आठवणींचे मोरपीस

Submitted by रीया on 15 February, 2012 - 04:04

"आठवणींचे मोरपीस"

सारे काही तसेच आहे
तेच कॉलेज तोच कट्टा
तोच तू अन ती च मी परी
भिन्न जाहल्या साऱ्या वाटा

हाच रस्ता हीच वाट
इथेच पडली आपली गाठ
हाच पार अन हीच टपरी
तसाच आहे यांचा थाट

तुझीच मी अन तूच माझा
तुझाच मजला लागे छंद
हेच सारे जिवलग साक्षी
जुळले जेंव्हा आपले बंध

परी तुटले बंध जसे
एकेक मोती हरवत गेला
भेट देता त्या काळाला
आठवणींचा गोफ मिळाला

रिती करते समोर ओंझळ
तूही मोती जोडून बघ
गोफ गुंफुनी क्षणापुरता
आठवणी काही आठवून बघ

पूर्वी सजणा माझ्यासवे
हि बाग तुझ्यावर रुसायची
तू मनवता मला सख्या मग
स्वतःही खुदकन हसायची

नाव कोरता तुझ्यासवे मी
फळा हि हा मोहरायचा
तू घेता मिठीत मजला
परिसर सारा शहरायचा

आपल्या Common बाकावरती
कोरलेले ते असंख्य बाण
नाव लिहिले ज्या झाडावर
त्यास आठवते आपली आण

इथले वारे आज ही राजा
पूर्वी सारखे धुंद वाहतात
जवळ येऊन कानामध्ये
तुझेच प्रेमगीत गातात

भिंती निर्जीव उत्सुकतेने
माझ्याकडे पाहत होत्या
"का ग राणी आज एकटी?"
आतुरतेने विचारात होत्या

स्मित करुनी त्यांस म्हणे मी
भूतकाळच्या त्या आठवणी
अनोळखी मज असे आता तो
ही खरी वर्तमान कहाणी

बोल ऐकता हे सख्या
सगळे काही सुन्न झाले
प्रश्न विचारू लागले सारे
वातावरणच भिन्न झाले

त्या बागेनी केला प्रश्न
जवळी नव्हते त्याचे उत्तर
"नाजूक नाते फुलांपरी त्या
अन कसे उडाले त्यातून अत्तर?"

अन लागला मला विचारू
तोच फळा अन तोच परिसर
"कसा पडला तुम्हास सांग
त्या नावाचा,मिठीचा विसर?"

"हृद्य आमचे तुम्ही कोरले "
बाक आणि झाड वदले
ती आण अन ते बाण
कसे इतक्या सहज विरले?

झुळझुळणारा चंचल वारा
क्षणापुरता स्तब्ध झाला
हरवलेली प्रीत पाहुनी
तोच असा निशब्द झाला

त्याच पावली परत फिरले
गोफ सारे पुन्हा तोडले
लपविले मी सारे मोती
वर्तमानी पुन्हा परतले

त्या वाटेला ऐक साजणा
नकोस फिरकू तू रे कधी
घाव घालती हृदयावरती
मन ससा अन प्रश्न पारधी

माझ्यापरी राजा तुला
असाह्य होतील प्रश्न सारे
मिटले पुस्तक आठवणींचे
तसेच असु दे मधुर प्यारे

गेलास तर करशील काय?
त्यांना सांगशील कुठली कहाणी?
स्वप्नामध्येच राज्य आपले
स्वप्नामध्येच मी तुझी राणी

गेलास तर मात्र एवढ कर
त्या सगळ्यांना सांग स्पष्ट
राजा,राणी,प्रेम,संसार
एवढीच नसते नेहमी गोष्ट

कितीही असले प्रेम तरीही
अपूर्ण राहतात काही नाती
कारण आपण क्षुल्लक पुतळे
तो वरचा बांधतो साऱ्या गाठी

त्या आठवणींचे झाले मोरपीस
हृदयामध्ये जपले आहे
आणि देवापेक्षा ही पवित्र आमचे
प्रेम मनातच पूजले आहे

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

गुलमोहर: 

"माझी गोष्ट आहे" असे म्हटल्यामुळे एवढंच -
खरं प्रेम नेहमी बळच देतं... ते तुम्हाला कायम मिळो. Happy

('शुल्लक' चं 'क्षुल्लक' करा. :P)

आपल्या Common बाकावरती
कोरलेले ते असंख्य बाण
नाव लिहिले ज्या झाडावर
त्यास आठवते आपली आण

>> छान आहे कविता. कॉमनचे कडवे आवडले.

खरं प्रेम नेहमी बळच देतं... ते तुम्हाला कायम मिळो.

('शुल्लक' चं 'क्षुल्लक' करा. )
>>> लाख लाख धन्स Happy
बदल केला....

@संजया, बी, फालकोर : अनेक अनेक अभार Happy

रिया...........

कविता वाचून ह्रदय हेलावून गेलं....खरंच असं झालं होतं ?
तुझ्या नावाप्रमाणेच कविताही फार मोठी झाली आहे....पण एकूण जमलीय.

आता? Happy

रीया, कवितेची लांबी कंट्रोलमध्ये ठेव असे आपले सुचवावेसे वाटले. राग मानू नकोस अशी विनंती. Happy

तुझ्या नावाप्रमाणेच कविताही फार मोठी झाली आहे....पण एकूण जमलीय.
>>>
रीया, कवितेची लांबी कंट्रोलमध्ये ठेव असे आपले सुचवावेसे वाटले
>>>
अगदी मान्य आहे पण कविता वर्तमानातुन भुतकाळात न्हेऊन पुन्हा वर्तमानात आणायची होती आणि भविष्यकाळात पण एक चक्कर टाकायची होती म्हणुन मोठी झाली..

भुषण दादा : राग कशाला??? तुमच्या प्रतिक्रिया ऑल्वेज वेलकम आहेत Happy

सहेली मयुरी: धन्यु Happy

दीपक : आभार Happy आता काय????

रिया, कविता संपता संपत नव्हती, पण बोअरही झाली नाही. पुढे कायची उत्सुकता होती. छान लिहिली आहेस.

साठवणीचे ब्लाऊजपिस...असं विडंबन सुचतय. Lol
करु का हो? आजकाल,मूळकविंची परवानगी घ्यावि लागते म्हणे Wink

घाव घालती हृदयावरती
मन ससा अन प्रश्न पारधी
>>> +१ अतिशय सुन्दर उपमा

माझ्यापरी राजा तुला
असाह्य होतील प्रश्न सारे>>>>
असह्य की असाह्य???