पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

तुझे माझे नाते, प्रेमाचे कि बंधनाचे
ओढ धाग्यांची जडते, मैत्रीचे का विश्वासाचे
प्रियतम साजण जिवलग तूच तो सखा
मग नात्याला नाव द्यायलाच हवे का

मला सोडुन- राजेश बरोबर लग्न केल्यामुळेच सखे,
मी तुला कायमचाच विसरणारून जात होतो;
आपली मुन्नी बदनाम झाली या विचारानेच आता,
शेजारच्या जवान शिलावर लाइन मारत होतो !!! Lol

ढगांमधुन गडगडणारी भुतकाळाची आरोळी,
अंगणात सजलेली स्मरणांची रांगोळी,
मनात साठवलेले जुने चार क्षण जोडले,
अन तयार झाली हि आठवणींची चारोळी...

तुझ्या माझ्यातल्या प्रेमाचा एक क्षण
सायंकाळच्या गारव्यात हळूच विरतो
अन तू सोबत नसलीस तरी
तू पुन्हा भेटेपर्यंत मला तो पुरतो...

नुकत्याच जपानमध्ये झालेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर...

कशास करशी वृथा वल्गना?
शिक मनुजा तू नवे धडे....
पराक्रमाचे ते व्यर्थ पोवाडे
नियती तूजवर भारी पडे ....! Sad

खर्‍या खुर्‍या चारोळ्या
आज मला कळल्या
शब्दकळ्या ज्या आज उमलल्या
चारोळीकाराच्या हाती पडल्या

फारच सुरेख

MALA MAAYBOLI VAR YEVUN FAR AANAND ZALA AAHE. LIHITANA HAT KAPAT AAHET. MAAF KARA KAHIHI TIHITE AAHE PAN KHARACHA MI KAHICHA BOLU SHAKAT NAHI. AANI MALA MARATHI LIHITA YET NAHI SORRY. I AM SO HAPPY.

या जगात कुणी कुणाचे नसते
तरी मन हे मानायला तयार नसते
हळव्या या हृदयाला ठेच जेव्हा बसते
तेव्हा कळते की जग किती फसवे असते...

अफजल गुरुला माफि देता
कसाबला खायला बिर्याणी घालता
लादेन च्या नावा पुडे जी लावता
अन् विश्वाच्या बाजारात भारताला मांडता

<<अफजल गुरुला माफि देता
कसाबला खायला बिर्याणी घालता
लादेन च्या नावा पुडे जी लावता
अन् विश्वाच्या बाजारात भारताला मांडता>>
आवडली.

उल्हासजी Happy

पाकडयांच्या देशामध्ये
लादेनही मरु गेला..
भारतात आज माझ्या
कसाब तो जगू दिला..

तुमच्यापेक्षा धाकटं कुणीतरी,
घरी जेव्हा येतं.........
लाडाकोडासहीत टोपण नावंही,
हिरावुन नेतं............

टोपणनाव जरी हिरावलं,
ताई-दादापण मिळतं,
मोठे आपल्याशी असं का वागतात
ते त्यानंतर कळतं.... (चिमुरीच्या चारोळीला झब्बू :फिदी:)

ललिता Happy मस्त झब्बू...

इवलंसं ते गाठोडं जेव्हा,
आत्या म्हणुन हाक मारीन...
उरणार नाही खंत तेव्हा,
टोपणनाव हिरावल्याची....

माझ्या मौनाचं तु करावंस भाषांतर
असं मला वाटतं
तुझं अगम्य भाषेतलं पाहुन अवांतर
माझं मन कावतं

ज्याला आयुष्यभर व्यवहाराने जगता येतं
तो खरोखर महान आहे
कारण त्याच्या व्यवहारी डोक्याला
फक्त पैशाचीच तहान आहे.
-----

Pages