आठवणींचे मोरपीस
Submitted by रीया on 15 February, 2012 - 04:04
"आठवणींचे मोरपीस"
सारे काही तसेच आहे
तेच कॉलेज तोच कट्टा
तोच तू अन ती च मी परी
भिन्न जाहल्या साऱ्या वाटा
हाच रस्ता हीच वाट
इथेच पडली आपली गाठ
हाच पार अन हीच टपरी
तसाच आहे यांचा थाट
तुझीच मी अन तूच माझा
तुझाच मजला लागे छंद
हेच सारे जिवलग साक्षी
जुळले जेंव्हा आपले बंध
परी तुटले बंध जसे
एकेक मोती हरवत गेला
भेट देता त्या काळाला
आठवणींचा गोफ मिळाला
रिती करते समोर ओंझळ
तूही मोती जोडून बघ
गोफ गुंफुनी क्षणापुरता
आठवणी काही आठवून बघ
पूर्वी सजणा माझ्यासवे
हि बाग तुझ्यावर रुसायची
तू मनवता मला सख्या मग
स्वतःही खुदकन हसायची
गुलमोहर:
शेअर करा