निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
हो साधना नक्की. जो, मंजिर्या
हो साधना नक्की.
जो, मंजिर्या खुडल्यावर तुळस मस्त फोफावते हा माझा अनुभव. मनाजोगती वाढ झाली कि मग मंजिर्या खुडायचे थांबवायचे. त्यात बिया धरु द्यायच्या आणि मग त्या मंजिर्या झाडाखालीच टाकायच्या. त्यातूनच नवीन रोपे तयार होतात.
ते पांढरे किडे ढगाळ हवामानामुळे होतात. चिमण्यासारखे छोटे पक्षी ते खातात पण त्यांची वाढच भरमसाठ होत असते. पाने काढून नष्ट करणे हा एक उपाय आहे.
इथे सुद्धा पॅशनफ्रुटस बरीच
इथे सुद्धा पॅशनफ्रुटस बरीच दिसतात. पण मी कधी चाखून पाहिली नाहीत. आता पाहीन.
सुप्रभात हो दिनेश कालच
सुप्रभात
हो दिनेश कालच मंजिर्या काढून टाकल्या. तशी ती झाडं चांगली वाढली आहेत. हे बी पडून इतकी झाडं येतात की सगळी कडे तुळसच दिसू लागते.
या वर्षी मोगर्याला आत्ताच कळ्या दिसू लागल्या आहेत.
आपल्या इथल्या गप्पांमुळे मी पुदीना, टोमॅटो, मुळा, चवळी, पालक लावले छान आलेत. एक मुळ्याचं रोप न काढता वाढू दिलं तर वेला सारख वाढ्त चाललं आहे. त्याला पांढरी फुलं येताहेत आणि बारीक शेंगा लागल्या आहेत.
मूळ्याला शेंगा यायला लागल्या,
मूळ्याला शेंगा यायला लागल्या, म्हणजे तो जून झाला. पण शेंगा (डिंगर्या) खाण्याजोग्या असतात.
तूळस मर्यादीत जागेत फोफावली तर छानच. वास छान येतो.
साधना, ती फळे मिळाली, रात्री फोटो टाकतो.
मी बघितलं नाही कधी हे
मी बघितलं नाही कधी हे फळ.
तुळशीला मंजि-या आल्या की औषधी गुणधर्म कमी होतात हे मीही वाचलेय.
आंबोली हे १२ वाड्या असलेले एक
आंबोली हे १२ वाड्या असलेले एक मोठे गाव आहे. वाड्यांची नावे वेगवेगळी आहेत जसे बाजारवाडी, जकात्वाडी, मुळगुंदवाडी, फौजदारवाडी, फणसवाडी इ.इ. >>
फणसवाडी ला माझ्या वडलांच आजोळ.
तुझी गावाला सेटल व्हायची इच्छा वाचुन शेअर करावस वाटत. साधना माझ्या वडलांना पण शेतिची खुप आवड आहे. ते एका ब्यांक मध्ये मुंबईला जॉब करत आहेत. पण आता कधी एकदा रिटायर होतो अस झालय त्यांना. सुमारे १०-१२ वर्षांपुर्वी त्यांनी आंबोलिच्या पायथ्याला केसरी गावात ३०-३२ एकर जागा घेतली आहे. त्यात आंबे, काजु, नारळ, केळी, पेरु, फणस, रुद्रक्ष, साग, शिसम, लिंबु, जांभळ, चिकू, आवळे आशी बारिच झाड लावली आहेत. शिवाय फुलझाड वेगळी. जुना वड, उंबर, फागलाच्या वेली अशी बरिच झाड त्यंनी तशिच ठेवली आहे. भाताची लागवड पण करतात. तिथे गेल्यावर त्यांना तासंतास कधी जातात ते कळतच नाही. जवळच धनगर वाडी आहे. यामुळे तिथल्या लोकांना वर्षाचे १२ महिने रोजगारही मिळाला आहे.
माझ्य मिरचीच्या झाडाला काय
माझ्य मिरचीच्या झाडाला काय झालय देव जाणे. छान पानं येतात आणि मग सुरकुततात. आणि टोकाला एकदम गुच्छासारख काहितरी होतं आणि सगळ झाड मरगळतं.
नेटवर पाहिलं, अॅफ्बिड असं काहितरी वाटतयं. आज नीम ऑइल मारुन आले आहे. बघुया काय होतयं.
शोभे जपानच फळ भारतवासीयाना
शोभे जपानच फळ भारतवासीयाना काय ओळखायला लावतेस ? :स्मितः
रिमा, मस्तच .
रिमा, मस्तच .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिमा, लवकरच त्यांच्या
रिमा, लवकरच त्यांच्या मनासारखे होवो.
निकिता, हा बहुतेक एक रोग आहे (पर्णगुच्छ नावाचा.).
माझ्या मिरचीलाही असेच झालेले.
माझ्या मिरचीलाही असेच झालेले. अर्थात ते मिरचीचे झाड हे माझे एकमेव लाडाचे झाड नव्हते. त्याच्यासोबत अजुन २-४ मिरचीची झाडे होती. म्हणुन मी ते म्हातारे झाले असा निष्कर्ष काढुन दुर्लक्ष केले. त्याने मी लक्ष देईन म्हणुन वाट पाहिली आणि मग आपोआप बरे झाले. आता लागतात परत मिरच्या. मागे मी इथे लिहिलेलेही की मधुनच मिरच्या येणे बंद होते का म्हणुन.. त्या मिरच्या येणे तेव्हा बंद झालेले आता परत मिरच्या येतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिमा, मला फार्मला भेट द्यायला आवडेल. केसरी नाव ऐकलेय. काकाला माहित असेल. (असे कोणाचे काय ऐकले की हेवा वाटतो आणि कोणाचेतरी स्वप्न साकार होतेय म्हणुन बरेही वाटतेय:) )
फागला - बरेच वर्षांनी नाव ऐकले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज घरी आईला मी आंबोलीत शेती करणार म्हणुन सांगितल्यावर तिने मला वेड्यात काढले. इतरांची फसलेली उदाहरणे दिली. पण आता काय करणार?? मी तर मला जे हवे ते करणारच...
(आता मॅडम हे वाचतील आणि मला परत बोलतील.. तीही हल्ली माबोफॅन झालीय
)
मलाही वाटत की ती पानांवर कीड
मलाही वाटत की ती पानांवर कीड किंवा रोग असावा.
मागे मी गरजा कमी करण्याबाबत
मागे मी गरजा कमी करण्याबाबत लिहिले होते. तशी आमच्याकडे क्वचितच वीज जाते, आणि काल रात्री नव्हती.
काय गमावले आणि काय कमावले ?
रोजचे वाचन, ईमेल्सना उत्तरे, सिनेमा बघणे झाले नाही. मोबाईल चार्ज करता आला नाही. कपड्यांना ईस्त्री करता आली नाही. माझ्याकडे टिव्ही नाहीच, त्यामुळे तसे काही अडले नाही, पॅशनफ्रुटचा फोटो अपलोड करता आला नाही...
पण काल त्रयोदशी होती. रोज जो चंद्र आणि चांदणी मी बसल्या जागेवरुन न्याहाळतो, तो गच्चीच जाऊन बघितला. माझ्या बिल्डींगखाली चाफ्याचे बहरलेले झाड आहे, ते मी नेहमी गच्चीतून बघतो, ते काल रात्री जवळ जाऊन बघितले. त्याच्या फुलांचा गंध भरभरुन घेतला. तसेच जरा पुढच्या गल्लीत जाऊन, झकरांदाचाही गंध अनुभवला. केळ्याच्या लोंगराशी झोंबणार्या पाकोळ्या बघितल्या.
मग जरा पावसाचा शिडकावा झाला, त्यात भिजून शहारुन घेतले. मेणबत्तीवर येणारे किडे न्याहाळले. मग मेणाचे थेंब बादलीतल्या पाण्यात पाडून लहानपणीचा चाळा परत एकदा केला.
स्वत:शीच अंताक्षरी खेळलो. एक केनयन शेजारी आपल्याच मस्तीत गच्चीवर गिटार वाजवत होता, ती ऐकली.
रोज हे करावे लागले वा करता आले तर... नाही सांगता येत.. जमेल का ते.
उपाय पण सांगा ना कुणीतरी
उपाय पण सांगा ना कुणीतरी
साधना प्रयत्नात परमेश्वर. बर
साधना प्रयत्नात परमेश्वर.
बर एक विषया.न्तर ऑफिसमध्ये सध्या फायरफॉक्स वापरात आहे. त्यात अनुस्वार येत नाही. त्यामुळे न टाकावा लागतोय. काही उपाय आहे का ? असेल तर प्लिज विपुत टाका.
. प्रतिसाद काढुन टाकला आहे.
. प्रतिसाद काढुन टाकला आहे.
रिमा, मला फार्मला भेट द्यायला
रिमा, मला फार्मला भेट द्यायला आवडेल. केसरी नाव ऐकलेय. काकाला माहित असेल. (असे कोणाचे काय ऐकले की हेवा वाटतो आणि कोणाचेतरी स्वप्न साकार होतेय म्हणुन बरेही वाटतेय:) )
फागला - बरेच वर्षांनी नाव ऐकले.
आज घरी आईला मी आंबोलीत शेती करणार म्हणुन सांगितल्यावर तिने मला वेड्यात काढले. इतरांची फसलेली उदाहरणे दिली. पण आता काय करणार?? मी तर मला जे हवे ते करणारच...
(आता मॅडम हे वाचतील आणि मला परत बोलतील.. तीही हल्ली माबोफॅन झालीय )>>
नक्कीच. तुझ स्वागत आहे.
फागल मुंबइत ही बरिच पाहिलीत. पाण त्याला ति चव नाही.
केसरीला जायला दाणोली संपल्यावर आंबोली घाट सुरू व्हायच्या आधी राईट साइडला रोड आहे. सावंतवाडी संस्थान असल्यापासुनच राजांनी तिथला पाण्याचा स्त्रोत ओळखला आणी सावंतवाडीला त्या काळात पाण्याची सोय केसरिवरुन झाली. आता होउ घातलेला नविन घाट केसरी फण्सावड्यावरुनच जाणार आहे.
पण एक गोष्ट सांगते. आमची चोकुळ ला जागा आहे पण तिथे सगळ कातळ असल्याने काहिही करता येत नाही. पण मळेवाड म्हणुन जागा आहे तिथे लागवड केल्यास सराररिने दुप्पट ते तिप्पट पिक येत एवढी कसदार जमीन आहे.
रोज हे करावे लागले वा करता
रोज हे करावे लागले वा करता आले तर... नाही सांगता येत.. जमेल का ते.
दिनेश सगळा सवयीचा भाग आहे. १० वर्षांंपुर्वी मायबोली नव्हती, २० वर्षांपुर्वी मोबाईल नव्हता... तरीही आपण सगळे आनंदात जगत होतो. या सगळ्या वस्तु नसल्यातर सुरवातीला काही दिवस अडखळायला होईल, मग त्याचीही सवय होईल.
मला टिवीचे जबरदस्त वेड होते. लग्न झाल्यावर वेळच मिळेनासा झाला. आता टिवी बघितला/नाही बघितला तरी फरक पडत नाही. समोर चालु असला तरीही मी पाहात नाही.
आता मासाहेब इथे असल्यामुळे मालिका कानांवर पडतात, मास्टरशेफ पाहिले जाते. पण हे तात्पुरते. नसले तरीही फरक पडणार नाही.
पण ....
पण काल त्रयोदशी होती. रोज जो चंद्र आणि चांदणी मी बसल्या जागेवरुन न्याहाळतो, तो गच्चीच जाऊन बघितला. माझ्या बिल्डींगखाली चाफ्याचे बहरलेले झाड आहे, ते मी नेहमी गच्चीतून बघतो, ते काल रात्री जवळ जाऊन बघितले. त्याच्या फुलांचा गंध भरभरुन घेतला. तसेच जरा पुढच्या गल्लीत जाऊन, झकरांदाचाही गंध अनुभवला. केळ्याच्या लोंगराशी झोंबणार्या पाकोळ्या बघितल्या.
मग जरा पावसाचा शिडकावा झाला, त्यात भिजून शहारुन घेतले. मेणबत्तीवर येणारे किडे न्याहाळले. मग मेणाचे थेंब बादलीतल्या पाण्यात पाडून लहानपणीचा चाळा परत एकदा केला.
स्वत:शीच अंताक्षरी खेळलो. एक केनयन शेजारी आपल्याच मस्तीत गच्चीवर गिटार वाजवत होता, ती ऐकली.
..
हे सगळे प्रत्यक्ष अनुभवणे खुप महत्वाचे आहे. याचा आनंद वेगळाच आहे. इथे रिपीट टेलेकास्ट किंवा तुनळी अपलोड मिळणार नाही. प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र वेगळा असतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फागल मुंबइत ही बरिच पाहिलीत.
फागल मुंबइत ही बरिच पाहिलीत. पाण त्याला ति चव नाही.
मुंबईची फागला वेगळी. दिसायला जरी सारखी असली तरी आंबोलीच्या जंगलातुन लाकडे तोडणा-या बायकांनी संध्याकाळी परत येताना ओटीतुन आणलेल्या फागलांची चव यांना नाही.
रच्याकने, फागला म्हणजे इथे मिळणारी कंटोळी....
त्याला आम्ही फागला म्हणतो.
हे सगळे प्रत्यक्ष अनुभवणे खुप
हे सगळे प्रत्यक्ष अनुभवणे खुप महत्वाचे आहे. याचा आनंद वेगळाच आहे. इथे रिपीट टेलेकास्ट किंवा तुनळी अपलोड मिळणार नाही. प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र वेगळा असतो >> + अगणित.
हो ते खरेच. रोज सकाळचा
हो ते खरेच. रोज सकाळचा सुर्योदय मी आवर्जून बघतोच.. म्हणजे ज्या दिवशी आम्हाला सूर्य दिसतो त्यावेळीच.. इथल्या एफ एम वरचा निवेदक नेहमी सांगतो...
दो वूई कांट सी हिम नाऊ, द सन इज शायनींग समव्हेअर बिहाइंड दोज क्लाउड्स.. ट्रट मी. मे बी वुई विल सी हिम लॅटर ड्यूरिंग द डे ऑर मे बी हि विल शॉवर अस विथ हिज ब्लेसिंग्ज...
हवामानाचे ईतके सुंदर वर्णन !!
साधना हे केशरी-पॅशनफ्रुट.
साधना हे केशरी-पॅशनफ्रुट.
हे आहे छान पण ही ढवसा नाहीत
मला आता ढवसा कुठे मिळतील बघायला??? जिथे मिळायची तिथे आता माझे घर आहे
आता वरच्या डोंगरावर मिळतील का बघायला हवीत....
ह्या केशरीवाल्यांचे सरबत करतात की नुसतेच खातात??
दो वूई कांट सी हिम नाऊ, द सन
दो वूई कांट सी हिम नाऊ, द सन इज शायनींग समव्हेअर बिहाइंड दोज क्लाउड्स.. ट्रट मी. मे बी वुई विल सी हिम लॅटर ड्यूरिंग द डे ऑर मे बी हि विल शॉवर अस विथ हिज ब्लेसिंग्ज...
हल्ली इथेही ही इज शॉवरिंग ब्लेसिंग्स, बट ऑफ अनदर काईंड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे सगळे प्रत्यक्ष अनुभवणे खुप
हे सगळे प्रत्यक्ष अनुभवणे खुप महत्वाचे आहे. याचा आनंद वेगळाच आहे. इथे रिपीट टेलेकास्ट किंवा तुनळी अपलोड मिळणार नाही. प्रत्येक पौर्णिमेचा चंद्र वेगळा असतो >>>>खरं आहे. इथे शहरात आल्यापासून मलाही हे काही अनुभवता येत नाही. फार वाईट वाटत. कोकणात असताना रात्री अंगणात झोपून, चांदण्या पहायच्या, 'यान' शोधायच, उल्कापात बघायचे, सप्तर्षी शोधयचे, विमान मोजायची, धूमकेतू पहायचा, कित्ती मज्जा असायची. दिवसा नदीतील पाण्यात पाय सोडून, निवांत बसणं, पाण्याची खळखळ, माश्यानी पायाला केलेल्या गुदगुल्या, वेगवेगळ्या प्रकारचे, आणि रंगाचे मासे, त्यांचे खेळ हे सगळ आठवून, फार फार उदास व्हायला होतं. यातल काहीच आता मी करू शकत नाही.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
शोभा डोन्ट वरी. ह्या कोकणातील
शोभा डोन्ट वरी. ह्या कोकणातील काही गोष्टी.
१)सध्या आंबोली घाट ह्या पिवळ्या सोनकी आणि कुठल्यातरी गोंडेदार निळ्या फुलांनी बहरला आहे.
२) कोकणात मला सोन कुसुम जांभळट रंगाचीही दिसली.
![](https://lh4.googleusercontent.com/-fJnhOhdTGbU/TrtrLGzsA3I/AAAAAAAAA-I/RsFUWCnjBws/s800/IMG_2867.jpg)
३) पारवा
![](https://lh6.googleusercontent.com/-vEFamZqdgcw/Trtrhw5HBDI/AAAAAAAAA-Q/j3xu15-akEA/s800/IMG_2912.jpg)
४) वेळणेश्वरला हे पक्षी भरपूर होते. पण पोझच देत नव्हते. कोणते आहेत हे ?
![](https://lh4.googleusercontent.com/-zv6lPiNCFb0/TrtrsdPH5TI/AAAAAAAAA-Y/N_J00wSbp6E/s800/IMG_2910.jpg)
५) कच्ची आणि पिकलेली सुपारी
![](https://lh6.googleusercontent.com/-Ryqv7WBFX6Y/TrtsjlNQiQI/AAAAAAAAA-o/-Madgjg6vYM/s800/IMG_2881.jpg)
६) नेवतीच्या किनार्यावरील रानकेळी
![](https://lh5.googleusercontent.com/-_RMLqm-7olA/TrtsXum3vuI/AAAAAAAAA-g/HYtB_mtkjv8/s800/IMG_3013.jpg)
७) कोकणातली (वेळणेश्वर) संध्याकाळ
![](https://lh4.googleusercontent.com/-Ow6edUc4jh0/TrttZQ7XyMI/AAAAAAAAA_Q/wPcMlAQzYqw/s800/IMG_2879.jpg)
साधना हि फळे नुसतीच खातात.
साधना हि फळे नुसतीच खातात. गोड लागतात. ढवश्याची चव कशी असते ?
जागू, हे फक्त हिमनगाचे टोक ना ? अजून भरपूर असतील फोटो !
त्या पक्ष्याचे नाव माहित नाही, गिरिराज त्यांना गुबगुबीत चिमण्या म्हणायचा. त्या तशा आपल्याला बूजत नाहीत.
साधना हि फळे नुसतीच खातात.
साधना हि फळे नुसतीच खातात. गोड लागतात. ढवश्याची चव कशी असते ?
दिनेश मला आता वाटतेय की कदाचित यांनाच आमच्याकडे ढवशी म्हणत असतीलही. ३०-३५ वर्षांपुर्वीच्या गोष्टी आता आठवणीतही धुसर व्हायला लागल्यात. माझ्या आठवणीत गोल्फ बॉलच्या आकाराचे आणि तसेच खडबडीत केशरी रंगाचे फळ (वरचा केशरी वेगळा, माझ्या आठवणीत अष्टगंधाच्या केशरी रंगाचे) आणि आतही तसाच गर नी गराने माखलेल्या बीया. सिताफळ कसे खातो तसे हे फळ खायचे.
आता यातले खरे किती आणि धुसर किती मलाही आठवत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागु मस्त फोटो. माझ्याकडे आंबोलीचे भरपुर फोटो आहेत पण अपलोडसाठी वेळ नाही.
ते जंगली सातभाई असावेत.
ते जंगली सातभाई असावेत.
वा जागू मस्त फोटो, मजा आली ही
वा जागू मस्त फोटो, मजा आली
ही रान केळी खातात का?
Pages