पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

शब्दांनी बोलून नातं
तोड्ण्यापेक्शा अबोल्याने
नातं जोड्ण्यात जास्त मजा आहे.

तुझ्याशिवाय आयुश्य जगण्याची
मी सवय करतेय पण कधी कधी
वाटतं की मी मलाच का शिक्शा
करुन घेतेय.

लक्ष दिव्यांच्या रांगोळीने
लखलख सारे अंगण सजले
अंगणातले तेज बघूनी
आभाळातील गोंदण हसले

का नसावा तोरा
मातीच्या पणतीला,
महाराष्ट्रात अंधार आहे
सरकार आहे तिच्या दिमतीला.

आकाशात चांदण्यांची
मैफल सजलेली....
तुझ्या एक एक आठवणींनी
प्रत्येक चांदणी भारावलेली....

एकांतात रडण्यात
कसली मजा;
तुमचं दु:ख वाटून घेण्याची
द्या की गर्दीला सजा Wink

वाट चुकली तर दोष वाटेचा कसा
किंवा दाटलेल्या धुक्याचा
अन् खंत तरी कशाला चुकल्याची
जर विश्वास असेल धरलेल्या दिशेचा

अजुनही चित्रे धुमसतात डोक्यात
हातपाय बांधुन प्रारंभरेषेला पडल्याची
अपयशाची खंत कधीच नव्हती
चीड होती न धावताच हरल्याची

सौरभ छान आहेत चारोळ्या
>>> + १

माझ्याकडून पण एक

ह्या वर्षीचा पाऊस
मुक्यानेच बरसेल
कारण तो तुझ्या
मल्हाराला तरसेल

गाय नेहमी हिन्दूची
बकरी मुसल्मानाची असते
ज्वरीची भाकरीच तेवढी
माझ्या ईमानाची असते

(म्हणून मी मान्साहार करत नाही............कधीच )

गटारी स्पेशल.

प्राण्यांच्या कोर्टात
मानवावर झाली केस दाखलं
न्यायाधिश महाराज ''सिंह'' म्हणतात
तळं राखल तो पाणी चाखलं

माझी पहिली चारोळी

अधुन मधुन मला काही सुचतात शब्द
या शब्दांचे काही कळ्त नाही
अन वेळे वर यमक ही जुळ्त नाही
पण तु हसल्यावर होतात ते मुग्ध

( नक्की प्रतिसाद द्या मी नविन आहे)

Pages