निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित
मोना पाहीली ग लिंक. मला वाटल
मोना पाहीली ग लिंक. मला वाटल जंगली बदाम म्हणजे लालसर फळ असत तेच काय. हा तर वेगळाच निघाला.
जागू म्हणतेय तो देशी बदाम.
जागू म्हणतेय तो देशी बदाम. त्याची पिवळी जात आमच्याकडे आहे. आणि वरच्या फोटोतला जंगली बदाम
आता (खरे) ओले बदामही मुंबईत मिळतात. हिरव्या रंगाचे फळ असते, आत बदाम असतात. वरचे साल खाण्याजोगे नसते. आतला बदाम अगदीच कोवळा निघतो.
हो तो हिरवा बदाम मी दोन तिन
हो तो हिरवा बदाम मी दोन तिन वेळा खाल्ला आहे. मस्त कोवळा कोवळा लागतो.
मला पण आता असेच वाटायला
मला पण आता असेच वाटायला लागलेय कि या साधनांमुळे आपल्या क्षमता कमीच होत जातील.>>>>> अगदी...
पायात साध्या वहाणा घालून ती विशाळगडाहून, राजापूरपर्यंत चालत जायची ---- यातले काहीच आमच्या पिढीपर्यंत राहिले नाही.>>>>>>> हेही खरचं.. थोडं अवांतर होतय पण परवाचंच एक निरिक्षण.. माझा सव्वा वर्षाचा भाचा घरात पळता अजिबात इकडे तिकडे बघत नाही, दिवसातुन ५० वेळा तरी पडत असेल फरशीवर.. पण परवा गावाला गेलो आणि अंगणात बरीच खडी, माती असतानाही, कोणीही न सांगता तो इतका जपुन चालला की एकदाही पडला नाही.. लहान मुलं लवकर अडॉप्ट होतात कोनत्याही गोष्टीला, झाडांसारखंच..
बकुळीच्या झाडाखाली फुले
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचुया.
http://www.maayboli.com/node/32841
होय गं जागू, मोह चिक्कूच्याच
होय गं जागू, मोह चिक्कूच्याच कुळातला आहे. Family - Sapotaceae
जो एस, त्या फेस्ट बद्द्ल वाचलंय. कदाचित जायला जमेल.
दिनेशदा, कवठाची झाडं चिक्कार आहेत. एस्.पी. कॉलेजमधेच दोन आहेत. आणि त्याचा फळांचा हंगाम आत्ताशी सुरू झालाय. महाशिवरात्रीला याची चटणी करतात.
आजचीच एक गंमत सांगते, धाकट्या लेकीची बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. तिचा नं एस्.पी. कॉलेजमधेच आलाय. तिला सोडायला गेले होते. तिची सिटिंग अरेंजमेंट बघून होईपर्यंत मी कॉलेजमधली झाडं बघत उभी होते. तर काय! मला टोकफळाचे चक्क २ वृक्ष, १ वांगी वृक्ष, पेट्रीयाची खूप मोठी आणि पांगार्यावर चढवलेली वेल, कवठाचे फुला-फळांनी लदलेले २ वृक्ष, २ सीता अशोक,२ गुलाबी पावडर पफ्,आणि १ शिकेकाईची फुललेली वेल इतकी मंडळी दिसली!! मलाच माझ्या भाग्याचा हेवा करावासा वाटला.
आता मी उद्या कॅमेराच घेऊन जाते आणि जमतील त्यांचे फोटो काढून इथे देते.
चिमुरी, लहान मुलं लवकर अडॉप्ट
चिमुरी,
लहान मुलं लवकर अडॉप्ट होतात कोनत्याही गोष्टीला, झाडांसारखंच..>>>>>>> +१
खरंय, मागे एकदा दिनेशदांनी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या क्षमता गमावत चाललो आहोत.
'आपल्या शेपटांचा उपयोग केला नाहीतर काय होईल? दोन पायांच्या माणसागत आपले शेपूट गळून जाईल'_____ शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा......
वांगीवृक्ष इथे वर्षभर फुलतो.
वांगीवृक्ष इथे वर्षभर फुलतो. खुपच देखणा दिसतो तो. गडद जांभळा ते पांढरा, यामधल्या कितीतरी छटा, एकाच झाडावरच्या फुलात दिसतात.
(मराठीत या सगळ्या छटांना शब्दही नाहीत. व्हायोलेट, मॉव, लॅव्हेंडर, पर्पल.... )
अरे वा ह्या वांगीवृक्षाचा
अरे वा ह्या वांगीवृक्षाचा फोटो टाका ना.
जिन्याखालच्या कुंडीतल्या
जिन्याखालच्या कुंडीतल्या झाडाला एवढ्यातच फुलं यायला लागली. त्यांचा क्लोजप.
थोडं लांबून..........
वा, मानुषी. दोन पाकळ्यांचेच
वा, मानुषी. दोन पाकळ्यांचेच फूल. मस्त.
दिनेशदा नाव माहिती आहे का
दिनेशदा नाव माहिती आहे का याचं?
हा सुधारीत वाण दिसतोय. याची
हा सुधारीत वाण दिसतोय. याची अगदी छोटी आवृत्ती मी गगनबावड्याला, कड्यावर
नैसर्गिकरित्या वाढलेली बघितली आहे. यात गुलाबी रंग पण होता. पानेपण अशीच.
जागू, वांगीवृक्षाचे फोटो, शांकलीकडून येतीलच इथे.
मानुषी सुंदर फुले आहेत.
मानुषी सुंदर फुले आहेत.
हं.........जागू आणि
हं.........जागू आणि दिनेशदा
याच्या पानांवर आणि देठांवर(स्टेम) सुंदर बारीक लव आहे.
मानुषी, ती बिगोनियाची जात आहे
मानुषी, ती बिगोनियाची जात आहे का?
मानुषी, सुंदर फुलं. गौरी, ही
मानुषी, सुंदर फुलं.
गौरी, ही फुलं बिगोनियाचीच आहेत.
काल म्हटल्याप्रमाणे मी आज
काल म्हटल्याप्रमाणे मी आज फोटो काढून आणलेत.
घोळ नावाचा एक छान पानांचा वृक्ष, पण त्याची फुलं अगदीच बारीक. इतकी की आकार काही मी.मी. इतकाच आणि रंगही हिरव्याकडे झुकणारा. पण त्याचा फोटो काढायचा मोह आवरला नाही...
तिकडून कवठाचा वृक्ष खुणावत होताच. त्याची इवली इवली नाजूक फुलं खाली अंथरली गेली होती.
त्यातलंच हे एक....
सीता अशोक पण खूप फुललाय. त्याचे गेंद बोलावत होतेच...
आणि हा डवरलेला, लांबून का होईना पण माझापण फोटो काढ अशी गळ घालणारा...
ही शिकेकाई, बाभळीच्या फुलाची आठवण करून देणारं तिचं फूल..तिच्याखोडापाशीच हा फोटो काढलाय.
आणि ही तिची नाजूक पानं.....
काल मी ज्याचा उल्लेख केला तो टोकफळ.....
आहे की नै माझी नवी नवी पालवी मस्त असंच जणू हा म्हणत होता. पण हा खूपच उंच आहे आणि त्याची दोन कणसा सारखी दिसणारी फुलं तितक्याच उंचावर असल्याने त्यांचं खरं खुरं सौंदर्य नीट दिसत नाहीये.
अरे हो... वांगीवृक्ष राहिलाच की..
हे त्याचं फळ..
आणि ही सुंदर फुलं...
शांकली, सुंदर फोटो. या झाडाचे
शांकली, सुंदर फोटो.
या झाडाचे टोकफळ हे नाव मला माहीत नव्हते. इथे त्याचे खुप मोठे मोठे वृक्ष आहेत.
आपल्या पांगार्याची छोटी आवृत्ती म्हणता येईल. (फक्त फुलांच्या बाबतीत हं)
माझ्या घरासमोर आहे त्याची उंची, सहाव्या मजल्याएवढी आहे.
त्याला फळे न लागता, शेंगा येतात. त्या साधारण सुबाभुळीच्या शेंगांसारख्याच असतात.
वांगीवृक्ष तर देखणाच असतो. मी फार कमी झाडे बघितलीत याची भारतात.
तशी आपल्याकडे निळी फूले येणारी झाडे अगदी मोजकी आहेत (गायत्री, वांगीवृक्ष, झकरांदा, रुई... आणखी ?)
, खरंय दिनेशदा. याच्या शेंगा
:स्मित:, खरंय दिनेशदा. याच्या शेंगा सु?(कु!)बाभळीच्या शेंगेसारख्याच दिसतात. पण हा खूपच उंच असल्याने फुलांकडे किंवा सुंदर पानांकडे लक्ष कमीच जातं. (मान वर करून बघताना टोपी पडणार!)
आणि टोकफळ हे नाव श्री. श्री.द.महाजनसरांनी ठेवलंय. त्याचं बोटॅनिकल नाव आहे Acrocarpus fraxinifolius
इथे पुण्यात गमग्वायकम (गायत्री) नक्की कुठे आहे ते माहिती नाही पण मी नक्की त्याचा ठावठिकाणा माहिती करून घेणार आहे; आणि मग फोटो काय इथे देईनच.
पेट्रीयाची पण वेल होती.. निळ्या-जांभळ्या फुलांनी बहरलेली पण मागे इथे गौरीने फोटो दिला होता म्हणून मी आत्ता नाही दिला.
मुंबईत राणीच्या बागेतल्या एका
मुंबईत राणीच्या बागेतल्या एका रस्त्याच्या दोन्ही बाजूने गायत्रीची झाडे आहेत. आणि
फोर्टमधल्या टॅमरींड लेनमधल्या चर्चच्या आवारात.
त्याची फुले अगदी छोटी, पण निळा, आकाशी आणि पांढरा असा रंग बदलत जातात.
त्याच्या पाकळ्या खेळायच्या पत्त्यातल्या चौकटच्या आकाराच्या. फळे नारिंगी.
खुप देखणे झाड. साधारण छत्रीसारखा आकार असतो झाडाचा.
हिरवाई मधे डॉ.डहाणूकरांनी काय
हिरवाई मधे डॉ.डहाणूकरांनी काय वर्णन केलंय या गायत्रीचं! निळी ये साजणी या प्रकरणात.. 'निळं शेडेड रेशीम घ्यावं, त्याने पाकळ्या भराव्यात, सोनेरी रेशमाने मधले पुंकेसर अळीच्या टाक्याने भरावेत आणि स्वीट ड्रीम्सना आमंत्रण द्यावं. स्नोफ्लेक्स ऑन माय नोज... म्हणत उन्हाचा ताप विसरावा.'
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2095
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/127991.html?1183479115
वरच्या दोन लिंक्स वर मी काढलेले फोटो आहेत, गायत्रीचे.
दिनेशदा - वरील दोन्ही लिंक्स
दिनेशदा - वरील दोन्ही लिंक्स धावत्या पाहिल्या - (वेळ मिळाला की जरा निवांतपणे पाहीन)- मला वाटतं तुम्ही शरीराने कुठेही असलात तरी मनाने कायम कुठल्यातरी झाडापाशी / फुलापाशी / फळापाशीच असता.
तुमच्या झाडा-पाना-फुला-फळाविषयीच्या सर्व लिंक्स एकत्रित द्या बरं - म्हणजे सर्व वृक्षप्रेमींना एक पर्वणीच वाटेल -
कालच झालेल्या पक्षीप्रेमींच्या एका कार्यक्रमात एकाने छान उदगार काढले होते - सर्व सामान्यांना सगळेच वृक्ष म्हणजे - अननोना कन्फुजिया (Unknownaa confusia). एकातरी झाडाचे नाव / वर्णन / उपयुक्तता माहित असेल तर शपथ..........
असो - तुमच्यासारख्या निसर्गऋषींकडून जे भांडार इथे मोकळं केलं जातं त्यातलं थोडंफार कळलं तरी खूप........
कालच्या कार्यक्रमात (पक्षीप्रेमींच्या) श्री गिरीश जठार याच्याकडून घुबडाविषयी छान माहिती मिळाली - पुण्यात राजेंद्रनगर भागात कालपासून हे सत्र ( २२ फेब्रु ते २६ फेब्रु २०१२) सुरु झाले.
With Love From Kokan
With Love From Kokan
रीठा
कोरांटी
ह्याचे नाव काय? कमळ/वॉटरलीलीचा प्रकार आहे का?
ह्याचे नाव काय?
चाफा
शाल्मली
सावध कि सावज??
जिप्सी ते पांढरे फूल कुमुदिनी
जिप्सी ते पांढरे फूल कुमुदिनी आहे. पुष पठार कास या पुस्तकात या फुलाची खूप मस्त माहिती दिली आहे. कारण हे फूल कास पठारावरच्या चंद्रकोरीच्या तळ्याची शोभा आहे. लाल फूल अबोलीच्या प्रकारातले असावे. पण नाव माहिती नाही. आणि अर्थात नेहेमीप्रमाणेच सगळे फोटो सुंदर.
वा जिप्या एकदम मस्तच शांकली
वा जिप्या एकदम मस्तच
शांकली छान फोटो आणि माहिती पण
धन्स शांकली आणि लाल फूल
धन्स शांकली
आणि लाल फूल अबोलीच्या प्रकारातले असावे>>>>अगदी अगदी. मला रतन अबोली वाटलेलं म्हणुन साधनाला लगेच फोन केला होता. आता हा फोटो टाकलाय.
पुष पठार कास या पुस्तकात या
पुष पठार कास या पुस्तकात या फुलाची खूप मस्त माहिती दिली आहे>>>>अरे हां. आता पट्कन पुस्तक शोधुन वाचल.
जिप्सी - सर्व प्र चि अप्रतिम
जिप्सी - सर्व प्र चि अप्रतिम - फक्त एक रिक्वेस्ट - फळाच्या/फुलाच्या फोटोबरोबर त्याचे पान, संपूर्ण झाड / वनस्पती यांचेदेखील फोटो दिलेस तर नाव शोधायला बरं पडेल असं माझं मत.
Pages