निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
पुरंदरे शशांक >>> +
पुरंदरे शशांक >>> + १.
दिनेशदा यासाठी मदत हवी असल्यास सांगा. नक्की करु >>>>>जोरदार अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालचा गच्चीतून दिसणारा
कालचा गच्चीतून दिसणारा सूर्यास्त.
![DSCN1146.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u3846/DSCN1146.JPG)
![DSCN1148.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u3846/DSCN1148.JPG)
![DSCN1150.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u3846/DSCN1150.JPG)
....................हो पण, तत्पूर्वी सर्वांना सुप्रभात!!!
सोनसावर काय सुंदर
सोनसावर काय सुंदर आहे!!!
जिप्स्य्स्स, तुझे उत्तर कन्नडाचे फोटो अप्रतिम आहेत रे.. तु विरंगुळा म्हणुन फोटो काढता काढता कुठच्या कुठे पोचलास... नजर आणि हात दोन्ही तयार झाले तुझे. मलाही खुप उर्मी येते तुझे फोटो पाहुन कॅमेरा घेऊन भटकायची...
माझे आंबोलीचे फोटो आहेत पण प्रोसेसिंग करुन टाकायला वेळ नाहीय.. (म्हंजे माझेही फोटो तुझ्यासारखे सुंदर आलेत पण केवळ मी टाकले नाहीत म्हणुन तुझे कौतुक चाललेय असा वाकडा अर्थ काढायचा तर खुशाल काढ. माझे फोटो पाहिलेस की 'दुध का दुध और पानी का पानी' होईलच...
) आता तुझ्याकडे पाठवते माझे फोटो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषी, फोटो मस्त आहेत. फोटोशॉपमध्ये टिपी करुन त्या आडव्या लाईन्स कशा काढायच्या ते बघ ना.. तुलाही टिपी आणि आम्हालाही गंमत (फोटोशॉपमध्ये करता येईल. मी एकदा भावाच्या फोटोत त्याच्या डोळ्याखालची वर्तुळे काढलेली नी त्याला एवढ्या मस्त मिशा चिकटवलेल्या की त्यालाही स्वतःचा फोटो ओळखता येईना
)
साधना धन्यवाद. मी अजून
साधना धन्यवाद. मी अजून फोटोशॉप वापरलेलं नाही गं पण ट्राय करीन.
आणि भाऊ लहान की मोठा गं आँ?(दिवा!)
इथे शांकली (म्हणजे शशांक आणि
इथे शांकली (म्हणजे शशांक आणि अंजलीही ) मला मदत करु शकतील.
परवा बाल्कनीत उभा होतो तर माझ्यासमोर ही माशी, अगदी एकाच जागी स्थिर होती.
![](https://lh3.googleusercontent.com/-BD5p9wzfE-o/Tr-APZTekzI/AAAAAAAACLw/3KjvzyJLAvg/s640/P1030597.JPG?gl=GB)
खरे तर हि माशी नाही, माशा आहे ( पुल्लींग !!) असे एका जागी उडत स्थिर राहणे म्हणजे त्याचा पुरुषार्थ सिद्ध करण्याचा मार्ग आहे. हे अटेंबरोच्या एका कार्यक्रमात दाखवले होते. याचे नाव आठवत नाही आता. (म्हणून शांकली ला हाक)
याने स्वत:ची एक काल्पनिक हद्द आखून घेतलेली असते. आणि त्या हद्दीत तो इतर नरांना येऊ देत नाही.
त्याची हि मालकी हक्काची भावना एवढी प्रखर असते कि त्या अवकाशात दुसरे काही उडणारे आले तरी त्याला चालत नाही.
अटेंबरोंनी त्याच्यावर वाटाणे फेकले होते, मी मूग फेकून मारले तर तो त्याने मूगालाही हुसकावण्याचा प्रयत्न केला.
(साधना, लब्बाड !!)
नैरोबीतली निवांत रविवार
नैरोबीतली निवांत रविवार दुपार. मुद्दाम फोटो टाकतोय ते २ गोष्टींसाठी.
१) फोटोच्या अगदी मधोमध जे झाड दिसतेय, ते पण कोरफडीच्याच कूळातले आहे.
२) आणि आजूबाजूच्या बाभळीच्या झाडावरची, पक्ष्यांची लगबग बघा. यात दोन प्रकार असतात. एका जातील गळ्याखाली लोंबती पिशवी असते आणि एकात नसते. मराठीत त्यांची नावे चंदन आणि चंदनेश्वर अशी आहेत.
पण इतक्या बेंगरुळ पक्ष्याला इतके सुंदर नाव का दिलेय ?
याचे जवळून काढलेले फोटो आहेत. पण याचे रुप अगदीच बेंगरुळ असते. मानेवर, डोक्यावर पिसे नसतात. चोच भली मोठी.
पण हा पक्षी माणसाला अजिबात बिचकत नाही. रस्त्यावरच्या ट्राफिकमधूनही बिनधास्त फिरतो.
याची चोच फार मजबूत असते. बाभळीची फांदीही कटकन मोडू शकतो. जवळ जवळ सहा महिने त्यांचे पिलांचे संगोपन चालते. पंखाचा विस्तार सहज ३ फूटांचा असतो.
पण याचे उड्डाण आणि घरट्यावर उतरणे मात्र फार देखणे असते.
मस्त फोटो दिनेश. वातावरण किती
मस्त फोटो दिनेश. वातावरण किती स्वच्छ आहे.
कोरफडीच्या कुळात झाड?? त्याच्या पायथ्याशी कोरफडीसदृश्य काहीतरी दिसतेय.
मानुषी, चुलतभाऊ
मानुषी, चुलतभाऊ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा - ते कोरफडीच्या
दिनेशदा - ते कोरफडीच्या कुळातले झाड जरा झूम इन करुन दाखवणार का, या - वरील फोटोत कळत नाहीये.
त्या पिशवीवाल्या पक्षाचे बायॉलॉजिकल नाव काय / तेथील भाषेत - तो पक्षी (फोटो) बघायची उत्सुकता लागलीये.
ती माशी (माशा) कुठला ते ही सांगा. मी किंवा अंजूने हा अॅटेनबरो साहेबांचा कार्यक्रम पाहिलेला नाही - तुम्ही जे वर्णन करत आहात त्याने उत्सुकता चांगलीच ताणली जातेय.
साधना, त्या कूळात मोठी झाडे
साधना, त्या कूळात मोठी झाडे पण असतात. इथे त्याचे बरेच प्रकार दिसतात.
शशांक, त्या झाडाचा आता स्वतंत्र फोटो काढता आला तर बघतो (पुढच्या रविवारीच !)
तो अटेंबरोंच्या जून्या मालिकेतला प्रसंग आहे. बहुतेक बघितली असणार तूम्ही दोघांनी.
आता नेटवर नाव किंवा क्लीप शोधायला पाहिजे.
दिनेशदा... तुम्ही म्हणता तो
दिनेशदा... तुम्ही म्हणता तो हा पक्षी आहे का...
![frigate2.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u34271/frigate2.jpg)
![images (1).jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u34271/images%20%281%29.jpg)
![images.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u34271/images.jpg)
![frigate-birds-in-foreground.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u34271/frigate-birds-in-foreground.jpg)
नाही गौराम्मा, हा फ्रिगेट ना
नाही गौराम्मा, हा फ्रिगेट ना ? हा खुप वेळ समुद्रावर तरंगू शकतो, पण लबाड असतो. (दुसर्या पक्ष्यांनी पकडलेले मासे त्यांच्या चोचीतून पळवतो.)
हे चंदनेश्वर, उकिरड्यावर चरत असतात. (स्थानिक भाषेत त्यांना कोरी म्हणतात.)
---------
इथल्या गुलाबाचे एक फूल तोडले तर त्याला किती जोमदार धुमारे फुटतात बघा. पण इथली लोकं, फुले तोडायचे पण कष्ट घेत नाहीत. गुलाबाची फळे धरतात, ती पिकून केशरी होतात, सूकतात, तरी झाडावरच असतात.
गुलाबाची फळे धरतात,>>> हा काय
गुलाबाची फळे धरतात,>>> हा काय प्रकारे, फोटो द्या.
रोझहिप्स म्हणतात त्यांना. लाल
रोझहिप्स म्हणतात त्यांना. लाल किंवा केशरी रंगाची असतात. युरपमधे त्यापासून सरबत वगैरे करतात. फोटो रात्री टाकतो.
गुलाबाची फळे धरतात,>>> आम्ही
गुलाबाची फळे धरतात,>>> आम्ही बी नाय बघीतली कधी त्या फळांपासुन नवीन झाड रुजत का?
आता रात्र व्हायची वाट बघतोय प्रचि लवकर येऊ द्या.
कंपनीतुन पुण्यात येताना
कंपनीतुन पुण्यात येताना रस्त्यात घाट लागतो. काही दिवसांपासुन जाणवलेय की रस्त्यापासुन थोडे उंचावर पांढर्या रंगाची फुले झुबक्याने फुलली आहेत. संध्याकाळी त्यांचा जरा उग्र पण धुंद सुवास येतो. अर्थात कंपनीची गाडी असल्यामुळे थांबुन फोटो काढता येत नाही. पण कधी तरी बाईकवर जाईन तेव्हाखास थांबुन फोटो काढेन.
या नि.ग.च्या गप्प वाचुन आज
या नि.ग.च्या गप्प वाचुन आज आणखी मजा आली.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांक, २००% अनुमोदन... भन्नाट कल्पना खुप आवडली... चला दिनेशदा आता लवकर मनावर घ्या पाहू
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिनेशदा,
आमचा १०१% पाठींबा आहे, या मागणीला !
गिरिकंद, ती बहुतेक बूचाची
गिरिकंद, ती बहुतेक बूचाची फूले आहेत. साधारण निशिगंधासारखी दिसतात ती पाच पाकळ्यांची पण त्यापैकी एक जोडपाकळी. सकाळी झाडाखाली सडा पण पडत असणार.
अनिल, कुठे गायब झाला होतास ?
नाही दिनेशदा. बुचाची फुले मला
नाही दिनेशदा. बुचाची फुले मला ओळखता येतात.
लहानपणी दारात एक बुचाचे झाड होते. एक स्पॅथेडियाचे पण झाड होते.
ही लहान ३-४ फुट उंचीची झाडे आहेत.
मग कुंतीची असतील. आता फोटो
मग कुंतीची असतील. आता फोटो बघितल्याशिवाय चैन नाही पडणार !
दिनेशदा, दोन तीन दिवस कळ काढा
दिनेशदा, ह्या माशीबुवांचे नाव
दिनेशदा, ह्या माशीबुवांचे नाव खरंच आठवत नाहीये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हापिसातनं घरी आल्यावर नि ग वर आले की बर्याच गप्पा वाचायला मिळतात! पण ऑनलाईन गप्पा मिस कराव्या लागतात.............
दिनेशदा, तुम्ही वर
दिनेशदा, तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे आमच्याकडच्या गुलाबाला पण फळ धरलं होतं. माझ्याकडे त्याचा फोटो आहे. जमल्यास मी पण तो टाकीन.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नैरोबीतल्या बायका जरा अरसिक आहेत की खूपच निसर्गप्रेमी? नाही म्हणजे इतक्या संख्येनी गुलाबाची इतकी एकसे एक फुलं उमलतात आणि ह्या त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत! याला काय म्हणायचे म्हणते मी! इथे आमच्याकडे हवी होती अशी फुलं म्हणजे मग यॅव रे यॅव.............
मानुषी, सूर्यास्ताचा फोटो मस्त!
साधना
.
.
शांकली, मागे दिनेशनी लिहिलेले
शांकली, मागे दिनेशनी लिहिलेले की तिथल्या फुलांना फारसा वास येत नाही. जर गुलाबालाही सुवास नसेल तर काय करावे अशा गुलाबाचे??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नैरोबीतल्या बायका जरा अरसिक आहेत की खूपच निसर्गप्रेमी?
पिकते तिथे विकते काय?? त्यानी जन्मापासुन आजुबाजुला गुलाबे, अगदी उकिरड्यावरही, पाहिलीत. त्यांना गुलाबांचे काय अप्रुप???
साधना तु विरंगुळा म्हणुन
साधना![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तु विरंगुळा म्हणुन फोटो काढता काढता कुठच्या कुठे पोचलास... नजर आणि हात दोन्ही तयार झाले तुझे. >>>>>>>अगदी अगदी. माझी पहिली आवड भटकंतीची आणि ते करता करता फोटोग्राफीची आवड कधी निर्माण झाली ते कळलंच नाही. मला फोटोग्राफी हा छंद म्हणुनच ठेवायचा आहे प्रोफेशन नाही. एकदा का प्रोफेशनल झालो तर मग "छंद" जोपासता येणार नाही हे "माझे" मत. अर्थात माझ्या बर्याच मित्रमैत्रीणींना ते पटत नाही.
पिकते तिथे विकते काय?? त्यानी
पिकते तिथे विकते काय?? त्यानी जन्मापासुन आजुबाजुला गुलाबे, अगदी उकिरड्यावरही, पाहिलीत. त्यांना गुलाबांचे काय अप्रुप???>>>>>>>>>>>> हो ना! अगदी अगदी...........
एकदा का प्रोफेशनल झालो तर मग
एकदा का प्रोफेशनल झालो तर मग "छंद" जोपासता येणार नाही हे "माझे" मत
होउन बघ.. आवडले तर तिथेच राहा..नाही आवडले तर मुळचा धंदा आहेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साधना या फोटोत गुलाबाची फळे
साधना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या फोटोत गुलाबाची फळे दिसत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे माझ्या घरी फुललेले
हे माझ्या घरी फुललेले एडेनियम. दुसरे फुल आता फुलत आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages