..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

०१ हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गाजलेली जोडी.
>>> जिप्सी हा काही क्ल्यु नाहीये रे. अशा अ सं ख्य जोड्या गाजल्यात. अजून एक हिंट दे बरं.

>>>> पर्दे के पिछेसे तुमने क्या केह डाला फिर से तो फर्माना ? >>> माधव, ते पलकों के पीछे से क्या तुमने कह डाला फिर सो केहेना ..... असं आहे.

जिप्सी, श्र, मला वाटलं ते पडदे अर्धे अर्धे केलेत म्हणून जुळतंय>>>>>:फिदी:

अजून एक हिंट दे बरं>>>>>>
०१ हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गाजलेली जोडी.
०२ सुपरहिट गाणं
०३ तिसर्‍या आणि चौथ्या चित्राचा संबंध जुळवण्याचा प्रयत्न करा Happy लगेच उत्तर सापडेल. Happy

परदेसिया ये सच है पिया
सब कहते है मैने तुझको दिल दे दिया
परदे आणि सिया - सीता.

गुड वन जिप्सी. Happy

वॉव, अमेझिंग!!! जिप्सी ,श्र ... जुग जुग जियो! म हा न!!!!! Happy
याबद्दल जिप्सीकडून श्रद्धाला पूर्ण घराच्या पडद्यांचा सेट सीयून (म्हणजे शिवून) भेट देण्यात येईल!

बिंगो श्रद्धा Happy Happy

००३/७१
परदेसिया ये सच है पिया
सब कहते है मैने तुझको दिल दे दिया

धन्यवाद मामी, श्रद्धा Happy

सेट सीयून (म्हणजे शिवून) भेट देण्यात येईल!>>>>मामी Proud

००३/७२: बिजली नारखेडे, पायल नेमाडे आणि सोनम येवलेकर ह्या तिघी मैत्रिणी महाराष्ट्राच्या खोखो संघात असतात. गुजराथविरुद्ध सामना रंगलेला असतो. बिजली पहिल्या वेळेला पायलला खो देते आणि दुसर्‍या वेळेला सोनमला खो देताना ती एक गाणे म्हणते आणि एकच हशा पिकतो.

सोप्पय.

००३/७२: बिजली नारखेडे, पायल नेमाडे आणि सोनम येवलेकर ह्या तिघी मैत्रिणी महाराष्ट्राच्या खोखो संघात असतात. गुजराथविरुद्ध सामना रंगलेला असतो. बिजली पहिल्या वेळेला पायलला खो देते आणि दुसर्‍या वेळेला सोनमला खो देताना ती एक गाणे म्हणते आणि एकच हशा पिकतो.

उत्तरः तुझे खो दिया हमने पा.ने. के बाद

श्रला भरपूर काजू, बदाम आणि 'खो'या घालून केलेला गाजर हलवा.

बापरे सगळ्यांना __________/\______________

काय माणसं आहात तुम्ही. आता माझं एक सोप्प कोडं>>>>

००३/७३

एक काली नावाचा कुत्रा असतो. त्याला सारखे खांबा जवळ जायची सवय असते. त्याच्या मालकाला खुप कंटाळा आलेला असतो. तो विचार करतो ह्याचा कसा बंदोबस्त करावा. एकदा तो त्याला घेवुन बाजारात जातो तिकडे काली खुपच प्रताप करतो. शेवटी मालक त्याला एक गोल पॉटी आणतो. कालीला ती खुप आवडते. ह्यावर मालक कुठले गाणे म्हणेल?

००३/०७६ : अजितच्या तपश्चर्येला अखेर फळ आले. आपल्या नव्या कोर्‍या कारने घरापर्यंत सोडतो, अशी त्याच्या ऑफिसातल्या दीपालीला, त्याने दिलेली ऑफर तिने स्वीकारली. पण शेजारी दीपाली बसलेली असताना नीट लक्ष देऊन ड्राइव्ह करणे सोपे का होते? फ्लाय ओव्हर, सब वे,वन वे , नो लेफ्ट टर्न अशा घोळात त्याने एक वळण चुकवले आणि तिचे घर मागे टाकून भलतीकडेच जाऊ लागला. चाणाक्ष दीपालीच्या हे लगेच लक्षात आले. अजितची चूक तिने कोणत्या गाण्यातून लक्षात आणून दिली असेल?

जीप्स्या....

बरोबर रे बरोबर....

००३/७३

एक काली नावाचा कुत्रा असतो. त्याला सारखे खांबा जवळ जायची सवय असते. त्याच्या मालकाला खुप कंटाळा आलेला असतो. तो विचार करतो ह्याचा कसा बंदोबस्त करावा. एकदा तो त्याला घेवुन बाजारात जातो तिकडे काली खुपच प्रताप करतो. शेवटी मालक त्याला एक गोल पॉटी आणतो. कालीला ती खुप आवडते. ह्यावर मालक कुठले गाणे म्हणेल?

काली रामका खुल गया पोल
बीच बजरीया बज गया ढोल
हो गया उसका डब्बा गोल
बोल हरी बोल हरी....

मामी , दीपालीने भाय म्हटलं तर अजित गाडी तिथेच ठोकणार नाही का? गायिकेने म्हटलेलं गाणं आहे. चित्रपट पाहात असाल तर गाण्यात व्यक्तिरेखांची नावे आहेत.

ए भाय >> पोपटच झाला म्हणायचा अजितचा Happy

जिप्स्या - ते शास्त्रिय संगीतावर आधारीत गाणे आहे, पण सुवर्णकाळातले नव्हे.

मीरा, चित्रकोड्याला क्रमांक द्या आणि त्याचा क्लू पण द्या Happy

चित्र कोड्याचा नंबर ००३/७४

क्लु
१) फेमस प्रेमिकांची जोडी. सीनेमा मधली नव्हे. खरी खरी.

Pages