पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

तु मला आवडतेस,
अगदी तेंव्हापासून.
कळी उमलताना जेंव्हा,
पाहिली पहिल्यापासून.

वा... खूप दिवसांनी.. नाही .. वर्षांनी... झुळूक दर्शन ...खूप छान वाटले... मस्त लिहीतायेत सर्व ...

कितीदा सांगावे या मना,
नको जाऊस असे मोहरून,
मृगजळाचे ते बिंब फसवे..
रोज पाहते रे तुला चोरून..

मी कवि वगेरे नाही परन्तु तिच्या आठवणीत काही बाही कधीतरी सुचले होते ते तिच्यापर्यत कधी पोहचलेच नाही
इथे लिहतो तिच्या आठवणीत

१. त्या नक्षत्राहूनही ति सुन्दर आहे
हे सर्व तार्‍याना कळत आहे
म्हणून हा वेडा चन्द्र
उगीच माझ्यावर जळत आहे

२. त्या झाडालाही फुले पाहून
सर्वच झाले दंग
मी विचारताच तो म्हणे
प्रेमात माणूस बदलतो, मी तर साधा निवडूंग !

३. कोणाला कळू नये म्हणून माझ
तोन्डावर कांबरुन घेवून निजण
आणि तुझ्या आठवणीखाली
बिच्यार्‍या उशीच भिजण

तू माझा कोण अन कोण मी तुझी..
याही पेक्षा.. 'तू माझा' अन 'मी तुझी'.. यातच सारं सामावतं..
तरी तुझं-माझं नातं ते काय,
याचं उत्तर अपूर्णच रहातं!!!!!

शके चालले निघुन आता,
नवे लागले याया.
सुहास्य वदने निरोप देऊन्,
नव्यास वन्दन करुया.

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

आज पाडव्यानिमित्त खास......

वसंताची चाहूल नवी अन्
चैत्रपालवी उमले कणकण
नववर्षाचे हार्दिक चिंतन
यशोगुढीने बहरो जीवन!
सर्व माबोकरांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपलं सारं देऊन निघुन जाणार्‍या
घनासारखं मोठं मन नाही.
कितीही वापरलं तरी न संपणारं,
मनासारखं कुठलंही धन नाही.

तो उलगडत गेलाय कॅनव्हासेस वरून
मांडला गेलाय प्रदर्शन भरून
दिसतोय का चाहत्यांच्या घोळक्यातून ?
कॉरिडॉरच्या शांतशून्य टोकाशी ती वाट पहातेय ताटकळून..

आपलं सारं देऊन विरून जाणार्‍या,
घनासारखं मोठं मन नाही.
आणी कितीहि वापरलं तरी न संपणारं,
मनासारखं दुसरं धन नाही.

भल्या पहाटे किलबिल होती,निरोप घेऊन उडण्याची.
हुरहुर होती चिंता होती,पिल्लांना सोडुन जाण्याची.
संध्याकाळी पुन्हा ऐकली,किलबिल सार्‍या पक्ष्यांची,
सार्थक होते,मार्दव होते,सादही होती पिल्लांची.

दोन कण,
एक क्षण.
विलक्षण.
आकर्षण.

Pages