निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू, जाईच्या कळीभोवती चहाचे पान गुंडाळून केलेल्या चिनी चहाचे वर्णन (बहुतेक चिनीमाती मधेच) वाचल्यासारखे आठवतेय. जाईचीच कळी ना ती ?
-----

मोहाचे झाड, ठाणे स्टेशनजवळ ? मज्जाच !

जिप्स्या, कुठे गायब झाला होतास ?

मी वर जो अफगाणिस्तानवरचा माहितीपट उल्लेखला आहे, त्यात दिसणारा अफगाणिस्तान खुपच अनोखा आहे. मझारे शरिफ आणि बामियान या गावी जाऊन थेट तालिबानी लोकांची परवानगी घेऊन चित्रीकरण केलेय.
उध्वस्त केलेली बुद्धाची प्रतिमा आणि तिच्या आजूबाजूचा परिसर खुप सुंदर चित्रीत
केलाय. खरे तर तालिबानी लोकांची इतकी बंधने असूनही, याचे चित्रीकरण कसे केलं
असेल, असाच प्रश्न पडतो.

साधना, सागर उपवन (बीपीटी गार्डन) कुलाबा, जाऊन आलीस का

नोप... ह्या रविवारी घरी कामे होती.... Sad येत्या रविवारी आंबोली.. आल्यावर जाऊया...

@साधना- ते मोहाचे झाड नाही.मोहाचा तर आता बहार पण ओसरत आला. मी रोज येउरला प्रभात फेरीला जाते.येउर रस्त्यावरच ५-६ मोहाची झाडे आहेत.मोहाच्या फुलाच वास बरासचा बासमती तांदळासारखा असतो आणि ह्या फुलांचा जस्मिन कुळातला वाटतो.
पाकळी सुध्दा मांसल आहे , मोहा एवढी नाहि पण रुईच्या फुलाएवढी आहे.

दिनेशदा, गावी गेलो होतो २ दिवस आणि त्याआधी तीन दिवस घरीच (तब्येत बिघडलेली Sad ).

पवई परीसरातही जांभळा, गुलाबी तामण आणि मुचकुंद बहरला आहे. Happy

माधव, बायर हाऊस (कोलगेट ऑफिससमोर) दोन मुचकुंदाची बहरलेली झाडे दिसलीत. Happy

मोहाच्या फुलाच वास बरासचा बासमती तांदळासारखा असतो >>> व्वॉव... पुण्यात कुठे आहे असं झाड....? मला आवडेल ते पहायला Happy

मोहाच्या फुलाच वास बरासचा बासमती तांदळासारखा असतो >>> व्वॉव... पुण्यात कुठे आहे असं झाड....? मला आवडेल ते पहायला स्मित>>>> पद्मजा - पुण्यात घोले रोडला महापौर निवासाजवळ दोन झाडे आहेत - पण आता बहर नसेल त्यांना, महिन्या दीडमहिन्यापूर्वी शांकलीने पाहिला होता (बासमती का आंबेमोहोर अशा वासाचेही वर्णन करत होती).......

धन्स शशांकजी, आस.. Happy
लक्षात ठेवायला हवीत ही ठिकाणं आता मला.. Happy बहर आला की जाऊन पाहिन... Happy

हो..मोहाच्या वासाचे वर्णन शिजलेल्या भातासारखे असेच ऐकलेय मी...>> सह्ही ना... Happy

नितीन छान फोटो. वैशाख ऐन भरात आला कि पिंपळाला चेव येतो.
जिप्स्या, आजारी नको रे पडूस सारखा सारखा !

मोहाचा वास म्हणजे मुयान मुयान (इति. चितमपल्ली )

बहर आला की जाऊन पाहिन...
मोहाला आता पालवी फुटायास लागली.. लवकर जावा! माझ्या घराजवळच ३ झाडे आहेत मोहाची. Happy
दिनेशदा,
मी आत्ताच फॉक्स ट्रॅव्हलरवर एक लघुपट पाहिला अफगाणिस्तानवर! त्यांतही बामियान दाखवले. अंगातले भूत काढायला मांत्रिकांच्या शोधात असलेला निवेदक. बामियानला या मांत्रिकांची प्रथम पसंती आहे असे त्यांत सांगितले. वगैरे वगैरे..

ईन मीन, पिंपळाचा फोटो मस्त!
दिनेशदा, तुम्ही दिलेली लिस्ट खूपच उपयुक्त (खरं तर उपयुक्तची सुपरलेटीव्ह डिग्रीच) आहे.

दिनेशदा, त्या अफगाणिस्तानवरच्या माहितीपटाचं नाव सांगा ना..

मोगर्‍याचा सुगंध आला इथवर Happy

पिंपळाची पालवी मस्त !

हे ओळखलं का ?
T.JPG

हो ट्युलिपच - आमच्या गल्लीत फुललं आहे - ट्युलिप च्या नेहमी च्या आकारा पेक्षा वेगळा आकार म्हणून सगळ्यांना दाखवायला फोटो टाकला Happy

येत्या शनीवारी आम्ही ट्युलिप च्या शेतांच्या बाजूने सायकल चालवायला जाणारे Happy

ट्युलिप अशा पण आकाराचं असतं हे पहिल्यांदाच बघितलं!
सेनापती, माझा नं पैला.... माला हवंय लाल कृष्णकमळ..
दिनेशदा, अजून एक असंच पांढरं,खूपच छोट्या आकाराचं कृष्णकमळ (त्यासारखंच दिसणारं) फूल असतं. ते म्हणे खरं कृष्णकमळ नाही....(मग कुठलं फूल आहे देव जाणे!). कुणी बघितलंय का? आणि मग ते नक्की कस्लं फूल आहे?

येत्या शनीवारी आम्ही ट्युलिप च्या शेतांच्या बाजूने सायकल चालवायला जाणारे>>>>> ट्युलिपच्या शेतात सायकल? वा वा... आमची आठवण काढून चालवा....
३/४ दिवसांपूर्वी एक अतिशय वाईट बातमी वाचली पेपरमधे.. पाषाण इथलं जंगल आगीत जळून खाक झालं Sad आणि ही आग नक्की कशामुळे लागली ते अजूनपर्यंत समजलं नाहीये Sad
तिथले अनेक प्राणी....त्यांच्याबद्द्लपण काहीच कळालं नाही.....तिथले अनेक मोर लोकांनी दाणा-पाणी घालून टिकवले होते.............

पिंपळपालवी खुपच कोवळी आणि सुरेख दिसतीय.. ट्युलीप आणि कॄष्णकमळाचे प्रचि पण सुंदर..

कोकिळेलाच पावश्या असं पण म्हणतात का?

मोहाला आता पालवी फुटायास लागली.. लवकर जावा! माझ्या घराजवळच ३ झाडे आहेत मोहाची.>>> ह्म्म बघुन येईन नक्कीच Happy

ट्यूलिप, जांभळा कृष्ण कमळ.... मस्तच आहे... Happy

शांकली, या पॅसिफ्लोरा कूळातली सगळी फूले अशीच दिसतात. ते पांढरे असते ते
पॅशनफ्रुटचे असेल. लाल कृष्णकमळ, सिंहगडाच्या पायथ्याशी, जिथून एस टी बस सूटते तिथे बघितले होते. हा वरचा फोटो, ऑकलंडचा आहे.

कोकिळेलाच पावश्या असं पण म्हणतात का?

पावश्या म्हणजे चातक असावा. दिसायला कोकिळासारखाच असतो. ककु कुटूंबातलाच. आफ्रिकेतुन इथे येतो खास दुस-यांच्या घरट्यात अंडी घालायला. Happy

आमच्या कॉलनीत कावळे कमी आणि कोकिळ जास्त झालेत. त्यामुळे समस्त कावळेजमात काळजीत पडलीय. त्यांच्या अंड्यांचे काही खरे नाही Happy

कावळ्याची अंडी खाली ढकलुन कोकिळेने त्यात अंडी घातल्यावर दुसरी कोकिळा येत नाही काय तिथे अंडी घालायला? कावळ्यांना जर अंड्यातला फरक कळत नसेल तर दुस-या कोकिळेला कसे कळते की घरट्यातली अंडी आपल्याच एका बहिणीची आहेत, कावळ्याची नाहीत ती..
(ऐशुच्या मते, भारतीय आई जशी चायनिज मुलांना पाहुन 'ही मुले आपली नाहीत' हे लगेच ओळखेल तसे कोकिळेलाही कावळा आणि दुसरी कोकिळा यांच्या अंड्यातला फरक कळत असणार Happy )

दिनेशदा, अजून एक असंच पांढरं,खूपच छोट्या आकाराचं कृष्णकमळ (त्यासारखंच दिसणारं) फूल असतं. ते म्हणे खरं कृष्णकमळ नाही....(मग कुठलं फूल आहे देव जाणे!). कुणी बघितलंय का? आणि मग ते नक्की कस्लं फूल आहे?

मी मागे टाकलेले त्याचे फोटो. अगदी क्रु.क. सारखेच पण जुन्या रुपयाच्या आकाराचे. फोटो बघते आणि मिळाला तर टाकते परत.

Pages