निसर्गाच्या गप्पा (भाग-७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 April, 2012 - 00:54


(ह्या भागाला आपला निसर्गमय आयडी महान छायाचित्रकार जिप्सी ह्याच्या सौजन्याने वरील छायाचित्र मिळाले आहे. )

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जांभळी अबोली मी पाहिलीय. सह्याद्रीच्या जंगलात भरपुर आहे. अबोलीच्या पाकळ्यांच्या विशिष्ट रचनेमुळे फुल अबोली वर्गातले आहे हे सहज लक्षात येते.

उजु, सध्या माझ्याकडे अ‍ॅडेनियमच्या बिया किंवा अ‍ॅडेनियम दोन्ही नाहीत. जे आहे ते फुललेले आहे त्यामुळे लवकरच त्याला शेंगा धरतील. मग रोपे बनवुन त्यातले एक देईन तुला.

Thanks for Aboli.....gypsy....:)

त्या राज्यांत इतर सर्व पिके त्यात चहा, बांबू, भात, मश्रुम, अननस, फणस होत असली तरी आंबा मात्र नाही. याबाबतीत शास्त्रीय कारण काहि असेल का ? >>> कदाचित हवामान हा घटक असेल.

आंबा, कोकणात पण होतो आणि गुजराथेत बलसाड येथे पण खुप मोठ्या प्रमाणात होतो. पण माझे निरिक्षण आहे की दोन्ही ठिकाणच्या आंब्याच्या चवित फरक आहे. याचे मला सांगितलेले कारण असे की कोकणात समुद्री वारा आहे जो बलसाड येथे नाही. त्यामुळेच चवीत खुप मोठ्या प्रमाणात फरक पडतो.

हवामान हा घटक असणार नक्कीच. मी गुवाहाटीला नारळाच्या झाडासारखीच उंच अशी केळीची झाडे पाहिलीत. मला ही झाडे उगीचच इतकी उंच का वाढलीत याचे आश्चर्य वाटत होते. कारण फळ तर येणार एकदाच. त्यामुळे फळ आल्यावर झाड तोडले जाणार. शिवाय झाडही असे नाजुक की त्याच्यावर चढताही येणार नाही. मग इतके उंच वाढायचेच कशाला???

जिप्स्याच्या फोटोतला वायुवर्ण (किंवा पाचुंदा किंवा जे काय त्याचे नाव असेल ते) बघुन जाम वाईट वाटले. माझ्या ऑफिसात याची दोन लहानशी बाळझाडे होती. त्यांना अशीच फोटोत दिसताहेत तशी सुंदर फुलेही येत होती. गेल्या महिन्यात बिचा-यांची कत्तल झाली. रस्तारुंदी Sad

सध्या सायनपनवेल महामार्ग तिनपदरी करण्याचे काम चालु आहे. दोन्ही बाजुंनी कत्तल चालु आहे Sad

हवामान आणि एखादा रोगही असणार.
उत्तम हवामानात झाडे अशीच वाढतात. माझ्या घरासमोर असेच एक टोकफळाचे
झाड आहे. ते सहाव्या मजल्याच्याही वर गेले आहे.
अविनाश बिनीवाले यांच्या पूर्वाचल या पुस्तकात मस्त ओळख करुन दिलीय त्या
भागाची. या महिन्यात १२/१४ एप्रिल ला तिथे (मिझोराम) ऑर्किड महोत्सव होतो.
सुरक्षिततेच्या कारणाने, आपल्याला तिथे जाणे आता कठिण झालेय.

अजुन एक तिथली तांबडी माती हेही कारण असावे. >>> बरोबर, कोकणातली तांबडी माती आणि बलसाडकडची काळी माती.

अजुन एक निरीक्षणः आता कलिंगडांचा मोसम सुरू आहे. कधी कधी कलिंगड खुप गोड लागते तर कधी ते तितकेसे गोड नसते, भले आतुन तेवढेच लाल का असेना. याचे मुख्य कारण ज्या मातीत कलिंगडे लावलेली असतात. मुरमाड, वालुकामय मातीतल्या कलिंगडात खुप गोडवा मिळ्तो. पण काळ्या मातीतल्या कलिंगडांमधे नसतो. कारण काळ्या मातीत पाणी पकडुन ठेवायची क्षमता जास्त असते आणि हे पाणी फळ शोषून घेते. या उलट मुरमाड मातीत पाणी पकडुन ठेवले जात नाही. त्यामुळे अशी कलिंगडे गोड असतात.

आता कलिंगडांचा मोसम सुरू आहे. कधी कधी कलिंगड खुप गोड लागते तर कधी ते तितकेसे गोड नसते, भले आतुन तेवढेच लाल का असेना. >>>>> कलिंगड, टरबूज - हे नदीकाठच्या जमिनीत (वाळू खूप असते तिथे) लावतात, माझ्या एका शेतकरी मित्राने सांगितले की ही फळे गोड होण्यासाठी त्या झाडांना फलधारणा झाल्यावर फार पाणी द्यायचे नसते - त्यांच्या भाषेत ताण देणे म्हणतात - अगदी जरुरीपुरतेच द्यायचे - त्यामुळे फळे गोड होतात. दुसर्‍या अंजीर बागा करणार्‍या मित्रानेही फळे गोड होण्याकरता हीच युक्ति वापरतात असे सांगितले.

सध्याच्या भेसळीच्या काळात या फळांना साखरेची इंजेक्शन्स देतात Sad :- -गोड होण्याकरता - असेही त्याने सांगितले..

माझ्या एका शेतकरी मित्राने सांगितले की ही फळे गोड होण्यासाठी त्या झाडांना फलधारणा झाल्यावर फार पाणी द्यायचे नसते - त्यांच्या भाषेत ताण देणे म्हणतात - अगदी जरुरीपुरतेच द्यायचे - त्यामुळे फळे गोड होतात. दुसर्‍या अंजीर बागा करणार्‍या मित्रानेही फळे गोड होण्याकरता हीच युक्ति वापरतात असे सांगितले.

>>> अगदी बरोबर शशांकजी.

कलिंगडाच्या बाबतीत तर रंगाचे पण इंजेक्शन देतात. आता खरेच गोड कलिंगड
दुर्मिळ झालेय.
कलिंगडाच्या बाबतीत रमझान महिना आणि ईद, हे महत्वाचे घटक आहेत. त्या
काळात या फळाला खुप मागणी असते. आणि त्या सुमारास फळे तयार व्हावीत
अशी लागवड केली जाते.
मुसलमान लोक आपल्यासारखेच चंद्रावरुन महिना पाळतात पण त्यांच्याकडे अधिक महिना नसतो. त्यामूळे रमझान ईद हि दरवर्षी १० दिवस मागे जाते.

मागे कुठे तरी (बहुतेक जपानमधे) ही कलिंगडे चौकोनी करतात असे फोटो पाहिल्याचे आठवते - गोल आकार जास्त जागा व्यापतो म्हणून ही मंडळी ते फळ वाढतानाच त्याला चौकोनी आकार देतात - मग पुढे साठवायला, ट्रान्सपोर्टमधे जागा कमी व्यापतात ही चौकोनी कलिंगडे.......

square-watermelon_1978388c.jpg

कलिंगडाच्या बाबतीत रमझान महिना आणि ईद, हे महत्वाचे घटक आहेत.>>> हे का बरं ?

दिवसभर उपवास केल्यानंतर सुर्यास्त झाला कि आधी कलिंगड आणि मग खजूर
खायची प्रथा आहे. कलिंगड त्यातल्या पाण्यासाठी आणि क्षारासाठी, तर खजूर
त्यातल्या साखरेसाठी आणि अल्कलीसाठी. उपवास सोडण्यासाठी हा उत्तम आहार आहे. गल्फमधे त्या काळात या पदार्थांची रेलचेल असते. तिथे मात्र गोड कलिंगडे
मिळतात. खास करुन इराणमधून आलेली. इराणमधले पिस्ते, केशर, कलिंगडे, संत्री
आणि मस्कतमधला खजूर, लिंबू आणि डाळींब... प्रसिद्ध आहेत.

इफ्तारला म्हणजेच या उपास सोडण्याच्या वेळी, स्वतः काही खाण्याआधी समोरच्याला
ते देण्याने जास्त पुण्य मिळते अशी त्यांची श्रद्धा असते. आणि त्यावेळी जर आपण समोर असलो, तर आपल्याला अगदी अनोळखी माणूस पण आग्रह करतो.

नैरबीच्या बाजारात खुप असतात कलिंगडे. जास्त करुन चिनी लोक ती घेताना दिसतात. मी असे वाचले होते कि ते लोक बिया खातात आणि गर फेकून देतात.
वर्षूला विचारायला पाहिजे.

Lol नाही नाही...गर सुध्धा खातात ...
इथे थंडीच्या दिवसात पोतीच्यापोती कलिंगडाच्या ,सूर्यफुलाच्या भाजलेल्या बिया, चेस्टन्ट्स, शेंगदाण्याच्या शेंगा विकल्या जातात..
आणी या बिया घेताना विचारावे लागते कि कोणत्या बिया साध्या आहेत..कारण इथे या वस्तूंना चिकन,पोर्क्,साखर इ.इ. अनेक प्रकारच्या चवी आणी वास असतात.. इथल्या लोकांना या चवी फार आवडतात..

जिप्स्या, मस्त छायाचित्र. Happy
जागू, मी कालच विचरणार होते, तू कुठे गडप झालीस म्हणून. Wink
शशंकजी, चौकोनी कलिंगड प्रथमच पाहिले. धन्यवाद.

आभार वर्षू. तूमचा चीन काय आणि आफ़्रिका काय, अनेक सुरस आणि
चमत्कारीक कहाण्या, खपवायचे बकरे आहेत.

ती चौकोनी कलिंगडे, बाटल्यांच्या सहाय्याने तयार करतात. म्हणजे
कलिंगड लहान असतानाच ते तशा आकाराच्या बाटलीत ठेवतात.
(वेलीवर असतानाच.)

नायजेरियात ग्रेव्हीचे वाटण म्हणून भोपळ्याच्या बिया (त्यांचे भोपळे जरा
वेगळे असतात.) आणि बारीक कोलंबी (सुकवलेली) वापरतात. मग तेल
कमी वापरले तरी चालते. आहारदृष्ट्या अगदी योग्य असे हे वाटण आहे.
(म्हणून तर त्यांची शरिरयष्टी दणकट असते.)

आणी या बिया घेताना विचारावे लागते कि कोणत्या बिया साध्या आहेत..कारण इथे या वस्तूंना चिकन,पोर्क्,साखर इ.इ. अनेक प्रकारच्या चवी आणी वास असतात.. इथल्या लोकांना या चवी फार आवडतात..>>

हो इथे चायनीज नवीन वर्षाला पोत्यानी बिया विकतात. टरबुजाच्या बियांना नक्की काय लावलेले आहे हे विचारावे लागते.

हल्ली बर्‍याच फळांना गोड ईन्जेक्षन देण्यात येतात. त्यामुळे एखादे फळ अति गोड लागले की समजवून जावे की हे फळ ईन्जेक्शन दिलेले आहे Sad

मराठी लोकाना देवगड, रत्नागिरी हापूसचा अभिमान वाटणे सहाजिकच आहे>>>>>
एकदा नाईट शिफ्ट मधे सहकारी असलेल्या पाकी सेफ्टी ऑफीसर बरोबर गप्पा मारतांना त्याला गुगल मॅप्स वर त्याच गाव दाखवल. गडी जाम खूष मग त्याने झूम करायला लावून त्याच्या आमराया कुठे आहे ते दाखवल. मग अर्थात आम्रपुराण व पाकी आंब्याची तारीफ सुरु झाली. दहा मिनीट ऐकून घेतल्यावर मी त्याला एकच विचारल ......

" आपने कभी हापूस खाया है? अल्फान्सो खाया है?"
" नही "
" नही? तो फिर समझो के आपकी अबतक की सारी जिंदगी बेकार गयी "
पाकड्या गप्प.

दिनेशदा - चाफ्याचे परागीवहन - www.worldagroforestry.org/
Michelia champaca - Reproductive Biology
The tree flowers and fruits throughout the year. The flowers are protogynous and are pollinated by beetles, which feed on the stigmas, pollen, nectar and secretion from the petals.

<<(शशांक, आता माझ्या डोक्याला भुंगा लागला. सोनचाफ़्याचा इतका मोहक वास म्हणजे तो किटकांसाठीच असणार. मग कुठला किटक याचे परागीकरण करत असेल ?) >>

"ग्रीष्म - दाहक-मनमोहक"
लवकरच.........:-) Happy

Great Jaagutai.....simplyyyyyyyyyyy superb......ESP Sontakka...

Pages