लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

भारतातल्या डॉकनी २ चमचे Pediasure १ ग्लास दुधात घालून मा॑झ्या मुलाला द्यायला सांगितलं आहे, दिवसातुन २ वेळा. पण Pediasureच्या डब्यावर ५ चमचे Pediasure १ ग्लाससाठी सांगितलं आहे आणि ते पण पाणी घालून. आता यातलं नक्की कोण बरोबर?

सुमु अगं त्याला दात येताहेत का? दात येताना मुलं अशी चिडचिड करतात आणि खात नाहीत. गॅस झाला आहे का बघ.थोडे मधाचे बोट चाटव किंवा खडीसाखर दे तो रडायला लागला की!! माझे सा.बु. असे करायचे..माझ्या मुलाला.

thank yes he is have teeth.

one this he his having month to month could & sound in his noise so what should do stop for this cold

I am giving every day balguti with mamra badam, black kharik, myfal, jaifal, ashvagandha, it ok or not

Your earlier reply help for me.

भारतातल्या डॉकनी २ चमचे Pediasure १ ग्लास दुधात घालून मा॑झ्या मुलाला द्यायला सांगितलं आहे, दिवसातुन २ वेळा. >>>>>>>>>>>>> माझ्या मुलीला सुध्दा २ चमचे १ ग्लास दुधात २ वेळा सांगितले आहेत आणि मी देते आहे.

नाचणी मिळत असेल तिकडे तर ती दे. गुळपापडी देऊ शकतेस.सर्दीसाठी सितोपलादी चूर्ण मिळत असेल तर ते मधाबरोबर दे.

i am giving balguti as below it is correct

Mamra badam, Ashwagandha, kakdshingin, sunth, jeshtimadh, myfal, kala kharik,

Kindly give me the answere

सुमु इथे दोन वर्षापरेन्त च्या बाळाचा आहार नावाचा बाफ आहे तिथे पण बघा उत्तम माहिती मिळेल. वरील सर्व औषधे प्रमाणात आहेत ना नाहीतर बाळाला कड्क पड्त असेल का ते चेक करावे.

माझी मुलगी सव्वा वर्षाची आहे. तिचे वजन मागील आठ्वड्यात एकदमच घटले.
ती खुप खेळकर झाली आहे आणि किरकिर पण फार करते.
तिचे जेवण तिला पुरेसे नाही काय?
आणखी काय बदल करता येइल?
आता ती सकळी नाचणी खीर खाते, दुपारी अर्धी दुध पोळी.
सन्ध्याकाळी खीर
आणि रात्री वरण्-भात.
दुध २ दा घेते.. दुपारि न रात्री झोपताना.
तिला सतत सर्दी होते.. आता तर खोकला पण वाढला आहे.
काही receipe, menu असतील तर pls सान्गा.

सुरश्री ,
स्नेहा ला अनुमोदन.
शिवाय नाचणी थन्ड असते. कफ , खोकला असेल तर दुध ही जास्त द्ययला नकोय. शिवाय जे दुध देताय त्यात हळद / सुन्ठ घलुन पहा.
भाज्या आणि फळे याचा आवश्य समावेश असावा.
परठे सुप अशा कोणत्याही प्रकारात भाजी देता येइल.

माझी मुलगी ५ महीन्यांची आहे.तिला गेले ८-१० दिवसांपासुन हवामान बदलांमुळे सर्दी-खोकला चा त्रास सुरु आहे.पातळ हिरवी शी पण दिवसातुन ४-५ वेळा होत होती.
डॉक नी antibiotics (झिफि ५०)चा डोस ५ दिवस साठी दिला तो आता संपला आहे.
आता शी चा हिरवेपणा कमी आहे पण अजुनी दिवसातुन २-३ वेळा पातळ च होते आहे.
तसेच आता सर्दी वाहायला सुरुवात झाली आहे.
तिला ताप वगैरे काही आला नाही.तसेच अंगावरचे दुध आणि डाळ-तांदुळ पेज(दिवसातुन ३ दा) व्यवस्थित घेत आहे.खेळते आहे.झोप पण नीट आहे.
पण मला तिच्या जुलाबांमुळे जरा काळजी वाटते आहे...जुलाब करताना फेस येतोय आणि शी ची जागा लाल झाली आहे...त्यासाठी डॉक नी cream दिले आहे...तो फेस acidic असतो म्हणे.

यावर घरगुती काही उपाय आहेत का?
कफा मुळे पातळ हिरवी शी होते हे ऐकले आहे मी . हे खरे आहे का?
प्लीज मला मदत करा.

स्मिता, काळजी करु नकोस पण नीट लक्ष ठेव.
नुकताच ताप्/सर्दी होउन गेली असेल तर बाळाचे पोट्/पचनशक्ती बरी व्हायला जरा जास्त दिवस लागतात. पोटात गेलेले अन्न नीट न पचल्याने हिरवी शी होउ शकते. तसंच तो औषधांचा परिणाम असु शकतो.
तिचे वय पाहता ही दात येण्याची टिपीकल सुरुवात असु शकते.
झोप, जेवण आणि खेळणे नीट आहे तर फक्त लक्ष असु देत.

बालगुटी देत असशील तर त्यातला सुंठ, बाळहिरडा, जायफळ, अतिविषा हे उगाळून दे.
मध देत असशील तर गुटी मधाबरोबरच दे.
तेल लावून गरम पाण्याने अन्घोळ घाल, गुंडाळून ठेव. दिवसभर गरमच कपडे घालुन ठेव.
पेजेमध्ये किंचित सुंठ पावडर घाल.
शीच्या जागी वॅसलीन्/तूप लाव.
जुलाबाने गळून जात नाहीये ना हे पाहा, असल्यास किंचित खडीसाखर घालून उकळलेले पाणी मधुनमधुन देत राहा.
गुड लक Happy

ज्ञाती,

अग तिची सर्दी अजुनी चालु आहे.खोकला पण होता..आता कमी झालं आहे दोन्ही...
आणि दात येत असताना असेच हिरवे-पिवळे जुलाब होतात का?
गेले काही दिवस ती दिसेल ती वस्तु कचाकचा चावायचा प्रयत्न करते आहे. हिरड्या शिवशिवत आहेत.
जर हे जुलाब दातांमुळे असतील तर असा त्रास अजुनी किती दिवस होउ शकतो?

दिसेल ती वस्तु खाण्याने अपचन होत असेल का?
तरी मी खुप लक्ष ठेवते तिच्याकडे.खेळणी धुवुन देते आहे.
"डेन टॉनिक" या औषधाचा कोणाला अनुभव आहे क?
माझी आई म्हणाली की तिने माझ्यासाठी वापरले होते व फायदा झाला होता.पण डॉक म्हणतात की काइ उपयोग नाही त्याचा...काय करु मी नक्की ? Sad

स्मिता, डेन-टॉनिकचा उपयोग होतो. तसेच तीच्या हिरड्यांना डिकेमलीची पावडर दिवसातुन २ - ३ वेळा चोळ. त्यानेहि हा त्रास कमी होतो. मी हे माझ्या मुलीला केलेले तीला अजिबात त्रास झाला नाहि. तसेच तीला ३-४ महिन्यापासुनच नाचणी सत्व देत होते त्यानेहि फायदा झाला.

मी_सखी, धन्यवाद.मी सुरु करीन आता डेन टॉनिक्.शेवटी आई चा अनुभव महत्वाचा Happy
अग नाचणी सत्व आत्ता देउ शकत नव्हते कारण अजुनी थंडी आहे ना....पण आता सुरु करीन हळुहळु.

खुप धन्यवाद सगळ्याना.

मी_सखी, धन्यवाद.मी सुरु करीन आता डेन टॉनिक्.शेवटी आई चा अनुभव महत्वाचा Happy
अग नाचणी सत्व आत्ता देउ शकत नव्हते कारण अजुनी थंडी आहे ना....पण आता सुरु करीन हळुहळु.

खुप धन्यवाद सगळ्याना.

माझ्या मुलीला गेले काही दिवस संपूर्ण अंगावर लाल फोड येत आहेत (पित्ताच्या गांधी उठतात ना तसलाच काहीतरी प्रकार वाटला) पण हे फक्त तिने खाजवले तरच येतात आणि क्रिम, तेल काहीतरी लावले की तासाभराने गायब होतात. यावर उपाय काय? काही चावले म्हणावे तर अंगात सतत फुल बाह्यांचे कपडे/पॅन्ट असतेच. असे का होतंय काही कळत नाही. आमसुलाचे पाणी लावतात असे ऐकलेय, कोणाला काही माहित आहे का?

मला सल्ला हवा..

माझी मुलगी सगुणा ३ वर्षांची आहे. गेले दोन तीन दिवस आम्ही प्रवासात होतो. बहुतेक पाणी कमी प्यायले गेले. थंडी भरपूर होती म्हणून.
कालपासून तिला सुसू कंट्रोल होत नाहिये. तिला लक्षात येऊन सांगेपर्यंत झालेली पण असते. आणि एका वेळी खूप थोडी होतेय. शिवाय 'कडक कडक सू ' होतेय असं म्हणतेय ती. ( तिला कडक शी आणि त्याने होणारा त्रास माहितय) हे इन्फेक्शन असावे का ?
आत्ता जिर्‍याचं पाणी सुरू करतेय. अजून काय करू ? कॉन्स्टिपेशन किंवा ताप दोन्ही नाही. खातेय नीट आणि खेळतेय पण.

मितान, पाणी कमी प्यायल्यामुळे उष्णता झाली असेल. माझ्या मुलीलाहि उन्हाळ्यात असा त्रास व्ह्यायचा. तीला बार्लीचे पाणी दे लगेच फरक पडतो.

मितान, थंडीत शू कमीच होते एकंदरीत. तू नुसतं जिरं नको, धने पण घाल पाण्यात. आणि डॉक्टरला दाखव, युरीन इन्फेक्शन असेल तर डॉक्टरी इलाज झालेले बरे.

मंजूडी, बहुतेक तिला कळ येऊन शू होतेय. सांगता येत नाहिये. एरवी थंडीत होतो तसा प्रकार नाही हा..

धणे पण घालते गं आता..
धन्स..

Pages