Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच काल कुहूच्या लग्नाची
खरंच काल कुहूच्या लग्नाची तयारी करायची म्हणुन हरखुन गेलेल्या भाटेकाकु पाहुन यांच्या डोक्यातुन वारे गेलेय की काय अशी शंका आली.. तिच्या आईला पाहुन तर कुहुपेक्षा आधी यांनाच आवरा म्हणुन ओरडावेसे वाटले. बाबाही तसलेच. कुहू अगदी शोभते दोघांना..... काय आचरटपणा चाललाय..
उल्कीचा जागी मी असते तर त्या दोन बायकांचा अत्याचार पाहुन दोन महिने तरी घरापासुन लांब पळाले असते.
उल्कीचा जागी मी असते तर त्या
उल्कीचा जागी मी असते तर त्या दोन बायकांचा अत्याचार पाहुन दोन महिने तरी घरापासुन लांब पळाले असते.>>> + १००
हल्ली फार कंटाळवाणे झालेले
हल्ली फार कंटाळवाणे झालेले आहे. नाही पाहिले तरी चालते!!!!
मुक्ता आज पेज ३ सेलेब्रिटी
मुक्ता आज पेज ३ सेलेब्रिटी आहे.
टाइम्समधे तिचा फोटो आला आहे.
आपण तिच्या गुड लुक्स आणि ड्रेसिंग (नो) सेन्स वर इथे लिहितो, तसंच टाइम्समधेही - ती छान दिसत होती, पण तिच्या आउटफिटचं फिटींग बरोबर नव्हतं अशी एक कमेंट टाकली आहे.
बाकी पेज ३ वरचे नेहमीचे फोटो आणि आजचे मराठी कलाकारांचे फोटो बघितल्यावर मराठी माणसाची सादगी परत एकदा ठसली.
या कलाकारांकडुन थोडंसं ग्लॅमरस दिसावं अशी अपेक्षा असते. असो. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राजवाडे, मालिकेत काय वाट्टेल
राजवाडे,
मालिकेत काय वाट्टेल ते राडे करा.
पण इथे या बाफावर काहीतरी खाद्य पुरवा रोजच्या रोज !
खरंच काल कुहूच्या लग्नाची
खरंच काल कुहूच्या लग्नाची तयारी करायची म्हणुन हरखुन गेलेल्या भाटेकाकु पाहुन यांच्या डोक्यातुन वारे गेलेय की काय अशी शंका आली.. >>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हल्ली दर भागात गेल्यावेळेचा
हल्ली दर भागात गेल्यावेळेचा भाग रिवाईंड करुन दाखवण्यात पहिली पाच-सात मिनिटं खर्ची घालतात ते फार बोअर होतंय.
अता विनय आपटेही सामील झाला का
अता विनय आपटेही सामील झाला का नाटकात, खोटं आजारी पडून ??![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
घना आणि राधा काहीतरी " अजारपण-भिती-इमोशनल वादळ' अशा गोष्टींनी हमखास जवळ येतात बाकी
आता घनाचं इंटरव्यूला जाणं
आता घनाचं इंटरव्यूला जाणं रद्द होणार वाटतं आजारपणाच्या नाटकामुळे?
कालच्या भागात फ्लॅशबॅक
कालच्या भागात फ्लॅशबॅक गुंहृहे सारखा ब्लॅक अँड व्हाईट रंगात दाखवून राजवाडेंनी सिग्नेचर स्टाईल दाखवली
तरी नशिब की आत्ता आणि पूर्वी असलं काही लिहिलं नव्हतं ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
परवाच्या एपिसोडमध्ये घना
परवाच्या एपिसोडमध्ये घना मानभावीपणे 'माझं अमेरिकेला जाणं घरचे कधी स्वीकारणार' असं म्हणतो तेव्हा डोक्यात तिडीक गेली अगदी. लेका, तू खरं सांगितलं आहेस कुठे त्यांना? सांगून टाकावं ना स्वच्छ की मला माझी बालमैत्रिण 'यू डिझर्व्ह अमेरिका' म्हणाली होती म्हणून मी आटापिटा करून चाललोय. घरच्यांना ती ह्यचा सॉफ्ट कॉर्नर होती हे माहित आहे. त्यामुळे त्याचं तिच्यावर प्रेम होतं पण ते तो व्यक्त करू शकला नाही हे सांगितलं नाही तरी चालेल. मला वाटतं घनाला कुठेतरी माहित आहे की हे कारण मूर्खपणाचं आहे. किंवा आपले प्रयत्न कमी पडलेत ह्याची त्याला जाणीव आहे (कदाचित प्रोग्रॅमिंग केलं असतं तर पटकन गेला असता अमेरिकेत!). म्हणून तो सगळं स्वच्छ सांगत नाहिये. वर 'मी बघा कसा बिच्चारा' चा अॅटिट्युड वैताग आणतो.
परवा रतन टाटांच्या मुलाखतीत वाचलं की त्यांना आर्किटेक्ट होऊन अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. पण ते झालं नाही, त्यांचं कारण काही का असेना. घनाला सांगावंसं वाटतंय अरे बाबा, टाटांचं असं झालं तर तू किस खेतकी मूली है![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कालचा एपिसोड चुकला ही
कालचा एपिसोड चुकला ही इष्टापत्तीच असावी असं बाकीच्या पोस्टसवरून वाटतंय
पण काळे कुटुंबीय जरा जास्तच
पण काळे कुटुंबीय जरा जास्तच करतात. असेल एखाद्याची इच्छा, इथे तर आपलाच मुलगा, तर जाऊदे की त्याला अमेरिकेला. काय विशेष इतकं? आणि बायकोलाही नेता येतं बरोबर. एकट्यालाच जायला लागतं असं काही नसतं! घरचेच लोक इतका अडसर कसे असू शकतात?
असे बेसिकमध्ये घोळ असले की त्या त्या इश्यूपुरती सिरियल कंटाळवाणी होते.
परवा रतन टाटांच्या मुलाखतीत
परवा रतन टाटांच्या मुलाखतीत वाचलं की त्यांना आर्किटेक्ट होऊन अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. पण ते झालं नाही, त्यांचं कारण काही का असेना. घनाला सांगावंसं वाटतंय अरे बाबा, टाटांचं असं झालं तर तू किस खेतकी मूली है >>>> स्वप्ना,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पौर्णिमा +१, मला पण हे
पौर्णिमा +१,
मला पण हे कळत/पटतच नाहीये की माईआजी 'आता शामरावला धडा शिकवायची वेळ आली आहे' वगैरे असं गुन्हेगाराला शिक्षा केल्याची भाषा का बोलतेय घनाच्या बाबतीत? गेला काही वर्ष तो अमेरिकेला तर काय बिघडलं, उलट इथल्या सगळ्यांनी त्याला इतकं 'जा रे, जा बिनधास्त जा' वगैरे करायला पाहिजे की त्याला इन्सिक्युरिटी वाटली पाहिजे की अरे कोणालाच कसं देणं घेणं नाहीये आपल्या अमेरिकेला जाण्याबद्दल आणि मग त्याचाच जीव तिकडे रमायचा नाही.... शेवटी तोही एक फॅमिली पर्सनच आहे, अगदी काही माणूसघाणा नाही, बिचार्याला अगदीच बदनाम करून ठेवलं आहे हो!
खरं सांगू का परवा पेपरात एक
खरं सांगू का परवा पेपरात एक बातमी आलेली. एक मुलगा अमेरिकेत फार्मसीची परीक्षा देऊन आला . त्याचे रिझल्ट इथे आल्यावर कळले पाच पैकी चार पेपरात तो नापास झाला होता तर त्याने आत्महत्याच केली. असू शकते एखाद्यास असे ऑबसेशन. आता अमेरिकेत राहणे व यशस्वी होणे फार अवघड आहे. त्याला तिथे नवीन जीवनाची घडी बसवावी लागेल, लाडावलेला मुलगा स्वावलंबी होईल , स्वकर्तुत्वाने मोठा होईल म्हणून घरच्यांनी उलटे त्याला तिथे पाठवलेच पाहिजे. आपणच मुलांना बांधून ठेवले तर त्यांची ग्रोथ, अॅज अ पर्सन, कशी होइल असे पालकांना नाही का वाट्त
शिवाय अमेरिकेला गेला तरी त्याची घरच्यांशी असलेली अॅटॅचमेंट कमी थोडीच होणार आहे? दिग्दर्शकापेक्षा जास्तच विचार करून रहायलो आपन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालचा कुहुचा अभिनय
कालचा कुहुचा अभिनय आवडला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ज्या तर्हेने ती घरच्यांना त्यांची लव स्टोरी ऐकवते ..
क्लासच
रामचंन्द्र कह गए सियासे ऐसा
रामचंन्द्र कह गए सियासे ऐसा कलियुग आयेगा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रतन टाटा इंडिया आयेगा, घनश्याम अमेरिका जायेगा
सगळ्यानी दिवे घ्या प्लीज
स्वप्ना
स्वप्ना![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अश्विनीमामी +१००
अश्विनीमामी +१००
स्वप्ना >>> जबरी
स्वप्ना >>> जबरी
"ध्यासपंथी पाऊले" मध्ये आता
"ध्यासपंथी पाऊले" मध्ये आता घनाची एक मुलाखत होऊनच जाऊद्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्या बालमैत्रिणीच्या आत्म्याला शांती लाभेल त्याची "मुक्ताफळे" वाचून....
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
स्वपना
स्वपना![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
पण काळे कुटुंबीय जरा जास्तच
पण काळे कुटुंबीय जरा जास्तच करतात. असेल एखाद्याची इच्छा, इथे तर आपलाच मुलगा, तर जाऊदे की त्याला अमेरिकेला. काय विशेष इतकं? आणि बायकोलाही नेता येतं बरोबर. एकट्यालाच जायला लागतं असं काही नसतं! घरचेच लोक इतका अडसर कसे असू शकतात? असे बेसिकमध्ये घोळ असले की त्या त्या इश्यूपुरती सिरियल कंटाळवाणी होते. >>>>>>>> + १००
पक्काऊ झालीये सिरिअल
पक्काऊ झालीये सिरिअल सध्या!
राधा- घनाला जवळ आणायला 'आजारपण' फंड्याची कित्ती ती पुनरावृत्ती!!!
कंटाळा आलाय...
कंटाळा आलाय...
पकलो
पकलो
जिंकले राजवाडे. त्यांचं
जिंकले राजवाडे. त्यांचं टार्गेट असतं कि सिरियल संपवता संपवता प्रेक्षकांच्या नाकात दम आणायचा. अगदी बस्स आता कधी संपणार अशी परिस्थिती आणायची ( आठवा - असंभव, गुंतता ह्रुदय.....). झालं त्यांचं काम. पकलो, कंटाळा आला सारख्या प्रतिक्रिया यायला लागल्या.
ब्लॅक एन व्हाइट मधे भुतकाळ, कथा खेचत रहाणे, मागच्या भागातले प्रसंग ५-७ मिनिटं दाखवुन ३० मिनिटं कशीबशी भरणे इ ट्रीक्स चालु झाल्या आहेत.
पौर्णिमा , अश्विनीमामी
पौर्णिमा , अश्विनीमामी मोदक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वप्ना
ईथे कुणी सांगेल का, आपलीमराठी वर जेमतेम ५मिनीटांचा एपिसोड असतो. पूर्ण भाग कुठे बघायला मिळेल?
महाबोर झालीय .. बंद करावी
महाबोर झालीय .. बंद करावी आता.
सतत आजारपणं कशाला दाखवतात ते..
केकता कपूरच्या मार्गाने गेली नाही तर मिळवले..
Pages