(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
माझ्याकडे बाळकळे आलेत..
माझ्याकडे बाळकळे आलेत.. पुढच्या आठवड्यात मोठे होतील बहुतेक.
जागु, मस्त गं..
जिप्सी, करमळाचा फोटो लईच भारी
जिप्सी, करमळाचा फोटो लईच भारी आला आहे !
>>जागू, रायाआवळ्याचे आणि कैर्यांचे फोटो टाकून कुफेहेपा?.....>>
आमच्या सगळ्यांच्या वाटचे आवळे आणि कैर्या दात आंबट होईपर्यंत खाऊन
अबोलीचा गजरा 'प्रफुल्ल' !
हा चेरी चा बहर -
आणि ही माझी आवडती स्टार मॅग्नोलिया
इंग्रजांच्या काही गुणांना दाद
इंग्रजांच्या काही गुणांना दाद द्यायलाच लागेल - आमच्या इथले ही वनस्पती उद्यान खूप सुरेख आहे - मी तिकडे वार्या करत असते उन्हाळ्यात ! आता कॅमेरा घेवून जाईन या पुढे
बंगरूळचे लालबाग वनस्पती उद्यान पण फार छान आहे.
इन्डीगो खुप सुंदर आहेत फुल.
इन्डीगो खुप सुंदर आहेत फुल.
इन्डीगो, चेरीचा बहर मस्तच.
इन्डीगो, चेरीचा बहर मस्तच. कितीहीवेळा बघितला तरी समाधान होत नाही.
त्या मॅग्नेलिया ची एक बी, जपानमधल्या एका उत्खनन क्षेत्रात सापडली होती. अनेक शतके ती जीव धरुन होती. ती रुजवल्यावर असे लक्षात आले कि ती एक वेगळीच
जात आहे. यावर सर अटेंबरोंचे वक्तव्य लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले, कि झाडे स्पेस मधेच नव्हे तर टाईम मधे पण प्रवास करु शकतात.
काल मी THE WAY नावाचा चित्रपट बघितला. त्याबद्द्ल लिहितोच त्या बीबीवर
पण, तो बघताना सारखे वाटत होते, कि तूम्हा सर्वांच्या सोबतीने जर मला तो प्रवास करता आला तर !!
मस्त माहिती मॅग्नोलियाबद्दल!
मस्त माहिती मॅग्नोलियाबद्दल! दिनेशदा!
हल्ली रोज संध्याकाळी ह्यांचा
हल्ली रोज संध्याकाळी ह्यांचा संचार आमच्या चिकूच्या झाडावर असतो. अगदी जवळ गेले तरी घाबरत नाहीत. बहुतेक आमच्या घरातील जन्मलेलीच बाळे असतील ही म्हणून घाबरत नसतील.
चिकूचा आस्वाद घेत आहेत साहेब.
वा बरिच उत्तम माहीती जमा
वा बरिच उत्तम माहीती जमा झाली आहे ईथे
जागुतै पुदिना कसा लावायचा याच्या आही बिया असतात का ?
इनमिन बाजारातून आणलेल्या
इनमिन बाजारातून आणलेल्या पुदीन्याच्या फांद्या लावल्या तरी त्या जगतात.
THE WAY या नावाचा मार्टीन शीन
THE WAY या नावाचा मार्टीन शीन अभिनीत चित्रपट मी बघितला.
मार्टीन हा एक वयस्कर डॉक्टर अमेरिकेत प्रॅक्टीस करत असतो. त्याचा मुलगा, फ्रांस ते स्पेनमधल्या सँटीयागो पर्यंत करायच्या एका तीर्थयात्रेत मरण पावल्याचा फोन त्याला येतो.
लेकाचा मृतदेह ताब्यात घेताना त्याला त्या तीर्थयात्रेची माहिती मिळते. त्याचा मुलगा
पुरेश्या माहितीअभावी त्या यात्रेवर गेला होता. भरकटला आणि म्हणून जीवनाला मूकला, असे त्याला सांगितले जाते.
तो मूलाच्या देहावर अग्निसंस्कार करतो आणि त्याची रक्षा घेऊन ती तीर्थयात्रा स्वतः
करण्याचे ठरवतो. त्याचे वय झालेले असते, त्याला अनुभवही नसतो, तरी तो हा
निर्णय घेतो. पाठीवर सॅक घेऊन एकटाच चालू पडतो. त्याला वाटेत काही सोबती
भेटतात. प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा असतो, पण तरीही त्यांच्यात मैत्री होते. एकमेकांवर
प्रेम करत, कधी भांडत त्यांचा प्रवास पूर्ण होतो.
खरं तर अगदी साधीसुधी कथा. या कथेचा मेलोड्रामा सहज झाला असता, पण तसा
तो अजिबात झालेला नाही. मूलाची रक्षा ठेवलेली पेटी त्याच्याजवळ सतत असते.
अनेक ठिकाणी, त्याला मूलाचा भासही होतो. पण कुठेही रडारड, पूर्वायूष्यातल्या
आठवणी असे काहीही नाही. मूलाचा मृतदेह बघितल्यानंतरचाही मार्टीनचा अभिनय
अत्यंत संयत आहे.
सहप्रवाश्यांच्या कहाण्या , ओघाने येणार्या कथा तितक्याच हृदयस्पर्शी आहेत. पण त्या त्यांच्या कथनातूनच येतात.
वाटेतले त्यांचे मुक्काम, तिथली रहायची, झोपायची व्यवस्था, तिथले तर्हेवाईक
मॅनेजर्स.. अनोखे आहेत. शेवटी इच्छित स्थळी पोहोचल्यावर तिथे त्यांना यात्रा
पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळते. त्याआधी पुरावे तपासले जातात. इथे मात्र मार्टीन
स्वत:च्या नावे प्रमाणपत्र न घेता, आपल्या मूलाच्या नावे घेतो. त्यावेळी आपल्याला
परत सत्याचे भान येते.
कथा, पटकथा (यासाठी नामांकन झाले होते) अभिनय या जमेच्या बाजू आहेतच. पण
सर्वात अनोखा आहे तो निसर्ग. या संपूर्ण यात्रेच्या दरम्यान दिसणारा निसर्ग, अतिसुंदर
आहे. तसा हा प्रवास मजेमजेत करण्याजोगा, फारसे चढ वगैरे नसलेला दिसतो.
वाटेत हवा तिथे मुक्काम करत, विश्रांती घेत केलेला हा प्रवास, मला खुपच आवडला.
माझ्या सर्व मित्रमैत्रिंणींसोबत असा प्रवास करावा, असे दर मिनिटाला वाटत होते.
(इथे अनया आणि रैना ने लिहिलेले वर्णन वाचून, त्यांच्या यात्रेचे चित्रीकरण व्हायला
हवे होते, असेही वाटून गेले.)
इथे या चित्रपटाचे एक ट्रेलर आहे.
http://www.youtube.com/watch?v=o5VZKWcgw6c
वा दिनेशदा तुम्ही दिलेल्या
वा दिनेशदा तुम्ही दिलेल्या बर्याच लिंक माझ्याकडे ओपन होत नाहीत. अशीच माहीती देत जा.
जागू, कारण काय ते कळत
जागू, कारण काय ते कळत नाही.
पण या सगळ्या सिडीज मी येताना घेऊन येईन. मग तूम्ही एक एक करुन बघा.
ही फुले लोणावळयात, पवनाकाठी
ही फुले लोणावळयात, पवनाकाठी होती
नेहमी प्रमाणे नाव माहीत नाहीत
नेहमी प्रमाणे नाव माहीत नाहीत
नितीन ते दुसरे फुल खूप
नितीन ते दुसरे फुल खूप कुंदासारखे (कुंद या फुलासारखे) दिसतय. पण पाने वेगळी आहेत.
ते दुसरे फुल खूप कुंदासारखे
ते दुसरे फुल खूप कुंदासारखे (कुंद या फुलासारखे) दिसतय.>>> हो हो मलाही ही फुले एका कॅनाला / कालव्याच्या बाजुला दिसली. रानफुलांसारखी पडुन होती तेथे.
कोणती आहेत ती?
ईन मीन ती दुसरी फुलं
ईन मीन ती दुसरी फुलं रानमोगर्याची आहेत. पण पहिलाही फोटो मस्त आलाय.
जागू, तुझ्याकडचे पाहुणे गोडू गोडूच आहेत!! वेळ कसा जातो कळत नाही यांच्या निरिक्षणात.
इंडिगो, सुंदर फोटो आणि फुलं!! सह्ही!!
साधना, राणीबागेबद्दल एक धक्कादायक बातमी (ती खोटीच असू आणि ठरू दे) कळाली की तिथली झाडं काढून टाकणार आहेत म्हणून आणि प्राणी दुसरीकडे हलवणार आहेत....
दिनेशदा, ही फिल्म (THE WAY) बघितली पाहिजे...
इंडिगो, चेरीचा बहर झक्कास
इंडिगो, चेरीचा बहर झक्कास
राणीबागेबद्दल एक धक्कादायक बातमी>>>>:(
जागू, अबोलीच गजरा करणे म्हणजे
जागू, अबोलीच गजरा करणे म्हणजे चांगलेच कौशल्याचे काम आहे!! गजरा छान झालाय. गुंफून केलास की सुईत ओवून?
ओ! सॉरी... जागू, मी नीट
ओ! सॉरी... जागू, मी नीट पाहिलाच नाही फोटो! गुंफूनच केलाएस की गं! मस्तच झालाय........
शांकली, अधून अधून तशा बातम्या
शांकली, अधून अधून तशा बातम्या येतच असतात. बाग आणखी किती तग धरु शकेल, याचीच काळजी
वाटतेय,
जागु तै, तो लालगाल्या बुलबुल
जागु तै, तो लालगाल्या बुलबुल आहे नं? कसला मस्त फोटो आहे..आणि कैर्^या पाहून तर जीव जायचाच होता माझा....:(
दिनेशदा तुम्ही सुचवलेला व्हाइट लायन सुरू केलाय्....रोज थोडा थोडा कारण सलग वेळ मिळत नाहीये.छान आहे ..आणि आता THE WAY शोधुन ठेवेन..
अवांतर, तुम्ही लोकांनी nat जियो ची (की डिस्कव्हरीची) animal planet पहिली आहे का?? खुप छान आहे...पाच डिव्हिडीचा सेट मिळतो आणि तो विकत घेतल्यामुळे काही रक्कम प्राणी की निसर्ग संवर्धनासाठी जाते...आम के आम आणि...:)
शांकली रानमोगरा
शांकली
रानमोगरा सुंदरच.
दिनेशदा नक्की त्या सिडीज आम्हाला द्या पहायला.
होय वेका तो लालगाल्या बुलबुलच
होय वेका तो लालगाल्या बुलबुलच आहे. मागे आमच्या घरातील झुंबरात बुलबुलने बाळे घातली होती. मी त्यावर लेखही लिहिला होता व तो लोकसत्ता मध्ये प्रकाशीतही झाला होता. सगळ श्रेय बुलबुल आणि मायबोलीला.
सही..अभिनंदन... आणि मुख्य
सही..अभिनंदन...:) आणि मुख्य तुम्हाला इतक्या जवळून ते सगळं पाहता आलं यासाठी जास्त अभिनंदन्...आमची धाव जास्तीत जास्त चिमण्यांची घरटी पाहण्यापर्यंत आणि मजा म्हणजे आजकाल चिमण्यापण कमी झाल्यात म्हणून ते स्प्~अरोज नेस्टवाले काम करताहेत असं वाचतेय....
दिनेशदा, उत्खनन क्षेत्रातल्या
दिनेशदा, उत्खनन क्षेत्रातल्या मॅग्नोलिया ची माहिती ल़़क्षवेधक - मला नं एकदा असं झाड बघायचं आहे - जे अशा प्रकारे काळ ओलांडून आलय - कुणाला सापडलं ना नेट वर तर नक्की टाका इथे - मी पण शोधेन..
>>यावर सर अटेंबरोंचे वक्तव्य लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते म्हणाले, कि झाडे स्पेस मधेच नव्हे तर टाईम मधे पण प्रवास करु शकतात.>>
खरंच ! भरभरून अनुमोदन !
THE WAY बघितलाच पाहिजे आता - ट्रेलर मस्त आहे !
animal planet आहे माझ्याकडे - अत्यु़त्क्रुष्ठ ! (हे मराठीत टाईपतांना घाम आला - तरिही काहितरी चुकल्या सारखे वाटते आहे - पण त्या कार्यक्रमाला तेच योग्य वर्णन आहे ) नक्की बघा - नाही मिळाले तर मला कळवा - मी पुढल्या वेळी आनंदाने घेऊन येईन
जागू, तुमची बाग आणि त्यातली फळे, झाडे, फुले, पक्षी - किती छान गं ! - माझ्या लेखी खूप श्रीमंत आहेस तू !
तिथले प्राणी संग्रहालय
तिथले प्राणी संग्रहालय हलवण्याबाब अनेक वर्ष हो नाही हो नाही सुरू आहे पण झाडांबद्दल हे नवीनच ऐकतोय. मला नाही वाटत तिथून बाग हलवता येईल.. तिथे खरेतर मुंबईचे बोटानिकल गार्डन व्हायला हवे..
इन्डीगो, तशी अनेक ऐतिहासिक
इन्डीगो,
तशी अनेक ऐतिहासिक झाडे आहेत.
शनवारवाड्यातली बकुळ खुद्द पेशव्यांनी लावलीय असे वाचले.
वसईच्या किल्ल्यातले गोरखचिंचेचे झाड, पोर्तुगीजांनी लावलेय.
दमणजवळच्या संजाण या गावातले एक आंब्याचे झाड, चक्क चालते.
खरे म्हणजे ते आडवेच वाढतेय. त्याचा एक भाग जमिनीला टेकला
कि त्याला मूळे फुटतात. आणि मग पहिले मूळ उचलले जाते.
या झाडाला आंबे पण लागतात. मिलिंद गुणाजी ने त्याचा फ़ोटो
प्रसिद्ध केला होता.
जागू, भारतात सध्या फास्ट असे कुठले नेट कनेक्शन आहे ? भारतात मी टाटा फोटॉन वापरत होतो. चांगले होते ते.
यू ट्यूबवर अनेक चांगले माहितीपट आहेत. रिफ्ट व्हॅली बरोबरच, किलिमांजारो,
कोस्टा रिका, सैबेरिया, इराण अशा अनेक ठिकाणांवर आहेत. तिथला निसर्ग
आपल्याला खूपच अनोळखी आहे. अवश्य बघावेत असे माहितीपट आहेत हे.
(माझ्याकडे यादी आहे आणि ते माहितीपट रेकॉर्डही करुन घेतलेत.)
साधना, राणीबागेबद्दल एक
साधना, राणीबागेबद्दल एक धक्कादायक बातमी (ती खोटीच असू आणि ठरू दे) कळाली की तिथली झाडं काढून टाकणार आहेत म्हणून आणि प्राणी दुसरीकडे हलवणार आहेत....
प्राणि आधीच वर हलवले गेलेत. आम्हाला १५-२० चितळे, दोन भुंकणारी हरणे आणि ऐशु-इशिताने पाहिलेल्या पाणघोडे नी माकडे सोडुन अजुन काही दिसले नाही. एक अस्वल हात पसरुन पडलेले. आधी पाहिलेले वाघ, सिंह, तरस. इ.इ. गडपलेत. हत्ती आहे, दोन मगरी सुस्तावलेल्या आहेत (त्यांना नो टेकर्स..)
झाडांबद्दल... त्या जागेवर कब्जा करण्यासाठी मोठमोठे बिल्डर उत्सुक आहेत हे ऐकुन आहे. कदाचित असे होईलही. पैशाने सगळे जमवता येते. दिनेशदांनी साईट दिलीय त्याचे नाव सेवराणीबाग आहे. सेव राणी बाग याचा अर्थच राणीबाग संकटात आहे असा होतो ना...
जागू, भारतात सध्या फास्ट असे
जागू, भारतात सध्या फास्ट असे कुठले नेट कनेक्शन आहे
जागुच्या घरी मटेनिली आहे. तिला मटेनिलीचे ब्रॉडबँड घेता येईल. ६०० रुपयात खुप छान स्पिड आणि अनलिमिटेड डाऊनलोड.
Pages