लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

धन्यवाद...मग मी हेअल्थ dept मध्ये call करू का? कारण तिचे डॉक्टर तिथून निर्वाळा आल्यशिवाय तिचे रेकॉर्ड शाळेत पाठवणार नाहीत.कुणाला असा अनुभव आहे का कि तिथली लोक शक्यतो काय करतील?मला भीती वाटते कि नाहक काहीतरी followup सुरु व्हायचे.तिला isolate करतील.

डॉक्टरनी तसे सांगितले असेल तर कॉल करा. मला असा काही अनुभव नाही, हे कॉमन आहे. डॉक्टरला माहीत असायला पाहिजे होते. पण इथे नियम, प्रोसिजरही काउंटी/स्टेट प्रमाणे बदलते. त्यानुसार हेल्थ डिपार्टमेंटला कॉल करावा लागणार असेल तर करा आणि त्यांना नीट सांगा. फार काही प्रॉब्लेम होईल असे वाटत नाही.

MALA DON TWINS AAHE TYA 3 VARSHACHYA AAHET TYANA JUNE PASSON VARANVAR SARDI KHOKALA TAAP AATA TAR INHEALER CHALOO KELE AAHE TYA TWINS ASALYANE VAJANANE KAMI HOTYA TARI TYANA HOMEOPAT CHALOO AAHE TARI PHARAK KA YET NAHI. ME ADULSA, SITOPHALADI, KUMARIASAV NO.3 EMUNOSIN, BB24. DEXORANGE SAGALA CHALOO HOTA TARI TYANA HE ALERGITIC INFECTION KA HOTAT?

MALA PLS. VAIDYA NARENDRA PENDSE HYANCHA ADDRESS PHONE NO. DYAL KA. YA DOGHINCHYA SARDI, KHOKAL,TAP HYAMULE TYANCHA VA MAZA JIVE NAKO HOTO. TYA KHELTAT KHATAT. PAN NAKKI ALLERGY KASALI AAHE TE KALAT NAHI.

PLS. GIVE ME THE ADDRESS.
REGARDS,

NIYATI

हाय नियती... Happy

मी माझ्या मुलाला डॉ. नरेंद्र पेंडसे यांच्याकडे नेते...
तुला Appointment घेऊनच जावे लागेल. डॉ. फक्त रविवारीच मुंबईच्या क्लिनिकमध्ये येतात.

त्यांचा पत्ता खालील प्रमाणे.

Mumbai :
Dr. Borgaokar's Poonam Clinic,
At Junction of Kataria & Bhagat Road,
Behind Kashi Vishveshwar Temple, Matunga ( West ),
Mumbai 400 016
Tel. No. : 24229124

For Appointment Call : Tuesday to Friday 5 to 7 p.m.
Phone : 020 - 2432 9353 ( Pune )

नियती,

अग दोघी आहेत ना? मग एकीची सर्दी दुसरीला.. दुसरीची पहिलीला असं होतं थोडसं.

त्यांना तू कायम कोमट पाणी देतेस का? सर्दी, खोकला नि ताप कश्या प्रकारचा येतो? एकीला सर्दी होतेयर वाटलं तर त्यांना जास्त एकत्र खेळू देऊ नकोस (अशक्य आहे Uhoh पण प्रयत्न करून बघ) सर्दी असलेल्या बाळाने घेतलेले टॉईज धुतल्याशिवाय दुसरीला देऊ नकोस. घरी व्हॅक्युम क्लीनर असेल उशा आणि गाद्या झटकून, साफ करून तर बघ कधी कधी त्यांच्यातल्या डस्ट्ची अ‍ॅलर्जी असते. अभ्रे सर्दीच्या दिवसात डेटॉलच्या पाण्यात विसळून बघ. Sad

मला कोणी तरी अमृतारीष्ट आणि द्राक्षारीष्ट समप्रमाणात मिक्स करून द्यायला सांगीतले होते माझ्या लेकीला. तिला त्याने गुण आला होता. सर्दी झाली तर मी दिवसातून ३ वेळा ५ मीली देते दोन्ही मिळून. (ती पण ३+ वर्षे आहे पण अंमळ वजन राखून आहे, तू जरा कमी मात्रा देऊन बघ.)

इथे कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असेल आणि लहान मुलांसाठी हे औषध नसेल तर कृपया सांगा.

डॉ साने आम्हाला नेहमी निलगिरीचे १-२ थेंब उशीला, कपड्याला लावायला सांगायचे नि १-२ आंघोळीच्या पाण्यात घालायला सांगायचे.. सुरूवातीच्या सर्दीला ह्याने फरक पडतो.. पण नाक वहायला लागलं तर विशेष फायदा होत नाही. Sad

माझ्या ७ महीन्याच्या बाळाला हाय फीवर आहे. अशावेळेस तिला पेज , नाचणी सत्व, सेरेलॅक देउ का की फक्त फोर्मुला मिल्क देउ. नाहीतर अजुन काय देउ.

.

प्लिज सांगा ना कोणीतरी मला काय करु ते......
तसेच डोक्यात ताप जातो म्हणजे नक्की काय होते? कसे ओळखायचे ते? आणि त्यावर उपाय काय करायचे?

निर्मयी, बाळाला ताबडतोब जवळच्या डॉक्टरकडे घेउन जा.
ताप असताना दूध देउ नकोस, उकळलेले पाणी खडीसाखर घालून दे.

निर्मयी.. बाबू कशी आहे? डॉक्टरकडे नेलस का?

ताप ३ च्या पुढे आहे का? काळजी घे ग.. जपानमधल्या अनुभवी माबोकरणीचा पत्ता घे.. कॉल कर.. लवकर डॉक्टरकडे ने. कॅलपॉल किंवा क्रोसीनने ताप उतरत नाहीये का?

हो मी नेले होते डॉ. कडे तिला. ते म्हणाले कुठलेसे इन्फेक्शन झाले आहे ४-५ दिवस ३९ पर्यन्त ताप राहु शकतो. म्हणुनच खुप काळ्जी वाट्ते. अणि परवा रात्री ती ५-१० मि. वेगळी च रड्ली आणि मी पण घाबरुन खुप जोरात ओरड्ले नवर्याल उठ्वायला म्हणुन मला सारखी भिती वाट्ते ताप डोक्यात जातो म्हण्जे काय ?कसे कळ्ते? काय काळजी घ्यायची. बहुतेक त्या दिवशीचे रड्ने त्रास होत होता म्हणुन असेल पण मीच उगच घाबरले.

डॉ. नी पोटातुन काही दिले नाही सपोझीटरी दिले आहे ५-६तासनी टाकायला अशावेळेस क्रोसिन मी तिला देउ का? पण मग कीती वेळानंतर देउ? क्रोसिन आणि सपोझीट्री मधे कीती गॅप ठेवु?

निर्मयी बाळाला बर वाटलच असेल Happy
ताप डोक्यात जाणे हे वाईटच... खुप त्रास होईल.
जास्त तापामुळे आकडी यायचे चान्सेस जास्त असतात. माझ्या मुलाला एकदा येऊन गेली आहे.

अशा वेळी बाळाला साध्या पाण्याने पुसून काढत रहायच सतत , कपाळावर मीठाच्या किंवा साध्या पाण्याच्या घड्या ठेवाव्यात , डॉ. ची औषधे वेळेवर द्यावी. डॉ. ना विचारून ठेवायचे ताप उतरायच औषध किती किती वेळाने द्यावी ते. वजन आणि वय यावर औषधांचा डोस ठरवतात म्हणून. ताप आल्यावर थर्मामीटरने मोजून त्याची नोंद करून ठेवावी. ताप किती वेळाने उतरला याचीही नोंद करावी. याची कल्पना डॉ. ना द्यावी म्हणजे निदान करायला बरे पडते.

पाणी थोड्या थोड्या वेळाने पाजतच रहायचे , खिमटी खात असेल तर द्यावी, दूध शक्यतो नकोच. थंड पदार्थ टाळावेत.

निर्मयी..
सॉरी उशीरा दिसली पोस्ट.
इयर इन्फेक्शन नाही ना यात खुप वेदना होतात.
इयर इन्फेक्शन लहन वयात सर्दी झाल्यानंतर ७ ते १० दिवसाने होते आणि १० दिवस चालते.
यात जास्त ताप आणि वेदना होउन मुले अस्वस्थ होउ शकतात.
परत परत सर्दी होत असेल तर हात सतत धुणे कोमट पाणी पिणे या गोष्टी पणकरत रहा, दुसरा काहिच उपाय नाही.

माझ्या बहिणीची मुलगी दीड महिन्याची आहे ती सारखी आपली जीभ बाहेर काढत असते झोपल्यावर सुद्धा. हे काळजीकरण्यासारखा प्रोब्लेम आहे का कि नॉर्मली मुले अशी करतात

लहान बाळांना विक्स चा वाफारा कसा द्यावा? नेब्युलाइझर म्हणजे नक्कि काय असते? त्याच्यासारखा घरच्या घरी काय उपाय करता येइल?

निर्मयी.
तुमची मुलगी 4 वर्षाची आहे का? तीला सर्दी आहे की कफ? नेब्यूलायसर हे एक वाफ (औषध मिश्रीत) घ्यायचे मशिन आहे. त्यात तुम्ही डॉ. नी दिलेले मेडीसीन व पाणी मिक्स करून टाकू शकता. त्याबरोबर एक मास्क येतो जो नाक व तोंड कव्हर करतो. मशिन चालू केल्यावर ते औषध डायरेक्ट नाका व तोंडावाटे लंग्समध्ये जाते ज्यामुळे कफ किंवा सर्दी मोकळी होऊन श्वास घेणे सोयीचे होते. याने बराच फरक पडतो ते मशिन साधारणपणे 3 ते 4 हजारापर्यंत येते. मेडिकल मध्ये मिळते.

माझी मुलगी ९ महीन्यंची आहे. मी तिला डॉ कडे घेउन जाते आहे नेबुलायझर साठी पण ते नीट घेत नाही आणि फक्त नेबुलायझर साठी नको वाटते सारखे डॉ कडे तिला घेउन जायला. तिला ब्रोन्काएटीस झाला आहे.

निर्मयी.
डॉ. कडे सारखे घेऊन जाण्यापेक्षा हे मशिन विकत घेतलेले बरे कारण त्याचा फायदा होतोच पण डॉ कडचे मास्क आधी ब-याच मुलांसाठी वापरलेले असतात त्यामुळे फायदा होण्यापेक्षा इन्फेकशनचा पण संभव असतो. आणि लहान मुलांना घरच्याघरी गरम पाण्याची वाफ देणे जरा कठीणच काम असते. त्यापेक्षा मशिन बरेच सुरक्षित आहे. मला स्वतःला ब्रोन्काएटीस असल्यामुळे आम्ही मशिन विकत घेतली आहे.

माझ्या भाच्याला सर्दीसाठी काल डॉ. नेले असता डॉ. ने त्या tongue tie ची सर्जरी करावी लागेल असं सांगितलेय. आणि त्यासाठी फोर्टीस सुचवलय. भाचा दीड वर्षाचा आहे. सर्वात प्रथम आम्हाला असं काही असतं हे पहिल्यांदाच कळलय. भविष्यात 'र' किंवा तत्सम शब्द वगैरे बोलताना त्रास होईल म्हणून सर्जरी. पण आम्हाला सध्या तरी त्याच्या बोलण्यात काहीच प्रॉब्लेम जाणवत नाही आणि सध्या तरी तो 'र' असलेले शब्द नीट बोलतोही.
नेटवर शोधले तर सगळीकडे सर्जरी विषयी लिहलय. पण सर्जरी शिवाय ह्यावर काहीच उपाय नाही का आयुर्वदिक वगैरे? सर्जरी करायचीच झाली तर दुसरं डॉ. चे मत घ्यावच लागणार.

याविषयी ईथे कुणाला अधिक माहिती आहे का?

जाजू निमोला तू कोणत्या डॉ. कडे नेतेस?

hii mazi mulgi 12 diwasachi ahe....te ratri bilkul zopat nahiye....tine ratri thode far zopave yasathi me kay karu......tasech tila feed kele ki naka madhun dudh baher yete....tari amhi tila feed kelya nanter 25-30 min ubhe dharun dhekar kadhto....pls help me

एक मैत्रिण,
काहि नको करू तो झोपावी म्हणून. ती स्वताच scedule बद्लेल थोड्या दिवसांनी. तू झोपत जा ती झोपते तेव्हा. ढेकर नीट निघत नाहिये बहुतेक तिचि म्हणुन ती बाहेर काढतिये.
आपल्यालाच हळू हळू अन्दाज यायला लागतो. मला बळाला हलक डोल बाइ डोल करून ढेकर कढायला जमायची पण माझे सासरे खान्द्या वर टाकून पटकन ढेकर काढून द्यायचे.
best luck.
अजून आठ्वड्या भरात छान routine बसून जाइल तूमच.
-शिरीन

एक मैत्रीण माझ्या मुलाला अशीच सुरुवात होऊन उलट्या वाढत गेल्या आणि डॉक ने अ‍ॅसिड रिफ्लक्स सांगितले. अजूनही त्याला थोडा त्रास होतो (वय सव्वा वर्ष) डॉक ला विचारा. घाबरवण्यासाठी नाही सांगत त्रास कमी व्हावा म्हणून सांगितलं.

la feed kele ki naka madhun dudh baher yete.>>> झोपुन फिड करता का? शक्यतो अजुन तरी तसे नका करु. बसुन बाळाला मांडीवर घेउन करा. पाठीची वाट लागते आपल्या पण पर्याय नाही.

माझी मुलगी ४ वर्षाची आहे.आभ्यासमधे oral फार aavdine karte pan written la far kantala karte. phile ti eka tution madhe hoti tithe ti sarvat lahan aslyakarnane far lad hot ase. Ti aabhayas hi karayachi.pan mi jabardastine dusrya tution madhe pathavali.pan ticha aabhyasacha sarva moodch gela.ti radkundila yete jeva tution la jayache asate teva. Ani atta abhayas kartana kontyatari vicharat magna aste. Most of time conffuse aste. mi tila tya tution madhun hi kadun takle ahe,

Aatt tichya abhasat godi nirman karnaysathi kay karu? Doctors shi consult kel tar te mhanale ass hot Asat.mala ticha chehara baghavat nahi.mala ti khelkar havi aahe.

Pls suggest
( sorry Marathi nahi lihitayet Pryatna kela Pan mala je lihayache ahe te lihitach yet navate)

अमिता, ट्युशन बंद केलीत हे बरे केले.
ती अजून खूप लहान आहे. अभ्यास घेताना जरा तिच्या कलाने घ्या. जास्त रागाऊ/मारू नका. काही आमिषं दाखवून किंवा खेळताखेळता अभ्यास करून घ्या.
शाळेतल्या तिच्या टीचरशीही बोलून घ्या. शाळेत तिचे वागणे कसे आहे? शाळेत अभ्यासाची जास्त बळजबरी होते आहे का ते बघा. तिने पाच दिवस नीट अभ्यास (तोही फक्त अर्धा तासभरच) केला तर दोन दिवस 'नो अभ्यास' वगैरे सांगून बघा. ते दोन दिवस तिला मनसोक्त खेळू दे.

चार वर्षाच्या मुलीला ट्यूशन ? दिवसातून किती वेळ शाळेत जातो, अन किती वेळ ट्यूशन मधे जातो ? दोन्ही कडे गृहपाठ मिळत असेल Sad . किती त्या लहान जिवाला त्रास!

चार वर्षे हे काय स्वतःहून मन लावून अभ्यास करायचं वय आहे का ? आतापासून तिला अभ्यासाचं दडपणच वाटेल अशाने.

तिच्या कलाकलाने थोडा थोडा अभ्यास करून घ्या. आकडे, अक्षरओळख , वाचायला शिकणे हे सर्व अभ्यास न वाटू देता पण शिकवता येते.

Pages