निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहि माधव, सितेची वेणी गुलाबी रंगाची असते.
हे लिलि कूळातले झाड आहे. झाड अननसाच्या झाडासारखेच असते. म्हणून तर हे नाव. या आणखी २/३ छटा असतात. येतीलच !!
जिप्स्याने सुरवात केलीय. यो पण केरळमधले फोटो टाकणार आहे. मग माझा नंबर !

शशांक, भेंडी आणि मायाळू दोन्ही माझ्याकडे आहे. फळे सध्या दोन्हीवर पाने आहेत. फळ येताच मी फोटो टाकते. जुने असतील तर शोधते.

राणीच्या बागेत फुललेली फुले. सोबत इतर मित्रमैत्रीणी असल्याने आणि सगळ्यांनाच यात इंटरेस्ट नसल्याने जास्त भटकता आले नाही. Sad मार्चच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यात परत एकटा निवांत जाईन. Happy

कांचन
नागचाफा
ब्राऊनिया
सिता अशोक
विषवल्ली

=======================================================================
ब्राह्मणी घार

जिप्सी मस्त फोटो. ब्राम्हणी घार झकास...

गावाला मी नागचाफ्याचे रोप विकत घेतलेय Happy आणि गावी नेलेली विषवल्ली मात्र गेली Sad

आमच्या मागील बाजुच्या ओसाड शेतात एक करंजाचे झाड आहे. त्यावर अजुन काही वेली वगैरे चढून घनदाट झाले आहे. त्यावर रोज पक्षी उन खाण्यासाठी बसतात. पाणकोंबड्यांचे तर ह्यात घरटेच असावे. सतात त्यावर असतात.

एकाच वेळी कोकिळा व खंड्या बसले आहेत.

वा मस्त फोटो आहेत सगळ्यांचे.

जिप्सी घारीचा फोटो मस्तच.

जागू खंड्या आणि कोकिळा मस्त आलेत.

पुण्यात सध्या काही झाडं पुर्ण पिवळ्या फुलांनी भरून गेली आहेत. एकही पान झाडावर नाही.
साधार्ण बिट्टीच्या फुलाच्या शेपची पण मोठी फुलं आहेत. कोणतं झाड आहे ते?

पिवळा टॅबेबुया असाच येतो निष्पर्ण झाडावर. आणि तो रंग काय चमकदार असतो...

परवाच जिप्सीला सांगत होते की गुलाबी टॅबेबुयाचा रंग अगदी बावळट दिसतो आणि काल पार्ल्याला सेंटॉर हॉटेलच्या समोर, पार्ले स्टेशनच्या दिशेने जाणा-या रस्त्यावर गुलाबी दिसला. आजवर गुलाबी टॅ. पानांनी नी फुलांनी भरलेला पाहिलेला पण हा पुर्ण निष्पर्ण होता आणि त्यामुळेच बहुतेक गुलाबी रंग खुप तेजस्वी वाटला.

गुलाबी टॅबेबूया पहायचा तो निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर आणि पिवळा पहायचा
तो मोकळ्या जमिनीच्या. रंग अगदी खुलून दिसतात.

लहानपणी त्या झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या काढून त्यातील मधला पांढरा भाग खोबरं म्हणून खाल्ल्याचं आठवतंय.>>>>मी पण मी पण. Happy

सर्वाचे फोटो मस्तच.
जिप्स्या, नागचाफ़ा, आणि सिता अशोक, मला बालपणात घेऊन गेले. धन्यवाद रे. Happy
जागू, हे माझ्याकडचे झेंडू.
DSCN1293.jpg

हो तो टॅबेबुयाच आहे. नेटवर फोटो पाहिले आत्ता. धंन्यवाद दिनेश.
माझ्या कडे पण आहे हा लाल झेंडू, पण खुपच लहान फुलं येतात.

जिप्सी, जागु, शोभा फोटो क्लास.. पक्ष्यांचे जास्त आवडले.. ते विषवल्लीचं फुल माझ्या स्वप्नात आलतं.. Happy

जो_एस, पौड रोडला पण मस्त टॅबेबुया फुललाय.. सध्या बर्‍याच ठिकाणे निष्पर्ण पण फुलांनी लगडलेला चाफा, पिवळा टॅबेबुया आणि निळसर फुलं असलेली झाडं दिसतायेत.. बसमधुन जेव्हडं दिसेल तेव्हड्यावरच समाधान मानवं लागतय..

आज आमच्याकडे मावळतीला, अनोखे रंग दिसले. आता इथला पावसाळा सुरु झाला. या दिवसात
असे रंग दिसतातच. पण टिपणे होत नाही. असे रंग, खास करुन हिरवा, मी नायजेरियाला पण
बघितला होता. सर्व रंग नैसर्गिक आहेत.

जिप्सी जागू , दिनेशदा : ह्या १२ नंबरच्या पानावरचे सगळे फोटो झकास ! मी भटकायला जवळच्या तलावावर गेले होते काल. तेव्हा काढलेले काही फोटो . इथे फाइल साइझ मोठा चालत नाही म्हणून छोटे फोटो टाकतेय. :
१. एक लाल फूल (नाव महित नाही. )
laal_phool1.jpg

२. त्या फुलांनी डवरलेलं झाड
laal_phool_jhaad1.jpg

३. छोटी छोटी पांढरी - जांभळी फुलं
jambhali-pandhari fule.jpg

४. त्या फुलांचा गालीचा बनलाय पार्क मधे :
jambhali-pandhari-gula-galicha.jpg

शकुन अप्रतिम फुले. ती गुलाबी जास्वंदीसारखी वाटतात.

दिनेशदा मस्तच रंगपंचमी.

शोभा ह्याच जातीतला झेंडू माझ्याकडे फुलतोय.

शकुन, पहिल्या प्रकारातली फुले न्यू झीलंडला आणि दुसर्‍या प्रकारातली, झुरिक ला
बघितली होती. खास म्हणजे हि दोन्ही फुले, २/४ दिवस कोमेजत नाहीत.

गुलाबी बहुतेक -होडोडेन्ड्रॉनची व्हराइटी असावीत. निळी-पांढरी काय गोड आहेत.

-होडोडेन्ड्रोन आपल्याकडे वर हिमाचलमध्ये आहेत. ऐशू मनालीला गेलेली तेव्हाच्या फोटोत पाहिलेली. तिकडे त्यांना बुरास म्हणतात. एकेका झाडावर इतकी येतात की पुर्ण झाडच गुलाबी दिसते.

जिप्सी - भन्नाट फोटो - ती ब्राह्मणी घार तुला बघून आली का हे म्हणत - ओ जिप्सी का, प्लीज माझा फोटो काढ ना.......
दिनेशदा - आकाशातली रंगपंचमी मस्त टिपलीये - तो हिरवा रंग कधीच पाह्यला नव्हता.
शकुन - फोटो मस्त - पण कुठे काढलेत हे फोटो - ठिकाण कळू शकेल का ?

दिनेशदा, शकुन मस्त प्रचि Happy

आकाशातील अशी रंगाची उधळण मी हेलसिंकीला (फिनलंड) पाहिली होती आणि तेही रात्री अकरा साडेअकराच्या सुमारास. पण त्यावेळेस चांगला कॅमेरा नसल्याने टिपता आली नाही. Sad

फिनलंडच्या लॅपलँड परीसरात आकाशातली हि रंगाची उधळण नॉर्दन लाईट्स किंवा ऑरोरा बोरिअ‍ॅलिस या नावाने ओळखली जाते. त्यावेळी तेथे एकटाच असल्याने जाता आले नाही पण एक मोठा चमत्कार न न पाहता आलो हि चुक केली याची जाणीव आता होतेय. Sad

याच विषयावर १९ फेब्रुवारीच्या लोकसत्ता चतुरंगमध्ये जयप्रकाश प्रधान यांचा नॉर्दर्न लाइट्सचा चमत्कार

हा रोज माझी ५-१० मिनीटे घेतो सकाळी घाई घाईत. फोटोही अगदी व्यवस्थित काढून देतो.

परवा एक हिरवट पक्षी होता. अर्धातास थांबून त्याने एक कसाबसा फोटो काढुन दिला. अजुन तो मी लोड केला नाही. उद्या टाकते.

शशांक Proud

होडोडेन्ड्रोन आपल्याकडे वर हिमाचलमध्ये आहेत. ऐशू मनालीला गेलेली तेव्हाच्या फोटोत पाहिलेली. तिकडे त्यांना बुरास म्हणतात. एकेका झाडावर इतकी येतात की पुर्ण झाडच गुलाबी दिसते.>>>>>
हि बुरांशची पाने आणि फुले. हा उत्तरांचल राज्याचा राज्यवृक्ष आहे. या फुलांचा औषधी उपयोग होतो (याच्या फुलांच्या रसाचा उपयोग हृदयाचा विविध विकारावर केला जातो). चवीला आंबटगोड असणार्‍या या फुलांपासुन सरबत बनवतात. Happy

जो_एस, पौड रोडला पण मस्त टॅबेबुया फुललाय.>>>>>चिमुरी, नक्की कुठे ग?
दिनेशदा, मस्तच फोटो. हिरवा रंग आकाशात प्रथमच पाहिला. आत्ता पाऊस पडेल, अस वाटतयं. :स्मितः
शकून, सुंदर फुले.
शोभा ह्याच जातीतला झेंडू माझ्याकडे फुलतोय.>>>>जागू, अग हा आमच्या गॅलरीत लावलाय, आणि वाढत, वाढत, वरच्यांच्या गॅलरीत गेलाय. (प्राजक्तासारख होतय. रुक्मिणी, सत्यभामा :डोमा:)

Pages

Back to top