भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

Submitted by मास्तुरे on 22 November, 2011 - 02:22

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, कोहली, रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रग्यान ओझा, अभिमन्यू मिथुन, झहीर खान

भारताचा ट-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा संघ असा आहे -

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सेहवाग, गंभीर, रैना, सचिन, मनोज तिवारी, कोहली, रोहीत शर्मा, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, अश्विन, राहुल शर्मा, उमेश यादव, विनयकुमार, प्रवीणकुमार, इरफान पठाण, झहीर खान

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), एड कोवॅन, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, डेव्हिड वॉर्नर, मायकेल हसी, डॅनियल ख्रिस्तियन, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), पीटर सिडल्, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क, नेथन लॉयन

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ असा आहे -
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग, पीटर फॉरेस्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, डेव्हिड हसी, मायकेल हसी, मॅथ्यू वेड, ब्रेट ली, रायन हॅरिस, मिचेल स्टार्क, झेव्हिअर डोहेट्री, क्लिंट मॅके, मिचेल मार्श

ऑस्ट्रेलियाचा T20 चा संघ असा आहे -
जॉर्ज बेली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), ट्रेव्हिस बर्ट, डॅनिअल ख्रिश्चिअन, झेव्हिअर डोहेट्री, जेम्स फॉकनर, एरॉन फिंच, ब्रॅड हॉग, डेव्हिड हसी, ब्रेट ली, मिशेल मार्श, शॉन मार्श, क्लिंट मॅके, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक)

श्रीलंकेचा एकदिवसीय संघ असा आहे -
जयवर्धने (कर्णधार), अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज (उपकर्णधार), उपुल थरंगा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगक्कारा (यष्टीरक्षक), दिनेश चंडिमाल (यष्टीरक्षक), लाहिरू थिरिमान्ने, थिसारा पेरेरा, फरवीज महारूफ, रंगना हेराथ, सचित्र सेनानायके, लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, चनका वेलेगेदेरा, धम्मिका प्रसाद, थिलान समरवीरा (अजून समावेश नक्की नाही)

_________________________________________________

हा आहे दौर्‍याचा कार्यक्रम -

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१५-१६ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघ वि भारत
१९-२१ डिसेंबर; स्थळ - कॅनबेरा, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: अनिर्णित (धावफलक इथे आहे)

_________________________________________________

पहिला कसोटी सामना -
२६-३० डिसेंबर, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा कसोटी सामना -
३-७ जानेवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ५:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

तिसरा कसोटी सामना -
१३-१७ जानेवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ८:०० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया एक डाव राखून विजयी (धावफलक इथे आहे)

चौथा कसोटी सामना -
२४-२८ जानेवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ५:३० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया २९८ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

मालिकावीर : मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० अशी जिंकली.

_________________________________________________

पहिला T20 सामना -
१ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)

दुसरा T20 सामना -
३ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - दुपारी २:०५ पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ८ गडी व २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)

मालिका निर्णय: १-१ अशी बरोबरी

_________________________________________________

सर्व एकदिवसीय सामने दिवस-रात्र असे खेळले जातील.

पहिला एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
५ फेब्रुवारी, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ६५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0

दुसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
८ फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत ४ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, भारत ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ५, भारत ४, श्रीलंका 0

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१० फेब्रुवारी, स्थळ - पर्थ, वेळ - सकाळी ९:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका 0, ऑस्ट्रेलिया ४
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ४, श्रीलंका 0

तिसरा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१२ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: भारत २ चेंडू राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत ८, श्रीलंका 0

चौथा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
१४ फेब्रुवारी, स्थळ - अ‍ॅडलेड, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: बरोबरी (धावफलक इथे आहे)
गुण - भारत २, श्रीलंका २
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका २

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
१७ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ८ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया 0, श्रीलंका ५
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया ९, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया -0.११६, भारत -0.२४५, श्रीलंका +0.३२३

पाचवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
१९ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: ऑस्ट्रेलिया ११० धावांनी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - ऑस्ट्रेलिया ५, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ७
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.६७२, श्रीलंका +0.३२३

सहावा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२१ फेब्रुवारी, स्थळ - ब्रिस्बेन, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ५१ धावांनी विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, भारत 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका ११
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.४३३, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४८१

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)
निकाल: श्रीलंका ३ गडी राखून विजयी (धावफलक इथे आहे)
गुण - श्रीलंका ४, ऑस्ट्रेलिया 0
आतापर्यंतचे एकूण गुण : ऑस्ट्रेलिया १४, भारत १०, श्रीलंका १५
आतापर्यंतची निव्वळ धावगती : ऑस्ट्रेलिया +0.३१८, भारत -0.७३३, श्रीलंका +0.४२६

सातवा एकदिवसीय सामना - विरूद्ध ऑस्ट्रेलिया
२६ फेब्रुवारी, स्थळ - सिडने, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

आठवा एकदिवसीय सामना - विरूद्ध श्रीलंका
२८ फेब्रुवारी, स्थळ - होबार्ट, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

ऑस्ट्रेलिया विरूद्ध श्रीलंका
२ मार्च, स्थळ - मेलबोर्न, वेळ - सकाळी ८:५० पासून (भारतीय प्रमाण वेळ)

पहिला अंतिम सामना
४ मार्च, स्थळ - ब्रिस्बेन

दुसरा अंतिम सामना
६ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

गरज भासल्यास तिसरा अंतिम सामना खेळवला जाईल.

तिसरा अंतिम सामना
८ मार्च, स्थळ - अ‍ॅडलेड

_________________________________________________

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाउदे ओ मास्तुरे कशाला टेंशन घेताय ! इथे नाही जिंकले तर अजून पर्थ आहे. मग न्युझीलंड, असे सर्व जग पडलेय कुठेतरी जिंकतीलच नक्की.

आमेन!

>>जल्ला चुकीच्या बापाकडे प्रार्थना केल्यावर नामुष्कीच ओढवणार.<<
@इंद्रधनुष्य
तुम्हाला चुकीच्या बाप्पाकडे म्हणायचे आहे का.? Lol

@इंद्रधनुष्य
तुम्हाला चुकीच्या बाप्पाकडे म्हणायचे आहे का.? >>> नाही ओ... हे पा <<< आता ०-४ अशी नामुष्की होऊ नये एवढीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना!

मास्तर 'आकाशातल्या बापाकडे ' करुणा भाकताहेत? शिव शिव , सोनियाजी जिथे भाकतात तिथे? पांडुरंग हरी वासुदेव हरी...

भाऊ, मस्त व्यंगचित्र!
आज क्षेत्ररक्षण करताना चेंडू जवळ आल्यावर काही क्षेत्ररक्षक वाकून चेंडू अडवायचा प्रयत्न न करताच थेट चेंडूच्या मागे धावायला सुरूवात करत होते.

अहो पाठ दुखत असेल त्यांची, म्हणून वाकता येत नसेल. चेंडुच्या मागे धावतात कशाला कुणास ठाउक? खरे तर चेंडू बाउंडरी पलीकडे गेला की कुणितरी आणून देतीलच. आता हे खेळाडू एव्हढे श्रीमंत, मोठे हिरो, त्यांनी का अशी धावाधव नि वाकावाकी करायची?

शिवाय इतर देशांचे खेळाडू म्हणे जमिनीवर आडवे पडूनसुद्धा झेल घेतात, नि चेंडू अडवतात! त्यांच्या आया रागवत कशा नाहीत त्यांना कपडे मळवले म्हणून? काही संस्कृतीच नाही त्यांना. धुवायला खर्च येत नाही का? ते एव्हढे श्रीमंतहि नसतील, म्हणून करत असतील तसे. आपण आपली डिग्निटी सांभाळली पाहिजे की नाही?

कदाचित स्वप्नाळू आशावाद असेलही हा; पण क्रिकेटमधे केंव्हाही कांहीही घडूं शकतं. अजूनही हा सामना व मालिका उत्कंठावर्धक व स्मरणीय होऊं शकतात .

३०० धावांच्या भागीदार्‍या ही ऑस्ट्रे. विरूद्धच्या सिरीज मधली आपली मक्तेदारी होती. होपफुली उद्या कोणालातरी त्याची आठवण होईल.

पण क्रिकेटमधे केंव्हाही कांहीही घडूं शकतं. >> हो बरोबर. हसी आता २०० काढेल आणि क्लार्क ४०० जे दोघांनाही शक्य नव्हत.

अरेच्चा क्लार्कला काय झाले. त्याने हे लिहिल्याबरोबर डिक्लेअर केले. चुकीचा निर्णय. ४०० अन २०० होऊ द्यायचे. अजून दोन दिवस होते. टी नंतर डिक्लेअर करायचे. भारतीयांचे पुरते मानसिक खच्चीकरण करून. (नाहीतरी काय बाकी आहे म्हणा.)

पण आपली पहिली जोडी टिकली तर ... मजा येईल. Happy

त्याला भारतीय खेळाडूंची दया आली बहुतेक.. Happy

मला पण वाटत होतं की त्यानं ४०० करून मगच डाव घोषित करावा. अशी संधी त्याला अन्य कुठला संघ देइल? Proud

मित्रांनो निराश होणे नाही.

एखाद्या फलंदाजाला ४०० करण्याची संधी कधीतरीच येते. ती आपल्या महान फलंदाजांना आली आहे.
वीरू, द्रविड सचिन , लक्ष्मण लगे रहो.

सचिन १०० मारून आपण हरलो अस व्हायला नको. ४०० नाहितर ३०० तरी मार. Happy

मला मनापासून आशा आहे. Happy

वीरू गेला.. त्याच्या खेळाबद्दल कितीही बोलले गेले असले तरी तो एक बेजबाबदार क्रिकेटर आहे हे त्यानं बर्‍याचदा सिद्ध केलंय..

क्लार्क - त्रिशतक

हसी - शतक

त्यांची धावसंख्या - ६३० च्यापुढे

भारतीय संघाची देहबोली -

बडवलेल्या बैलासारखी

Sad

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड कॉमेंटरी बॉक्स मधे त्याच्याबरोबर आल्या आहेत. शास्त्रीने आत्ता त्यांच्याशी "हाय ज्युलिया..." टाईप गप्पा चालू केल्या. राष्ट्राध्यक्ष्यांशी Mr. President, Mr/Ms. Prime Minister असे बोलण्याचा प्रघात आहे. ऑस्ट्रेलियात नसला तर माहीत नाही.

एखाद्या अमेरिकनाने केले तर समजू शकतो, पण शास्त्रीसारख्या आपल्याकडे जिकडेतिकडे सर, मॅडम ची सवय असलेल्या देशातील माणसाने असे केले हे आश्चर्य आहे. अशीही शक्यता आहे की अशा वेळेस राष्ट्राध्यक्ष्यांच्या कार्यालयातील एक टीम येउन प्रेप अप करते प्रोटोकॉल बद्दल, तसे केलेले नसेल.

तरी पण चूकच. त्याने मॅडम असे सुरूवातीला म्हणायला पाहिजेच होते. अमेरिकेत पण मि. प्रेसिडेन्ट अशीच सुरूवात होते.

रवी शास्त्री हा प्रॉब्लेम समजतच नाही आपल्याला तरी!

आता स्टॅटिस्टिक्स काहीही दाखवोत, पण इतके खरे की तो अतिशय बोअर खेळायचा. कित्येकदा तर त्याने काहीच केलेले नाही. (एखाद दोन विकेट्स हे कामच असते गोलंडाजाचे - स्टॅटिस्टिक्स खरच नक्की काहीच सांगत नाहीत - आता बघा ना, पहिल्या इनिंग्जमध्ये साहेबांच्या त्रेचाळीस धावा झाल्या आणि रेकॉर्डमध्ये काय गेले?तर साहेबांचे अ‍ॅव्हरेज मेन्टेन झालेले आहे. पण संघ मार खात आहे. - अर्थात हा साहेबांचा दोष नाहीच - पण त्यांच्या या त्रेचाळीस धावांचे मोल फारसे नाही हे रेकॉर्डमध्ये जाणार नाही - अर्थात, त्याही धावा केल्या नसत्या तर बोंब झाली असतीच म्हणा - असो). तर रवी शास्त्री साहेबांनी मियाँदादला भर मैदानात दम देणे, अमृता सिंघ की कोण तिच्याबरोबर प्रेमप्रकरण गाजवणे आणि कोणत्यातरी दुय्यम सामन्यात सलग सहा षटकार ठोकणे या व्यतिरिक्त कर्णधारपदही भूषवले आहे आणि अष्टपैलू म्हणून स्वतःस गौरवूनही घेतलेले आहेच. (आठवते की तेव्हाच्या तरुणी रवी शास्त्रीचा मैदानातील वावर अनिमिष की कसल्या तरी लोचनांनी बघायच्या). मात्र हे साहेब अत्यंत कंटाळवाणे व दिशाहीन खेळायचे. फलंदाज व गोलंदाज म्हणूनही! मोठे साहेब, म्हणजे गावसकर यांच्या मर्जीतील असल्याने व फाडफाड इंग्रजी बोलता येत असल्याने ते क्रिकेटशीच संबंधित पण खेळाव्यतिरिक्त अशा क्षेत्रांमध्ये अग्रगण्य राहिले हे त्यांचे नशीबच! आता ऑस्ट्रेलिया या देशानेच त्यांच्यावर तोंडसुख घ्यावे, जेणेकरून ते तिकडे पाय ठेवू शकणार नाहीत.

Angry

क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंचं किंवा संघांचं पूनर्वसन करायचे असेल त्यांनी भारताच्या संघाशी खेळावे...त्यांना हमखास यश मिळवून देण्यात भारत नेहमीच दयाळू राहिलाय...सद्द्याचंच उदाहरण पाहा....ऑस्ट्रेलियाचा संघ आणि त्यातले पॉंटिंग-क्लार्क हे खेळाडू पाहा....दोहोंनाही भारताने किती मोठं यश देऊन त्यांना त्यांचा आत्मविश्वासही दिलाय....हेही कमी म्हणून नवोदित खेळाडूंच्या पदरातही भरभरून यश ओतलंय.....मेरा भारत महान!
सेहवाग(घ).द्रविड,तेंडूलकर आणि लक्ष्मण असे फलंदाजीतले जागतिक कीर्तीचे रथी-महारथी असूनही आम्ही नेहमी प्रतिस्पर्ध्याला झुकतं माप देत असतो...दानशूर कर्ण ह्या देशात होऊन गेला ते उगीच काय? त्याचेच संस्कार आहेत आमच्यावर....अतिथी देवो भव...सद्द्या ऑस्ट्रेलियात खरं तर भारत हा अतिथी आहे...पण आपण इतके संस्कारशील लोक आहोत की तिथे जाऊनही त्यांनाच अतिथीचा दर्जा देऊन टाकतो...घ्या..जे हवे ते घ्या आणि संतुष्ट व्हा! शतक, द्विशतक, त्रिशतक,५बळी, ८ बळी....हवे ते घ्या..आम्ही बनतो तुमच्यासाठी...यज्ञातली आहुती! Wink

भारतीय संघाचे दोन ऐतिहासिक प्रॉब्लेम्स कधी सुटलेच नाहीत.

१. द्रूतगती गोलंदाजांची भयानक कमतरता

२. काहीशी अशक्त मानसिकता

तिसराही एक प्रॉब्लेम आहे, पण तो ऑफ लेट जरा कमी झाल्यासारखा वाटत किंवा भासत आहे.

तो म्हणजे संघाचा / देशाचा हिरो बाद झाला की सगळ्यांनी नांगी टाकणे!

Angry

८ ओव्हर्स मध्ये एकही धाव नाही! ते ही तेंडल्या अन रन अ बॉल करणार्‍या गंभीर कडून. झेपत नाही. मॅच स्टॅन्ड स्टिल. अर्थात हे ही कधीच बघितले नाही म्हणा. पहिल्या एन दोन ओव्हर नंतर बॉलरला कौतुक वाटले की तो मेडन टाकतोय, पण घ्या सगळ्याच मेडन. Happy

केदार हे कदाचित रिव्हर्स खच्चीकरण असेल बॉलरचे... तू कसेही बॉल टाक आम्ही मारणारच नाही.. मग तो फ्रस्ट्रेट होऊन काही तरी वेडेवाकडे करेलच... Happy

सचिन ४२ बॉल्स मधे ८ रन्स........................................... कर्मगती की कुर्मगती काय ते यालाच म्हणतात का Happy

ही कसोटी या बाफ वरिल सगळ्यांच्याच भाकितांची टिंगल करताना दिसतेयं... मैदाना पेक्षा इथेच जास्त करमणूक होतेयं :p

Pages