Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी धन्यवाद
जिप्सी धन्यवाद![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्वप्ना क्लु???? "यहां" मधले
स्वप्ना क्लु????
"यहां" मधले गाणे आहे का? (पण ते नायिका म्हणते, म्हणजे नसणारच )
कोडं क्र. ०३/०६५ इन्स्पेक्टर
कोडं क्र. ०३/०६५
इन्स्पेक्टर रवी धर्माधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिध्द होता. त्याला दिलेली कामगिरी पार पडणारच असा त्याचा नावलौकिक होता. मागच्या वर्षीपासून दर ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन कोणी गाडी चालवत नाहिये ना हे पाहण्याची जबाबदारी त्याने वरिष्ठांकडून मागून घेतली होती. अनेकांना ह्यचं आश्चर्य वाटलं. पण फक्त १-२ लोकांनाच माहित होतं की २ वर्षांपूर्वी रवीचा बालमित्र अश्याच निष्काळजी ड्रायव्हरच्या चुकीमुळे गेला होता.
ह्या वर्षीही शहरातल्या रहदारीच्या नाक्यावर रात्री ११ वाजता रवीने आपली व्हॅन उभी केली. आत्तापर्यंत तपासलेल्या १० वाहनातले सगळेच्या सगळे ड्रायव्हर्स टाईट होते. सगळ्यांची रवानगी तुरुंगात करायचे आदेश त्यांना हाताखालच्या अधिकार्यांना दिले होते. 'साहेब आता वाईट मूडमध्ये आहेत. पुढच्या गाडीतल्या ड्रायव्हरचं काही खरं नाही' असं ते आपापसात बोलत होते.
एव्हढ्यात एक लाल रंगाची टोयोटा वेगात आली. झालं! रवीच्या सहकार्यांनी ती थांबवली. ड्रायव्हिंग करणारी तरूणी जेव्हा गाडीबाहेर पडली तेव्हा सगळेच बघतच राहिले इतकी ती सुंदर होती. पण रवीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याने सहकार्याला तिची breath analyze करयला सांगितलं. त्यात काहीही आढळलं नाही. मान वर न करताच रवी गुरकावला 'चालून दाखवा सरळ रेषेत'. ती तरुणी मुकाटपणे चालायला लागली आणि तेव्हाच रवीने मान वर केली.
मग काय झालं माहित नाही. ती चालत होती ती रेषा भूमितीच्या कुठल्याही व्याख्येनुसार सरळ नव्हती. पण रवी बघतच राहिला. कळस म्हणजे त्याने त्या तरुणीला नुसती तंबी देऊन सोडून दिलं.
दुसर्या दिवशी त्याच्या युनिटमधल्या पोलिसांच्या तोंडी एकच गाणं. ओळखा पाहू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, ह्या गाण्यातला एक
जिप्सी, ह्या गाण्यातला एक महत्त्वाचा शब्द दोन दिवसांपूर्वीच्या एका कोड्यात होता.
'चालून दाखवा सरळ रेषेत'>>
'चालून दाखवा सरळ रेषेत'>> सिधी करदे सबकी चाल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कोडं क्र. ०३/०६६ (माझा पहिला
कोडं क्र. ०३/०६६ (माझा पहिला प्रयत्न शब्दकोडं घालण्याचा :फिदी:)
रुपाचं लग्न अखेर ठरलं!
तिने ह्यासाठी मनात अनेक स्वप्न पाहिलेले असतात. आता ती जिथे ही जाते अजयचा, होणार्या नवर्याचा फोटो घेऊन फिरत असते...
एके दिवशी रुपा, तृप्तीबरोबर सप्नाच्या (तिच्याच मैत्रिणीच्या) गाण्याच्या कार्यक्रमाला जाते, तिथे स्टेजवरची आकर्षक लाईट्सची रंगयोजना पाहून ही अजयचाच फोटो बघत बसते, तेव्हा मैत्रिण कुतुहलाने विचारते, अगं इतकी काय वेडी झाली आहेस त्याचा फोटो मिळाल्यापासून? तेव्हा रुपा तिला अजयबद्दल जे प्रकर्षाने जाणावत असतं ते गाण्यातून तृप्तीला सांगते... ओळखा पाहू ते गाणे
तसवीर तेरी दिल मे जीस दिन से
तसवीर तेरी दिल मे जीस दिन से उतारी है
फिरु तुझे संग लेके नये नये रंग लेके सपनो की मेहफिल में
००३/६५ आयो कहा से घनश्याम???
००३/६५
आयो कहा से घनश्याम???
बुल्ज आय स्निग्धा कोडं क्र.
बुल्ज आय स्निग्धा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ०३/०६६
रुपाचं लग्न अखेर ठरलं!
तिने ह्यासाठी मनात अनेक स्वप्न पाहिलेले असतात. आता ती जिथे ही जाते अजयचा, होणार्या नवर्याचा फोटो घेऊन फिरत असते...
एके दिवशी रुपा, तृप्तीबरोबर सप्नाच्या (तिच्याच मैत्रिणीच्या) गाण्याच्या कार्यक्रमाला जाते, तिथे स्टेजवरची आकर्षक लाईट्सची रंगयोजना पाहून ही अजयचाच फोटो बघत बसते, तेव्हा मैत्रिण कुतुहलाने विचारते, अगं इतकी काय वेडी झाली आहेस त्याचा फोटो मिळाल्यापासून? तेव्हा रुपा तिला अजयबद्दल जे प्रकर्षाने जाणावत असतं ते गाण्यातून तृप्तीला सांगते... ओळखा पाहू ते गाणे
उत्तरः तसवीर तेरी दिल मे जीस दिन से उतारी है
फिरु तुझे संग लेके नये नये रंग लेके सपनो की मेहफिल में
सह्हिए बागेश्री मस्तच कोडं.
सह्हिए बागेश्री मस्तच कोडं. (पहिल्या कोड्याबद्दल अभिनंदन)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्निग्धा पुन्हा एकदा चौकार.
चित्रकोडे ००३/६७
चित्रकोडे ००३/६७
जिप्सी
जिप्सी![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बागेश्री, पहिल्यावहिल्या
बागेश्री, पहिल्यावहिल्या कोड्याबद्दल अभिनंदन. मस्त होतं कोडं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी क्ल्यु?
जिप्सी क्ल्यु?
कोडं क्र. ०३/०६८ उमा नुकतीच
कोडं क्र. ०३/०६८
उमा नुकतीच कॉलेजाला जाऊ लागली...
तिचं सौंदर्यच असं होतं की भल्याभल्यांनी गारद व्हावं, तिच्या रुपावर, हसण्या बोलण्यावर फिदा होऊन कित्येक आशिक तिच्या मागे पडले होते, अशा लाघवी मुलीच्या प्रेमात कुणी का पडू नये म्हणा.. पण ह्या सगळ्यांचा तिला मानसिक त्रासही होत असे.
अशीच एकदा सगळ्यांचा ससेमिरा चुकवून ती उदास होऊन मैत्रिणीला विचारत होती, की का ही मुलं वेड्यासारखी वागतात, असा पाठलाग करतात, घरापर्यंत वगैरे येतात... तर हळूच एक पंटर तिथे टपकून एक प्रेमालाप गातो... कुठला?
सॉरी स्निग्धा changes
सॉरी स्निग्धा
changes done!!!!
बागेश्री ते कोडं क्र. ०३/०६८ कर ना.
क्लु:![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
१. कृष्णधवल जुनं गाणं आहे.
योगेश, डन थँक्स मामी, हे
योगेश, डन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
थँक्स मामी, हे आत्ताचं ओळख (हुरूप आलाय बघ
जिप्सी, जरा कडक क्ल्यु दे ना.
जिप्सी, जरा कडक क्ल्यु दे ना.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विचार करतीये बागे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बागेश्री, ये आखें उफ युं मा,
बागेश्री,
ये आखें उफ युं मा, ये सुरत ....
प्यार क्युं ना हो गा ये अदाए.... ???
जिप्सी, जरा कडक क्ल्यु दे ना.
जिप्सी, जरा कडक क्ल्यु दे ना. >>>>>>वरील चित्रांपैकी एक चित्र जसच्या तसं चित्रपटात आहे. (एकदम कडक क्लु
)
अय्यो, स्निग्धा, तोडा रुकनेका
अय्यो, स्निग्धा, तोडा रुकनेका जी, कितना जल्दी गेस करता तुम्! पण करेक्टे येकद्दम!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ०३/०६८
उत्तर : ये आखें उफ्फ-यू- मा (इथे फोड होती उमा)
ये सूरत, उफ्फ-यू-मा, प्यार क्यो ना होगा?
उमा साठी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्निग्धा, बागे मस्त!
स्निग्धा, बागे मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिमाग में गाना आने के बाद रुक
दिमाग में गाना आने के बाद रुक नै सकती जी मैइ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्ये धन्स स्निग्धा, तेरा
आर्ये धन्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
स्निग्धा, तेरा तोडा दिमाग इधरको दे, एकभी गेस करने को नई होता रे
कोडं क्र. ०३/०६९ 'साहेब,
कोडं क्र. ०३/०६९
'साहेब, एम.व्ही.रोडवरच्या गुलबकावली अपार्टमेन्टला आग लागली आहे. लवकर निघावं लागेल' सहकार्याचं हे बोलणं ऐकताच तो ताडकन उठला. त्याच अपार्टमेन्टमध्ये त्याची 'ती' रहात होती.
फायर ब्रिगेडची गाडी तिथे पोचली तेव्हा बिल्डिंग धडाडून पेटली होती. तरी कसाबसा तो पाचव्या मजल्यावर पोचला. तिच्या घराची बेल वाजवयचं भानही त्याला राहिलं नाही. धाडकन दरवजा तोडून तो आत गेला तर बाईसाहेब डाराडूर झोपलेल्या. त्याला हसाव का रडावं तेच कळेना. तिला गदागदा हलवून जागं करत तो ओरडला 'अग काय हे झोपणं? बाहेर आग लागलेली कळली नाही तुला? मी काळजीने अर्धा झालो इथे येईस्तोवर. निदान फोन तरी उचलायचास."
तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं, हसली आणि एक झक्कासपैकी गाणं गुणगुणायला लागली. ते ऐकून तो सगळा राग विसरला. ओळखा पाहू गाणं.
अक्षरी कुठे गेली???? मामी
अक्षरी कुठे गेली????
मामी अजुन एक क्लु देऊ का?
इधर तुम हसीन हो उधर दिल जवान
इधर तुम हसीन हो
उधर दिल जवान है?
चित्रकोडे ००३/६७ उधर तुम हसी
चित्रकोडे ००३/६७
उधर तुम हसी हो, इधर दिल जवा है, ये रंगिन रातोंकी एक दास्ता है?
बिंगो बागेश्री!!!!! बरोबर
बिंगो बागेश्री!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
)
बरोबर स्वप्ना
(आज दुकानं बंद असल्याने बक्षिस नाही.
चित्रकोडे ००३/६७
उत्तरः
उधर तुम हंसी हो इधर दिल जवां है
ये रंगीन रातो कि इक दास्ता है
लोक्स, माझी ३ कोडी
लोक्स, माझी ३ कोडी आहेत.....सोडवा नक्की
Pages