निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
बार्क क्लोथ ट्री >>>>>
बार्क क्लोथ ट्री >>>>> दिनेशदा - ती नेमकी लिंक देणार का - गुगलून पाहिले पण सटरफटरच मिळत आहे - ते जिवंत फर्निचर वगैरे कुठे पहायला मिळेल ?
गोरखचिंचेची पाने (विकिपिडियावरुन)
सुप्रभात तो रामाचा कंद मी पण
सुप्रभात
तो रामाचा कंद मी पण खाल्ला आहे. त्याला तशी काही चव नसते. फक्त पाणचट कच्चट चव लागते.
शांकली थँक्स!!! शशांक ने ही
शांकली थँक्स!!!
शशांक ने ही पानांचा फोटो टाकलाय
जागु सुप्रभात!!!
ते रामाचे कंदमुळ. ते बाओबाब
ते रामाचे कंदमुळ. ते बाओबाब नाही. मी खाल्लयं>> मस्त फोटो
हेम, वर्षू नील फोटो छानच.
मृण्मयी, कोणीतरी मुलगी
मृण्मयी, कोणीतरी मुलगी शीर्षासनात उभी आहे असे वाटते ते फुल पाहुन.
हे बाओबाब काय प्रकरण आहे?
हे बाओबाब काय प्रकरण आहे? <<
हे बाओबाब काय प्रकरण आहे? << जा मागची तिन चार पाने परत वाचून काढ
बाओबाब = गोरखचिंच
अरे हो पटकन लक्षात नाही आले
अरे हो पटकन लक्षात नाही आले
वर्षू, पानेच नाहीत तर सुंदर
वर्षू, पानेच नाहीत तर सुंदर फुलेही येतात. पांढरी पाच पाकळ्यांची भली मोठी फुले येतात आणि त्यात लोकरीच्या पॉम पॉम सारखा गोंडा असतो.
शशांक, आमच्याकडे एक मासिक
शशांक, आमच्याकडे एक मासिक मिळते त्यात या झाडाची माहिती आहे पण फोटो नाहीत. या झाडाची वाढ एवढी असते कि तीन महिन्यात एक बसायचा बाक तयार होतो.
--------
नि.ग. वर कुणी विदर्भातले आहेत का ? मला चारोळीच्या झाडाची आठवण आली.
मी प्रत्यक्ष बघितले नाही पण ते आंब्याच्या झाडासारखेच असते असे वाचले होते. त्याला मोहोरही तसाच येतो.
मग त्याला बोरासारखी फळे लागतात. ती खातात आणि मग आतल्या बिया दळल्या
कि चारोळी मिळते. आता चारोळीचा वापरही तसा कमीच झालाय. (मी ओले बदाम, पिस्ते बघितले आहेत. पण चारोळी नाही.)
या बियांचे डिंक मिसळून लाडू करुन, माकडे आपल्या माद्यांना देतात असेही वाचले.
(खास करुन पिल्लू झाल्यावर.) त्यांना या बिया फोडायची गरज वाटत नाही.
बाओबाबच्या बिया साधनाने भरपुर
बाओबाबच्या बिया साधनाने भरपुर खाल्ल्या आहेत
नुसत्या खाल्ल्या नाहीत तर पेरल्याही आहेत. आणि आंबोलीला बाओबाबचे जंगल झाले तर त्याला दिनेश जंगल असे नाव देणार हेही ठरवुन झालेय
नि.ग. वर कुणी विदर्भातले आहेत
नि.ग. वर कुणी विदर्भातले आहेत का ? मला चारोळीच्या झाडाची आठवण आली.
चारोळ्या कोकणातही होतात. मी झाड पाहिले नाहीय पण कोकणवासीय नातलगांकडुन ऐकलेय.
आज World Sparrow Day आहे.
आज World Sparrow Day आहे. आमच्या HR नी मेल पाठवली आहे त्यामुळे कळलं. खुप सुंदर फोटो आणि माहिती टाकताय लोक हो. चालू द्या.. मी मागच्या शनिवारी काळे बटाटे, काळे आणि हिरवे मुळे पाहिले एका दुकानात. फोटो काढले आहेत. वेळ झाला की टाकतेच.
काल 'David Attenboroug' साहेबाचा एक कार्यक्रम पाहिला. झाडं बियांचा प्रसार कशी कशी करतात. अचाट tricks n techniques आहेत निसर्गात. एक-दोन खास लक्षात आहेत त्या पण लिहिते.
पुणे युनिव्हर्सिटीच्या
पुणे युनिव्हर्सिटीच्या बोटॅनिकल गार्डनमधे खूप विविध प्रकारची वृक्षसंपदा आहे. खरोखरीच खूप दुर्मिळ आणि काळजीपूर्वक जतन केलेले अनेक वृक्ष इथे बघायला मिळतात. त्यांपैकी काही...
हा गेळफळ किंवा गेळा. याची पानं अगदी छोटी छोटी असतात. फुलं सुरुवातीला पांढरी असतात आणि नंतर ती पिवळी होतात. फुलं साधरणपणे सदाफुली सारखी दिसतात आणि याचे फळ पेरू सारखे दिसते. आत्ता मला फुलाचा फोटो मिळाला नाही, पण पानं आणि फळाचा मिळाला तो इथे देते...
हे फळ...
आणि पानं थोडी लांबून अशी दिसतात....
हा किन्हई/किनई......
ही याची फुलं...
आणि हे याचे खोड.. यावरून याच्या उंचीची कल्पना येईल... ३ मजली इमारती इतका उंच आहे हा!
मागे मी पांढर्या शेव्हिंग ब्रशचे फोटो टाकले होते. हा गुलाबी शेव्हिंग ब्रश. हे फक्त एकेकच आहेत पुण्यात. पांढरा सहकार नगर नं २ मधे तर गुलाबी युनि. मधे!
हे एक फूल खाली पडले होते.. मग त्याचाच फोटो काढला...
जिप्सी, अभिनंदन!!!! शांकली ,
जिप्सी, अभिनंदन!!!!
शांकली , मी महाबळेश्वरला गेलेली तेव्हा बरीच गेळाची झाड बघितली होती.गेळाचा उपयोग साबण बनवताना करतात.
हे त्याचे फूल (फोटो अजिब्बात क्लिअर नाहिये,रीसाईझ करताना क्वालिटि गंडली)
गेळ आंबोलीलाही भरपुर आहेत.
गेळ आंबोलीलाही भरपुर आहेत. तिथेही त्याचे नाव गेळ हेच आहे.
दिनेशदा, चारोळी आम्ही पण
दिनेशदा, चारोळी आम्ही पण लहानपणी खूप खाल्लेत. करवंदासारखे फळ असते. वरचे मउ आवरण काढल्यावर आत कठीन कवच असते. ते फोडल्यावर आत छानसी चारोळी.
जिप्सी, अभिनंदन! जागू, सुरेख
जिप्सी, अभिनंदन!
जागू, सुरेख फोटो आहेत.
या गेळाच्या फळाला सुंदर मधुर
या गेळाच्या फळाला सुंदर मधुर वास येतो. पण खाण्याजोए काही नसते त्यात. डोंगरावर हमखास दिसतो.
---
प्रज्ञा / साधना मी पण चारोळी म्हणून कोकणात एक फळ खाल्ले आहे. पण मला वाटतं ते खर्या
चारोळ्याचे नसावे. म्हणून इथे विचारायचे होते. कुणीतरी खात्रीने सांगा बरं. प्रा. घाणेकरांच्या एका लेखात
फक्त मोहोराचा फोटो होता.
(शांकलील पूण्यात ते सापडेल का ? आशा करावी का ?)
चारोळीच्या फळांना 'चारं'
चारोळीच्या फळांना 'चारं' म्हणतात. उन्हाळ्यात मिळतात. पिकलेली, गडद जांभळ्या रंगाची फळं आकाराला साधारण चारोळीच्या पाचपट असतात. नखभराचा गर खाऊन, उरलेली बी फोडून, चारोळ्या खाण्याचं काम महा कटकटीचं.
आज स्पॅरो डे आहे तर.. आज
आज स्पॅरो डे आहे तर.. आज सकाळ-कोल्हापूरमध्ये चिमण्यासाठी रोज अंगणात तांदूळ ठेवा असा लेख आला आहे.
हे फूल ओळखा :
हे फूल ओळखा :
याच्याफळाच्याबियाफळाबाहेरसतात
याच्याफळाच्याबियाफळाबाहेरसतातका ?
स्ट्रॉबेरी?
स्ट्रॉबेरी?
मृण्मयी, मग कोकणात नक्कीच
मृण्मयी, मग कोकणात नक्कीच वेगळी फळे, चारोळ्या म्हणून खपवत असत. मला त्यातल्या बिया
खाल्ल्याचे आठवतेय पण त्या अजिबात चारोळ्यासारख्या लागत नसत.
छ्या ... लग्गेच ओळखलं की.
छ्या ... लग्गेच ओळखलं की. दिनेशदा तुम्हाला अर्धाच मार्कं. तुम्हाला कल्पना होती या फोटोच्या उगमाची. मृ ला एक मार्क.
अशा साध्या फुलातनं आलेल्या या राजेशाही स्ट्रॉबेर्या :
आणि हे शेत :
हे प्लॅस्टिक स्ट्रॉबेर्या मातीनं खराब होऊ नयेत म्हणून पसरलेलं असतं. किती नाजूक फळं आहे ते.
व्वा ! मस्त गप्पा सुरु आहेत
व्वा ! मस्त गप्पा सुरु आहेत इथे ! सगळे फोटो पण झक्कासच !
स्ट्रॉबेरी कुठल्या आहेत ? आणि खाल्ल्या का ?
जेव्हा ते प्लॅस्टिक नव्हतं, तेव्हा त्या खराब होवू नयेत म्हणून त्यांच्या खाली वाळलेलं गवत (straw) पसरत असत - म्हणून त्या स्ट्रॉबेरी
दिनेश दा बाओबाब ची पानंफुलं
दिनेश दा बाओबाब ची पानंफुलं पाहायला फेब चा महिना उपयुक्त नसणार.. म्हणूनच उजाड शी दिसली ती झाडं..
शांकली.. मस्त फोटो ,गेळचं फळ तर चक्क कुणी मुद्दाम पेरुच लटकावून ठेवलाय कि काय असं दिसतंय..
इंटरेस्टिंग!!!!
ह्म्म.. चारं खूऊऊप खाल्लीत लहानपणी.. चारं ला जंगल का मेवा नावाने विकायचे एम पी मधे.
स्ट्रॉबेरीज... वॉव!!!!
ओ काल होता स्पॅरो डे??- लालक्रांती च्या उत्पातात माओ च्या हुकुमावरून इथल्या सर्व चिमण्या मारून टाकण्यात आल्या होत्या( त्या शेतातील धान्य खातात म्हणून).. मला दहा वर्षात इकडे एक ही चिमणी दिसली नाहीये यावरून ही काल्पनिक गोष्ट नसावी असं वाटतं..
जेव्हा ते प्लॅस्टिक नव्हतं,
जेव्हा ते प्लॅस्टिक नव्हतं, तेव्हा त्या खराब होवू नयेत म्हणून त्यांच्या खाली वाळलेलं गवत (straw) पसरत असत - म्हणून त्या स्ट्रॉबेरी स्मित>>>> इण्डिगो - छान माहिती, पण हे प्लॅस्टिक केव्हा टाकतात - रोपे तयार व्हायच्या आधी कि नंतर ?
ओ काल होता स्पॅरो डे??- लालक्रांती च्या उत्पातात माओ च्या हुकुमावरून इथल्या सर्व चिमण्या मारून टाकण्यात आल्या होत्या( त्या शेतातील धान्य खातात म्हणून).. मला दहा वर्षात इकडे एक ही चिमणी दिसली नाहीये यावरून ही काल्पनिक गोष्ट नसावी असं वाटतं.. अ ओ, आता काय करायचं>>>>>> वर्षूतै - पण चीन सरकारच्या हे नंतर लक्षात आलं की अशा चिमण्या मारुन आपण नैसर्गिक समतोल बिघडवतोय म्हणून (ऐकून आहे)- पण त्यावर काही उपाय योजना केली का नाही - चिमण्या परत आणण्याकरता ?
छान चर्चा चालु आहे.. सगळे
छान चर्चा चालु आहे..
सगळे फोटो मस्तच..
जिप्सी अभिनंदन
पर्जन्यवृक्ष बघितला... पावडर पफ सारखीच फुलं असतात ना त्याला, फक्त हिरव्या रंगाची?
हा बघा एक छोटासा पण सुंदर -
हा बघा एक छोटासा पण सुंदर - क्रेस्टेड बंटिंग म्हणजेच युवराज (चिमणीपेक्षा लहान, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी श्रावणात युवराजांच्या दर्शनाचा लाभ झाला) - डोक्यावरचा तुरा नीट नाही आला फोटोत...
Pages