निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
जिप्स्या माझ्याकडे काही
जिप्स्या माझ्याकडे काही फळझाडांचे पान, फुल फळासकट फोटो मिळतील. अजुन कसले हवेत ते लिस्ट दे. मिळतील तसे देईन. शिवाय अजुन कसली मदत हवी असेल तर तेही सांग.
अरे वा! जागुतै कोकण ट्रिपला
अरे वा! जागुतै कोकण ट्रिपला निघाल्या का?
म्हणजे आम्हाला काही तरी छान वाचायला, पहायला मिळणार तर!
दिनेशदा, शशांक/शांकली, जागू,
दिनेशदा, शशांक/शांकली, जागू, साधना धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी उत्तर कन्नडा ट्रिप करून आल्यावर लगेच कामाला लागतो.
जिप्सी, मी सुद्धा टायपिंग आणि
जिप्सी, मी सुद्धा टायपिंग आणि मनापासून वाचणे ही कामे करू शकते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने, ट्रिप मस्त मजेत होऊ दे.
टेबलसॉल्ट आणि खाद्यरंग वापरुन
टेबलसॉल्ट आणि खाद्यरंग वापरुन मी काढलेली रांगोळी.
आज माझ्या घरातून दिसलेला हा
आज माझ्या घरातून दिसलेला हा नजारा.
दिनेशदा - तुमचे हात जादूभरे
दिनेशदा - तुमचे हात जादूभरे असल्याने तुम्ही रांगोळी, पेंटींग, पाककला, हस्तकला ...... अशा व अजून कुठल्या कुठल्या कलात प्रविण आहात हे माझ्यातरी कल्पनेपलिकडे आहे....
परमेश्वराने खास वेळ काढून काही व्यक्ति बनवल्या आहेत यावर माझा पूर्ण विश्वास काय खात्रीच आहे - विशेषतः तुमच्याकडे पाहिल्यावर तर नक्कीच...
(ते इंद्रधनुष्य तुम्हीच काही वेगळ्या कला वापरुन चितारले नाही ना... ती रांगोळी व ते इंद्रधनुष्य एकदम पाहिल्यावर मला खरंच असं वाटलं होतं आधी....)
काय शशांक, मला न जमणार्या
काय शशांक, मला न जमणार्या गोष्टीच जास्त आहेत.
एका दिशेने कडक ऊन, दुसर्या बाजूने मुसळधार पाउस इथे नेहमीचेच.
दिनेशदा, रांगोळी आणि नजारा
दिनेशदा, रांगोळी आणि नजारा दोन्ही मस्तच.
दिनेशदा, रांगोळी आणि दुहेरी
दिनेशदा, रांगोळी आणि दुहेरी इंद्रधनुष्य खासच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या हापिसात काढलेल्या काही
आमच्या हापिसात काढलेल्या काही रांगोळ्या
("रांगोळी सोडुन इतर वस्तु वापरून रांगोळी काढायची" अशी थीम होती. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हि माझ्या टिमने काढलेली रांगोळी (लोकर, चमकी, शंखशिंपले इ.)
![](https://lh4.googleusercontent.com/-z6QdOU6Ej6I/Tq4YqxfOC0I/AAAAAAAABGU/ANk9oYAJOwM/s640/IMG_8141%252520copy.jpg)
सर्वात श्रीमंत रांगोळी
(डाळ, गहु, तांदूळ इ.)
![](https://lh4.googleusercontent.com/-HNrFZhcaWPM/Tq4YovJ_6lI/AAAAAAAABGM/fiL9Umwca5o/s640/IMG_8134%252520copy.jpg)
लाकडाचा भूसा, डिव्हिडी इ. वापरून काढलेली रांगोळी
![](https://lh6.googleusercontent.com/-casDQaEGg3A/Tq4Yp3h0HkI/AAAAAAAABGQ/rVikOvSanY8/s640/IMG_8139%252520copy.jpg)
फराळाची रांगोळी (फरशीवर व्यवस्थित कागद अंथरून काढलेली रांगोळी :-))
![](https://lh6.googleusercontent.com/-TP3LpUoBY_A/Tq4YsMFLLaI/AAAAAAAABGY/hTmtiwzKoNI/s640/IMG_8143%252520copy.jpg)
शुगर कोटेड गोळ्यांनी काढलेली रांगोळी
![](https://lh5.googleusercontent.com/-XIukedP6mCk/Tq4YtHS-biI/AAAAAAAABGc/JgMePhO92ko/s640/IMG_8233%252520copy.jpg)
रव्याची रांगोळी तांदूळ आणि
रव्याची रांगोळी
![](https://lh4.googleusercontent.com/-WibyKSS6z9Y/Tq4YuHbpenI/AAAAAAAABGg/THMHp9WYT48/s640/IMG_8249%252520copy.jpg)
तांदूळ आणि साखरेची रांगोळी
![](https://lh4.googleusercontent.com/-rqIERP0NkEc/Tq4Yvb1ISBI/AAAAAAAABGk/ONOHWL5AxM0/s640/IMG_8252%252520copy.jpg)
मिठाची रांगोळी
![](https://lh3.googleusercontent.com/-CV01-eyd0E0/Tq4YwqGCcXI/AAAAAAAABGo/ddBojBhJ8gQ/s640/IMG_8264%252520copy.jpg)
कोबी, गाजर, काकडी, बीटरूट, मका इ. भाज्या वापरून काढलेली रांगोळी
![](https://lh4.googleusercontent.com/-dN4RA5n6WPg/Tq4YxYT0WnI/AAAAAAAABGs/_DXZ6U9Fsec/s640/IMG_8275%252520copy.jpg)
डाळ, गहु इ. वापरून काढलेली रांगोळी
![](https://lh5.googleusercontent.com/-mHnhxaQZO5M/Tq4Yzmt4LgI/AAAAAAAABG0/q43a2hYW0W4/s640/IMG_8148.jpg)
नमस्कार मित्रांनो
नमस्कार मित्रांनो
नमस्कार सचिन सचिन, वरती
नमस्कार सचिन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सचिन, वरती दिनेशदांनी ब्लॉग (वृक्ष) तयार करण्यास सांगितला आहे, तेंव्हा ब्लॉग तयार करण्यास मला तुझीही मदत लागणार आहे.
जिप्या नक्की मदत करेन आज
जिप्या नक्की मदत करेन
आज पासून नेट अॅक्सेस पुर्ववत झाले आहे ऑफिस मधे
जिप्सी रांगोळ्या मस्तच! तूही
जिप्सी रांगोळ्या मस्तच! तूही फिरायला चाललेला दिसतोस! मजा करून ये!
आणि हो शशांकला मोदक! दिनेशदांच्या घराच्या नजार्याबद्दल --- मलाही वाटलं त्यांनीच काहीतरी जादू करून इंद्रधनुष्याचा इफेक्ट दिला असावा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
<<<<<दिनेशदा - तुमचे हात
<<<<<दिनेशदा - तुमचे हात जादूभरे असल्याने तुम्ही रांगोळी, पेंटींग, पाककला, हस्तकला ...... अशा व अजून कुठल्या कुठल्या कलात प्रविण आहात हे माझ्यातरी कल्पनेपलिकडे आहे....
परमेश्वराने खास वेळ काढून काही व्यक्ति बनवल्या आहेत यावर माझा पूर्ण विश्वास काय खात्रीच आहे - विशेषतः तुमच्याकडे पाहिल्यावर तर नक्कीच...>>>>>>>>>>>
शशांक अगदि अगदि. तुम्हाला पुर्ण अनुमोदन.
जिप्सी रांगोळ्या सुंदर.
सगळ्या रांगोळ्या सुंदरच
सगळ्या रांगोळ्या सुंदरच रे.
आपण सगळ्यांनी झाडाचा फोटो काढताना, पानांचा, पूर्ण झाडाचा फोटो काढत जाऊ. (पानांचा प्रकार, आकार, लांबी रुंदी पण नोंदवून ठेवू)
पुस्तकात फोटो देताना किमतीचा विचार करावा लागतो, या माध्यमात आपल्याला ते बंधन नाही.
याचे नाव काय ??
याचे नाव काय ??
जिप्सी - सर्व रांगोळ्या एकदम
जिप्सी - सर्व रांगोळ्या एकदम भन्नाट - सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच - सगळ्यांना जरुर सांगणे - ट्रीपचे फोटो केव्हा टाकणार....
आपण सगळ्यांनी झाडाचा फोटो काढताना, पानांचा, पूर्ण झाडाचा फोटो काढत जाऊ. (पानांचा प्रकार, आकार, लांबी रुंदी पण नोंदवून ठेवू)>> अनुमोदन - शक्य झाल्यास झाडाचा पत्ता मिळाला तर फारच उत्तम होईल असे वाटते- उदा. गोरखचिंच - पुण्यात -पुणे विद्यापीठ -मुख्य इमारतीसमोर बागेत, दुसरे ठिकाण- बाजीराव रोड व टिळक रोड चौकात मेहेंदळे म्युझिक सेंटरबाहेर, इ.
जागू आहे का? श्रावणीला
जागू आहे का? श्रावणीला वादिहाशु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्स्या, रांगोळ्या मस्तच आहेत. पण खाद्यपदार्थ फुकट जातात ते पाहून वाईट वाटतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही सगळी पुस्तकं ग्राहक संघात भरभक्कम डिस्काऊंटने विक्रीस होती. अजूनही अधून मधून अशीच चांगली पुस्तकं मिळतात.
जिप्सी, मस्त फोटो. छान
जिप्सी, मस्त फोटो. छान काढल्या आहेत रांगोळ्या. वापरलेली माध्यमे खूप कल्पक आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रावणीला वाढदिवसाच्या
श्रावणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तूमच्या पुस्तकांच्या यादीत, निळु दामले यांचे माणूस आणि झाड, हे पुस्तक पण असू द्या.
माणूस आणि झाड हे आहे
माणूस आणि झाड
हे आहे माझ्याकडे मजा येते वाचताना..एकदम गणित सोडवल्या सारखे
जागू, श्रावणीला वाढदिवसाच्या
जागू, श्रावणीला वाढदिवसाच्या भरपुर शुभेच्छा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, रांगोळ्या मस्त कल्पक. व तुझी पुस्तकांची आयडीयाही
श्रावणीला वाढदिवसाच्या
श्रावणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सचिन, तूझा हा फोटो आहे ना,
सचिन, तूझा हा फोटो आहे ना, तसा फोटो कुठल्याच पुस्तकात दिलेला नसतो (आणि तसेच फोटो आपल्याला जमा करायचेत) बहुतेक पुस्तकात फुलाचा फोटो समोरूनच दिलेला असतो. या फुलाची खास कळी आणि पुष्पकोष गोंधळात टाकतोय !
दिनेशजी हे फुल रस्त्याच्या
दिनेशजी हे फुल रस्त्याच्या कडेला होते आणि त्या झुडपावर प्रचंड धुळ बसलेली होती त्यामुळे त्या कळीचे मुळ सौंदर्य लक्षात येणार नाही.
मोर-वेल हा आजून एक फोटो पण हे
मोर-वेल
हा आजून एक फोटो पण हे फुल तेच आहे या बद्दल मला शंका आहे.
सचिन, मला यात पाकळ्या जास्त
सचिन, मला यात पाकळ्या जास्त दिसताहेत. वेगळा प्रकार दिसतोय.
Pages