निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी, बरं पहिला मान तूझा. यात लालपिवळी जात पण असते ना ?
साधना, शशांकच्या फोटोबाबत मी एक क्लू दिलाय, (तोच चुकला तर !! मला नै मैत.)

कळमाचा बहर कदाचित उशीरा येत असावा. पण बहरलेले झाड सुंदर दिसते आणि
राणीच्या बागेतला तर भरभरुन फुलतो.

त्या कळमांच्या फुलांचा मी काढलेला फोटो, या पानावर आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/126551.html?1180628514

आणि श्री दिनेश वाळके यांनी काढलेला, या पानावर आहे.
http://www.flickr.com/photos/dinesh_valke/484253744/

आणि हो साधना, तोच क्लू !!

सापडला Happy

जिप्सी, त्या जोडप्याला सापडलेल्या फुलाचा फोटो टाक ना इथे....

चिकुसारखे फळ असलेले झाड कोणते? आपण माहिमलाहि पाहिलेले.. मला नाव काही केल्या आठवेना. काहीतरी श.. वरुन्होते एवढेच आठवत होते.

शशांकनी शिंगावर घेतलं वाटतं सगळ्यांना

हा काय क्लु???????/ स्मित>>>>>>> हाच क्ल्यू आहे - आता सांगा बरं - साधनाला ५०% मार्क्स आहेतच - कूळ तेच आहे - वारस आणि हे झाड.....

हुश्श .. अखेरीस वाचून झाला हा भाग ... सगळेच फोटो अप्रतिम!

बी, त्या फुलांना आम्ही लहानपणी `पुणेरी शेवंती' म्हणायचो.

दिनेश.. टेंभुर्णी बरोबर. मला याचे लाकुड वापरतात हे आठवत होतं पण नाव नाही.. त्यामुळे सतत शिसम हेच नाव तोंडात येत होतं..

मला ५०% मार्क.. वावा.. आता उरलेला पेपर इतरांनी सोडवा .. मिल बाट के खायेंगे... Happy

काय हे साधना - ५०% मिळवलेतच तर बाकीचे शिंगावरुन मिळालेच असते- मेडशिंगी / मेढशिंगी - याच्या शेंगा मेंढ्याच्या शिंगा सारख्या वळलेल्या आहेत ना - तोच क्ल्यू दिनेशदांनी (घरी मला अंजूने) दिला होता.
http://www.flowersofindia.net यांच्यानुसार - Dolichandrone falcata तर मेडिसिनल प्लांट च्या साईटवर Dolichandrone spathacea म्हणजे मेडशिंगी, कूळ - Bignoneceae

हे जरा माधव आणि शशांकसाठीच, (बी, साधना पण नक्कीच रस घेतील.)

शेवंती हा शब्द मराठमोळा असावा, असे मला उगीचच वाटत होते. निदान हिंदीभाषिक
पट्ट्यात तरी हा शब्द ऐकला नव्हता. मालिनी राजूरकरांचा एक पंजाबी टप्पा ऐकताना मात्र, हा शब्द सापडला. गुलफुला फुले शेवंती असेच शब्द आहेत. आता शेवंती म्हणजे आपण समजतो, तेच फूल का, हे मात्र बघावे लागेल.

----------

एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्यावर माहितीपट कसा बनवायचा, हे बीबीसी
कडून शिकावे. बीबीसी चे अनेक माहितीपट यू ट्यूब वर आहेत.
त्यापैकी, पृथ्वीवर नेमकी किती माणसे राहू शकतील, यावरचा जो माहितीपट आहे,
त्यातचे विवेचन (अर्थात अटेंबरो साहेबांचे) म्हणजे झणझणीत अंजन आहे.
त्यातली आकडेवारी आणि तीसुद्धा कशी संकलित केली जाते, त्यावरुन कसे आडाखे
बांधले जातात, हे सगळेच श्रवणीयच नव्हे तर प्रेक्षणीयपण आहे.

अटेंबरो साहेब, नेहमीप्रमाणेच आकाशी शर्ट आणि ढगळ पँट या वेषात. याची त्यांनीच
सांगितलेली कारणे म्हणजे.
१) त्या रंगाचे त्यांच्याकडे २ शर्ट आहेत Happy
२) त्यांच्या कार्यक्रमाचा एक भाग जगाच्या एका कोपर्‍यात तर दुसरा, दुसर्‍या कोपर्‍यात चित्रीत केलेला असू शकतो. मग सलगपणा रहावा म्हणून हे.
३) मी जर मधेच शर्ट बदलला तर लोक माझ्या शर्टाकडेच बघतील..

अवलीया माणूस...

शांकली हि आवड माहित नव्हती. esnips वर मला मालिनी राजूरकरांच्या गायनाचा
खजिना सापडला. अनेक खाजगी आणि सार्वजनिक मैफिलींचे, आणि त्यासुद्धा
त्यांच्या तरुणपणीच्या मैफिलींचे संकलन आहे त्यात. अप्रतिम. दुसरा शब्दच नाही.

जिप्सी, त्या जोडप्याला सापडलेल्या फुलाचा फोटो टाक ना इथे....>>>>हा त्याचा फोटो (माझ्यासारख्या अजाण बालकाला ते फुल लाल कृष्णकमळासारखे वाटले आणि तिथे त्याच नावाने ज्ञान पाजळले Sad )

बरं बाबा, हि घे लिंक
http://www.esnips.com/search_results.php?album=search&keywords=on&captio...

इथे तूला टप्पा, तराणा, होरी, त्रिवट, चक्रधर, रागमाला असे खणखणीत प्रकार ऐकायला मिळतील. बाईंचे गायन आधी ऐकले नसशील तर आधी टप्पे ऐकायला घे.

(यात मधेच हेमामालिनी आणि नंदा मालिनी अशा पण फाईल्स दिसतील, त्यांच्याकडे
दुर्लक्ष कर.)

लाल कृष्णकमळ असते तसे जांभळेही असते, पण हे ते नाही. हे फूल बहुतेक ते
ऑफिसजवळचे आहे. तिकडे पण गेला नव्हतात का ?

(यात मधेच हेमामालिनी आणि नंदा मालिनी अशा पण फाईल्स दिसतील, त्यांच्याकडे
दुर्लक्ष कर.)>> Lol
खरंच खणखणीत गायन आहे..

तिथे बघ समुद्रफळ, करमळ, कोको, समोरच्या बाजूला ते ऑस्ट्रेलियन, एक चाफा
अशी झाडे आहेत. बाजूला कमळाचे सरोवर आहे (हे कमळ तर नव्हे ?)

तिथे बघ समुद्रफळ, करमळ, कोको, समोरच्या बाजूला ते ऑस्ट्रेलियन, एक चाफा
अशी झाडे आहेत.>>>येस्स तीच जागा Happy

(हे कमळ तर नव्हे ?)>>>>नो आयडीया Sad

येस्स्स.. हे कमळ आहे.. नो डाऊट अबाऊट इट इन माय माईंड..... दिनेश, हे फुल कुठल्याही झाडाखाली सापडले नव्हते तर एका बागेच्या कडेला लावलेल्या अनंताच्या रोपट्यांमध्ये खाली पडलेले सापडले होते. मी खरे तर तेव्हाच ओळखायला हवे होते. फुलाच्या देठाकडे जाड हिरवट पाकळ्या, त्यावर मुलायम अशा पाकळ्या आणि मध्ये पुंकेसर. कोणीतरी आदल्या दिवशी कमळ तोडले आणि मग तिथे टाकले असणार.

मालिनीबाईंचे गाणे मी समोर बसुन ऐकलेय. माझ्या पपांची नी तिची खुप वर्षांची ओळख होती. पपा नेहमी सांगायचे की तिला स्टेजव्यतिरिक्त इतरत्र पाहिले तर एक साधी संसारी गृहिणी वाटते पण स्टेजवर गाताना इतकी वेगळी पर्सनॅलिटी बनायची तिची की ओळखुही यायचे नाही. खरेच खणखणीत आवाज.

मालिनीबाईंबद्दल अजून एक आठवण/किस्सा सांगितला जातो तो असा; की त्यांनी पहिल्यांदा जेव्हा सवाई गंधर्व मधे गायन केलं तेव्हा त्यांचं बाळ अगदीच लहान होतं. त्याला विंगेत ठेवून त्या गायल्या होत्या. तेव्हा काही जण म्हणाले देखील होते की आता इथे बाळंतिणी (की स्वयंपाकघर) पण यायला सुरुवात झाली वाटतं!! पण जेव्हा त्यांचं गाणं सुरू झालं तेव्हा आपसूकच ह्या कॉमेंट्स करणार्‍यांची तोंडं बंद झाली.

अजाण बालकाला ते फुल लाल कृष्णकमळासारखे वाटले

ऐला, लाल कृष्णकमळ????????????????????????? काय रे काय चाललेय???

Pages