निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना Rofl
जागुतै चालेल, माझ्या लेकींनी चिउताईसाठी चप्पलच्या खोक्याचे घरट बनवलय, वाट बघतेय लवकर पाठवा .. पण << साक्षी मला चिमण्या दिसल्या तर पाठवते ग तुझ्याकडे >> दिसल्यातर म्हणजे तुम्हालाही शोधाव्या लागतील का?

मार्लेश्वर (देवरुख) चा धबधबा. (जिप्स्याने फोटो टाकले होते याचे). १५ जानेवारीला एवढे पाणी होते. पण हा धबधबा उन्हाळ्यातही आटत नाही. पावसाळ्यात तर तिथे जायलाच बंदी असते.

कर्णेश्वर (संगमेश्वर) च्या देवळामागचा सुंदर देखावा. माझा पाय तिथून निघतच नव्हता. तिथल्या देवळाचे फोटो मग टाकीन.

दिनेशदा : हो हो मार्लेश्वरचा फोटो पाहुनच विचारणार होते की उन्हाळ्यात तेथे जाता येते का? पावसाळ्यात तर तो रस्ता बंद करतात.

मोनालि, देवरुखवरुन सतत बसेस असतात. बर्‍याच टुरिष्ट गाड्या पण दिसल्या. आता पायर्‍या बांधल्यामूळे चढण सोपी आहे. पायर्‍या देवळापर्यंत आणि पुढे धबधब्यापर्यंत आहेत.

हो हो मी आत्ताच जाउन आले. पावसाळ्यात त्यांनी जा म्हटले तरी आपण जाउ शकत नाही असला कोसळतो तो.

दिनेशदा, फोटो सुंदर.
साक्षी..... 'या चिमण्यांनो.... परत फिरा रे...' असं झालंय खरं!
साधनाला परत इथे बघून मस्तच वाटतंय आणि कॉमेंट्स वाचून मज्जा वाटतिये.

इथे (लंडन) ज्यांच्या कडे राहाते त्या काकूंच्या बागेतलं माझं सगळ्यात आवडतं फूल. तीन मुख्य पाकळ्या. त्यांच्या मधे मधे एका आड एक ३ छोट्या पाकळ्या. आणि मुख्य पाकळ्यांच्या पाठीला लागून बाहेर वळलेल्या अजून ३ पाकळ्या. ह्या शेवटच्या पाकळ्या आपल्या गोकर्णाच्या फुलासारख्या दिसतात. काय माहीत काय नाव आहे.
fool.jpg

मस्तच फोटो सगळ्यांचेच Happy

रविवारी माहिमच्या निसर्ग उद्यानातुन पवईला जायचे नक्की आहे का? सध्या फिक्कट गुलाबी आणि पिवळाधम्मक टॅबेबुया मस्त फुललाय. Happy

शकुन, त्या निळ्या फुलाचा फोटो मस्तय एकदम. ते फूल आयरिसचे आहे का? पानं वाटत नाहीयेत पण फुलाची रचना मात्र खूपच आयरिस सारखी वाटतिये.
माहीमच्या उद्यानातील फोटो बघण्याची खूपच उत्सुकता लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर गटग घेऊन फोटो द्यावेत ही नम्र विनंती... Happy

दिनेशदा, छान फोटो. मी मार्लेश्वर ला जाऊन ४-५ वर्षे झाली. उन्हाळा असल्यामुळे धबधबा (?) पूर्ण कोरडा होता.
शकून फारच सुंदर आहे फूल.

लालुच दाखवतोय... Biggrin

शकुन, त्या फुलाच्या झाडाचा किंवा पानांचा प्रचिही ढकला ना इथे...

आतील भाग वेलवेट टच (कापसी) आहे का?

पहील्यांदाच पाहीले फुलात फुल्....तिन फुल Happy

जवळ जवळ ३ पानांच्या पोस्टस वाचायच्या आहेत, म्हणुन ही माहिती कोणी वर शेअर केली आहे का माहित नाही. मी घाईत आहे, म्हणुन हे quickly share करुन पळते.

पुणेकर निसर्गप्रेमींसाठी -

एम्प्रेस गार्डन मधे भाज्या, फुलं, फळं, बोन्साय यांचं थंडीमधे भरणारं प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे आताही चालु झालं आहे. फार सुंदर फुलांच्या रचना आणि वेगवेगळ्या स्पर्धा असतात. आज दुसरा दिवस आहे, त्यामुळे ज्यांना जमेल त्यांनी आजच जा. तिसर्‍या ( शेवटच्या) दिवसापर्यंत फुलं फार खराब होतात आणि मजा येत नाही बघायला. शिवाय तिथे विक्रीसाठी पण भरपुर रोपं, बिया, कंद मिळतात.

मी आता निघाले आहे. पुण्याबाहेरच्या लोकांसाठी फोटो शेअर करेनच. टा ! Happy

आता ऑफिसमधे येताना राखाडी रंगाचा धनेश दिसला, लांबुन. आणी त्याच्या डोक्यावरचे शिंग तुलनेने लहान वाटले.
म्हणुन गुगलुन बघितले, Gray Hornbill असणार तो.

मी आजवर पाहिलेले सगळे धनेश लांबुनच पाहिलेत. माणसांच्या जास्त जवळ यायला त्यांना बहुतेक आवडत नाही. नेहमी माना वाकड्या करुन बसलेले असतात, चोचींच्या अवाढव्य आकारावरुन ओळखता येतात.

...तीन,
मस्त फोटो

मनीमाऊ, माहिती बद्द्ल धंन्यवाद

धनेश सहसा उंच झाडावर बसतात, खाली फारसे येत नाहीत, त्यामुळे पटकन दिसत नाहित. ओरडलेकी आवाजावरून कळतं कुठे आहेते.

नितीन, तुम्ही केन म्हणुन फोटो टाकलाय तो पेव आहे ना??? त्याच्या पानांची रचना गोलाकार जिन्यासारखी असते तेच आहे ना हे रोप??

राखाडी रंगाचा धनेश मी पण मलकापूरला पाहिला, पण आकाराने लहान् होता. बसल्यावर जरा बेढब दिसणारा हा पक्षी, उडताना मात्र खुप देखणा दिसतो.
सिंगापूरला तर प्रत्यक्ष हाताळायला मिळाला होता. पापण्यांवर केस असणारा हा एकमेव पक्षी आहे, असे तिथे कळले.

मालवणला माझ्या आत्याच्या घरासमोर काजूचे झाड आहे, त्यावर मात्र ते सहज खेळत असतात. माणसांना अजिबात बिचकत नाहीत.

Pages