निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
व्वा शशांक ... सुंदर फोटो !
व्वा शशांक ... सुंदर फोटो ! माझ्याकडे क्लोज अप नव्हते फुलांचे / पानांचे. दिनेशदा, पुढच्या वेळी फोटो टाकताना पिकासामध्ये टाकून इथे दुवा देईन.
शशांक या फुलांची एक खासियत
शशांक या फुलांची एक खासियत म्हणजे, जांभळ्या पाकळ्या नसून पुष्पकोष असतो. मधले जरा गडद रंगाचे फूल गळून गेले तरी त्याचा रंग आणि आकार तसाच राहतो. त्यामूळे लांबून बघणार्याला ते फुलांचेच तूरे वाटतात.
मला मुंबईत हे दिसले नाहीत, पण गोव्यात होते. इथे सगळ्याच फुलांचा असतो तसा या "फुलां"चाही आकार जरा मोठाच असतो.
गौरीने दिलेल्या फोटोत मात्र छानच बहर आलाय.
साधना, माझं पण बुकिंग तुझ्या
साधना,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं पण बुकिंग तुझ्या घरासाठी.
या फुलांची एक खासियत म्हणजे,
या फुलांची एक खासियत म्हणजे, जांभळ्या पाकळ्या नसून पुष्पकोष असतो. मधले जरा गडद रंगाचे फूल गळून गेले तरी त्याचा रंग आणि आकार तसाच राहतो.>> अशा कॉमेंट्स करता दिनेशदाच हवेत....
शशांक फोटो छान काही दिवसां
शशांक फोटो छान
काही दिवसां पुर्वी ओढ्यात साप आणि मुंगसांचा खेळ पहायला मिळाला. साप साधारण ६,७ फुट लांब होता. मग तो साप पाण्यात जाऊन बसला तेव्हा मुंगुस कडे कडेने फिरत राहिले.
आमची चाहुल लागल्यावर निघून गेले. थोड्यावेळाने सापही दाट झाडित निघून गेला. जाता जाता एका मोठ्या दगडाखालून आहीतरी गिळून गेला.
तेव्हाच एक अनोळखी पक्षी येऊन समोरच्याच झाडावर बसला. कावळे व इतर पक्षी त्याला घाबरत होते. आकाराला मोठ्या कावळ्या एवढा होता. मग कळलं तो शिक्रा होता.
जो_एस - फोटो काढू शकला नाहीत
जो_एस - फोटो काढू शकला नाहीत का या साप - मुंगूस खेळाचे - शिक्रा पक्ष्याचे...... ?
आहेत, टाकतो जमतील तसे
आहेत, टाकतो जमतील तसे
शांकली धन्यवाद माझ्या कडे असे
शांकली धन्यवाद माझ्या कडे असे बरेच फोटो आहेत की त्यांची नावे मला आजुनही सापडली नाहीयेत.
रिमा | 22 October, 2011 -
रिमा | 22 October, 2011 - 10:20
डॉ. अल्मेडांबद्दल कोणीच कस किहील नाही. त्याचा बराच आभ्यास आहे या क्षेत्रातला.
Sadhana1 | 22 October, 2011 - 10:34
अगं मग तुच लिही ना.. मी नावही ऐकले नाहीय>>
अग ते आपल्या सावंतवाडीचेच आहेत. आंबोलीतला तर कण आणि कण छानुन काढलेला आहे त्यांनी. ते बि.एन्.एच.एस. ला संलग्न आहेत. बोरिवली न्याशनल पार्क मध्ये जे नेचर वॉक असतात त्यांना डॉ. अल्मेडांच गाइड करतात. बारिच पुस्तक आहेत त्यांचि सह्याद्रिमधिल झाडांवरती.
त्यांनी गेल्यावर्षि एक स्पिशीस शोधुन काढलेली. सरकारने ऑनर म्हणुन त्याला डॉ. अल्मेडांच नाव दिल.
रिमा मग इथे सविस्तर लिहायलाच
रिमा मग इथे सविस्तर लिहायलाच पाहिजे.
निदान पुस्तकांची नावे तरी.
नैरोबीमधे हे झाडही खुप दिसते.
नैरोबीमधे हे झाडही खुप दिसते. वर्षभर हिरवेगार असते आणि अशी झुपक्याने फुले लागतात. इथे सहसा फुलांना सुगंध नसतो, तसा या फुलांनाही नसतो. पण मध असावा कारण फोटोत
मधमाशी आहे. पण मधमाश्या या दुय्यम परागवाहक असाव्यात कारण रंग शुभ्र आहे म्हणजे कुणीतरी निशाचर किटकही, हे काम करत असणार. नाव माहीत नाही पण आपल्याकडच्या विषवल्लीची फुले अशी असतात.
राणीच्या बागेत सिंहाच्या पिंजर्यावर वेल आहे ही. पण ती वेल असते, हे मध्यम उंचीचे झाड आहे.
रिमा मग इथे सविस्तर लिहायलाच
रिमा मग इथे सविस्तर लिहायलाच पाहिजे.
निदान पुस्तकांची नावे तरी.>>
http://www.dnaindia.com/mumbai/report_fifth-volume-of-flora-of-maharasht...
http://www.saveranibagh.org/CO_currentStatus%20.php
हे रेफरन्स साठी
दिनेश, माझ्याकडे ही वेल होती
दिनेश, माझ्याकडे ही वेल होती
मी गावी नेली आणि तिथल्या पावसाळयात तिने राम म्हटला.
माझी सगळी झाडे स्वर्गात गेली
फक्त ऑल्स्पाईस राहिले
यावर्षी आंबोलीत पावसाचे चार महिने एकही दिवस उसंत न घेता पाऊस पडला आणि तोही मुसळधार. चार महिने सुर्यदर्शन झालेच नाही.
पर हम हारनेवालोंमेसे नही है. मी परत वृक्षारोपण करुन आले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी मध्यंतरी 'आरण्यक' नावाचे
मी मध्यंतरी 'आरण्यक' नावाचे एक पुस्तक वाचलेले. मुळ बंगाली कादंबरीचा (बंगाली असल्याने बरीच जाडजुड होती, कमीत कमी ५०० पाने असावीत) साहित्य अकादमीतर्फे मराठीत अनुवाद केलेला.
परिस्थितीवश बिहार्-बंगालच्या बॉर्डरवर असलेल्या एका मोठ्या जंगलाचा इस्टेट मेनेजर म्हणुन नोकरी पत्करावी लागलेल्या एका तरुणाची ही कथा आहे. कथेचा काळ साधारण १८९०-१९०० हा आहे. त्याने जंगलात घालवलेली ७-८ वर्षे पुस्तकात येतात. पहिली दोन वर्षे तो लोकवस्तीपासुन दुर जंगलात पडल्याच्या दु:खात घालवतो पण हळुहळू तो त्याच जंगलाच्या इतक्या प्रेमात पडतो की नंतर त्याला लोकवस्तीत गेल्यावर गुदमरायला व्हायला लागते.
जंगले तोडून त्या जागी मानवी वसाहती कशा झाल्या, शेतकरी पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनी जमिनदारांच्या मालकीच्या कशा काय? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मला यात मिळाली.
पुस्तक परत आणते ग्रंथालयातुन आणि इथे सविस्तर लिहिते.
हायॉल. कशी गेली दिवाळी?
हायॉल. कशी गेली दिवाळी?
वेरूळ मुक्कामी सकाळी सकाळी हॉटेलच्या रुमसमोर ही गँग मस्त ऊनात बसलेली मिळाली.
गिरि : हा घे झब्बु.
गिरि : हा घे झब्बु.
![DSCN1121.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/DSCN1121.jpg)
साधना, अधून मधून मुसळधार
साधना, अधून मधून मुसळधार पाऊस, वणवा, अवर्षण हे निसर्गाला अपेक्षितच आहे. त्या काळातच जूनी झाडे (म्हणजेच "खोडे") नष्ट होऊन, नव्या झाडांना जगण्याची संधी मिळते.
प्रोटिआ, बॉटलब्रश सारखी काही झाडे तर वणव्याची "वाट" बघतात.
जिप्स्या, यावर्षी कुठे रांगोळीचे प्रदर्शन नव्हते का ?
साधना, ४ महिने सलग पाऊस
साधना,
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४ महिने सलग पाऊस ?????
(काय अप्रतिम नजारा असेल ना ! तिथल्या एकुण निसर्गाचा,झाडांचा, पाना-फुलांचा,पक्षांचा,पावसाचा आवाज्, सध्या तरी अशा पावसाळ्याची फक्त कल्पनाच करु शकतो)
आमच्याकडे (मिरजपासुन पुर्व भाग) या ४ महिन्यात फार तर ४ दिवसच पाऊस पडला (पडतो)
तुम्ही छान वर्णन केलेलं पुस्तक वाचायला आवडेल
दिनेशदा,
मुसळधार पावसानंतर येणार्या महापुरामुळे काही वनस्पती नष्टही होत असतील, काही दुर प्रदेशात,पाण्याबरोबर वाहत जाऊन दुसरीकडे नदीकाठी पुन्हा तग धरत असतील ना..
४ महिने सलग पाऊस
४ महिने सलग पाऊस ?????
आंबोलीत हे हल्ली कधीतरीच होते पण होते. माझ्या लहानपणी मात्र आंबोलीत पावसाळ्यात दिवसभर साधारण संध्याकाळाचे ७ वाजल्यासारखे वातावरण आणि रात्रभर गुडुप काळोख असायचा, परत दुस-या दिवशी तेच असे असायचे. जरा जरा प्रकाश असला की समजायचे दिवस आहे, काळोख म्हणजे रात्र
बाकी बाहेर बघुन वेळ अजिबात समजत नसे. आई/आजीच्या भाषेत 'पाऊस डोळे मिटुन कोसळतोय, दिवस-रात्र काही पाहात नाही' आणि ते खरेच असायचे. पाऊस सतत पडतच असायचा, फक्त त्याचा जोर दिवसभर कमीजास्त होत राहायचा.
आता पाऊस कमी झालाय. मेच्या दुस-या आठवड्यात पाऊस सुरू व्हायचा, तो आता जुन उजाडल्यावर येतो. ब-याच वर्षांनी या वर्षी पुर्ण ४ महिने पाऊस झाला. तिन वर्षांपुर्वी जवळजवळ ८ महिने पाऊस पडत होता. मार्चमध्ये सुरू झाला तो ब्रेक घेत घेत साधारण नोवेंबरापर्यंत टिकला.
अनिल मोठी झाडे नाही तग धरत
अनिल मोठी झाडे नाही तग धरत सहसा, पण बिया वगैरे नक्कीच वाहून जातात. आणि लांबवर रुजतात.
अंबोलीची खासियत म्हणजे, भातखाचरे सोडली तर तिथे पाणी तूंबून रहात नाही, वाहून जाते.
आमच्याकडे म्हणजे नैरोबीला पण तसेच आहे. रात्रभर पाऊस पडला, तरी रस्त्यावर पाणी साचलेले नसते.
अरे झालेय काय सर्वांना. जागू
अरे झालेय काय सर्वांना. जागू नी साधना नाहित तर हा धागा पण थंड ???
हो दिनेश, एवढा पाउस असतो पण
हो दिनेश, एवढा पाउस असतो पण कुठेही चिखल नसतो. पाणी लगेच वाहुन जाते. इथे मुंबईत नुसता चिकचिकाट होतो पावसात.
मोनालिप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण त्या काळात तिथे एक बुरशी
पण त्या काळात तिथे एक बुरशी वाढते असे लाड सांगत होते. न्यू झीलंडला पण तसेच होते. शेवटी सूर्य हवाच ना !
महाबळेश्वर परिसरात पण असेच वातावरण असते, स्ट्रॉबेरीची रोपे शेतातून उपटून घरी आणून ठेवावी लागतात.
काल आमच्याकडे गारांचा पाऊस पडला. इथे पाऊस सहसा रात्रीच पडतो पण दिवसा पडला कि ट्राफिकचे १२ वाजतात. काल संध्याकाळी ५ ला निघालो ते रात्री ८ ला घरी पोहोचलो. अंतर किती तर फक्त ८ किलोमीटर.
दिनेशदा, तिकडे पाऊस
दिनेशदा,
तिकडे पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर पाणी येत की नदी/नाले भरुन वाहत असल्यामुळे,पाणी कमी होईपर्यंत वाट पहावी लागली ?
अरे ! एक दीड दिवसात ४२
अरे ! एक दीड दिवसात ४२ पोष्टी!
काल पुण्यात होते तिथे माझं टाटा फोटॉनचं इंटरनेट चालेचना.
आज नगरात चालू.
गिरीभाऊ, उन्हाला बसलेली गँग मस्तच!
बरेच काही जमा झाले आहे
बरेच काही जमा झाले आहे इथे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या दिवाळी साजरी करायची कल्पना मस्तच. आणि ऑफिसातल्या रांगोळ्या पण सुंदर आहेत.
साधनाचे घर कसले मस्त आहे. अशा जागी रहायचे सोडून पोटापाण्यासाठी आपल्याला बकाल शहरात रहावे लागते. याला म्हणतात अशुध्द प्रारब्ध (नुकतच नर्मदा परिक्रमेवरचे एक पुस्तक वाचले. तो अनुभव मिळणे म्हणजे 'शुध्द प्रारब्ध असे लेखिकेने म्हटलय - त्याला अनुसरून).
जिप्स्या ब्लोगची कल्पना मस्तच आहे. मी पण मदत करायला तयार आहे.
नैरोबी उंचावर असल्याने
नैरोबी उंचावर असल्याने रस्त्यावर पाणी साचून रहात नाही, पण पाऊस इतका वेगात पडतो कि १५/२० मिनिटात रस्त्यावर पाणी भरते. पण ते १०/१५ मिनिटात ओसरतेही.
इथे पावसात भुरुभुरु, शिडकावा असे काही प्रकार नसतातच. धाड्कन, मुसळधारच कोसळतो.
साधनाचे घर कसले मस्त आहे. अशा
साधनाचे घर कसले मस्त आहे. अशा जागी रहायचे सोडून पोटापाण्यासाठी आपल्याला बकाल शहरात रहावे लागते. याला म्हणतात अशुध्द प्रारब्ध
शुद्धीकरणाची प्रक्रिया चालु आहे. शक्य तितक्या लवकर माझी पुर्ण शुद्धी होईल, पापमुक्ती होईल आणि मी माझ्या स्वर्गात राहायला जाईन अशी आशा आहे. आमेन.
शुद्धीकरणाची प्रक्रिया चालु
शुद्धीकरणाची प्रक्रिया चालु आहे. शक्य तितक्या लवकर माझी पुर्ण शुद्धी होईल, पापमुक्ती होईल आणि मी माझ्या स्वर्गात राहायला जाईन अशी आशा आहे. >> गुरुमाउली मला दिक्षा कधी देताय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
Pages