बंगळूरमधली खादाडी

Submitted by admin on 26 June, 2009 - 01:33

बंगळूरमधली खादाडी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसाला पुरी नवाचा पदार्थ सॉदींडीयन चाट मधे मिळेल..

कुचकरलेल्या पापु च्या पुर्या.. त्यवर चना/वाटाण्या ची उसळ.. कांदा, शेव, दही, चटण्या...
मस्त लागते ही मसाला पुरी. मी महाराष्ट्रात कधी पाहीली नाही ही डीश!

विकेंडला पूर्णब्रह्म मध्ये जायचा योग आला. थाळी घेतली होती, दुसरी स्वीट्डिश सोडून सर्व पदार्थ अनलिमिटेड होते . स्टार्टर्स : साबुदाणा वडा, मिसळपाव आणि पालक भजी . साबुदाणा वडा मस्त होता पण फारच मागाव लागत होतं. डॉलर साइझचा होता. एका वेळेला दोनच वडे वाढत होते. मिसळपाव पण छान होता; मिसळ झणझणीत (माझ्यासाठी) आणि पावाला टिपीकल मुंबईचा आंबूस वास आणि चव होती Happy पालक भजी अगदीच गंडली होती. सर्व चटण्या, ठेचा चविष्ट. भाज्यांच्या चवीत प्रचंड सुधारणेला वाव आहे. कोशिंबीर, मसालेभात ओके. बाकी साधा भात-वरण, खिचडी- कढी, उसळ, मट्ठा ठिकठाक. पातळ भाजीत मला तरी भाजी दिसली नाही, मला जी चांगल्या पालेभाजीची टंचाई घरांत पावसामुळे जाणवते, तीच हॉटेलमध्ये पण असावी. पुरणपोळी छान आणि अनलिमिटेड होती पण साइझ फुलक्याचा आहे. कडा किंचित कडक वाटल्या. पुरण व्यवस्थित भरले होते. मोदक एकच लिमिटेड होता, सारण चविष्ट पण पारी कोरडी पडली होती. मागावं लागलं तरी मी न-लाजता मागून फक्त साबुदाणा वडा आणि पुरणपोळीवर ताव मारला. नवर्‍याला असं मागावं लागलं की जेवण जात नाही त्यामुळे तो पुढच्या वेळेस थाळीच्या भानगडीत पडणार नाहीये.

महेश, इथली मराठी माणसं मराठी जेवण घरीच करून खातात हो! Happy बाकी असं वरीलप्रमाणे मराठी माणसाने, मराठी माणसासाठी व्हेन्चर केलं तर खारीचा वाटा उचलायला जातो.

मी ३ वर्षे काढली आहेत बेंगलोरात, एकटा रहात होतो
तेव्हा एक राजवर्धन सोडले तर कुठेच मराठी पदार्थांचे उपाहारगृह दिसले नाही. Sad
मारथहल्लीच्या जवळ टिफीन सर्विस पण मिळाली नाही कधी. Sad

माझी माहिती ६-७ वर्षे जुनी आहे, कुंदनहल्ली गेटपाशी २-३ राजस्थानी / मारवाडी मेस आहेत. ८-९ वर्षांपूर्वी एक मराठी बाई कोडीहल्लीपाशी टिफिन सर्व्हिस चालवायची पण तिच्याकडे हाताखाली सगळे ओरिया कुक होते त्यामुळे मराठी जेवण नाहीच. अजून ती सर्व्हिस चालू असल्यास कल्पना नाही. ORRवर Bagmane World Techजवळ एक North karnataka मेस सध्या सुरु झाली आहे, ऑफीसच्या वेळात बरं जेवण असतं असं ऐकून आहे.

खालील लिन्क बघता येतील. वर उल्लेख केलेल्या अथवा खाली दिलेल्या कोणच्याही दर्जा, चव इ. काही कल्पना नाही.

http://www.itsmymeal.in/

http://gharkakhana.net/

http://chulha.co.in/

http://www.foodtribe.in/

एकंदरीत मल्लेश्वरम भागात तरी हॉटेलेच कमी दिसली. एक बरेसे हॉटेल शोधायला अर्धा अर्धा तास चालावे लागले आम्हांस. पुण्यात २ फुटांवर एक तरी फुड स्टॉल असतो.

अरे देवा! पूर्णब्रह्म चे फारच वाईट आहेत रिव्यु़ज. मी पण गेले पण ग्रेट नाही वाटले. मी महाराष्टियन केटरर्स शोधते आहे. पण नो लक सो फार! Sad

मल्लेश्वरम भागात संपिगे रोडवरच आडिगा'स चांगले आहे.

तिथे कुठे श्रीकृष्णा कॅफे आहे का बघा.... त्यांचे पण जेवण चांगले असते, तामिळ ब्राह्मण पद्धतीचे.

बंगलोरमध्ये स्वतः न करता मराठी जेवण हवे असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे कुक लावायची आणि तिला आपल्याला हवे तसे करायला शिकवायचे. मुळांत कुकला स्वयंपाक येत असेल तर १५-२० दिवसांत आपल्या जेवणाचा अंदाज येऊ शकतो.

अजून एक मल्लेश्वरम भागात ..दर्शिनी, .. सागर, .. उपाहार अशी नावं असलेली बरीच stand-up eatery type हॉटेल्स आहेत, त्यांचे सहसा चव, दर्जा चांगला असतो असं ऐकून आहे.

मल्लेश्वरम मध्ये खरतर केव्हढे तरी पर्याय उपलब्ध आहेत. मर्गोसा आणि संपिगे रोडवर नुसते १ - १८ cross चालत गेल्यावर बरीच उपहारग्रुहे दिस्तात आणि बरीचशी उत्तम आहेत. मेसला कंटाळ्लो तर आम्ही बर्याच वेळा मल्लेश्वरम मधेच जातो !
NKB २ cross उत्तम आहे.

हो आलोच आरती, इतक्या गोष्टी आहेत इथे आकलन व्हायला जरा वेळ लागतोय Lol

मिसळ पाव मिळते का हो कुठे .? चांगली ... आपल्याकडे असते तशी .?
यांची पाव भाजी आणि चाट खाऊन तर मला घेरी आली. तशी असेल तर लांबून_/\_ ..
गाजर टाकतात खिसलेल, काय विचित्र लोक आहेत.. :{

@महेश - तुम्ही जयनगर ४थ T मधलं राजवर्धन म्हणत आहात का ? ते पण काही फार उत्तम नाही बरका. आणि आता त्यांनी बोर्डवरच महाराष्टीयन काढून आता नॉर्थ इंडिअन अस टाकलेय हे मला सखेद नमूद करावे लागत आहे.

मिसळ पाव मिळतो ! IISc च्या NIAS गेट बाहेर रविवारी मिळतो असे ऐकून आहे . कधी गेले / कोणी जाऊन आले असेल तर माहिती काढून सांगते .

IISc कॅन्टीनचा फारच वेळा उल्लेख झालाय, जातोच आता ..
आणि gate बाहेर मिसळ पाव पण आहे म्हणे. व्वाह!! जाऊन येतो आणि सांगतो कशी आहे ..

नॉर्थ कर्नाटका पद्धतीचे कुठले ठिकाण असले की चव साधारण मराठी पद्धतीकडे झुकलेली असते.
तरी बंगळूरात मला तरी आत्तापर्यंत कुठेही बरे मराठी जेवण / खाऊ सापडलेला नाही.

IISc च्या कँटीनमधले मिसळ पाव आणि छोले भटुरेही ( हो, हो भटुर्‍यासकट) चांगले वाटले. >>> कुठचे कँटीन ? इथे IIScमध्ये असून खाल्ले नाहीत गेल्या तीन वर्षात ! आता बंद झाले असावेत .

आपल्याकडे असते तशी .?<<<<< प्रकु, आमच्याकडे मिपा मिळत नाही. मी कधीतरी घरी बनवते.
पाव भाजी आणि चाट खाऊन तर मला घेरी आली. <<<<< Lol

एक सोनवने'स म्हनुन आहे whitefield ला.
त्यांचा पांढरा तांबडा रस्सा, अन मिसळ पाव पण भारी आहे असं ऐकलाय!

कुठचे कँटीन ? >> आँ? पुस्तकांच्या दुकानाइथले. की ते कॅंटीन IISc चे नव्हे?

ओके ओके ! prakruthi. IISc मध्येच आहे ते पण आता मिसळ मिळत नाही तिथे .

>>>>>>>>>>>> प्रकु, आमच्याकडे मिपा मिळत नाही.<<<<<<<<<<<<<<<<<
आरती? प्रकु मी समजू शकतो. मिपा काय? मिसळ पाव म्हणल्याने कीबोर्ड ला थकवा आला असता का?
तीदिलामक.! घे समजून आता.. Lol

>>>>>>>>>>>> मी कधीतरी घरी बनवते.<<<<<<<<<<<<<<
अशा गोष्टी मला कृपया सांगू नये. मला काहीच बनवता येत नाही. त्यामुळे मला वाईट वाटत..

परवा मस्त कलंदर मध्ये जाऊन आलो. ok ok वाटलं. म्हणजे किमतीच्या मानाने फार काही खास नाही.
नंतर माझ्या स्थानिक मित्राने सांगितल तिथे काही particular पदार्थच खाण्याजोगे आहेत फक्त.

Pages