Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझं चित्र कोडं
माझं चित्र कोडं सोडवा......००३/७४
मीरा अजुन एक क्लु प्लीज
मीरा अजुन एक क्लु प्लीज
किंवा उत्तरच सांगा. 
चला उत्तरच सांगते.
चला उत्तरच सांगते. ००३/७४
लैला ओ मेरी लैला
तेरी गली मे आया
तेरा मजनू तेरा छैला.
सॉलिड होतं मो.कि.मी. ती
सॉलिड होतं मो.कि.मी. ती बॉक्सर लैला अली आहे तर.
कोडं क्र. ०३/०६४ घनश्याम आणि
कोडं क्र. ०३/०६४
घनश्याम आणि संध्याचं प्रेम कॉलेजपासूनचं. दोघं लग्न करणार असं जवळजवळ सगळेच धरून चालले होते. पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि दोघे विभक्त झाले. घनश्याम परदेशात निघून गेला आणि संध्याने दक्षिण भारतातल्या एका छोट्यश्या खेड्यात एनजीओसाठी काम सुरु केलं. निलगिरीच्या कुशीत वसलेलं ते गावं तिला इतकं आवडलं की तिथेच तिने आपलं एक घरकुल उभारलं आणि त्याला नाव दिलं ते निलगिरीच. तिचं काम लोकांना इतकं आवडलं की पंचक्रोशीत लोक तिला ओळखू लागले. दिवसा गर्द झाडीतून उतरणारी, जमिनीवरच्या सावलीशी खेळणारी उन्हं, खळाळत वाहणारा झरा, डोंगरमाथ्याशी उतरलेले ढग ह्यांच्या सोबतीनेच तिने उरलेलं आयुष्य काढायचं ठरवलं.
आणि घनश्याम? काही वर्ष परदेशात काढल्यावर त्याने भारतात परतायचा निश्चय केला. आल्या आल्या त्याने संध्याचा पत्ता शोधला. काही कॉमन मित्रांच्या मदतीने त्याला ती दक्षिण भारतात असल्याचं कळलं. विमान, कार असा प्रवास करर करत तो जवळच्या शहरात पोचला. आता त्याला त्या गावाचा ठिकाणा शोधायचा होता. पण मधल्या प्रवासाच्या शिणाने आणि संध्या भेटेल की नाही ह्या काळजीने तो गावाच नाव विसरला. पण संध्या त्या भागात प्रसिध्द असल्याचं त्याला ठाऊक होतं म्हणून त्याने तिचाच पत्ता विचारला. एका गावकर्याने चक्क हिंदी गाणं म्हणून त्याला तो पत्ता सांगितला तो इतका अचूक की काही मिनिटातच घनश्याम संध्याच्या घरी जाऊन पोचला.
मग पुढे? अहो, मी काय रोमॅन्टिक सिनेमाची गोष्ट सांगतेय का? कोडं आहे हे. समजून घ्या ना राव. हिंदी पिक्चरप्रमाणे सगळं गोडच झालं शेवटी. पण तुम्ही त्या गावकर्याने म्हटलेलं हिंदी गाणं ओळखताय ना?
क्लू: ह्या गाण्यातला एक महत्त्वाचा शब्द तीन दिवसांपूर्वीच्या एका कोड्यात होता.
उत्तरः
पर्बतो के पेडोंपर शामका बसेरा है
सुरमयी उजाला है चंपई अंधेरा है
महत्त्वाचा शब्द - सुरमयी
कोडं क्र. ०३/०६५ इन्स्पेक्टर
कोडं क्र. ०३/०६५
इन्स्पेक्टर रवी धर्माधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिध्द होता. त्याला दिलेली कामगिरी पार पडणारच असा त्याचा नावलौकिक होता. मागच्या वर्षीपासून दर ३१ डिसेंबरच्या रात्री दारू पिऊन कोणी गाडी चालवत नाहिये ना हे पाहण्याची जबाबदारी त्याने वरिष्ठांकडून मागून घेतली होती. अनेकांना ह्यचं आश्चर्य वाटलं. पण फक्त १-२ लोकांनाच माहित होतं की २ वर्षांपूर्वी रवीचा बालमित्र अश्याच निष्काळजी ड्रायव्हरच्या चुकीमुळे गेला होता.
ह्या वर्षीही शहरातल्या रहदारीच्या नाक्यावर रात्री ११ वाजता रवीने आपली व्हॅन उभी केली. आत्तापर्यंत तपासलेल्या १० वाहनातले सगळेच्या सगळे ड्रायव्हर्स टाईट होते. सगळ्यांची रवानगी तुरुंगात करायचे आदेश त्यांना हाताखालच्या अधिकार्यांना दिले होते. 'साहेब आता वाईट मूडमध्ये आहेत. पुढच्या गाडीतल्या ड्रायव्हरचं काही खरं नाही' असं ते आपापसात बोलत होते.
एव्हढ्यात एक लाल रंगाची टोयोटा वेगात आली. झालं! रवीच्या सहकार्यांनी ती थांबवली. ड्रायव्हिंग करणारी तरूणी जेव्हा गाडीबाहेर पडली तेव्हा सगळेच बघतच राहिले इतकी ती सुंदर होती. पण रवीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. त्याने सहकार्याला तिची breath analyze करयला सांगितलं. त्यात काहीही आढळलं नाही. मान वर न करताच रवी गुरकावला 'चालून दाखवा सरळ रेषेत'. ती तरुणी मुकाटपणे चालायला लागली आणि तेव्हाच रवीने मान वर केली.
मग काय झालं माहित नाही. ती चालत होती ती रेषा भूमितीच्या कुठल्याही व्याख्येनुसार सरळ नव्हती. पण रवी बघतच राहिला. कळस म्हणजे त्याने त्या तरुणीला नुसती तंबी देऊन सोडून दिलं.
दुसर्या दिवशी त्याच्या युनिटमधल्या पोलिसांच्या तोंडी एकच गाणं. ओळखा पाहू.
क्लू: खोटयाच्या कपाळी गोटा
उत्तर:
हुस्न चला कुछ ऐसी चाल, दिवानेका पूछ ना हाल
प्यारकी कसम् कमाल हो गया
स्वप्ना ०३/०६४ मध्ये कोड्यात
स्वप्ना ०३/०६४ मध्ये कोड्यात आणि गाण्यात लिंगपरिवर्तन झाले का?
नीलगीरी पर्वत फार आवडता आहे का? आधी तू नीले पर्वतोंकी धारा आयी ढूंढते किनारा यावर कोडं विचारलं होतंस.
हुस्न चला कुछ ऐसी चाल धमाल आहे. बहुतेक सगळे जण नशामुक्तीकेंद्राच्या किंवा त्याच्या उलत दिशेच्या रस्त्यावर भरकटले.
भरत, संध्या म्हणजे पण शाम ना?
भरत, संध्या म्हणजे पण शाम ना? घनश्याम लोकांना भरकटवायला होता.
निलगिरीचं म्हणशील तर काही वर्षांपूर्वी उटीला गेल्यापासून निलगिरीच्या प्रेमात आहे. ये प्रेमकहानी तो बरसों चलेगी. 
सुप्रभात!!!!! मीरा ते गाणं
सुप्रभात!!!!!
मीरा ते गाणं नव्हतं माहिती.

हुस्न चला कुछ ऐसी चाल धमाल आहे>>>>+१
आजची माझी दोन
आजची माझी दोन चित्रकोडी
००३/०८२

००३/०८३
००३/०८३
००३/०८२ ये गलियाँ (दोन
००३/०८२
)
ये गलियाँ (दोन गल्ल्या) ये चौबारा यहां आना ना दोबारा (२, १२) (किंवा वाक्यात बारा दोनदा आलेत म्हणून १२, २)
अब हम तो भये पर (पीस) देसी (देशी दारूची बाटली) (
के तेरा यहां कोई नही (१३वर काट)
शाब्बास मामी पहिलंच उत्तर
शाब्बास मामी
पहिलंच उत्तर एकदम बरोबर 

तुला न्युयॉर्कर मधले फलाफल
००३/०८२
ये गलियाँ ये चौबारा यहां आना ना दोबारा
अब हम तो भये परदेसी
के तेरा यहां कोई नही
रच्याकने, एक गलिया आहे आहे आणि एक चौबारा
चौबारा म्हणजे चौक ना रे भौ?
चौबारा म्हणजे चौक ना रे भौ? तसा कुठे दिसतोय त्या चित्रात?
मी चौबारा म्हणजे घरासमोरची
मी चौबारा म्हणजे घरासमोरची जागाच समजत होतो.

चौबारा सर्च केल्यावर ते पहिलं चित्र सापडलं.
गुगलल्यावर हे मिळालं. माझंही
गुगलल्यावर हे मिळालं. माझंही चुकलं न तुझंही चुकलं. ज्ञानकण पिऊन घ्या.
Roman Hindi word "chaubara - चौबारा" from English - Hindi Dictionary
Chamber (Noun)
हिन्दी - हिन्दी शब्दकोश से हिन्दी शब्द "चौबारा" के लिए हिन्दी अर्थ:
वह कमरा जिसमें चार विशेषतः चारों ओर एक एक दरवाजा हो।
मकान के ऊपरी तल्ले पर का कमरा जिसके चारों ओर प्रायः दरवाजे होते हैं।
"चौबारा" के लिये पर्यायवाची शब्द : चंद्रशाला, चून चबारा, छतःकक्ष
(No subject)
मामी __/\__ मी फक्त चौबारा
मामी __/\__
मी फक्त चौबारा "इमेज" सर्च केली होती.

चार रस्ते मिळतात तो चौराहा
चार रस्ते मिळतात तो चौराहा असेल
सुप्रभात लोक्स चला आता
सुप्रभात लोक्स
चला आता ००३/०८३ ओळखा.
अजुन कुठली कोडी सोडवायची बाकी आहेत का?
चौबारा म्हणजे "घरातला चौक" .
चौबारा म्हणजे "घरातला चौक" . पुर्वी वाड्यांना घराच्या आत चौक असायचे, सामायिक जागा असायच्या. हे गाणं प्रेमरोग मधलं आहे. त्यात सुध्धा असाच चौक दाखवला आहे.
(अर्थाचं सौजन्य माझा मिश्रा नावाचा कलीग)
जिप्स्या... दुसर्या कोड्याचा क्लु दे!!!!
ए, जिप्स्या! क्ल्यु दे बरं!
ए, जिप्स्या! क्ल्यु दे बरं!
००३/०८३ क्लु: ०१ या
००३/०८३


क्लु:
०१ या चित्रपटाच्या प्रोड्युसरचा उल्लेख हल्लीच मायबोलीच्या एक लेखात आला होता.
०२ गाणं जितकं ऐकायला सुरेख आहे तितकंच पहायला एकदम बकवास.
०३ हिर्वीन कोण आहे ते माहित नाही पण हिरो हिंदी मालिकांमध्ये गाजलेला.
०४ एका चित्रात फक्त एक मात्रा अॅड केली आहे.
जिप्सी अजून एक क्ल्यु हवा
जिप्सी अजून एक क्ल्यु हवा बुवा.
काय पण क्ल्यु देतॉय!! जसे
काय पण क्ल्यु देतॉय!! जसे काही माबोवरचे सगळे लेख आम्ही कोळुन प्यायलोय.
आर्ये अजुन ३ क्लु दिलेत
आर्ये

अजुन ३ क्लु दिलेत
नाही येत मला. जरा कालखंड
नाही येत मला.
जरा कालखंड सांग.
जिप्स्या मी आहेच इथे, पण फार
जिप्स्या मी आहेच इथे, पण फार भराभर कोडी आणि उत्तरे येताहेत.
थोडी रुक्ष माहिती, निलगिरी या झाडाला आपल्याकडे नाव नव्हते, ते आपल्याकडच्या पर्वतरा़जीचे नाव, आणि
ब्रिटीशांनी त्यावर ऑस्ट्रेलियामधून ती झाडे आणून लावली, म्हणून त्या झाडांना पण तेच नाव पडलं.
दिनेशदा तुमचा सक्रीय सहभाग
दिनेशदा तुमचा सक्रीय सहभाग आम्ही मिस करतोय. "करवटे बदलते रहे" आठवून अजून हसते मी!
दिनेशदा जरा कालखंड
दिनेशदा
जरा कालखंड सांग.>>>>>७५-८०
चित्रपटाचे नाव पण थोडे हटके आहे. 
Pages