निसर्गाच्या गप्पांचा चौथा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.
निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन). ह्या सर्वांच्या निसर्गावरच्या प्रेमामुळे निसर्गाच्या गप्पांच्या चौथ्या भागाची सुरूवा होत आहे.
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १
४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
साधना, माफी असावी... गेल्या
साधना,
माफी असावी...
गेल्या वर्षभरात एकदम अशी अनेक फुले-झाडे निग वर पाहतोय,पुर्वी काही माहीत नव्हतं,नावही वाचलेली असतात पण लगेच लक्षात आलं नाही, विसरुन गेलो.पुन्हा असं होणार नाही.
ओळखा पाहू? या फळाच नाव
ओळखा पाहू? या फळाच नाव काय?
दिनेशदा, तुम्हाला माझी सक्त ............................विनंती (ताकीद नाही हो.)आहे. तुम्हाला याच नाव महित असणार. पण तुम्ही सांगू नका हां.
कुणाच्या कानात पण नका सांगू.
काय विचित्र फळ आहे
काय विचित्र फळ आहे
शोभा, माझी हाताची घडी आणि
शोभा,
माझी हाताची घडी आणि तोंडावर बोट.
वरच्या अनिलच्या प्रश्नावरुन परत ब्लॉगची उणीव जाणवतेय,
मुखपृष्ठावरच सर्व झाडांची यादी, आणि त्यावर क्लीक केल्यावर
त्याचे अनेक फोटो आणि माहिती दिसली पाहिजे.
आपण सगळेजण त्यात भर घालत राहू.
शोभा तो टोमॅटो आहे का?
शोभा तो टोमॅटो आहे का?
दिनेशदा, तुम्हाल नक्किच महित
दिनेशदा, तुम्हाल नक्किच महित आहे ना?
माधव > चूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊक.
दिनेशदा, मला खरच
दिनेशदा, मला खरच स्मरणशक्तीसाठी औषध सांगा ना.
हो शोभा, बहुतेक आहे माहित.
हो शोभा, बहुतेक आहे माहित. स्मरणशक्तीची औषधे या बीबीच्या पहिल्याच पानावर
आहेत.
स्मरणशक्तीची औषधे या बीबीच्या
स्मरणशक्तीची औषधे या बीबीच्या पहिल्याच पानावर
आहेत.
कशाला घ्यायची ती?? मी तर म्हणते स्मरणशक्ती अती घातक. कोण काय, कधी, कुठे बोलले ते लक्षात ठेऊन वाद घालता येतात. मी इतर बीबीवरचे वाद वाचुन पकले आणि इथे निवांत झाडाखाली आले बसायला.
मला स्मरणशक्ती नसल्याला मागे दुरदर्शनवर फक्त दोनच चॅनेल्स असताना खुप फायदा व्हायचा. रविवारचा हिंदी चित्रपट पाहायला मी हातात रिमोट घेऊन बसायचे. शेजारी माझा भाऊ माझ्याशी 'अगं हा चित्रपट याआधी दोनदा दाखवलाय, तेव्हा हा बंद कर नी तिकडे दुसरीकडे पॉप म्युझिक चालु आहे ते आपण बघुया' अशी आर्जवे करत बसायचा. मी चित्रपट पाहिलाच नाही यावर हटुन बसायचे आणि आधी दोनदा पाहिलेल्या चित्रपटाचा परत एकदा नव्याने आनंद घ्यायचे. त्याची स्म. दांडगी असल्याने त्याला चित्रपट पाहताना भारीच त्रास व्हायचा
साधना, अगदी खरं बोललीस. या
साधना, अगदी खरं बोललीस.
या दांडग्या स्मरणशक्तीचा मलाही कधी कधी त्रास होतो.
चला सोमवारची सकाळ प्रसन्न करण्यासाठी हे घ्या.
वा !! दिनेशजी सुंदर फोटो
वा !! दिनेशजी सुंदर फोटो
मस्त दिनेश हे सुर्य फूल आहे
मस्त
दिनेश हे सुर्य फूल आहे का?
सुप्रभात. दिनेशदा, खरच
सुप्रभात. दिनेशदा, खरच प्रसन्न वाटल, सूर्यफूल पाहून.
अरे, पण मी विचरलेल्या प्रश्नाच उत्तर कोणीच दिल नाही
मी विचरलेल्या प्रश्नाच उत्तर
मी विचरलेल्या प्रश्नाच उत्तर कोणीच दिल नाही
मी नी माधवने दिलेय की?? आता तुला ती आवडली नाहीत त्याचे काय करायचे??
मला तर ते शिंगे फुटलेली पपयी वाटते. आता ती खरेच पपई असेल तर मात्र तु चिटींग करतेयस हा. सगळ्याच पपयांना काय शिंगे फुटणार नाहीत.. चालणार नाही
Sadhana1 | 5 November, 2011 -
Sadhana1 | 5 November, 2011 - 16:39
काय विचित्र फळ आहे
साधने, हे तुझ उत्तर आहे का?
ती पपई नाहीच आहे.
सांगा, सांगा, लवकर सांगा, त्या फळाचे नाव सांगा.
हे फळ खायला घातल्याशिवाय
हे फळ खायला घातल्याशिवाय आम्ही नाही सांगणार नाव ज्जा......
दिनेशदा.. फूल मस्तच.. शोभा..
दिनेशदा.. फूल मस्तच..
शोभा.. ते फळ बघितल्याचे आठवतेय. पण नाव माहीत नाही..
हे फळ खायला घातल्याशिवाय
हे फळ खायला घातल्याशिवाय आम्ही नाही सांगणार नाव ज्जा......>>>अले, अले, ललू नको हा. अग तू अस म्हणणार आहेस हे माहित असतं, तर आधीच तुला हे फळ खायला दिलं असत. पण आता अशक्य आहे.
यो. _____________/\______________.
तसेही "त्या" सर्व फळांनाही
तसेही "त्या" सर्व फळांनाही शिंगे नसतात, हो ना शोभा ?
लक्ष्मण, हनुमान, काका !!!
शोभा तो टोमॅटो नाही
शोभा तो टोमॅटो नाही मग........................
टंबाटू ? नाही? मग....................
टाम्याटो?? नाही? मग?...............
बर सांगच आता तू! तो पर्यंत हा तुळशीवरचा चतुर पहा.......
शोभा, हे पीच आहे का? दिनेशदा,
शोभा, हे पीच आहे का?
दिनेशदा, मस्त फोटो!
मीही हे फळ पाहिल्यासारखे
मीही हे फळ पाहिल्यासारखे वाटतेय पण कधी कुठे ते काही आठवत नाही (तसेही माझी स्मरण...... )
तसेही "त्या" सर्व फळांनाही
तसेही "त्या" सर्व फळांनाही शिंगे नसतात, हो ना शोभा ?>>>बरोबर.
छान, म्हणजे असे लाखातले एक
छान, म्हणजे असे लाखातले एक फळ इथे टाका, खायला मात्र देऊ नका. आणि 'आजची खिरापत ओळखा पाहु'चा खेळ मात्र आम्हाला खेळायला लावा..... ये सब्कुच नही चलेगा....
हाय कसे आहात सगळे ? मी परवाच
हाय कसे आहात सगळे ? मी परवाच आले. खुप सुंदर आहे कोकण. सविस्तर लिहेनच मी नंतर.
शोभा तो आंबा,रामफळ, पिच, यापैकी काही आहे का ?
जागू वेलकम बॅक!
जागू
वेलकम बॅक!
जागू, आलीस? खूप आनंद झाला.
जागू, आलीस? खूप आनंद झाला. आता आणखी फोटो पहायला मिळतील. तेही माझ्या कोकणचे.
हल्ली जिप्स्या, कुठाल्या महत्वाच्या कामात अडकलाय का?
फोटो नाही टाकत तो. (काही तरी पाणी मुरतय.) दिनेशदा, जरा शोध घ्या बघू.
तो दक्षिणेकडे गेलाय. कसलंतरी
तो दक्षिणेकडे गेलाय. कसलंतरी संशोधन करायला.
(ती म्हणेल ईल बा, याला वाटेल बा येईल... असे काही नसावे बहुतेक)
जागू, कुठे कुठे होता दौरा ?
विहिरीवरचा लेख मस्तच जमलाय. (गर्दीत न हरवता स्वतंत्र वाचायला मिळाला, ते छानच झाले.)
दिनेशदा
दिनेशदा
मला रामफळ वाटतेय
मला रामफळ वाटतेय
Pages