"आठवणींचे मोरपीस"
सारे काही तसेच आहे
तेच कॉलेज तोच कट्टा
तोच तू अन ती च मी परी
भिन्न जाहल्या साऱ्या वाटा
हाच रस्ता हीच वाट
इथेच पडली आपली गाठ
हाच पार अन हीच टपरी
तसाच आहे यांचा थाट
तुझीच मी अन तूच माझा
तुझाच मजला लागे छंद
हेच सारे जिवलग साक्षी
जुळले जेंव्हा आपले बंध
परी तुटले बंध जसे
एकेक मोती हरवत गेला
भेट देता त्या काळाला
आठवणींचा गोफ मिळाला
रिती करते समोर ओंझळ
तूही मोती जोडून बघ
गोफ गुंफुनी क्षणापुरता
आठवणी काही आठवून बघ
पूर्वी सजणा माझ्यासवे
हि बाग तुझ्यावर रुसायची
तू मनवता मला सख्या मग
स्वतःही खुदकन हसायची
नाव कोरता तुझ्यासवे मी
फळा हि हा मोहरायचा
तू घेता मिठीत मजला
परिसर सारा शहरायचा
आपल्या Common बाकावरती
कोरलेले ते असंख्य बाण
नाव लिहिले ज्या झाडावर
त्यास आठवते आपली आण
इथले वारे आज ही राजा
पूर्वी सारखे धुंद वाहतात
जवळ येऊन कानामध्ये
तुझेच प्रेमगीत गातात
भिंती निर्जीव उत्सुकतेने
माझ्याकडे पाहत होत्या
"का ग राणी आज एकटी?"
आतुरतेने विचारात होत्या
स्मित करुनी त्यांस म्हणे मी
भूतकाळच्या त्या आठवणी
अनोळखी मज असे आता तो
ही खरी वर्तमान कहाणी
बोल ऐकता हे सख्या
सगळे काही सुन्न झाले
प्रश्न विचारू लागले सारे
वातावरणच भिन्न झाले
त्या बागेनी केला प्रश्न
जवळी नव्हते त्याचे उत्तर
"नाजूक नाते फुलांपरी त्या
अन कसे उडाले त्यातून अत्तर?"
अन लागला मला विचारू
तोच फळा अन तोच परिसर
"कसा पडला तुम्हास सांग
त्या नावाचा,मिठीचा विसर?"
"हृद्य आमचे तुम्ही कोरले "
बाक आणि झाड वदले
ती आण अन ते बाण
कसे इतक्या सहज विरले?
झुळझुळणारा चंचल वारा
क्षणापुरता स्तब्ध झाला
हरवलेली प्रीत पाहुनी
तोच असा निशब्द झाला
त्याच पावली परत फिरले
गोफ सारे पुन्हा तोडले
लपविले मी सारे मोती
वर्तमानी पुन्हा परतले
त्या वाटेला ऐक साजणा
नकोस फिरकू तू रे कधी
घाव घालती हृदयावरती
मन ससा अन प्रश्न पारधी
माझ्यापरी राजा तुला
असाह्य होतील प्रश्न सारे
मिटले पुस्तक आठवणींचे
तसेच असु दे मधुर प्यारे
गेलास तर करशील काय?
त्यांना सांगशील कुठली कहाणी?
स्वप्नामध्येच राज्य आपले
स्वप्नामध्येच मी तुझी राणी
गेलास तर मात्र एवढ कर
त्या सगळ्यांना सांग स्पष्ट
राजा,राणी,प्रेम,संसार
एवढीच नसते नेहमी गोष्ट
कितीही असले प्रेम तरीही
अपूर्ण राहतात काही नाती
कारण आपण क्षुल्लक पुतळे
तो वरचा बांधतो साऱ्या गाठी
त्या आठवणींचे झाले मोरपीस
हृदयामध्ये जपले आहे
आणि देवापेक्षा ही पवित्र आमचे
प्रेम मनातच पूजले आहे
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
व्वा ! आवडली
व्वा ! आवडली
(No subject)
धन्स
धन्स
रिया, कविता अप्रतिम आहे,
रिया, कविता अप्रतिम आहे, स्वतंत्र चारोळी म्हणून जास्त छान वाटतील.. (वै.म.)
धन्यवाद सारु.....
धन्यवाद सारु.....
सुंदर कविता
सुंदर कविता
"माझी गोष्ट आहे" असे
"माझी गोष्ट आहे" असे म्हटल्यामुळे एवढंच -
खरं प्रेम नेहमी बळच देतं... ते तुम्हाला कायम मिळो.
('शुल्लक' चं 'क्षुल्लक' करा. :P)
वा कवीता मोठी पण उत्तम
वा कवीता मोठी पण उत्तम सांभाळलीत प्रियंकाताई
आपल्या Common
आपल्या Common बाकावरती
कोरलेले ते असंख्य बाण
नाव लिहिले ज्या झाडावर
त्यास आठवते आपली आण
>> छान आहे कविता. कॉमनचे कडवे आवडले.
छान कविता.आवडली.
छान कविता.आवडली.
खरं प्रेम नेहमी बळच देतं...
खरं प्रेम नेहमी बळच देतं... ते तुम्हाला कायम मिळो.
('शुल्लक' चं 'क्षुल्लक' करा. )
>>> लाख लाख धन्स
बदल केला....
@संजया, बी, फालकोर : अनेक अनेक अभार
सुंदर.
सुंदर.
रिया........... कविता वाचून
रिया...........
कविता वाचून ह्रदय हेलावून गेलं....खरंच असं झालं होतं ?
तुझ्या नावाप्रमाणेच कविताही फार मोठी झाली आहे....पण एकूण जमलीय.
आता?
रीया, कवितेची लांबी
रीया, कवितेची लांबी कंट्रोलमध्ये ठेव असे आपले सुचवावेसे वाटले. राग मानू नकोस अशी विनंती.
आवडली
आवडली
तुझ्या नावाप्रमाणेच कविताही
तुझ्या नावाप्रमाणेच कविताही फार मोठी झाली आहे....पण एकूण जमलीय.
>>>
रीया, कवितेची लांबी कंट्रोलमध्ये ठेव असे आपले सुचवावेसे वाटले
>>>
अगदी मान्य आहे पण कविता वर्तमानातुन भुतकाळात न्हेऊन पुन्हा वर्तमानात आणायची होती आणि भविष्यकाळात पण एक चक्कर टाकायची होती म्हणुन मोठी झाली..
भुषण दादा : राग कशाला??? तुमच्या प्रतिक्रिया ऑल्वेज वेलकम आहेत
सहेली मयुरी: धन्यु
दीपक : आभार
आता काय????
रीया आवडली तुझी गोष्ट -
रीया आवडली तुझी गोष्ट - म्हणजे कविता
रिया, कविता संपता संपत
रिया, कविता संपता संपत नव्हती, पण बोअरही झाली नाही. पुढे कायची उत्सुकता होती. छान लिहिली आहेस.
धन्यु नन्ना, माऊ
धन्यु नन्ना, माऊ
मस्त मन कुठे हरवुन गेल्या
मस्त मन कुठे हरवुन गेल्या सारखं वाटलं
kishya thanks
kishya
thanks 
मस्त आहे कविता... खरच खूप
मस्त आहे कविता...
खरच खूप छान...
सुंदर कविता
सुंदर कविता
कविता छान आहे...... आवडली.
कविता छान आहे...... आवडली.
साठवणीचे ब्लाऊजपिस...असं
साठवणीचे ब्लाऊजपिस...असं विडंबन सुचतय.

करु का हो? आजकाल,मूळकविंची परवानगी घ्यावि लागते म्हणे
सर्व नव्या प्रतिसादकांची आभार
सर्व नव्या प्रतिसादकांची आभार


साठवणीचे ब्लाऊजपिस...असं विडंबन सुचतय..... करु का हो?
>>>>>>
हो जरूर...का नाही!
वाट पहातेय
घाव घालती हृदयावरती मन ससा अन
घाव घालती हृदयावरती
मन ससा अन प्रश्न पारधी
>>> +१ अतिशय सुन्दर उपमा
माझ्यापरी राजा तुला
असाह्य होतील प्रश्न सारे>>>>
असह्य की असाह्य???