पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

विरहातला स्वातंत्र्य दिन
आसवांना आवडतो,
२६ जानेवारीलाही मग
१५ ऑगस्ट साजरा होतो... Proud

काळ्याकुट्ट ढगांनी झाकलेल्या आभाळातून मंद चांद्णे झिरपावे
आंधारलेल्या रात्रीला रातराणीने सुगंधाने दरवळावे
असे असतात क्षण- तुझ्यासवे..

दर्शन प्रयत्न ठीक आहे....

झाकोळलेल्या आभाळातुन
मंद चांदणे झिरपावे
तुझ्यासवेचे क्षण जनु
रातराणीच्या सुगंधाने रात्र दरवळावी

चांदण्यांची फुले वेचता,
धुक्याची ती लाट आली,
सोड सखे मौन आता,
बघ कशी सोनपहाट झाली

सुकि, शेवटच्या ओळीत काहितरी चुकतय..

चांदण्यांची फुले वेचता,
धुक्याची ती आली लाट,
सोड सखे मौन आता,
बघ झाली सोनपहाट ... हे कसं वाटतय??

आम्ही कधी प्रेम केलं नाही,
म्हणे, प्रेमिकांचा जीव धोक्यात असतो,
त्यांचा एक पाय स्मशानात
तर दुसरा केळीच्या सालीवर असतो

कधि प्रेम नाही केले राज्या..कधि करुन तर बघ,
नाही लागले तरी... मन कुणाशी लावुन तर बघ...!

प्रेमिकांचा जर..... जीव असतो धोक्यात,
एकदा प्रेम करुन जीव धोक्यात घालुन तर बघ

प्रेमाची चीता जळते का कधी?
प्रेमाला मरण येतं का कधी?
एकदा स्मशानात जाउन तर....!

-प्रेमी.....निसर्ग प्रेमी.

चातका Happy

आम्ही कधी प्रेम केलं नाही,
तु जरा करुन तर बघ
प्रेमाचीही चिता जळेल कदाचित
जरा काडी लावुन तर बघ

सुक्या Happy

घेऊन आस मीलनाची
आठवणींच्या गावात
वेशितल्या पाऊलखुणा
उमटतील का दारात

तू जाता जाता....
मागे वळून बघितलस....
आणि माझ्या पावलांना....
तुझ्याकडे वळवलस...

प्रत्येक भावना मनातली...
लिहून आणली होती...
कारण शब्द मुके होतील...
अशी भीती वाटत होती....

इथे कुणीतरी, काहीतरी गमावतं
म्हणुनच तुमचं जग सुंदर दिसतं
पाण्याला सुद्धा वाहणं विसरुन
दवबिंदु म्हणुन जगावं लागतं

अरेरे..... Wink

सखीच्या विरहात सुक्या ....
गळ्यापर्यंत बुडताना दिसला,
आणि कवितांचा राज्या चक्क
चारोळ्यात रमताना दिसला...!

नाहीतर काय, ज्याने राज्याच्या कविता वाचल्या आहेत, अनुभवल्या आहेत त्या प्रत्येकाचे हेच मत असेल. राज्या परत सुरूवात कर रे बाबा लिहायला Angry

जागा हो माणसा जागा हो ,
इतिहास पूसायच काम चालु हाय ,
नेत्यानी देश बूडवला हाय ,
आदरश घोटाळे झाले हायत,
तरी तुला त्याची जाणिव नाय ,

प्रदीप जाधव

जागा हो माणसा जागा हो ,
इतिहास पूसायच काम चालु हाय ,
नेत्यानी देश बूडवला हाय ,
आदर्श घोटाळा झाला हाय,
तरी सरकार गप्प हाय,
तरी तुला त्याची जाणिव नाय ,

तू जाता जाता मला,
लवकर येण्याचा विश्वास देऊन गेलीस...
अन् आपल्या सार्‍या गुलाबी आठवणींचे,
जणू आंदण देऊन गेलीस...!!!

मैत्री फुलवावी तशी फुलते,
नातं बनवावं तसं बनत...

मैत्री फुलवणं जितकं सोपं,
नातं जपणं तितकच अवघड...

म्हणूनच, तुटलेलं नातं कितपत जोडता येतं माहित नाही,
पण मैत्री मात्र, तुटत नाही त्यामुळे जोडण्याचा प्रश्न्च येत नाही...!!!

Pages