(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
बापरे केवढ्या ह्या पोस्ट ४-५
बापरे केवढ्या ह्या पोस्ट ४-५ दिवस आलेच नव्हते. साधना मोगरा पाहून माहेरच्या बालपणीची आठवण झाली. असाच डबलचा मोगरा माझ्या माहेरी माझ्या बालपणापासुन फुलतोय. असाच भरगच्च बहर. आम्ही त्याचे गजरेही करायचो.
या अंड्यांबाबत चितमपल्लींनी
या अंड्यांबाबत चितमपल्लींनी लिहिले होते. पक्ष्यांना मोजता येत नाही. अंडी आहेत कि नाहीत
एवढेच कळते. कोकिळा सगळी अंडी फ़ेकत नाही, एखादे ठेवतेच. कावळ्याला फरक कळत नाही.
पण एका कोकिळेने अंडे
पण एका कोकिळेने अंडे घातल्यावर नंतर दुसरी कोकिळा येत नाही तिथे? तिला कसे कळणार की ह्या घरट्यात आपल्या आधीच एका कोकिळेची अंडी आहेत ते?
पक्ष्यांना मोजता येत नसेल तर मग अंडी उबवायला किती दिवस लागतात तेही कळत नसेल. पिले बाहेर येईपर्यंत ते बापडे बसुन असतील उब देत. मग कोकिळांनी अशी अंडी घातल्यावर कदाचित कावळ्याच्या घरट्यात रोज एक पिलु जन्म घेत असेल्ही
पह्ल्यांदा कावळ्याचे, मग कोकिळेचे..
अंड्यातल्या पिल्लाने आवाज
अंड्यातल्या पिल्लाने आवाज केला तर कळते. बहुदा पिल्लूच स्वतः धडपड करुन बाहेर
येते. दिवस नाहीच मोजता येत, त्यांना. पण हवामानातला बदल, सूर्याचे मावळणे,
दिशा वगैरे नक्कीच कळतात.
तशीही अंड्यातून पिल्ले क्रमाक्रमानेच बाहेर येतात. पेलिकन सारख्या पक्ष्याच्या बाबतीत
सगळ्यात मोठे पिल्लू धटींगण असते. त्यालाच जास्त अन्न मिळते. ते बाकीच्या भावंडाना
घरट्याबाहेर ढकलून देते. आणि तसेही एकापेक्षा जास्त पिल्लू मोठे करणे, आईबाबांना
जमत नाही. त्यासाठी पेलिकन्स आता माश्यांचा आहार सोडून, दुसर्या पक्ष्यांची पिल्ले
पण खायला शिकलेत.
<<<मोहाला आता पालवी फुटायास
<<<मोहाला आता पालवी फुटायास लागली.. लवकर जावा! माझ्या घराजवळच ३ झाडे आहेत मोहाची. >>>
हेम, तुमच्या घराचा पत्ता द्या ना ! पुण्यात असेल तर शक्य असेल तर जावून पाहता येइल.
पक्षांबद्द्ल फारच मनोरंजक माहिती !!
मी आधी दिलेल्या यादीसोबत हि
मी आधी दिलेल्या यादीसोबत हि पण यादी ठेवा. हे सगळे यू ट्यूबवरचे माहितीपट
आहेत. याच नावाने आहेत, त्यामूळे लिंक्स देत नाही.
भारतात कुणी हे माहितीपट बघायचा प्रयत्न केला, तर किती वेळ लागतो
डाऊनलोड करायला ते पण लिहा. हे सगळे साधारण तासाभराचे आहेत.
Michael Palin Great Railway Journeys – Confessions of Train Spotter
Great Railway Journeys – St Petersburg to Tashkent
Great Railway Journeys – The High Andes to Pantagonia
Ddocumentales Machu Pichu megaconstruciones History Chanel
2012 The Mayan Word
Russian Tibet Amazing Journey: Only Buddhist state in Europe
Tibet The Story of Tragedy
Papua New Guinea: Where to now?
Easter Island
How Earth made us 1/5 Water
How Earth made us 2/5 Deep Earth
How Earth made us 3/5 Wind
How Earth made us 4/5 Fire
How Earth made us 5/5 Human Planet
दिनेशदा धन्यवाद
दिनेशदा धन्यवाद
मी अजुन मोहाचे झाड पाहीले
मी अजुन मोहाचे झाड पाहीले नाही. आई म्हणते की पुर्वी होते आमच्या वाडीत पण आता दिसत नाही.
जागू, त्या भागात तुरळक झाडे
जागू, त्या भागात तुरळक झाडे आहेत. माझ्या पाहण्यात पनवेलला झाड होते.
भाजीवालीला, मोहट्याचे झाड आहे का ? असे विचार. फुले ते लोक विकणार
नाहीत पण मोहट्या म्हणजे त्याची फळे विकायला आणतील. या मोठ्या बिया
असतात आणि त्याची वाल घालून भाजी करतात.
----------------------------------
मी आज सकाळी हाऊ अर्थ मेड अस या माहितीपटाचा पहिला भाग बघत होतो.
त्याचे काही चित्रीकरण भारतात झालेय. त्यातल्या निवेदकाने एक विधान केले
ते असे. ब्रिटीशांना भारतातल्या मोसमी पावसाचे प्रकरण कधी कळलेच नाही.
दुष्काळाची गंभीरता त्यांना कळली नाही, ते जुल्मीपणा करुन कर वसूल करत
राहिले. आणि त्यामूळेच भारतात उठाव झाले.
त्यात असे म्हंटले नव्हते, पण मला वाटतं जर त्यांनी असा अभ्यास केला असता,
तर काही दूरगामी योजना त्यांनी आखल्या असत्या. आणि आज या प्रश्नाने एवढे
ऊग्र रुप घेतले नसते.
भारतात अनेक राज्यकर्त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी सरोवरे बांधली. सातार्यापासून
थेट हरयानातल्या नारनौल गावात अशी सरोवरे आहेत. (ते गाव बिरबलाचे.)
पण प्राचीन धरणे / बांधारे का जास्त नसावेत ? पुराणातल्या इंद्रदेवाला पण
धरण बांधणे मंजूर नव्हते. त्याला पाणी असे अडवून ठेवलेले आवडत नसे.
तो असे बांधारे फोडत असे.
आजही या प्रश्नाचे गांभीर्य राज्यकर्त्यांना कळतेय का ? कि केवळ टॅंकरवाल्यांच्या
सोयीसाठी या योजना होऊ दिल्या जात नाहीत. शशांक आणि अनिल, काल म्हणाले
तसे, जर तलावातील गाळ काढण्यासाठी पण लाल फ़ित आडवी येत असेल, तर
खेदाने असेच म्हणावे लागेल.
शाकली, तू सांगितलेली दुरंगी
शाकली, तू सांगितलेली दुरंगी बाभूळ पाहिली आणि काही दिवसापुर्वी हे खाली पडलेले मिळाले. इथे जराते बावलेय. पण झाडावर खरच खूप मोहक वाटतात ती फुले.


शोभा, हि फुले झाडावर पण फार
शोभा, हि फुले झाडावर पण फार टिकत नाहीत. संध्याकाळच्या आतच कोमेजतात
पण त्यावेळी यातला गुलाबी भाग, पांढरा होतो आणि तो अंधारात चमकतो.
म्हणजे रात्री उडणार्या किटकांना पण आमंत्रण !
त्यात असे म्हंटले नव्हते, पण
त्यात असे म्हंटले नव्हते, पण मला वाटतं जर त्यांनी असा अभ्यास केला असता,
तर काही दूरगामी योजना त्यांनी आखल्या असत्या. आणि आज या प्रश्नाने एवढे
ऊग्र रुप घेतले नसते.
भारतात अनेक राज्यकर्त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी सरोवरे बांधली. सातार्यापासून
थेट हरयानातल्या नारनौल गावात अशी सरोवरे आहेत. (ते गाव बिरबलाचे.)
पण प्राचीन धरणे / बांधारे का जास्त नसावेत ? पुराणातल्या इंद्रदेवाला पण
धरण बांधणे मंजूर नव्हते. त्याला पाणी असे अडवून ठेवलेले आवडत नसे.
तो असे बांधारे फोडत असे.
चार महिने पाउस तेव्हा कदाचित पुरत असावा. आणि तशीही भयाण दुष्काळाची वर्णने आहेतच भारतीय इतिहासात. पाणी अडवता येईल हे कुणाला सुचले नसावे..
आमच्या कडील एका डोंगराळ भागात
आमच्या कडील एका डोंगराळ भागात हे मोहाचे झाड आहे असे आमच्या शेजार्यांनी सांगितले पण ते नेव्ही च्या अंडर असल्याने जाता येत नाही तिथे मला. तो शेजारी तिथे कामानिमित्त जातो तो आणुन देईन असे काही दिवसांपुर्वी म्हणाला होता आता त्याला विसर पडला असेल. उद्याच आठवण करून देते.
अजुनही काही डोंगराळ भाग जे
अजुनही काही डोंगराळ भाग जे मोकळे आहेत तिथे ही रोजना राबवता येईल पण लक्ष कोण देत तिथे ?
संध्याकाळच्या आतच कोमेजतात पण
संध्याकाळच्या आतच कोमेजतात
पण त्यावेळी यातला गुलाबी भाग, पांढरा होतो आणि तो अंधारात चमकतो.
म्हणजे रात्री उडणार्या किटकांना पण आमंत्रण !>>>>>>>>>बघायला पाहिजे.
याला काही धार्मिक आडकाठी
याला काही धार्मिक आडकाठी असावी.
आपल्याकडे नेहमी वाहते पाणीच शुद्ध आणि पवित्र मानत असत. शिवाय कदाचित
आपण अडवले तर खालच्या गावांना पाणी कमी मिळेल, असाही विचार असावा.
तळ्यांच्या खुणा तर आजही आपल्याला दिसतात. वसई / ठाण्यात तर आहेतच, पण मुंबईत पण बाणगंगा, धोबीतलाव (इथे होता तलाव पुर्वी) जरीमरी वांद्रा इथे पण मोठे
तलाव दिसतात. इतकेच नव्हे तर उपनगरातही तलाव होते. माझ्या लहानपणी मालाडला माझ्या शाळेच्या वाटेवर आणि शाळेच्या मागे तलाव होते. पण ते १९७४
सालीच बूजवले. अगदीच नाही तर निदान, म्हशींना तरी डूंबायला मिळत असे त्यात.
कालच्या म टा तली बातमी - नविन
कालच्या म टा तली बातमी - नविन सिनेमा येतोय 'आजोबा'
‘ आजोबा ’ नावाच्या एका बिबट्याच्या २९ दिवसांच्या प्रवासावर.
गोष्ट असेल २००९ मधली. संगमनेरजवळच्या टाकळी डोकेश्वर इथं एक बिबट्या आणि कुत्रा एका विहिरीत पडले. ते दोघं एकाच विहिरीत होते ; मात्र बिबट्यानं त्या कुत्र्याला खाल्लं नाही. कुत्र्याच्या ओरडण्यामुळे ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आली आणि बचावकार्य सुरू झालं. कुत्र्याला बाहेर काढल्यानंतर तो तत्काळ गतप्राण झाला. आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावून त्या बिबट्याला पडकलं. विद्या अत्रेय या महिला वन्यजीव अभ्यासकानं ही कामगिरी पूर्ण केली. त्यानंतर या बिबट्याला ‘ आजोबा ’ असं नाव देऊन रेडिओ कॉलर लावून माळशेज घाटात सोडण्यात आलं. पुढे हा बिबट्या २९ दिवसांचा प्रवास करून मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचला. बिबट्याचा हा प्रवास आणि त्याच्या रेडिओ कॉलरच्या माध्यमातून विद्या यांनी टिपलेल्या त्याच्या हालचाली अशा वेगळ्याच इंटरेस्टिंग विषयावर सिनेमा बनवण्याची कल्पना दिग्दर्शक सुजय डहाकेला सुचलीय. जुलै महिन्यात याच्या शुटिंगला सुरूवात होईल.
‘ आजोबा ’ असं नाव असलेल्या या सिनेमाची कथा तो बिबट्या आणि निसर्ग अभ्यासकाभोवती फिरते. असा विषय ‘ फिक्शन फिल्म ’ च्या माध्यमातून हाताळण्याची पहिलीच वेळ असेल. सुजय याबाबत म्हणाला की , ‘ अशा प्रकारच्या सिनेमांची आपल्या प्रेक्षकांना अजिबात सवय नाही. जगभरात निसर्ग संवर्धनाविषयीची जागरुकता वाढत असताना या सिनेमाला नक्कीच महत्त्व असेल. ’
त्या बिबट्याविषयी सुजयनं सांगितलं की , ‘ विहिरीत असताना आणि बाहेर आल्यावरही तो बिबट्या शांत असल्यानं त्याला आजोबा हे नाव देण्यात आलं. त्यानंतर केलेल्या प्रवासात तो हायवे , रेल्वे स्टेशनवर पोहोचला , माणसांच्या वस्त्यांवर गेला तरी त्यानं कुणावरही हल्ला केला नाही. तो चक्क आजोबा नावाच्याच ट्रेकिंगच्या पॉइंटवरही गेला होता. माणसानं जंगलांवर केलेलं आक्रमण याबाबत सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. ’
शूट भारताबाहेर
भारतात वाइल्ड लाइफवरच्या सिनेमाचं शूटिंग करण्यात अनेक अडचणी असल्यानं या सिनेमासाठी श्रीलंका , थायलंड आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन शूटिंग करेल.
चला लवकरच एक वेगळ काहीतरी पहायला मिळणार अशी आशा आहे.
नविन सिनेमा येतोय 'आजोबा' >>>
नविन सिनेमा येतोय 'आजोबा' >>> हो काल पोस्टर पाहिलं या सिनेमाचं, मस्तं होतं.... सिनेमापण छान असावा....
दिग्दर्शक सुजय डहाके >>> म्हणजे "शाळा" दिग्दर्शित केला आहे तोच बहुदा...
इनमिनतीन खरच हा चांगला सिनेमा
इनमिनतीन खरच हा चांगला सिनेमा पहाय्ला मिळेल.
दिग्दर्शक सुजय डहाके >>>
दिग्दर्शक सुजय डहाके >>> म्हणजे "शाळा" दिग्दर्शित केला आहे तोच बहुदा... >> हो
या बिबट्याला ‘ आजोबा ’ असं नाव देऊन रेडिओ कॉलर लावून माळशेज घाटात सोडण्यात आलं. पुढे हा बिबट्या २९ दिवसांचा प्रवास करून मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचला. >> हे प्राण्यांना दिशा ज्ञान असण्याचे उत्तम उदाहरण , पण हे कसे हा प्रश्न पडतो.
नविन सिनेमा येतोय 'आजोबा' ‘
नविन सिनेमा येतोय 'आजोबा'
‘ आजोबा ’ नावाच्या एका बिबट्याच्या २९ दिवसांच्या प्रवासावर. > अरे वा! इंटरेस्टिंग वाटतोय .
नितीन, चांगला विषय. असे
नितीन, चांगला विषय. असे चित्रपट आफ़्रिकेत निर्माण होतात. मराठीतला हा पहिलाच असेल.
हा आजोबा हल्लीच गेला असे
हा आजोबा हल्लीच गेला असे वाचलेले. नॅशनल पार्कात काम करणा-या एका लेडी डोक्टरचा लेख हल्लीच कुठेतरी वाचला होता त्यात आजोबाबद्दलही लिहिले होते. बिबट्यांना त्यांचे निवासस्थान सोडुन लांब जाणे अजिबात आवडत नाही. असेच विहिरीत किंवा इतरत्र पकडले गेलेले बिबटे कुठुन आले ते शोधुन त्यांना त्यांच्या मुळ जागी परत सोडावे लागते. तसे केले नाही तर ते बिबटे स्वतःच तो प्रवास करतात आणि त्या प्रवासात कधीकधी प्राणास मुकतात. पकडले गेलेले बिबटे जर परत जंगलात सोडायचे असतील तर त्यांना माणसांचा कमीतकमी सहवास मिळेल असे पाहतात कारण जर सहवास मिळाला तर त्याच्या लक्षात येते की माणुस एकदम हार्मलेस प्राणी आहे, तो आपल्याशी प्रेमानेही वागु शकतो. हे लक्षात आलेला बिबटा नंतर जर जंगलात परत गेला आणि त्याला माणुस दिसला तर तो जुने प्रेम आठवुन त्याच्या जवळ जाऊ शकतो आणि मग माणसावर आणि पर्यायाने बिबट्यावर आफत कोसळू शकते
दिनेशदा, खुप छान माहिती मिळत
दिनेशदा,
खुप छान माहिती मिळत आहे, त्यामुळे सगळ्या पोष्टी वाचल्याशिवाय गत्यंतर नाही ..
देशात दुष्काळाची झळ बसलेल्या भागात हजारो जनावरांना पाण्यावाचुन आपला जीव गमवावा लागतो, इथल्या गरीब शेतकर्यांना/शेतमजुरांना दरवर्षी आपली बहुमोल जनावरे चार्या/पाण्यावाचुन एकतर माफक किमतीत (बहुतेक कत्तलखान्यातच) विकावी लागतात,नाहीतर नाईलाजाने त्यांना वार्यावर सोडुन द्यायची वेळ येते,
शेवटी हाच माणुस स्वःताच पोट भरण्यासाठी नाईलाजाने,चोर्यामार्या करतो, दरोडे घालतो,अगदी ५००-१००० रु. साठी कसायाप्रमाणे वागण्यास मजबुर होतो, ६० वर्षानंतर देखील इथल्या राज्यकर्त्यांना हे दुष्टचक्र थांबवता आलं नाही (आपण हे थांबवु शकत नाही) याच खुप वाईट वाटतं
अनिल, काही दिवसांपुर्वीच
अनिल, काही दिवसांपुर्वीच कराडच्या बाजाराचा फोटो लोकसत्ता मधे बघितला.
चारा देणे परवडत नाही, म्हणून गुरे बाजारात आली होती. साधे चाऱ्याचे
व्य्वस्थापन जमत नाही आपल्याला ?
अजून एप्रिल चालू आहे. मे
अजून एप्रिल चालू आहे. मे जायचाय. पाऊस पडायला निदान ८/१० जून. त्याच्यानंतर चारा मिळणार.
अशावेळी सरकारी गोदामातले धान्य, इतर राज्यातला चारा का उपलब्ध होऊ शकत नाही ? आमच्याकडे पण यावर्षी पाऊस लांबला. एरवी दूधाचा महापूर असलेल्या या
देशात, काही दिवस दूध मिळणे मुष्कील झाले होते. सगळ्यांनी किमती वाढवल्या.
पण पाऊस सुरु झाल्यावर चार दिवसात सगळे, मूळपदावर आले.
तसं सरकारने यावर्षी
तसं सरकारने यावर्षी चार्यासाठी मोठा निधी खर्च करण्याच जाहीर केला आहे ही चांगली बाब आहे, पण या निधीचा विनियोग योग्य त्या कामासाठी झाला तरच दुषकाळग्रस्तांना दिलासा मिळेल..
उस गावात सगळीकडे पावसाचं पाणी
उस गावात सगळीकडे पावसाचं पाणी वाहून जाऊ नये आणि ते पाणी जमिनीत झिरपायला वाव मिळावा म्हणून जागोजागी छोटी छोटी तळी केलेली असतात.
अगदी शहरात सुद्धा प्रत्येक गल्लीत ही तळी असतात - त्यांना community ponds म्हणतात - जमिनीतील पाण्याची पातळी टिकवण्या वरोबर ही तळी पक्षी, किडे , छोटे प्राणी यांना आधार असतात.
भारतात अशा प्रकारचे संयोजन का नाही, याची मला नेहमी खंत वाटते
शोभा१२३, दुरंगी बाभूळ चे रंग
शोभा१२३, दुरंगी बाभूळ चे रंग खूपच गोड

शांकली, नक्कीच तुम्हा सगळ्यांची आठवण काढीन ट्युलिपच्या शेतात
कृष्णकमळ, दुरंगी बाभूळ
कृष्णकमळ, दुरंगी बाभूळ ,सुंदरच!! मी लाल रंगाचं कृष्णकमळ प्रत्यक्षात पाहिलं नाहीये कधी ..
पक्ष्यांबद्दल मस्त माहिती..
'इतर सर्व माहितीही फार इंटरेस्टिंग
Pages