निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
१] ब्युटिफुल पिपल २] गॉड मस्ट
१] ब्युटिफुल पिपल
२] गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २
३] डुमा
४] टु ब्रदर्स
५] लॉस्ट इन डेझर्ट
६] ब्लॅक स्टॅलियन
७] द बेअर
८] चत्रन (जॅपनीज)
डिस्कव्हरी / अॅनिमल प्लॅनेट वरील
१] शिंगालाना २] लिटिल बॉय, लिटिल गर्ल, ३] जामू - जॉन व्हर्टी निर्मित
४] सफारी सिस्टर्स यांची मालिका असावी
माझ्याकडील ही यादी - अजून कोणाला भर टाकायची असेल तर टाकत रहा, दिनेशदांकडे तर भरपूरच असतील असे चित्रपट.
गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २
गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २
हे प्लीज परत कधी असल्यास मला सांगा
माझ्याकडील ही या <<< पेंग्विन
माझ्याकडील ही या <<<
पेंग्विन
हॅपी फीट, बॉर्न फ्री फ्री
हॅपी फीट,
बॉर्न फ्री
फ्री विली
डॉल्फीन
व्हाईट लायन
काँगो (थ्रिलर आहे)
अॅडव्हेंचर्स ऑफ अ येलो डॉग (फ्रेंच आहे.)
(पोलर कुत्र्यांबद्दलचा कुठला तो ? एट अंडर ?)
गँजेस (बीबीसीचा माहितीपट आहे.)
एमराल्ड जंगल (धरणामूळे विस्थापित झालेल्या आदीवासींवर आहे.)
नॉस्टाल्जिया फॉर द लाईट (चिलीमधले वाळवंट, तिथल्या वेधशाळा, प्रकाशाचा वेध,
यावर अप्रतिम सिनेमा आहे हा.)
दिनेशदा, बिबट्याची पिले, आणि
दिनेशदा, बिबट्याची पिले, आणि कुत्रा, यांच्यावर इंग्रजीत 'दी रनींग वाईल्ड' चित्रपट आला होता, तो मूळ चित्रपट कोणत्या भाषेत आहे..? त्याचे मूळ नाव काय..?
गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २
गॉड मस्ट बी क्रेझी - १ & २ यावरुन आठवलं - ते बुशमन मंडळी भूभागावरील (हा सरफेस वॉटरला समानार्थी शब्द - बरोबर आहे का माहित नाही) पाण्याशिवाय रहातात - हे कसे काय ? किती तरी वर्षे त्यांच्या पिढ्या तिथे तशाच (विदाउट सरफेस वॉटर) नांदताहेत असे त्या चित्रपटांच्या कॉमेंट्रीत ऐकले !!!!
आपल्याकडे भरपूर/ प्रचंड /मुबलक/ अति पाणी वापरण्याचे जे प्रमाण आहे हे प्रमाणाबाहेर तर नव्हे ना असेही वाटून गेले......
शशांक तुम्हाला मायाळूची फळे
शशांक तुम्हाला मायाळूची फळे पहायची होती ना. ही आहेत फळे. ती काळपट झालेली पिकलेली आहेत. माझ्या पुतण्याने आणि मुलीने मिळून रंगपंचमीसाठी ह्या फळांचा रंग केला होता. भेंडीची फळे काही दिसली नाहीत झाडावर.
हा तयार केलेला रंग. छान जांभळा रंग येतो.
वा जागू मस्तच आहे हा रंग
वा जागू मस्तच आहे हा रंग
सारीका, तो बघितल्यासारखा वाटत
सारीका, तो बघितल्यासारखा वाटत नाही. पण व्हाईट लायन, साधारण तसाच आहे. (साऊथ आफ्रिकेचा आहे तो.)
शशांक,
ते लोक कंदमूळे खाऊन पाण्याची तहान भागवतात. काही कंदमूळात भरपूर पाणी
असते. तसेच त्यांच्या जेवणात नाचणी असते, त्यानेही तहान कमी लागते.
अगदीच वेळ आली तर बाओबाब, म्हणजे गोरखचिंचेचा बुंधा असतोच.
या भागात पाऊस अगदीच पडत नाही असे नाही. वर्षातून कधी मधी पडतो. त्यामूळे
जमिनीखाली, उंच कातळाच्या खाली पाणी मिळते.
चिली मधल्या काही वाळवंतात, समुद्रावरुन येणार्या वार्यात बाष्प असते. ते काही
केसाळ निवडूंग पकडतात. रात्रीचे दवही पडते. सकाळच्या वेळी, बहुतेक सगळे
प्राणी ते पाणी पितात.
तिथले काही तरूण, गोणपाटासारख्या कपड्याचे आडवे पडदे या वार्यांचा दिशेत
आडवे लावून ठेवतात्. त्यातून त्यांना बर्यापैकी पाणी मिळते. बर्यापैकी म्हणजे
चक्क शेती होईल एवढे.
पिढ्या न पिढ्या त्या भागात राहिल्यांने, त्यांची शरीरे पण त्या वातावरणाला
सरावलेली असतात. आपल्याकडे पण लेह-लडाखला आपण गेलो तर धापा टाकू,
पण तिथले स्थानिक लोक, अगदी शेतीतली कष्टाची कामे पण करतात.
याला मयाळू म्हणतात का? अगदी
याला मयाळू म्हणतात का? अगदी छोटी ५,६ मीमी व्यासाची आहेत ना.
मझ्या घराच्या आसपास खुप वेल आहेत आणि पक्षी खास करून कोकिळ ते ताव मारून खात असतात.
ते लोक कंदमूळे खाऊन पाण्याची
ते लोक कंदमूळे खाऊन पाण्याची तहान भागवतात. <<< भाग २ मधे हे दाखवलय तो बुशमन एका माणसाला जो डि-हायड्रेट झालेला असतो त्याला कोणतेतरी कंदमुळ सोलून त्याचा रस पाजताना
नाही जो, हि पाने जाडसर आणि
नाही जो, हि पाने जाडसर आणि अगदी ८/१० सेमी व्यासाची पण असतात.
भजी, भाजी, आमटी असे अनेक प्रकार करतात.
वा जागू - आठवणीने ते मायाळूचे
वा जागू - आठवणीने ते मायाळूचे फळ आणि तो रंग इथे टाकलेस...धन्स.
दिनेशदा - ते चिलीच्या वाळवंटातील "पाणी' प्रकरण पाहिल्याचे आठवते -डिस्कव्हरी / अॅनिमल प्लॅनेट / नॅशनल जिओग्राफी का बी बी सी (ह्यूमन प्लॅनेट) वर... कुठेसे...
ससा आमच्याकडचे पक्षी जरा रॉयल
ससा आमच्याकडचे पक्षी जरा रॉयल आहेत ही असली फळे सोडतात आणि चिकू, पेरू, आंबे, रामफळ अशा फळांवर ताव मारतात.
हे रामफळावर बसलेले कोकीळ कुटूंब. वरच्या बाजूची सगळी रामफळे ह्यांनी फस्त केली.
दिनेशदा पान नाही फळं छोटी
दिनेशदा पान नाही फळं छोटी आहेत. पानं मोठीच आहेत. कसले वेल आहेत कोण जाणे त्याच खोड पण जांभळ दिसतं. फळतर अगदी डार्क जांभळी आहेत. कोणी लावलेलं नाही असच उगवत. चांगला २,३ मजले उंच गेला आहे वेल भींती धरून
जागू तै खरंच रॉयल आहेत हे
जागू तै खरंच रॉयल आहेत हे पक्षी,
रामफळाची चव चाखुन आता २ वर्षे उलटली असतील
आमच्या आंब्यावर पोपटांचा थवाच
आमच्या आंब्यावर पोपटांचा थवाच बसतो आणि छोट्या छोट्या कैर्यांचा फडशा पाडून खाली रांगोळी घालतो.
पोपट सिताफळ आणि पेरूचाही फडशा
पोपट सिताफळ आणि पेरूचाही फडशा पाड्तात
पोपट नालायक आहेत पण निसर्गाने
पोपट नालायक आहेत पण निसर्गाने सगळी फळे सगळ्यांसाठी बनवलीत त्यामुळे आपण त्यांनी खाऊन उरलेला खाऊ गुपचुप खावा हेच बरे.
जागु काल तुझ्याकडचा धनेश आलेला माझ्याकडे. बहुतेक पहिल्यांदाच आलेला. त्याच्या आजुबाजुला कावळे फिरफिरुन त्याच्यावर लक्ष ठेवत होते. शेवटी वैतागुन तो उडुन गेला.
ही कसली फुले आहेत कोण कोण
ही कसली फुले आहेत कोण कोण ओळखेल ? फळही आहेच सोबत ओळखण्यासाठी.
हो साधना तो धनेश आला की कावळे
हो साधना तो धनेश आला की कावळे ओरडतात आमच्याकडेही. सोबतीला तोही काहीतरी उत्तरे देतच असतो.
जागू - रायआवळा का ?
जागू - रायआवळा का ?
रायआवळा का ?<<< मलाही तोच
रायआवळा का ?<<< मलाही तोच वाटतोय
म्हणजे तो नालायक धनेश अंडी
म्हणजे तो नालायक धनेश अंडी पळवायचे काम करत असणार.. कावळे उगीच नाही बोंबाबोंब करत.
रायआवळॅच दिसताहेत. जिप्सीला बोलवा तोडायला.
आवळा दिसतोय.... जागु रॉयल
आवळा दिसतोय....
जागु रॉयल पक्षी
पोपट नालायक आहेत >>>> नालायक
पोपट नालायक आहेत >>>> नालायक धनेश>>>>>>>
हो जो, मग तो मायाळूच. पण सहसा
हो जो, मग तो मायाळूच. पण सहसा हिरव्या देठाचा खातात.
जागू, ऋतुचक्र अवश्य वाचायला घे. ज्या काळात दुर्गाबाई आजारी होत्या, त्या
काळात निव्वळ घराच्या आजूबाजूला दिसणारा निसर्ग पाहून त्यांनी ते पुस्तक लिहिलेय. त्यातले सूक्ष्म वर्णन वाचून तर थक्क व्हायला होते. (१९५६ सालचे पुस्तक
आहे ते.)
म्हणजे तो नालायक धनेश अंडी
म्हणजे तो नालायक धनेश अंडी पळवायचे काम करत असणार..>>> साधना मला नाही वाटत धनेश अंडी पळवत असेल - धनेश हा फळांवर गुजराण करणारा आहे ना ?
अरे वा सगळ्यांचे उत्तर बरोबर
अरे वा सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे. रायआवळेच.
साधनाच्या लिस्ट मध्ये आता कबुतरापाठोपाठ पोपट आणि धनेशचेही नाव अॅड करावे लागेल.
आवळे आहेत का ते जागू?
आवळे आहेत का ते जागू?
Pages