Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भान मी वर कुठेतरी यावर
भान मी वर कुठेतरी यावर लिहिलेय की, फॅन्स कितीही असू देत......... "हम जहां खडे होते है लाईन वहींस ए शुरू होती है" सो फीकर नॉट...... मागे शेपूट कितीही वाढू दे........ माझा नंबर पहिला.>>>>> क्या ब्बातहै
>>चला ,म्यूट वगैरे करु शकते
>>चला ,म्यूट वगैरे करु शकते म्हणजे स्वप्ना स्वतःहून हि मालिका बघते तर
नाही, ही मालिका म्यूट केली तरी आईसाहेबाना फरक पडत नाही. कारण कुहू तिच्याही डोक्यात जाते म्हणून ती बर्याचदा स्वतःच म्यूट करते
कुहू आणि प्रभातसाठी गाणं -
कुहू आणि प्रभातसाठी गाणं - तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी है मुश्किल, दो लफ्जोंमे ये बयां ना हो पाये
सही, ईकडे कुहुचा फॅनक्लब बराच
सही, ईकडे कुहुचा फॅनक्लब बराच दिसतोय. ह्या मालिकेत स्पृहाला जाम बोरींग रोल दिलाय पण तीने तो उत्तमरीत्या साकारलाय. म्हणजे तीच्या कॅरॅक्टरला जे काही अतिशयोक्तीपणे करायला सांगतात ते स्पृहाने तरीही बरच लिमिटमध्ये ठेवलय. ती लिखाणसुद्धा करते त्यामुळे त्या कविता बहुतेक तीच रचत असेल अस वाटत.
मी तसा काही कुहुचा फॅन नाहीय पण ती रुईया कॉलेजची (रुईयाईट) असल्याने सॉफ्ट कॉर्रनर आहे. त्यामुळे माझा तीला २००% सपोर्ट आहे
आजच्या भागात मुक झालेली
आजच्या भागात मुक झालेली मुक्ता पाहुन गलबलले.
इतके दिवस गंमतीगंमतीत चाललेले काँट्रक्ट मॅरेज पार फसलेय, आता दोघेही परत आपापल्या घरी गेले तरी यातुन सावरायला वेळ लागेल. मोडण्यासाठी लग्न करायचे हा दोघांचा प्लॅन फार फसलाय आणि त्यात राधाला जास्त मनस्ताप झालात.
घनाचा मला जाम राग येतोय. तो खरेच लुजर आहे. 'अमेरिकेला मला जायचेय' हे स्वतःला सांगतानाही तो चाचरतोय. राधाने काय बघितले त्याच्यात????
आणि आता हे मॅरेज टिकवायची जबाबदारी विनोदकाका राधेच्या गळ्यात घालणार??
काय झालं म्हणे आज?
काय झालं म्हणे आज?
आणि आता हे मॅरेज टिकवायची
आणि आता हे मॅरेज टिकवायची जबाबदारी विनोदकाका राधेच्या गळ्यात घालणार??
<< टिकवायची जवाबदारी कुठे म्हणाला विनोद काका , तो म्हआण्तो वेगळं होण्या साठी तुला पुढाकार घ्यावा लागेल !
राधा जेंव्हा म्हणते कि एकत्रं येणं जितकं अवघड आहे तितकं वेगळं होणं पण !
विनोद काका म्हणे , अवघड आहे पण त्या साठी तुम्हाला, खरं तर तुलाच अता लवकर पाउलं उचलायला ह्वीत !
राहूल सोल. आणो वल्लभकाका हे
राहूल सोल. आणो वल्लभकाका हे ५वीत कबड्डीतले रायव्हल असतील आणि दोघांनी एकमेकांना टांग मारून पाडलं असेल....तेव्हापासूनची शपथेवरची दुष्मनी! >>>>>>>>>>>
हमने क्या बोला था कल!
भुंग्याला कुहू आवडणे आणि
भुंग्याला कुहू आवडणे आणि प्रभातने कुहूला विविध फुलांच्या नावांनी हाका मारणे हा निव्वळ योगायोग असू शकेल का?
आजच्या भागात मुक झालेली मुक्ता पाहुन गलबलले.>>>> +१ साधना. खूपच सुरेख अभिनय केला आहे मुक्ताने. देहबोली, चेहर्यावरचे भाव, संवादफेक सगळेच उत्तम.
इतके दिवस स्पृहा आवडायची पण
इतके दिवस स्पृहा आवडायची पण कुहु जाम आवडत नव्हती.
ती लिखाणसुद्धा करते त्यामुळे त्या कविता बहुतेक तीच रचत असेल अस वाटत. >>>> हे वाक्य जर खरं असेल तर स्पृहा पण माझ्या ब्लॅक लिस्टीत गेली. काय पकाऊ कविता असतात. कवितांचा एवढा वैताग मला कधीच आला नव्हता.
काय पकाऊ कविता असतात.
काय पकाऊ कविता असतात. कवितांचा एवढा वैताग मला कधीच आला नव्हता.>>> कुहूच्या कॅरेक्टरने पकाऊ कविता लिहीणेच अपेक्षित आहे ग. उलट स्पृहा चांगली कवयित्री असेल तर अश्या पकाऊ कविता लिहीणे कित्ती अवघड असेल तिच्यासाठी.
विनोद काका म्हणे , अवघड आहे
विनोद काका म्हणे , अवघड आहे पण त्या साठी तुम्हाला, खरं तर तुलाच अता लवकर पाउलं उचलायला ह्वीत !
ओह्ह्ह्ह... मला वाटले त्या बाब्याला रुळावर आणाय्चे काम...
अवघड आहे खरे पण आता जे करतील ते लवकर करतील तर बरं.. नाहीतर प्रभात्-कुहू हे दुसरे प्रकरण गळ्यात मारतील.
भुंग्याला कुहू आवडणे आणि
भुंग्याला कुहू आवडणे आणि प्रभातने कुहूला विविध फुलांच्या नावांनी हाका मारणे हा निव्वळ योगायोग असू शकेल का?
>>>
कुहूच्या कॅरेक्टरने पकाऊ कविता लिहीणेच अपेक्षित आहे ग. उलट स्पृहा चांगली कवयित्री असेल तर अश्या पकाऊ कविता लिहीणे कित्ती अवघड असेल तिच्यासाठी.
>>>
+१
स्पृहाच्या कविता चांगल्या असतात
काय पकाऊ कविता असतात.
काय पकाऊ कविता असतात. कवितांचा एवढा वैताग मला कधीच आला नव्हता.>>> कुहूच्या कॅरेक्टरने पकाऊ कविता लिहीणेच अपेक्षित आहे ग. >>> पण कुहू नेहेमीच पकाऊ कविता ऐकवते असं मला खरंच नाही वाटत. विनोदनिर्मितीसाठी काही काही तशा असल्या तरी प्रसंगानुरुप चांगल्याही असतात आणि ती ज्या स्वप्नीलपणे त्या ऐकवते त्यामुळे त्या ऐकायला मला तरी मजा येते कुहू सुरुवातीला आवडायची नाही पण नंतर आवडायला लागली. ते कॅरॅक्टर लोकांच्या डोक्यात जाणारंच रंगवायचं असलं तरी तिने ते अत्यंत प्रामाणिकपणे साकारलंय.
ते कॅरॅक्टर लोकांच्या डोक्यात
ते कॅरॅक्टर लोकांच्या डोक्यात जाणारंच रंगवायचं असलं तरी तिने ते अत्यंत प्रामाणिकपणे साकारलंय.>>> +१
इथे महाराष्ट्रात पाणीकपात
इथे महाराष्ट्रात पाणीकपात आहे........पण या राजवाड्यांना मालिकेमधे टाकण्यासाठी एवढे पाणी कुठुन मिळते.. ?
काल (की परवा??? , आठवत नाही)
काल (की परवा??? , आठवत नाही) पण गिरिश जोशी बरोबर संभाषण चालू असताना मुक्ता बर्वेचा चेहरा प्रचंड सुजलेला वाटला....... (रडून रडून की काय ) काहीतरी नेपाळी लूकच वाटत होता एकदम. आधीचा लूक गायब झालाय
बाकी, प्राची....... कुहूच्या खर्याखुर्या कविता छानच आहेत.
कुहूच्या कॅरॅक्टरमध्ये अचरट कविता आहेत याबद्दल दुमत नाही. (आय होप त्या तिने लिहिलेल्या नसाव्यात)
उदयन. इथे महाराष्ट्रात
उदयन.
इथे महाराष्ट्रात पाणीकपात आहे........पण या राजवाड्यांना मालिकेमधे टाकण्यासाठी एवढे पाणी कुठुन मिळते.. ?
>>>>>>>>>>
ह ह पु वा
अक्षरश: आचरटपणा चाललाय.
अक्षरश: आचरटपणा चाललाय. शाळेतल्या मारामार्यांवरुन म्हातारे झाल्यावर व्याही बनण्यास नकार
शनिवार च्या भागात "डोली सजा
शनिवार च्या भागात "डोली सजा के रखना" चित्रपटाचे पाणी ओतण्यात आले.. पळुन गेलेली मुल आईवडिलांचा विचार करुन परत येतात आणि त्यामुळे शहाणी झालेले वडिल दोघांचे लग्न ला परवानगी देतात..:हहगलो:
मुक्ता वजन कमी कर ग..... कसलि
मुक्ता वजन कमी कर ग.....
कसलि सुजकि दिसतेय हल्लि
>>>>मुक्ता वजन कमी कर
>>>>मुक्ता वजन कमी कर ग.....कसलि सुजकि दिसतेय हल्लि>>>>>
हो मुक्ता फारच जाडी झालीय. स्वप्निल जोशी बरोबर सतत काम करण्याचा दुष्परीणाम असेल कदाचित
एकही शब्द, अॅक्शन किंवा
एकही शब्द, अॅक्शन किंवा प्रतिक्रिया नविन नव्हते. कोण काय बोलणार, कसे वागणार आधीच कळत होते. स.रा. कडुन ही अपेक्षा नव्हती. मूळ ट्रॅक कुठे वळवायचा ते ठरेपर्यंत पाणी घालत बसणारेत की काय???)
सध्या मुक्ताच्या एकटीच्या
सध्या मुक्ताच्या एकटीच्या जीवावर मालिका चालू आहे असं वाटतय. कथा काहीच पुढे सरकत नाहीये. ज्यांना अभिनय येतो ते सध्या मालिकेतून गायब आहेत आणि जे आहेत त्यांना फारसा आभिनय येत नाही. उरली फक्त मुक्ता.
राजवाडे गिअर बदला वेग वाढवा
शुक्रवारच्या भागात मस्त संवाद
शुक्रवारच्या भागात मस्त संवाद होते,
"वर पक्षाचा आहार जास्त आहे हे लग्न मोडण्याचे कारण नाही असू शकत!"
वजन वाढले आहे. चक्क 'पाव भारी
वजन वाढले आहे. चक्क 'पाव भारी हो गये है" असे वाटते. आहे.....
(No subject)
काय बोअर केले गेले काहे
काय बोअर केले गेले काहे ईपिसोड्स, त्या कुहुच्या लग्नाची तयारी कसले करतायेत, दोघं कॉलेज मधे आहेत ना अजुन
Btw, माझा गेस बरोबर ठरणार असं वाटतय, माईंच्या नाटकाचा गुण येतो कि नाही माहित नाही पण साइड इफेक्ट म्हणून विनय आपटे-असावरी जोशीचं जमणार बहुदा !
डीजे, आपट्यांनी सायकल
डीजे,
आपट्यांनी सायकल घेतलीये. मग आता चांदी की सायकल सोने की सीट गाणं म्हणत दोघे फिरायला जाणार का?
मला हल्ली फार बघायला मिळत
मला हल्ली फार बघायला मिळत नाही पण त्याने फारसा फरकही पडलेला नाही. पण इथे यायला जमत नसल्याच मात्र वैषम्य वाटत. प्रॉक्सिने मी फक्त वाचू शकतो पण लिहीता येत नाही हे अजुन दु:खद.
तर हा आणि या पुर्वीचा सगळा धागा मी वाचलाय.
आपल्या सौंदर्याच्या कल्पना तरी काय????
स्वप्निल जोशी हा देखणा वगैरे वगैरे कसा काय????? शिवाय तो चांगला अभिनेता आहे असही म्हटल गेलाय. त्याच ते शाहरूखी बोलण आणि चट चट वाजणा-या चुटक्या... डोक्यात नाही जात. आणि कसले पारदर्शक घाणेरडे कपडे.
बालकलाकारांच्या शोकांतिकेतला अजुन एक कलाकार. एखाद्या उर्मिलाचा अपवाद सोडला तर बाल कलाकार मोठे व्हायलाच तयार नसतात. त्यात आणिक याचा मेंटोर सचिन पिळगावकर. म्हणजे भांगेत अफू.
या सिरीयला मधली अजुन एक बालकलाकार म्हणजे इला भाटे.
आता राजवाड्याना म्हणाव आवरा.
Pages