निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
लाल ग्रेपफ्रुटचा जो रंग असतो
लाल ग्रेपफ्रुटचा जो रंग असतो ना, तो कुसुंबी रंग.
हा बघा :
माधव, कुसुंबी रंग त्या
माधव, कुसुंबी रंग त्या पानांचा असतो. प्रथम बघणार्याला तर सांगूनही खरं वाटत नाही की ही कोवळी पानं आहेत, फुलं नाहीत इतका तो रंग मोहक आणि फुलांचाच असल्याचा भास होतो. फुलं मात्र खूप छोटी आणि पटकन न दिसणारी असतात.मी वर दिलेल्या फोटोंवरून कल्पना येईलच.
"पक्ष्यांच्या डोळ्याला एक
"पक्ष्यांच्या डोळ्याला एक तिसरी पापणी असते. ती निमिषार्धात लवते आणि पारदर्शक असल्यामुळे या निमिषार्धतही पक्ष्याच्या दृष्टीत अडथळा येत नाही. या पापणीचं छायाचित्र हवं असं मनानं घेतलं. योगायोगाने त्याच वेळी एक जखमी घुबड सापडलं. त्याला घरात ठेवलं. चार दिवसांनी ते बरं होऊन उडून गेलं. पण दरम्यान त्याच्या डोळ्याचा अभ्यास करता आला. तिसरी पापणी कधी लवते त्याचा एक क्षण आधी अंदाज लावता येतो का ते पाहिलं. मग बारा छायाचित्र काढली. त्यापैकी पाचांमध्ये पापणी स्पष्ट आली. साधलेल्या क्षणापेक्षा हुकलेले क्षण जास्त लक्षात रहातात. जेव्हा हातात कॅमेरा नसतो तेव्हा एखादा दुर्मिळ पक्षी अथवा प्राणी निवांतपणे समोर येतो. असाच कॅमेरा जवळ नसताना मी आठ मिनिटं एक बिबळ्या पाहत होतो. तोही माझ्याकडे पहात होता - डोळ्याला डोळा देउन. दहा फुटावरच्या जाळीतून एकदा दोन अस्वलं निघाली अचानकच. मला पाहून दोन क्षण थांबली - पोझ देऊन आणि मग पळून गेली. माझे हात रिकामे होते.
आता या हुकलेल्या क्षणांची मला जरासुद्धा खंत वाटत नाही. क्षण साधण्यात जेवढी मजा असते तेवढीच क्षण हुकवण्यातही असते आणि क्षण साधण्यात कॅमेरा हे एकमेव साधन थोडंच आहे ! ! साधणं आणि हुकणं यातली सीमारेषा किती अंधुक आहे......." - आरण्यक - डॉ. मिलिंद वाटवे.
शशांक धन्यवाद,
शशांक धन्यवाद,
शशांक, छान उतारा. आपल्याकडे
शशांक,
छान उतारा.
आपल्याकडे कॅमेरा आत्ता आले. पण मनात छबी पकडून ठेवलेले असे कितीतरी क्षण
आपल्या प्रत्येकाकडे असतात.
आणि कुसुंबाची पाने जवळून बघितल्यासच ओळखू येतात नाहीतर पुर्ण झाड या
रंगात रंगलेले असते आणि तो फुलोराच वाटतो.
युरपमधले फॉल कलर्स ज्यावेळी बघतो त्यावेळी असे दिसते कि त्या पूर्ण परिसरात
एकाच जातीची झाडे आहेत. पण आपल्याकडच्या हिरव्या जंगलात, मधेच एखादा बहावा, मधेच पांगारा, मधेच पळस.. असे वेगळे दिसतात.
शशांक्,तुझ्या लिहिण्यात
शशांक्,तुझ्या लिहिण्यात मिलिंद वाटवे च्या 'आरण्यक' पुस्तकाचा संदर्भ आला म्हणून तुला विचारायला आले..मिलिन्द ला ओळखतोस का??
सुप्रभात. शशांक छान उतारा
सुप्रभात.
![](https://lh5.googleusercontent.com/-JqXdZC7krqA/T29Ik8uq54I/AAAAAAAACC4/D4kPAy5slJM/s640/IMG_3818.JPG)
शशांक छान उतारा आहे.
कुसुंबाचा फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.
वर्षू नील - हो - डॉ मिलिंद
वर्षू नील - हो - डॉ मिलिंद वाटवेंना मी ओळखतो - गरवारे कॉलेजमधे ते आम्हाला प्राध्यापक म्हणून लाभले होते, त्यांच्याबरोबर काही काळ मी कामही केलेले आहे.
शांकली तू हाच वेगळा चाफा
शांकली तू हाच वेगळा चाफा म्हणाली होतीस ना?
![DSCN2060.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/DSCN2060.jpg)
आणि ही त्याची पाने.
आणि ही त्याची पाने.
![DSCN2068.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/DSCN2068.jpg)
नाही गं शोभा हा नाही. त्याची
नाही गं शोभा हा नाही. त्याची पानं खूपच वेगळी आहेत. पूर्वीचे पाडळे पॅलेसच्या आवारात आहे मी म्हणाले होते ते झाड. त्याची पानं तू दिलेल्या फोटोतल्यासारखी नाहीयेत.
जागू, तू दिलेले दोन्ही फोटो (निळ्या आणि आजच्या गुलाबीसर फुलांचे) फार मस्त आलेत. ही फुलं तुझ्याकडची का गं?
हो शांकली माझ्याकडचीच.
हो शांकली माझ्याकडचीच. मागच्या महिन्यातच रोपे आणलीत.
अरे वा!, सर्व फोटो मस्त!
अरे वा!, सर्व फोटो मस्त! कुसुंब प्रथमच पाहिले.
साधना, त्या दिवशी मी फोनवर
साधना, त्या दिवशी मी फोनवर हिरानंदानीतल्या ज्या फुलांबद्दल बोलत होतो त्याचा फोटो शशांकने दिलेल्या या लिंकवर आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.flickriver.com/photos/shubhada_nikharge/tags/ranibaug/
पहिलाच फोटो (Gustavia augusta Lecythidaceae 2011_0417_Hiranandani Gardens)
आता उद्याच कॅमेरा घेऊन जायला पाहिजे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने, याचे मराठी नाव काय?
शशांक, तुमचे खूप आभार - आमचा
शशांक, तुमचे खूप आभार - आमचा सगळ्यांचा कुसुंब बघण्याचा हट्ट पूर्ण केलात !
डॉ. वाटवेंचं पटलच अगदी !
जिप्सी, त्या लिंक वरचे फोटो अशक्य सुंदर आहेत - तुला तिथे प्रत्य़क्ष जाऊन बघायला मिळणार हे किती छान - पण म्हणून तुझा 'किंचित' हेवा सुद्धा वाटतोय !
तुझे फोटो टाक हां नक्की जाऊन आलास की !
त्या लिंक वरचे फोटो अशक्य
त्या लिंक वरचे फोटो अशक्य सुंदर आहेत>>>>अगदी अगदी
खरंच फोटो खुपच सुंदर आहे. प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने - आता कुसुंब
रच्याकने - आता कुसुंब बघण्याचा हट्ट पूर्ण झाल्यावर तो रंग मला इतका आवडला आहे, की माझ्या 'ह्यां'च्या कडे त्या रंगाची साडी हवीच हा हट्ट करण्याची वेळ आहे :प
जिप्स्या. हे फुल मी तूला
जिप्स्या. हे फुल मी तूला राणीच्या बागेत दाखवलं होतो. त्यांचे ऑफिस, नर्सरी आहे तिथे, एका कमानीच्या बाजूला. तू फोटो पण काढला होतास.
साध्या झिनीयाच्या फुलात पण
साध्या झिनीयाच्या फुलात पण बाळफुले असतात बघा !!
जिप्स्या. हे फुल मी तूला
जिप्स्या. हे फुल मी तूला राणीच्या बागेत दाखवलं होतो. त्यांचे ऑफिस>>>>येस्स दिनेशदा, मलाही तेच वाटतं होते, पण राणीबागेतल्या फुलांच्या पाकळ्या जरा जास्त गडद रंगाच्या असल्याने गफलत झाली.
पवईतील झाडाला भरपूर फुले लागली आहेत याची.
दिनेशदा, तुम्हाला एक काम
दिनेशदा, तुम्हाला एक काम
वरील लिंकमधील बहुतेक सगळी झाडे/फुले राणीबागेतली आहेत. जरा प्लीज चेक करून ती राणीबागेत नेमकी कुठल्या ठिकाणी आहेत ते सांगा ना. म्हणजे एप्रिल महिन्यात गेल्यावर जास्त शोधाशोध करायला नको.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या, त्यापेक्षा असे कर,
जिप्स्या, त्यापेक्षा असे कर, अगदी बाग उघडता उघडताच तिथे जा. दिसलेल्या प्रत्येक अनोळखी झाडाचा, त्याच्या पानाचा आणि असतील तर फुलांचा, कळ्यांचा, फळांचा फोटो काढ.
मग त्यांची नावे बघू का मिळतात का ती.
आपण तसे बाहेर कुठे गेलो नाही. पण जर समजा कोल्हापूर (रंकाळा परिसर), गोवा
(बीचेस सोडून इतर भागात) अंबोली ला गेलो असतो, तर अनेक झाडे दाखवता आली
असती.
जिप्स्या, त्यापेक्षा असे कर,
जिप्स्या, त्यापेक्षा असे कर, अगदी बाग उघडता उघडताच तिथे जा. दिसलेल्या प्रत्येक अनोळखी झाडाचा, त्याच्या पानाचा आणि असतील तर फुलांचा, कळ्यांचा, फळांचा फोटो काढ.मग त्यांची नावे बघू का मिळतात का ती. >>>>>>ओक्के, नक्कीच!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अंबोली ला गेलो असतो, तर अनेक
अंबोली ला गेलो असतो, तर अनेक झाडे दाखवता आली
असती.
ह्या जर.. तर. च्या भानगडीत कशाला पडता. बॅगा उचला नी चला...............
ही राणीबाग एकदा बघायचीच आहे!!
ही राणीबाग एकदा बघायचीच आहे!! (इथे सगळे मुंबैवाले सारखी राणीबाग राणीबाग म्हणत अस्तात आणि वर्णनं करत अस्तात) (त्यात जिप्सी, दिनेशदा,साधना हे सगळे आले!) मग आम्हा पुणेकरांना नुसतंच वाचावं लागतं. ते कै नै आता आम्ही काही लोक्स मनावर घेऊच आणि राणीबाग बघायला येऊच! (अर्थात ही वरची मंडळी पायजेतच वृक्ष परिचयासाठी!)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शांकली, आहे बाग छोटीच पण
शांकली, आहे बाग छोटीच पण दुर्मिळ आणि खास असे किमान १४२ वृक्ष आहेत तिथे.
खरंच दिनेशदा, एकदा ही राणीबाग
खरंच दिनेशदा, एकदा ही राणीबाग बघायचीच आहे. तुम्ही पुन्हा भारतभेटीवर याल तेव्हा वेळ असल्यास एकदा जमवूयात. इतके वृक्ष असतील तर किमान ४/५ तास तरी लागतील.
दिनेश , वरच फुल डेलीया नाही
दिनेश , वरच फुल डेलीया नाही माझ्या मते. झिनिया आहे. डेलीया मध्ये परागकण वेगळे असतात.
हो सीमा, सुधारलं. (काय झालंय
हो सीमा, सुधारलं. (काय झालंय मला ? गेले काही दिवस या फुलांच्या नावात
गफलत होतेय !)
That's OK. चुका काढण्याचा
That's OK. चुका काढण्याचा हेतु नव्हता.
मी हा बाफ नेहमी रोमातुन वाचत असते. ८० टक्के गोष्टी माहिती नसतात. तुम्हा सगळ्यांमुळ माहिती होतात. गुगल केल्या जातात.
डेलिया आवडते फुल. पण आमच्या हवामानात जोमाने वाढत नाही. वाढवायला कठीण इथे. झिनिया वाढवायला सोपे. आमच्या टेक्सासमध्ये तर अमाप येतात. त्यामुळ मग डेलियाची तहान झिनियावर भागवली जाते.
Pages