..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६०० वी पोस्ट बरोबर !!!!
६००व्या पोस्टबद्दल सर्वांचे अभिनंदन!!!!

श्रद्धा एकदम बरोबर Happy
तुला नॅचरल्सचे मँगो आईस्क्रीम Happy Happy

०३/५७
जिंदगी की ना टूटे लडी
प्यार कर ले घडी दो घडी
- क्रांती.

चला आजच्या दिवसातला पहिला चौकार श्रद्धा यांनी मारलेला आहे.
मी संध्याकाळी येईन. तोवर एखादं सोपं कोडं शिल्लक ठेवा.

लडी म्हणजे साखळी का? मला रेशमाची लडीच वाटायचे.

जिपस्या पण दुसरा आणि तिसरा क्ली मिसलिडींग होत हा. गाण्यात अगदी एकदाच येणार्‍या शब्दाचे केवढे कौतुक केले होतेस! Happy

लडी म्हणजे साखळी का? मला रेशमाची लडीच वाटायचे.>>>>असते हो अजुनही बर्‍याच गोष्टींची लडी असते. Happy लोफर आठवा "मोतियोंकि लडी हुं मै....." Proud

जिपस्या पण दुसरा आणि तिसरा क्ली मिसलिडींग होत हा>>>>>तिसर्‍या क्लु मध्ये मी एकदाच सांगितलंय "लव" चे भाषांतर करा (लवलव चे भाषांतर नाही) Happy Wink

असते हो अजुनही बर्‍याच गोष्टींची लडी असते. >> हो रे ते माहितीये मला पण त्या गाण्यात तो शब्द रेशमासारख्या नाजूक गोष्टीची लड या अर्थाने आला आहे असे वाटायचे मला. असो.

०३/५८ मस्त होते. कोडेकर्त्याचे आणि उत्तरदेत्रीचे अभिनंदन Happy

०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले तेव्हा एका सैनिकाच्या सामानात बसून एक भुंगी पण सुरतला जाते. तेंव्हा सुरतमध्ये गुलाबी फुलांची काटेरी झाडे खूप होती. तर त्या गुलाबी फुलातला मध पीता पीता भुंगीला भुंगा भेटतो आणि दोघांचे प्रेम जमते. तर भुंगी कुठले गाणे म्हणेल?

उत्तरः सावरी सुरत मन भायी रे पिया तेरी सावरी सुरत मन भायी (चित्रपट: अदा)

माधव हे गाण नव्हत माहित Sad Sad
ओक्के ते गुलाबी फुल काटे सावर (सावरी) होते तर Happy मी आपला गुलाबी म्हणुन गुलबकावली शोधतोय. Happy

०३/०५६ चित्रकोडे

क्लू १: 'ती'चे सिनेसृष्टीतले पदार्पण या चित्रपटातून झाले होते. प्रचंड हीट गाणे आहे.

क्लू १: 'ती'चे सिनेसृष्टीतले पदार्पण या चित्रपटातून झाले होते.>>>>ओक्के, म्हणजे ते तीन्ही चित्र मिळुन चित्रपटाचे नाव आहे?

जिप्सी नाही. हे गाणे ज्या सिनेमातले आहे त्यातून एका स्टार ने पदार्पण केले. तिला अभिनेत्री म्हणून फारसे कोणी ओळखत नाही. Happy

०३/०५६ चित्रकोडे
क्लू १: 'ती'चे सिनेसृष्टीतले पदार्पण या चित्रपटातून झाले होते. प्रचंड हीट गाणे आहे.
क्लू २: यातले एक चित्र फक्त एक शब्द सांगेल पण उरलेल्या दोन चित्रात (प्रत्येकी) आख्खी ओळ आहे गाण्याची

हे गाणे ज्या सिनेमातले आहे त्यातून एका स्टार ने पदार्पण केले. तिला अभिनेत्री म्हणून फारसे कोणी ओळखत नाही. >>> या पदाकरता कोणकोण उमेदवारीणी आहेत बरं
शेरावतांची मल्लिका
बासूंची बिपाशा
पडुकोणांची दिपीका

बाप्याला रॉबर्ट लौ म्हनत्यात. पन नावात काय हाये? काय बी नाय Happy

मामीसा, मी म्हन्तो ती बया आत्तापतूर आज्जी झालीया. पन ल्येकाचा घरोबा काय टिकला नाय बगा.

आहा, शर्मिला टागोर!
कश्मिर की कली मधलं गाणं?
चांद सा रोशन चेहरा, जुल्फोंका रंग सुनहरा, झील सी नीली आंखे वगैरे जुळतंय.
व्हाईट हाऊस, मेग रायनचं काय करायचं???????

बरं,
रोशन = बंगल्यातली रोषणाई
जुल्फोंका रंग सुनहरा = मेग रायनचे केस
नीली आंखे मौजुद आहेतच.
Uhoh

मामीसा अक्षी बरुबर!

०३/०५६ चित्रकोडे:

ये चांद सा रोशन चेहरा
जुल्फोंका रंग सुनहरा
ये झील सी नीली आंखे
कोइ राज है इनमे गहरा

मामी तुमी फरारीवर कस्ट्म्स डिवटी भरनार का? ऑ? Happy

त्यो शबानाचा इस्क्रू टाईट कर्ता कर्ता माझं टकुरं फिरलं न्हवं! दुसरा क्लू द्येवा.

जिपस्या, गान्यामंदी आफताब हाये का?

कोडं क्र. ०३/०५३

शबाना आयटीआयचा टर्नर आणि फिटरचा कोर्स करत असते. अंतिम परीक्षेत तिला सगळे पेपर्स उत्तम जातात. प्रॅक्टिकल तर तिला नेहमीच सोप्पं जात असतं. पण आजच्या स्क्रू फिटिंगच्या प्रॅक्टिकल मध्ये तिला स्क्रू फिट करायला खूप प्रयास पडत असतात. तेव्हा ती खुदाची प्रार्थना करते. कशी?
>>>>>
क्ल्यु १) हिंदी चित्रपटसृष्टीतली आतापर्यंतची सर्वात सुंदर नटी यात आहे.
२) या सिनेमानं इतिहास गाजवलाय.

Pages