनय (पुन्हा एकदा!) केला. वैताग आलाय! ह्या बाईला एव्हढीच रेंज आहे काय अभिनयाची?

आत्या तर प्रचंड डोक्यात जाते. काय ते सारखं सारखं 'जमाईबापू कुठे आहेत'. स्वतःचा नवरा काय करतोय ते माहित आहे का हिला? आता तर इथेच ठाण मांडून बसलेय. परत हे कमी म्हणून मध्येमध्ये हिंदी पेरते. कहर आहे!

आता तुकोबांना सदेह स्वर्गात न्यायला पुष्पक विमान आलं तसं घनाला न्यायला एयरफोर्स वन येतं असं दाखवा आणि संपवा हे दळण एकदाचं.

राधाने आणखी लाळघोटेपणा करू नये अशी माफक अपेक्षा आहे. सध्या देते आहे तीच वागणूक घनासारख्यांना बरोबर आहे.

Pages