निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात.

शशांक दुसर्‍या फोटोत तुरा दिसतोय.

मामी स्ट्रॉबेरीचे फोटो मस्तच.

शांकली हल्ली तुझा जोरात अभ्यास चालू आहे. मस्तच. गेळ फळ अगदी पेरू सारखच दिसतय.

चिमुरी, हिरवी फुले म्हणजे तो शिरिष आणि पांढरी गुलाबी फुले म्हणजे पर्जन्यवृक्ष.
वर्षू, मृण्मयी तूम्ही त्या चाराबोरंच्या बिया कशा फ़ोडायच्या ? कठिण असतात ना ?

हे गेळच फुल अनंताच्या फुलाप्रमाणे वाटत आहे.

हे फुल कसल ओळखा. कोकणातील लगेच ओळखतील.

नि.ग. वर सगळी एक्स्पर्ट झालेले आहेत. कोड टाकायची काही सोयच नाही. Lol

शशांक तुमच उत्तर बरोबर १०० पैकी १०० गुण.

हा भारद्वाज - आकार - डोमकावळ्याएवढा, वैशिष्ट्ये - डोळे लालबुंद, मोठी शेपूट........

Picture 120.jpg

जागू -आधी मला ते फुल कर्दळीच्या जातीतलं एवढं लक्षात आलं - पण दिनेशदांच्या क्ल्यू (जळगाव) ने क्लिक झालं - दिनेशदा व इतरही जाणकार मंडळींपुढे मी बालवर्गात (फार्फार तर) असेन.......

भारद्वाजाची आणखी एक खासियत म्हणजे याला सकाळी उडायचा कंटाळा येतो.
जमिनीवर चालत चालतच फिरत असतो हा. फारसे रंग नसूनही फार सुंदर दिसतो हा.
---
वरती वर्षूने चीनमधल्या (नसलेल्या) चिमण्यांचा उल्लेख केलाय.
मला ओमानमधे फारच कमी चिमण्या दिसायच्या. तिथे सी गल्स मात्र भरपूर.
तिथे कुत्रे तुरळक, मांजरी मात्र खुप.
नायजेरियातही पक्षी फारच कमी दिसतात. न्यू झीलंडमधे चिमण्या, अगदी हॉटेलमधल्या टेबलावरची शिते खायलाही येतात. तिथे एकदंरच पक्षी धीट असायचे.
तिथे मोठे पक्षी तर लहान मुलांच्या मागे लागलेले बघितले मी.
केनयातही खुप पक्षी दिसतात. शहरात जरा माणसांपासून जपून राहतात. पण
जरा शहराबाहेर गेले कि मुद्दाम, पुढे पुढे करतात.

हा भारद्वाज - आकार - डोमकावळ्याएवढा, वैशिष्ट्ये - डोळे लालबुंद, मोठी शेपूट........> हो हो . मी पाहिलाय तो अश्याच आकाराचा आहे. अगदी सुरेख दिसतो.

अलिबाग ला माझ्या बागेत एक भारद्वाज जवळपास रोजच येतो. अलिबागच्या भाषेत "सोनकावळा". माझा मुलगा म्हणतो तो माझा मित्र आहे. तशी एक खार ही त्याची मैत्रीण आहे. तो शाळेतन आला की ती खारुताई लगेच भेटायला येते कारण पोळीचा तुकडा वगैरे मिळतो ना. कधी कधी मात्र गडबड होते. त्याची आई घरी नसतांना एकदा साहेबांनी चक्क एक पावभर चणाडाळ च खारुताईंना खायला दिली. मग अरे अस करशील तर तिच पोट दुखेल ना अस समजावल होत.

कोणाला जायचं असल्यास
In Commune with Nature - “Over night Camping in SGNP, Borivali”
The Sanjay Gandhi National Park (SGNP) is a unique National park with a rich biodiversity of plants animals and birds. It is an ideal place to experience the tranquillity and biodiversity of nature. As city dwellers, we are blessed to have such a pristine forest in the midst of our teeming metropolis.
In mid-March, we had held a nature camp ‘In Commune with Nature’ at SGNP – Yeur Hills. A sizeable number of nature enthusiasts participated in it and made it a grand success. Encouraged by this enthusiastic response and obliging eager participants who are clamouring for more such camps, we are happy to announce another nature camp at SGNP – Borivali on 31st March – 1st April 2012.

The highlights of this camp are:
• Camping in Tents in the jungle
• Slide show on biodiversity, Insights and challenges of (SGNP)
• Lion-Tiger Safari, Boating, Mini Train ride
• Trekking to the highest point of Mumbai (1500 feet)

The programme will kick off at Nature Information Centre (NIC) with a presentation on the Park’s flora & fauna, followed by lunch/refreshments. The afternoon will be spent taking in the delights of the park through Lion-Tiger Safari, boating in the calm lake and a mini train ride.
This is the best way to spot varied animal species living in the park such as spotted deer, black napped hare, barking deer, palm civet, mouse deer, rhesus macaque, bonnet macaque, Hanuman langur, Indian flying fox, sambhar and leopards etc.

Day’s activities will wind up with a tranquil ‘Evening walk through the jungle’, where you can watch the flora-fauna and enjoy the serenity of the jungle. At night, there will be a slideshow on Herpetofauna and a Wildlife documentary concluding with a capping of the day’s activities.
An entirely new experience awaits you, as you spend a night in the forest, camping under the open sky in tents. It would be an ideal place to watch and experience the jungle come alive at night with its diverse nocturnal denizens such as palm civet, leopards, etc.

The following day post refreshments, participants will trek to the highest point of Mumbai in SGNP Jambul mall. This will be an exhilarating trek as you climb and pass through a World Heritage Site of the Buddhist Caves, termed as Kanheri Caves dating back to the 2nd-9th century.
The programme ends in the afternoon with a discussion on the experiences had by the group and listing of wildlife sightings during the programme.
Grab this opportunity and book your seats in advance! By participating in this unique programme you are also contributing towards the conservation of Sanjay Gandhi National Park, as a part of the proceeds will be utilized for day-to-day conservation activities of SGNP.

Cost of the programme is Rs 2,100/- per head
Cost includes
- Pick and drop from Borivali Station to Camp site and back
- Accommodation
- Food
- Resource person
- Programme fees.

Interested participants kindly Contact - Krishna Tiwari - 9870785006 or Jagdish Vakale - 9322870324 and the last date of registration is 29th March 2012.

दिनेशदा - तुम्ही खरं तर एक पुस्तकंच (एक हे आमच्यासाठी, तसं बघितलं तर तुम्ही खंडच्या खंडही लिहू शकाल) लिहायला घ्या बरं..... ही वर जी वैशिष्ट्ये पाहिलीत त्यावर ( मला ओमानमधे फारच कमी चिमण्या दिसायच्या. तिथे सी गल्स मात्र भरपूर. तिथे कुत्रे तुरळक, मांजरी मात्र खुप.
नायजेरियातही पक्षी फारच कमी दिसतात. न्यू झीलंडमधे चिमण्या, अगदी हॉटेलमधल्या टेबलावरची शिते खायलाही येतात. तिथे एकदंरच पक्षी धीट असायचे. तिथे मोठे पक्षी तर लहान मुलांच्या मागे लागलेले बघितले मी.
केनयातही खुप पक्षी दिसतात. शहरात जरा माणसांपासून जपून राहतात. पण जरा शहराबाहेर गेले कि मुद्दाम, पुढे पुढे करतात.) या गोष्टी तिथल्या स्थानिकांनाही माहित नसतील - जसं पुण्यातली फारच थोडी माहिती आहे मला....

नाही दिनेश, कोकणातही आहेत चारोळ्या. माझ्या शेजा-याने आणलेली फळे. त्याच्या आत चारोळ्या होत्या, मी विचारल्यावर त्याने सांगितले की त्याच्या घरी झाड आहे बोराचे. त्याला बोरे लागतात आणि बोरांच्या आत चारोळ्या.

शशांक, इथेच जून्या मायबोलीवर आहे हे सगळे.
--------
यावेळेस न्यू झीलंडला बोक्याने एक मजाच केली. लेकीच्या घरी तिने न पाळलेला,
एक बोका पडीक असतो. ती त्याला स्वतःच्या खाऊच्या पैश्याने खाऊ घालते, पण
तो आपणहून जाईल तर बरा असे तिला वाटते.

आम्ही दोन दिवस रोटोरुआला गेलो होतो तर, त्याला खायला टाकायचे राहूनच गेले. आल्यावर बघतो तो तर त्याने चार चिमण्या मारून खाल्या होत्या, आणि त्यांची
कलेवरं, ओळीने मांडून ठेवली होती.
पण एरवी तो कोंबड्यांना भितो. कोंबड्या बिनदिक्कत त्याचे खाणे खातात आणि हा
लांब बसून बघत राहतो. त्यांनी खाऊन उरले तर खातो.

सुदूपार!

trip 2 mahabaleshwar with my sisters 163_0.jpg

दिनेशदा
पक्षी आणि प्राण्यांमध्ये परिस्थिती अनुसरून स्वतःत बदल घडवण्याची एक उपजतच शक्ती अस्ते वाटत.

मागे मी गूलमोहरा सारख्या झाडाला (पण गुलमोहोर नाही) कदंबासारखी फूल आलेली पाहिली. फूल सूकल्यावर ब्राऊन होत होती. मला वेळ नसल्यामूळे मी फोटो नाही काढू शकले. कोणाला माहिती आहे का कसली झाड आहेत ती?

चिमुरी, हिरवी फुले म्हणजे तो शिरिष आणि पांढरी गुलाबी फुले म्हणजे पर्जन्यवृक्ष. >>>>> हिरवी म्हणजे त्यात थोडी पिवळी झाक असते तीच का? माझ्या ऑफीसच्या वाटेवर १ झाड आहे आणि सध्या त्याच्या खाली असाच पिवळसर हिरव्या फुलांचा सडा पडलेला दिसतो. सडा म्हणावा कि नाही, कारण पुर्ण फुलं पडलेल दिसत नाही पण झाडा खालची सगळी मातीचं हिरवी होऊन गेली आहे.

चारोळ्या कोकणातही होतात. मी झाड पाहिले नाहीय पण कोकणवासीय नातलगांकडुन ऐकलेय.>>>>मी खाल्यात खूप चारोळ्या, आमच्याकडे त्याला ’चाराबोर’ म्हणतात. आमच्या घराजवळ झाड होते. त्यामुळे दिवसभर तोच उद्द्योग असायचा. पाखर वरच मऊ फ़ळ खाऊन बिया खाली टाकायची. त्या फ़ोडून आम्ही खायचो. कधी कधी संपूर्ण फ़ळ ही मिळायच. Happy

उजू, ते चेंडूफळ. ठाणा कोर्टाच्या दारातच मोठे झाड आहे.
बदल होत असतातच, पण खुपच हळू असतात ते.
स्निग्धा,
हो तसा पिवळसर हिरवाच म्हणायचा. आणखी एक खुण म्हणजे शिरिषाला सुगंध असतो. आणि त्यांच्या शेंगा सोनेरी रंगाच्या असतात. त्या सुकल्या कि आवाज येतो.
त्या आवाजाची तुलना युवतींच्या पायातील पैंजणांच्या आवाजाशी केली आहे.
हि फुले आपल्याकडे सुगंधासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही वापरत असत.
सुंदरींच्या केसांतील फुले, त्या सरोवरात स्नानासाठी गेल्यावर पाण्यात पडल्याने, ते शैवालच आहे कि काय असे वाटून, मासे आकर्षित झाले.... अशा अर्थाचा एक संस्कृत श्लोक वाचला होता.

दिनेशदा, खुप छान माहिती दिलीत. आता त्या झाडाकडे लक्ष ठेवेन. शेंगा अजुन तरी दिसत नाहीत. त्याची फुल शांकलीताईनी दिलेल्या शेवींग ब्रश सारखीच पण आकाराने लहान आहेत. आणि आत्ता झाडाला एकही पानं नाही. फांदी फांदी वर फक्त फुलंच दिसताहेत.

दिनेशदा छान माहिती... शिरिषाच्या फुलांच्या पाकळ्या (पाकळ्या नाही म्हणता येणार कदाचीत, पण ते तंतु) खाली पिवळे असतात आणि टोकाला हिरवे होत जाता...

हे घ्या शिरिषाची फुल मागे मी सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने धागा टाकला होता त्यात ही फुले टाकली होती. पण ह्यावर्षी अजून त्या झाडाला फुले आलेली दिसत नाहीत.

दिनेशदा, चारोळीचे कडक आवरण असलेले फळ दोन बोटांच्या चिमटीत दगडावर धरायचे. दुस-या हाताने हातोडीने अल्गद शिरेवर फोडायचे. हातोडीचा ठोका जर जास्त पडला तर आतील गराचा भुगा होतो. थोडक्यात भाजलेले काजु कसे फोडतात तसे हे कच्चेच फोडायचे, पण फळ फारच लहान असल्याने अतिशय जपून करावे लागते, नाहीतर बोटावर हतोडीचा ठोका बसतो. आणि मग.................... Proud
पण आम्ही एकदम तरबेज होतो ह्या कामात. त्यामुळे आम्ही भरपूर खाऊन डबे भरून, सुट्टित माझे भाऊ पुण्याहून कोकणात यायचे, त्यांच्यासाठी ठेवायचो. काय शोभा आठवतंय ना सगळे?

मागील वर्षी मी व शांकली साधारणतः याच सुमारास मुळशी धरणावरुन जरा पुढे जाणारा रस्ता आहे (ताम्हिणी घाटाच्या अलिकडे) तिथे ही झाडे पाहिले होती - खूप सुगंध येत होता या सर्व परिसरात. काय असेल याचे नाव?

ks.jpg

Pages