बंगळूरमधली खादाडी

Submitted by admin on 26 June, 2009 - 01:33

बंगळूरमधली खादाडी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दाम जायचे असेच काही नाही, मैसूर साईड ला जाताना ट्राय करु शकतो की माहीत असेल तर. इनोवेटिव फिल्म सिटी / जनपद लोक / वंडर ला, या कुठल्याही ठीकाणी जायचे म्हणले तरी हे कदंबम वाटेत येते, तेव्हा जाउ शकता.
हो, ते राजवर्धन मला पण नाही आवडत.

जुन्या एअरपोर्ट रोडवर साधारण डायमंड डिस्ट्रीक्टच्या जवळपास चांगली रेस्टॉ. आहेत काय? मस्त कलंदर नावाचे एक व्हेज वाले होते, बरे वाटले. तेथेच एक क्ले पॉट नावाचे पण आहे. ते कसे आहे माहीत नाही.

मस्त कलंदर चांगले आहे अगदी ऑथेण्टिक शाकाहारी (फार मसालेदार नाही) असे चांगले पदार्थ, पण त्यांचे पराठे छान नाहीयेत. तसेच त्यांच्या बर्‍याच शाखा आहेत.

मस्त कलंदर च्या त्या ब्रांच मध्ये मी नाही गेले कधी, पण जिथे जिथे गेलेय ते चांगले असते. (आयटी मधल्या कपलने दोघांनी आपापले जॉब्स सोडुन हे मस्त कलंदर प्रकरण काढले आणि आता तुफान ब्रांचेस निघत आहेत. काही डीशेस खरंच छान असतात.)
क्लेपॉट ला मी नाही गेले कधी.
आंध्रा क्विझिन आवडत असेल ( म्हणजे भाताचा डोंगर अन बाजूला रस्सम, सांबार, भाज्या, पायसम, अश्या १०-१२ वाट्या ) तर नंदिनी नावाचे ठीकाण आहे डायमंड डिस्ट्रिक्ट च्या समोरच, मेनलँड चायना च्या बाजूला. तिथे चांगले जेवण मिळते.
डायमंड डिस्ट्रिक्ट च्या बाजूच्या बिल्डींग मध्ये आधी आनंद भुवन होते, आताचे माहीत नाही. तिथल्या ब्रांच ला गेले नव्हते पण जनरली आनंद भुवन मध्ये चांगले खायला मिळते. कॉफी तर सहीच. पण साधे आहे, सेल्फ सर्वीस आहे.
बरीच भूक असेल अन जरा महागडे खायचे असेल तर नंदिनीच्याच समोर बार्बेक्यू नेशन आहे.
बाकी मग बर्‍यापैकी जवळ ( तुला सवयीचे असल्यास) सबवे अन टाको बेल आहे. (वेगवेगळ्या दिशांना).
समोरच १०० फूट इंदिरानगर रोडवर खूपच खाण्याची ठिकाणे आहेत, पण ते आवड, वेळ अन बजेट यावर सांगता येईल. बीच वगैरे काही काही मस्तच आहेत पण कायच्याकाय महाग.
लिटल इटली / इटालिया पण बर्‍यापैकी जवळच आहे, ते पण चांगले आहे.
सध्या त्या भागात गेले नाहीये २ वर्षांत, त्यामुळे आण्खी काही लक्षात येत नाहीये पटकन, आठ्वले तर लिहीते परत.

धन्यवाद मवा. टाको बेल अजिबात आवडत नाही उसगावातील. देशातील ट्राय केले नाही अजून. बा.ने. चेक करेन - बहुधा हॉटेल मधे मिळते त्यापेक्षा स्वस्तच असावे Happy

टाको बेल का ? दुरुस्त करते. तिथे वाट्टेल तितके कोक, पेप्सी वगैरे (फुकट) मिळतं म्हणून लोकांना आवडतं. Uhoh .
जर तुला दाक्षिणात्य स्पेशल खायचं असेल आणि तुझ्याकडे वाहनाची सोय होत असेल तर इंदिरानगर मधलं Annachi चांगलंय, ऑथेंटीक चेट्टीनाड क्विझिन. नॉन्-व्हेज आवडणार्‍यांना खूपच चांगले ऑप्शन्स आहेत. त्याच्याच वर नॉर्थ इंडियन साठी विलेज नावाचं आहे, ते ही चांगलंय.
( गाडीची सोय होणार असेल अन दाक्षिणात्य हवं असेल तर परत ) कोरामंगला मध्ये कोकोनट ग्रूव नावाचं केरला क्विझिन चं पण चांगलंय.
दाक्षिणात्य स्पेशल आंध्र, केरळ, अय्यंगार, चेट्टीनाड हे खाऊन आवडण्यासाठी थोडी टेस्ट डेवलप व्हावी लागते असं मला वाटतं. पहिल्यांदाच खाल्लं तर नाही आवडत काहींना अप्पम, इडीयाप्पम, नीर दोसा, केरळ पराठा हे सगळं. (हे माझ्या घरातल्यांच्या अनुभवावरुन)

इंदिरानगरमधेच एक "सनीज" म्हणून आहे तेथे गेलो होतो. महाग आहे. काहीतरी फ्युजन टाईप असावे. कारण टोफू पासून पिझा पर्यंत बरेच काही होते. पण अगदी सूप पासून डेझर्ट पर्यंत जे काही खाल्ले ते अत्यंत चवदार होते. इतके हाणले की दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत भूक लागली नाही Happy

१००% रेकमेन्डेड!

दुसरे एक बहुधा इंदिरानगरमधेच "साउथ इंडिज" म्हणून आहे तेथेही गेलो होतो. बाकी सर्व लोक जबरदस्त तारीफ करत होते. "अस्सल" होते असे म्हणत होते. सगळा मेनूच दाक्षिणात्य होता. तमिळ की मल्लू माहीत नाही. एकच गोची म्हणजे पदार्थ काय आहेत जाम कळत नव्हते. आणि त्याचे नाव लिहीणार्‍याने ती तमिळ नावेच रोमन मधे लिहीली होती. आता ती वाचल्यावर जर पदार्थ काय आहे कळत असते, तर तो पदार्थ बघूनही कळले असते Happy

मला दाक्षिणात्य खाणे फारसे आवडत नाही (टोमॅटोच आवडत नसल्याने. आणि रस्सम, सांबार, लाल चटण्या मधे त्याची रेलचेल असते). त्यामुळे मला विचारले तर माझे मत 'लगान' मधला तो दाढीवाला जसे त्या इंग्लिश मुलीचे नाव "अच्छा है, जो भी है" म्हणतो, तसे असेल Happy

काल परवा कधी नव्हे ते विकांताला बेन्गलोर मधेच होतो. काल कोरमंगलामधल्या ४ ब्लॉकच्या जवळच्या कामत मधे गेलो होतो. स्पेशल ज्वार भाकरी थाळी, आहाहा !!!

मला त्यांचा अ‍ॅम्बियन्स खुप आवडला. सर्वच बाबी खुप चांगल्या होत्या, टेस्ट, क्वालिटी आणि सर्विस टाईम, इ.
अनेक प्रकार होते पण विशेष म्हणजे सर्वच छान होते, अगदी सॅलड सुद्धा. मुगाची ऊसळ, पालक सारखी एक पातळ भाजी, पिठले, वांग्याची रस्सा भाजी, सॅलड, कांद्याची पात, काकडी, पापड, दही, ताक, भात, सांबार, रसम.
आणि स्पेशल थाळीमधे या व्यतिरिक्त एक स्विटडिश (काल पुरणपोळी होती), मिरची भजी आणि शेवटी आइस्क्रिम विथ फ्रूटस. रेग्युलर थाळी १२० आणि स्पेशल १६०
आणि हो नंतर दोन सोनकेळी, तसेच बिल काऊंटर वर एक टोपली भरून केळी ठेवली होती, माझा मित्र म्हणाला की पाहिजे तेवढी घेऊन जाता येतात. Uhoh

नो निड टू मेन्शन हे सगळे फक्त केळीच्या पानावर. (आइस्क्रिम सोडून) Happy

केबल कार म्हणुन आहे, मारेनहल्लि मेन रोड वर! तेही व्हेज लोकांसाठी छान आहे. पिझ्झा वगैरे कोण्टीनेन्टल छान मिळतं. केबल कार मधे बसुन जेवयचं असेल तर बूक करावि लगते. चव छान आहे.

swarth | 20 December, 2011 - 00:10
बानसवाडी, जेव्हीव्ही जवळ काही छान होटेल आहेत का?>>

जाता येता एक ' अपबीट' दिसतं टेरेस रेस्टो. कधी गेली नाही. तुम्ही गेल्यास रीव्यु द्या इथे Happy

इन्द्रधनु - गेले तिथे तर नक्कि देइन रीव्यु...

खुपच ambitious plan आहे आमचा - ६ दिवस आहोत बंगलुरु मधे, त्यातुन दोन दिवस तीरुपती, कालहस्ती करणार अहोत (सोबत दोन लहान मुलं (वय वर्ष ४ आणि १.५) बाय रोड!!!

मला आणि नवर्या ला खाणे अत्यंत प्रिय आहे म्हणुन आधीच हा रीसर्च..पाहु किति जमेल. अत्ता पर्यंत ची माझी फेव फाय चि लिस्ट्...(गेले तर रीव्यु नक्कि देइन)

१. एबोनी - हे आमचं फेव आहे (tried and tested)
२. द वीलेज - एम एस के प्लाझा - ह्या बद्दल खूप ऐकलं आहे
३. कामत - ह्या धाग्यावर वाचुन....
४. एम टी आर - ह्या धाग्यावर वाचुन....
५. नंदीनी - ह्या धाग्यावर वाचुन....

जर एबोनी तुमचं फेव असेल तर एम टी आर / नंदिनी च्या वाट्याला जाऊ नका. तेवढे अपस्केल नाहीयेत हे. पण जर लोकल फूड मधे इंटरेस्ट असेल अन अँबियन्स / पार्किंग चा अ‍ॅनोयन्स चालणार असेल तर मात्र जा नक्की.

लोकल फूड मधे इंटरेस्ट असेल अन अँबियन्स / पार्किंग चा अ‍ॅनोयन्स चालणार असेल तर मात्र जा नक्की>>>> अश्या परिस्थीतित जेवणाची मजा काहि औरच आसते.....;-)

नवीन शोध... कॅफे पास्कुची...
-बीटीएम १६ मेन, जयनगर ब्लॉक ४ (कलांजली जवळ, १९४७ खाली), जे पी नगर (रिंग रोड), इंदिरानगर

इथे वुडफायर पिझ्झा मिळतो...
एकदम क्रिस्पी (बिस्किट सारखं) क्रस्ट, आणि थोडी वेगळी (पण टेस्टी) टॉपिंग्स... (पिझ्झा हत, डॉमिनोज वगैरेंच्या ढमाल्या क्रस्ट पेक्षा शतपटीनी छान...)
पास्ता, सँडविचेस आणि रोल्स पण चांगले आहेत... आणि डेझर्ट्स पण... (कॉफी मात्र अजूनही ट्राय नाही केली...)

फक्त बार्बिक्यु सॉस घेऊ नका, त्यांना नीट जमत नाही...

कोरमंगला ५ ला कासा पिकोला यूरो रेस्टॉरंट होतं...
बर्‍यापैकी ऑथेंटिक आणि छान यूरो फूड मिळायचं...
तीन महिन्यांपूर्वी बंद झालं...
त्यांचंच रेसिडेन्सी रोडलाही रेस्टो आहे...

कासा रिव्हेरा म्हणून त्याच स्टाफ नी इंदिरानगरच्या फ्र्ंचाईझ ची ब्रांच सुरू केलिये (कोरमंगला ५ मधेच)... पण ती फारशी खास नाही...
वीक्स अँड थॉमस च्या लेव्हल ला आहे...

कोरमंगला ७ आणि बीटीएम १ मधे फ्रेंड्स यूरो रेस्टो आहे... आजिबात जाऊ नये असं...

तसंच कोरमंगला ६ मधे ओशन्स यूरो आहे... त्याच्याकडे हीन दर्जाचं न तुटणारं चिवट चिकन स्टेक मिळालं होतं... बदलून बर्गर मागितला तर सिझलर आणलं... त्यात परत तसंच / तेच चिवट चिकन... मग निघून आलो...

ramamurthy nagar , bangalore 16 / Hoysala nagar या परीसरात कोणी घरगुती पोळी भाजी वैगरे डबा पुरवणारं कोणी आहे का? माझ्या मैत्रीणीस हवे आहे .

कोरमंगला ब्लॉक १ मधे बिकानेर स्विटस नावाचे दुकान आहे (महाराजा हॉटेलच्या जवळ)
सकाळी सकाळी पोहे जे काही मिळतात, आहाहाहा !!! लिहितानासुद्धा तोंपासु !
त्यावर मस्त फरसाण, डाळिंबाचे दाणे पसरवून देतात, वर एक लिंबाची फोड पिळायची.
परवाच्या रविवारी गेलो होतो, एका मागोमाग दोन प्लेट फस्त केल्या.
त्याच वेळेस तिकडे बेन्गलोर महाराष्ट्र मंडळाचा युवा वर्ग पण आला होता पोहे खायला.
या दुकानातले बाकीचे प्रकार पण अफलातुन असणार, उदा. समोसे, कचोरी, ढोकळे, इ.

पुणेरी सुचना : इकडे पोहे स्वस्त आहेत, १० रू. प्लेट, राजवर्धन मधे महाग आहेत. तसेच टेस्ट पण एवढी भारी नाहीये.

मी एकदाच त्या राजवर्धन मधे मिसळ पाव घेतला होता, पण एकतर ते प्रकरण फार काही जमलेले नव्हते आणि किंमत पण ५० रू. Uhoh

Pages