निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिपळुनला माझ्या आईच्या आत्याच्या घरासमोर काजूचेच झाड आहे, त्यावर मात्र ते सहज खेळत असतात. माणसांना अजिबात बिचकत नाहीत... Happy

जागू, शांकली, ईनमीन तीन, प्रज्ञा१२३, चातक, शोभा१२३ : धन्स!
आता थंडी आहे. सगळी फुलं - पानं उन्हाळ्याची वाट पहात दडून बसली आहेत. त्यामुळे आत्ता पानांचा फोटो नाही टाकता येणार. काकुंच्या माळ्याला विचारेन नाव आणि बाकी माहिती. पण वेगळेपणामुळे माझ्या कायम लक्षात राहील हे फूल . आपल्याकडे नसेल फूलत हे फूल. म्हणून कोणी आधी पाहिलं नाहीये Proud

मस्त मस्त होतं एम्प्रेस गार्डनचा फ्लॉवर शो. जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं ( दर वर्षीच वाटतं Happy
पुण्यात खुप लोकांना एम्प्रेस गार्डन माहितच नाही. फारच अ‍ॅमेझिंग जागा आहे. ही होती या वर्षीची रोझ क्वीन.

Rose Queen.JPG

आणि हा होता द रोझ किंग ऑफ द यिअर.

Rose King.JPG

यांचा आकार फोटोमधे कळत नाहीए. हे दोघेही साधारण कप-बशीतल्या बशीच्या आकाराचे होते. अजुन मधे कळी आहेच, त्यामुळे अजुन पुढे किती मोठी होतील विचारच करु शकत नाही.

ईन मीन तीन - त्या लाल फुलाचे (पेव) साधनाने वर्णन केलेले एकदम बरोबर - गोलाकार जिना असलेली पाने - मराठीत पुष्करमुळा व हिंदीत केउकंद - Costus speciosus
फोटो एकदम सहीच.
हा आंतरजालावरुन मिळालेला फोटो -

1213837507_82c286f4df[1].jpg

अत्यंत खेळीमेळीत, गप्पाटप्पा करत, निसर्गाच्या सान्निध्यात "निसर्ग गटग" संपन्न झाला. सविस्तर वृतांत येईलच (कोण लिहतंय ते माहित नाही :फिदी:) तो पर्यंत हि एक फोटो झलक. Happy

(वरच्या फोटोत कोण काय शोधतंय ते विचारू नका Proud वृतांतात सगळं येईलच.)

विसु: "खादाडी"चे फोटोही असणार"च". Happy

तो बघा सूर्य आणि .............

........ नाही नाही... अरे तो सूर्य आणि तो आहे............

"निसर्ग गटग" - मजा आली,
वरच्या फोटोत कोण काय शोधतंय ते विचारू नका वृतांतात सगळं येईलच.) >> लवकर येउदे Happy

मला पुढिल रोपे ठाणे वा मुंबईमध्ये कुठे मिळतील?
१) कुंती २) मुचकुंद ३) अगस्ती/हादगा ४) मदनबाण ५) भटकळ मोगरा ६) भुईचाफा ७) मोह

कुंती कुठल्याही लहान नर्सरीत मिळते. मदनबाण मला दादर छबिलदास गल्लीतल्या नर्सरीत दिसलेला. तिथे भटकळ मोगरा (म्हणजे वेल मोगरा का?), कुंती ही तिथे मिळेल.अगस्ती/हादगा पण विचारुन पाहा.

अगस्ती/हादगा , मुचकुंद, मोह हे सगळीकडे मिळणार नाहीत. मोठ्या नर्सरीत मिळतील. कर्नाळा रोडवर असलेल्या गो-ग्रीन मध्ये मात्र नक्की मिळतील.

भुईचाफा कुठे मिळाला तर मलाही सांगा. मलाही हवाय. Happy

साधना आणि सेनापती धन्यवाद!
सेनापती -महेश नर्सरी ठाण्यामधे नक्कि कुठे आहे ?

मनिमाऊ, मस्त फोटो. खरे तर काल मला पण यायचे होते पण जमले नाही लवकर यायला. कदाचित संध्याकाळी ५.३० नंतर जमले असते पण उशीर होइल म्हणुन टाळले. आता खुप वाईट वाटतेय. आणि हो एम्प्रेस खरेच मस्त आहे आणि माझ्या घराजवळुन ५-१० मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे मला अगदी 'चुल्लुभर पानीमे ...' वाले फिलींग आलेय.

कर्नाळा रोडवर असलेल्या गो-ग्रीन मध्ये पुढिल रोपे आहेत-(मी वेबसाईट मधे दिलेल्या फोन नंबरवर माहिती विचारली)
१) कुंती २) अगस्ती/हादगा ३) मोह
पण उरलेली पुढिल रोपे ठाणे वा मुंबईमध्ये कुठे मिळतील?
१) मुचकुंद २) मदनबाण ३) भटकळ मोगरा ४) भुईचाफा

राधा मी पण गो ग्रिन मधुन हदगा आणला. मदनबाण माझ्याकडे आहे. कधी आलीस तर घेउन जा. भटकळ मोगरा आणि भुईचाफा नक्की कसे फुल असते ?

जागु-
भुईचाफा साठी -
http://smilingsmit.blogspot.com/2009/06/kaempferia-rotundafamily-zingibe...
भटकळ मोगरा साठी (याचा सुगंध अप्रतिम असतो, याचे गजरे मुम्बैत माटुंगा नी दादरला एक दोन ठिकाणी मिळतात)
http://expressbuzz.com/topic/jasmine-fragrance-spreads-overseas/261505.html
मी मदनबाणासाठी नक्कि येइन.

शोभा & आस, आधी म्हणाला असतात तर बरोबरच गेलो असतो. मीपण एकटीच गेले होते शनिवारी सकाळी. मलाही कंपनी झाली असती आणि थोडी चर्चाही करता आली असती. मला अंकलिपीत शिकलेल्या ठराविक १०-१२ फुलांपलिकडे वेगळी फुलंही ओळखता येत नाहीत. माझंही ज्ञान जरा वाढलं असतं. पुढच्या वेळेस असा काही event असेल तर मी नक्कीच विचारेन तुम्हाला. Happy

हे एका प्रचंड मोठ्या झाडाचं प्रचि

Trees.JPG

आणि हा दुरुन काढलेला बागेतलाच फोटो.

empress garden.JPG

मस्त गप्पा रंगल्याएत.
मने; हा फ्लॉवर शो माझा हुकला Sad
पण तू इथे दिलेले सुंदर फोटो बघून समाधान वाटून घेतले.
मुंबईला सर्वांनी खर्‍या अर्थाने निसर्ग संगत अनुभवली... (इथे खूप हेवा वाटणारी स्मायली नाहीये तेव्हा..)

meeradha.. महेश नर्सरी भास्कर कॉलनीमध्ये आहे... कोपरी पुलाबजुला ठाणे महापालिकेचे उदंचन केंद्र कुठे आहे तुला ठावूक आहे का? त्याच्याबाजूचा बंगला म्हणजे महेश नर्सरी... Happy

इन मीन, तुम्हाला कुठे दिसतात असली फुलं? काय सही कलर्स असतात. एकदम unusual आहेत दोन्हीही.
अगोदर दिलेलं लाल तर एखादा पुष्पालंकार म्हणुन वापरता येइल ( रंग आणि आकार दोन्ही सुटेबल आहे त्यासाठी) आणि हा केशरी इतका क्लासी आहे कि असं एखादं कापड शोधावं लागेल आता. Happy ब्ल्यु डेनिम्सवर मॉडर्न पॅटर्नचा टॉप किंवा बेज कलर पतियालावर छानशी शॉर्ट कुर्ती Wink

BTW, निगवर फॅशनच्या गप्पा मारण्याचं कारण एम्प्रेस गार्डनमधला हा स्टॉल. पुर्णपणे पानं, फुलं आणि भाज्या वापरुन बनवलेले या सुंदर्‍यांचे हे ड्रेसेस.

कानात कारली, गळ्यात मटर आणि गाजराचा नेकपिस, ब्लाउज - जांभळा कोबी.

empress garden1.JPG

हा तिचा स्कर्ट - वेत आणि लसणांची माळ.
empress garden2.JPG

आणि ही तिची सखी बघा. गळ्यात - मक्याच्या दाण्यांची माळ, त्यात कारल्याचं पेडंट, डोक्यावर पिवळ्या पानांचा हेड गिअर, लाल आणि हिरव्या मिरच्यांचा ब्लाउज.

empress garden3.JPG

हा तिचा पानापानांचा स्कर्ट. बोटांमधली कलरफुल अंगठी आणि पिवळ्या पानांचं ब्रेसलेट मिस करु नका.

empress garden4.JPG

या दोघीजणी अशा होत्या. एक दुरुन फोटो.

empress garden5.JPG

शशांकजी धन्यवाद Happy
मनिमाऊ-ब्ल्यु डेनिम्सवर मॉडर्न पॅटर्नचा टॉप किंवा बेज कलर पतियालावर छानशी शॉर्ट कुर्ती->> Lol
छान कल्पना आहे.

गळ्यात - मक्याच्या दाण्यांची माळ, त्यात कारल्याचं पेडंट, डोक्यावर पिवळ्या पानांचा हेड गिअर, लाल आणि हिरव्या मिरच्यांचा ब्लाउज. >> वा क्या बात हे अगदी राजेशाही थाट Happy

Pages