गणेशोत्सवानिमित्ते पोस्टर- मंत्रवत आरत्यांची परवड थांबवा

Submitted by limbutimbu on 7 September, 2011 - 02:09

Poster yogya Arati mhaNaa 2011.JPG

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात आरती मधील शब्द सौंदर्य, उत्कट भावना हे सारे त्या त्या उत्सवाच्या निमित्ताने समजावून सांगायचे सोडून उगा - 'तुमचे २ काने मात्रे चुकले, अशाने धर्म भ्रष्ट होणार' अस्ले हाकारे मारु नयेत असे वाटते.
आरती समजावून सांगावी, कुणी लिहिली ते सांगावे. गणपतीच्या आरतीत 'दास रामाचा' का येतो? हे बर्‍याच लोकांना ठाउक नसते.

लिंबूभाऊ,

मुद्दा पटतोय पण असे जास्तीचे शब्द घातल्याने "मोडतोड" होते का हे नक्की ठरवता येणार नाही. अर्थात गेयता, मात्रा वगैरे निकष ठेवले तर सम मात्रा असलेल्या वृत्तात अजून अधिक सम मात्रांची (शब्दांची) भर घातली तर काही मोडायचे वा तुटायचे शक्यता कमीच आहे Happy पण मग त्या न्यायाने सर्वच मूळ गीते, रचना, ओव्या सुध्दा जास्तीच्या शब्दांसकट "खपतील"..
तांत्रिक दृष्ट्या खरे तर आजकालच्या प्रताधिकार-पोलिस जमान्यात "ध" चा "मा" केला तरी कायदेशीर खटला दाखल करता येईल. (बहुतेक सर्व मूळ आरत्या, ओव्या रचलेले संत आता हयात नाहीत- तेव्हा खटला ऊभा राहणार नाही) पण मुळात जे "ओरीजीनल आहे" ते तसेच राहू द्यावे असा संकेत पाळायचा आग्रह मला गैर वाटत नाही. बाकी भक्तीभाव, सामुहिक मानसिकता वगैरे वगैरे सर्वच "सापेक्ष" सदरात असल्याने त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.
पण याच गणेशोत्सवात ईथे लिहील्या गेलेल्या, गायला गेलेल्या गीत, आरती, ईं, मध्ये वरचे शब्द घुसडून तसे म्हटले तर त्याने गेयता नाही तरी मूळ रचनेच्या गाभ्यास धक्का लागेलच.. तसे केलेले जर आजच्या कवी, संगीतकार ई. ना चालत नसेल तर पूर्वीच्या संतांच्या रचनेत तरी का बदल करावे?
परदेसाई म्हणतात तसे मग आता आरत्यांचे रिमीक्स देखिल तूफान फेमस झाले तर काय करायचे? Happy

अर्थात "आता मनाचा दगड घेतो कण्हत ऊशाला" अशा ओळी तशाच ठेवून तरिही त्यास समर्पक चाल, संगीत वगैरे देणारे हृदयनाथ एकच असल्याने बाकी ईतरांना शब्दांची घुसड, जोड तोड करायची तेव्हडी मुभा द्यायला हरकत नाही असे माझे मत Happy

दोन्ही बाबतीत देवाला राग येणार नाही असे गृहीत धरुया!

लिंबूभाऊ,

एक विनंती करू का? तुम्ही सर्व लोकप्रिय आरत्या, त्यातले प्रक्षिप्त/घुसडलेले शब्द्/पंक्ती काढून त्यातल्या मूळ शब्दांसकट, इथे प्रसिध्द कराल का?

माझी आजी आरती अशी म्हणायची.

ओवारा ओवारा माज्या सग्दुरू राना, माज्या सावर्‍या राना
पाचाही तत्वाच्या जोती तपासल्या राना

निराकार वस्तू कयसी आकारा आली
सरवा घुटी सापक माजी सगदुरू मावली

सोरासांडे बाहात्तर कोठुड्या खाया रन्चली
नवखिडक्याचा ढोल हात मुर्ती बयसवली

सप्टे सागराचा यडा कयसा घातला
तुका म्हने बाप माजा कनवड ववाडा

ती आरती अशी वृत्त, व्याकरण, आशय व महत्वाचे म्हणजे प्रमाण भाषा वगैरे काहीच न पाळताच म्हणायची.

म्हणून मग ती नरकात गेली असेन काय ब्बॉ. Happy

की, ही आरती ऐकताना तो साक्षात विठोबाच चक्कर येऊन पडला असावा? Happy

>>>मास्तुरे | 7 September, 2011 - 21:57 नवीन

लिंबूभाऊ,

एक विनंती करू का? तुम्ही सर्व लोकप्रिय आरत्या, त्यातले प्रक्षिप्त/घुसडलेले शब्द्/पंक्ती काढून त्यातल्या मूळ शब्दांसकट, इथे प्रसिध्द कराल का?
>>>

महोदय,
प्रक्षिप्त/घुसडलेले शब्द्/पंक्ती कोणत्या हे कशाच्या आधारावर ठरवायचे? रेवडीवाल्यास गंडेरीवाला साक्ष या न्यायाने काय? तसे असल्यास समस्त मानव जात लवकरच 'शुद्ध' झाल्याशिवाय राहणार नाही.

<<<<ती आरती अशी वृत्त, व्याकरण, आशय व महत्वाचे म्हणजे प्रमाण भाषा वगैरे काहीच न पाळताच म्हणायची.

>>>>

'आशय न पाळता' म्हणजे काय? आशयच पाळायचा नसला तर काहीही म्हंटले जाईल. आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतो.

<<<म्हणून मग ती नरकात गेली असेन काय ब्बॉ. >>> हे विधान उपहासात्मक आहे, मात्र 'आशय न पाळणे' असे विधान आधी केले गेल्यामुळे हे विधान निरर्थक ठरावे.

<<<<की, ही आरती ऐकताना तो साक्षात विठोबाच चक्कर येऊन पडला असावा?>>>>

विठोबा या महाराष्ट्राच्या प्रथम दैवताबाबत असा हीन उल्लेख तिरस्करणीय असून त्याचा निषेध नोंदवत आहे. एखाद्याच्या आजीमुळे (आजीच्या आशय 'नसूही' शकेल्या आरतीमुळे) विठोबाला चक्कर येणे ही अतर्क्य घटना आहे व ती नोंदवताना सारासार विचार न केला जाणे हे पंढरपूर येथील घटनेच्या प्रताधिकाराविरुद्ध असू शकेल. त्या घटनेनुसार विठोबाला चक्कर कधी यावी हे इतर कोणी ठरवू शकत नाही असा समज पसरल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. हे विधान वारकरी समाजाला कळवण्याची वृत्ती बालीश, चुगलखोर व नकारात्मक असल्याने कळवण्याची तसदी घेत नाही आहोत.

विठोबाला चक्कर येणे हा उल्लेख पाहून मी संतप्त झालो आहे.

-'बेफिकीर'!

@ बेफिकीर!
महोदय,
मला वाटते, की मुटे महोदयांनी त्यांचे पोस्ट तुमच्या समर्थनार्थ लिहिले होते. फक्त त्यात उपहास अलंकार वापरला होता...
असो.

<<<<इब्लिस | 7 September, 2011 - 14:48 नवीन
@ बेफिकीर!
महोदय,
मला वाटते, की मुटे महोदयांनी त्यांचे पोस्ट तुमच्या समर्थनार्थ लिहिले होते. फक्त त्यात उपहास अलंकार वापरला होता...
असो.>>>>

इब्लिस साहेब, माझे समर्थन मी स्वतःही करत नाही तिथे बाकीचे काय करणार? ज्या क्षणी जे वाटते ते बोलणारा एक 'बेफिकीर' मी!

-'बेफिकीर'!

आणखीन एक स्फोटक (पण अजूनतरी स्फोट न झालेला ;)) धागा -
काय फरक पडतो..
"असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तयाच्या मनी देव तैसा" हेच खरं..
हे विसरून तुम्ही त्याला "हो श्रीमंगलमूर्तीच का म्हणलं" आणि "अहो" च का नाही म्हटलं असल्या वादात अडकलात तर कसं व्हायचं हो.. डोळे मिटून मंगलमूर्तीला आठवावं त्यापेक्षा - त्यानं संतानी काय सांगितलं ते आपल्याला समजण्याची शक्यता जास्त आहे!
आमच्या धर्मग्रंथात एक अक्षरही बदल चालणार नाही (भलेही ते कितीही कालबाह्य असो!) असं म्हणणार्‍यांच्यात आणि तुमच्यात काय फरक?
ज्या संतांनी समाजातल्या सगळ्या आंधळ्या रुढींवर कोरडे ओढले, तत्कालीन समाजाच्या/चालीरितींच्या विरोधात जाऊन समाजसुधारणेचे प्रयत्न केले - त्याच संतांच्या नावाचा वापर तुम्ही त्यांच्या सांगण्याविरोधातल्या गोष्टी करायला करताय ह्याचं वाईट वाटलं! असो!

ज्या संतांनी समाजातल्या सगळ्या आंधळ्या रुढींवर कोरडे ओढले, तत्कालीन समाजाच्या/चालीरितींच्या विरोधात जाऊन समाजसुधारणेचे प्रयत्न केले>>संतांच्या ताजमहालाला इतरांच्या विटा नको असे सांगायचेय लिंब्याला बहुतेक. नेहमीसारखे स्वगत करण्यामधे मूळ मुद्दा बाजूला राहिलाय त्याचा.

मला दोन्ही बाजू पटतात पण सहज प्रूफ म्हणून आपण जुने ग्रंथ, पोथ्या - अगदीच जुने बर का, पुरातत्व खात्यात जतन केलेल अस काही - की जिथे आरतीच मूळ लेखन असेल. आता अगदी रामदासांच नाही पण नजिकच्या काळातले उल्लेख सापडले तर त्या नुसार आरती म्हणावी. माबो वरचे चिनूक्स वगैरे जाणकार यात मदत करु शकतील.
मला आठवतय तस मी माझ्या आजी-आजोबांकडून आरत्या म्हणायला शिकले. त्या लिंबुभाउ म्हणत आहेत तशाच "शुद्ध" होत्या. पण आता मित्रमैत्रिणींबरोबर majority ने आणि मोठ्या आवाजाच्या भटजी लोकांमुळे Happy कशाही आरत्या म्हणतो आम्ही. Happy एक आहे की लहानपणी येणारी मजा अजुनही कमी नाही झाली किंवा नवीन शब्दांमुळे कुठे चूक वाटली नाही. हे खरच. सो भाषेच्या प्रवाहातील बदल म्हणायचा आणि आपल आपण ठरवायच. संताची मूळ वचन बदलु नयेत हे पुरेपूर पटत. पण मूळ काय याचा पुरावा नको. Happy

लिंबूटिंबू,

तुम्हाला शंभर टक्के अनुमोदन! संतांच्या रचनेत (शब्द + चाल) ईश्वरी चैतन्य असतं. या रचनेत बदल केला तर चैतन्यानुभूती येत नाही किंवा खंडित अनुभूती येते. आरत्या गाण्याचा मूळ उद्देश गेयता राखणे हा नसून भक्ताची देवतेशी तादात्म्यता होणे हा आहे.

म्हणून संतांच्या रचना जश्याच्यातश्या ठेवणे इष्ट!

आ.न.,
-गा.पै.

तर स्वतः आरती रचावी अन म्हणावी,
अहो कैच्याकै काय सांगता भारतीयांना? जे आयते मिळते ते घ्यायचे हा भारतीयांचा स्वभाव आहे. निदान भारतात असेतो. भलेहि परदेशात जाऊन हॉट मेल नि इतर काही क्रांतिकारी गोष्टी करतील, पण परदेशात!! भारतात नाही.

स्वतः रचायचे, तर आरत्या कशाला? त्याहि मराठीत? ह्या:!! बिहारी, यूपी वाल्यांना समजणार आहे का?
'तरहि' गझल, हायकू असे काही तरी लिहीतील, उर्दू, हिंदीत. लिहीलेच एखादे भजन तर त्यात 'बल्ले बल्ले, रब्बा, रब्बा, या अल्ला, ओ बेबी,' असे काही काही घालून एकदम आयटेम साँग होईल असे लिहीतील.
गणेशोत्सव सुरु केला लो. टिळकांनी तेंव्हा त्यांचाहि उद्देश धर्माचरण केवळ निमित्त करून समाजात जागृति, एकीकरण करावे हा होता. त्यामुळे धर्म कमी, उत्सव जास्त ही भावना होती. शिवाय नाहीतरी आजकाल आरती वगैरे कोण जास्त म्हणतात? जास्तीत जास्त वेळा तुम्हाला मुन्नी बदनाम हुई, शीला की जवानि हेच ऐकू येईल बघा. ते निरनिराळ्या चालीत, फरक करून, वाईट आवाजात वगैरे म्हंटले तर काही फरक पडतो का? आजकाल गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे दारू पिऊन धिंगाणा, गर्दीत बायकांची छेडछाड करणे असा आहे. आरती वगैरे उगीचच. फारच आग्रह केलात तर आरत्या म्हणणारच नाहीत! नसती झंझटच नको भटाची!!

तेंव्हा पाणी जास्त झाले तरी पालथ्या घड्यावर टाकू नका, घडा सरळ करून मग त्यात टाका. उपयोगी पडेल.

>>>> तेंव्हा पाणी जास्त झाले तरी पालथ्या घड्यावर टाकू नका, घडा सरळ करून मग त्यात टाका. उपयोगी पडेल. <<<<< हे मान्य Happy
मायबोलीवर हा विषय मान्डला हीच चूक झाली.

@ लिम्बुतिम्बु:
महोदय
इथे काहीही मांडणे चूकच असते. चला. उशीराने का होईना तुम्हास याची जाणीव झाली.

तुम्हाला दुसरी बाजू असते हे मान्यच करायचं नसेल तर कुठल्याही पब्लिक फोरम वर विषय न मांडणच चांगलं!
Light 1

काय बोलणार! "गालीब तुने तो पी ही नही" सारखी अवस्था! Happy
आईनं एक मस्त बोधकथा सांगितली ह्यावर, वेळ मिळाला तर टाकेन इथे!

तुम्हाला दुसरी बाजू असते हे मान्यच करायचं नसेल तर कुठल्याही पब्लिक फोरम वर विषय न मांडणच चांगलं!
दिवा घ्या ->>> दिवे देण्याची काssssssssही गरज नव्ह्ती.

तुम्हाला दुसरी बाजू असते हे मान्यच करायचं नसेल तर कुठल्याही पब्लिक फोरम वर विषय न मांडणच चांगलं!
दिवा घ्या ->>> दिवे देण्याची काssssssssही गरज नव्ह्ती.

>>>> तुम्हाला दुसरी बाजू असते हे मान्यच करायचं नसेल तर कुठल्याही पब्लिक फोरम वर विषय न मांडणच चांगलं! <<<<
अगदी बरोबरे नानबा, याच प्रश्नाला काय? पण जक्कलसुतार झालच तर तो लागू, रामनराघव अन आत्ताच्या अफजलगुरु-कसाब वगैरे खुन्यान्ची देखिल दुसरी बाजू आहेच की! Proud मान्डणारे ती देखिल मान्डतातच, वाचणारे चवीचवीने, उसासत वाचतातही, पण, अशा प्रकारे प्रत्येक बाबीला दुसरी बाजू असली तरीही, मूळ रचना आचरटासारखी तोडून-जोडून म्हणणे कितपत योग्य हा प्रश्न उरतोच, त्यातही वैयक्तिक म्हणत बसला तर कोण विचारणारे? पण हिन्दू धर्मियातील सामुहीक प्रार्थनेचे हे एकमेव बहुप्रसारित शिल्लक रुप देखिल एक शिस्तीत म्हणले जात नाही त्यात काहीच अयोग्य वाटत नसेल, तर तसे स्पष्ट सान्गण्या ऐवजी "दुसर्‍या बाजुची" ढाल पुढे का करावी बरे? अन योग्य तारतम्याविना अशी ढाल पुढे होते म्हणूनच तर वरील उदाहरणातील अफजल/कसाब सारखी माणसे देखिल "दुसर्‍या बाजुची" ढाल पुढे करुन सर्वोच्च फाशीच्या शिक्षेविना राहू शकतात, अन याला आम्ही आमची "सहिष्णूता" म्हणावे अशी अपेक्षा?

पण हिन्दू धर्मियातील सामुहीक प्रार्थनेचे हे एकमेव बहुप्रसारित शिल्लक रुप देखिल एक शिस्तीत म्हणले जात नाही

अगदी बरोबर.. हिंदु धर्मात वैयक्तिक उपासनाच जास्त आहेत. आरती हे एकमेव सामूहिक रूप

गणपतीची मूर्ती चित्रविचित्र रूपांत सादर करणे, तिच्यासमोर गणेशपूजेशी काहीही संबंध नसलेल्या गाण्यांची आवर्तने आणि मिरवणुकीत मद्यपान करून नाच, एका जागी अर्धा अर्धा तास बँडचा गदारोळ यापेक्षा आरत्यांमध्ये वेगळे शब्द घुसवणे हे जास्त वाईट आहे का?
लोकांना आरत्या म्हणता येतात आणि आरत्या म्हणायला लोक येतात एवढ्यानेच बाप्पा समाधान मानून घेत असेल.

भरत, तेवढेच, किम्बहुना त्यापेक्षाही जास्त वाईट आहे असे माझे मत.
तू वर्णन केलेल्या गोष्टी करणारे निदान उघडपणे शेण खातात, पण कळतवानकळत अनाधिकारात आरतीची मनमानी तोडमोड करणारे अप्रत्यक्षरित्या तोच तसाच अधिक्षेप करीत असतात असे माझे मत. किम्बहूना, या अशा प्रकारच्या मूलभूत शिस्तीचा अभाव असल्यानेच तू म्हणत असलेल्या बाबी उत्सवात झुन्डशाहीच्या/बहुमताचा जोरावर घुसलेल्या आहेत.
येत्या काही वर्षातच कशाला, उद्याच असाही युक्तिवाद वावदूक काढतील की लेको, तुम्हाला साधे तुमच्या बुद्धिच्या दैवताचे आरतीरुपी पूजन एकसारखे जसे रचलेय तसे करता येत नाही तर कशाला सान्गताय बाकीच्या गाण्याबजावण्याच्या अन पिण्याच्या गमजा? नै का? (मागे इकडेच कुठेतरी "हळदीकुन्कवाला" "ड्रिन्क्स" सर्व्ह करावी का असा विषय झाल्याचे पुसटसे आठवते Proud आता हळदीकुन्कू काय की गणपती काय, फरक काय पडतो? नै का? देव काय मानगुट धरायला येतो का नरड्याखाली घोट उतरताना? Proud देव तर काय फक्त भावाचा-भक्तिचा भुकेला, तुमच्या मनात भाव-भक्ति असली म्हणजे झाल, मग ती असताना काहीही बेशिस्त कृती केली तरी बिघडत नाही असा आवेश! चालायचेच! हिन्दू आहोत ना आम्ही? त्यातुन भारतातले...... )

लिम्बूभौ, तुमचा मुद्दा काही पटत नाही बुवा. एकतर यात आरतीची मोडतोड नाही आहे. केवळ ठेक्यासाठी केलेली काही शब्दांची वाढ आहे. त्याला एवढा गंभीर विषय बनविणे काही पटत नाही.
मयेकर म्हणतात त्या गोष्टी जास्त गंभीर आहेत. गणेशोत्सव हे नवयुवकांना चौखुर उधळायला मिळालेले मोकळे रान झाले आहे. ध्वनीवर्धकांचा दणदणाट, अनेक देवाधर्माशी संबंध नसलेल्या फालतू गाण्यांचा सुळसुळाट आणि दारू, विडी काडी मधे वर्गणीच्या पैशांचा होणारा खणखणाट या सर्वांना आळा कसा घालता येईल (पक्षी हे सर्व बंदच होऊन याचे चांगले स्वरूप कसे होईल) यावर चर्चा करावी का ?
यावर्षी कोल्हापूरच्या महिलांनी डॉल्बी ला सामुहिक विरोध करण्याचे ठरविले आहे. हे एक चांगले उदाहरण आहे.

मंत्रांचे मोठ्या संख्येने उच्चारण झाले तर त्यात ताकद येते, असे तुम्चे म्हण्णे असेल तर मग इस्लाम धर्म स्वीकारणेच योग्य नाही का? कारण त्यांची संख्याही मोठी आणि रोज पाच वेळा नमाज पढतात. Proud .. मराठीतील आरत्या फक्त म्हाराष्ट्रातले मूठभर लोक म्हणणार, त्यात किती ताकद असणार? नै का?

जागोमोहम्मदप्यारे! Proud

भटाने भटांसाठी काढलेला टुकार धागा.
ह्या आरत्यांमधे शब्द घुसडणारे कोण? भटच.......
आपण तर अशाच शब्द घुसडवलेल्या म्हणणार आरत्या.......
बाकी लिंब्याला ऑफीसमधून अ‍ॅक्सेस मिळाला वाट्ट.......

मुटेजींच पोस्ट आवडलं.. खर्‍या मनाने जो देवाला आळवतो ते खरा भक्त. व्याकरणात चुकला म्हणुन भ्क्ती कमी होत नाही.

तरिही लिंटींशी मी सहमत आहे, जेव्हा तुम्ही सार्वजनीक ठिकाणी आरती म्हणता तेथे ती योग्य प्रकारेच म्हंटली जावी. नाहीतर "तुझे कारणी देव माझा पडावा" असं लोक म्हणतातच. Happy पण जेंव्हा अक्षर ओळख नसणार्‍या वया पासुन आरत्या ऐकत आलो, ते पांठातर पण ऐकिवच, त्यामुळे बरेच श्ब्द चुकीचे उच्चारले जातात म्हणुन ते तसेच उच्चारत रहाणे चुकीचे आहे. लिंबूचे मत येवढे आहे की जिथे हे सुधारणे शक्य आहे तिथे तरी ते सुधारायला हवे. नाचायला रिमिक्स असले की मजा येते म्हणुन मुळ गाण कसं आणि काय याच्याशी आपल्याला काय घेण देणं, अस होता कामा नये.

रिमिक्स वाल्यांनी मुळ गितकाराला मुर्खात काढत सुटण्या सारख आहे हे.

असो... माझ्या घरी आरती एक दिड तास चालते त्या घरच्यांनी रचलेल्या आरत्या, पारंपारीक आरत्या, वेगळ्या चाली, अ‍ॅडीशन भरपुर, भरपुर आळवणं, आलाप, मुलांचा दंगा, टाळांचा गजर, ढोलकी... कुठल्याही गोश्टीचा अतिरेक न होण्याच भान ठेउन, मोठ्यांच्या कंट्रोल मध्ये हे लयबद्ध आणि शिस्तबद्ध चालू असतं... पण त्यात जी मजा असते... ती काय सांगू
पण हे सगळ घरापुरतच मर्यादीत असावं सार्वजनिक ठिकाणी आपली अ‍ॅडिशन करु नयेत या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे. सार्वजनिक ठिकाणी आचारसंहीता ही हवीच.. अगदी घरीही मुलांना मुळ रचना काय आहे हे समजवुन सांगणे आणि त्यांचा आदर असायला हवा हे मात्र नक्की.

लिंबू तुझ म्हणण पटलं या पुढे हे मी आचरणात आणायचा नक्की प्रयत्न करेन. आभार...

मला वाटले की चित्रगितांच्या चालीवर आरया,धार्मिक गित गायली जातात त्याबद्दल आहे की काय!

आणि वर म्हटलेय तश्या त्या आरत्या नाहीत का मग? आम्ही तर आमच्या बालपणापासून अश्याच म्हणत आलो आहे!
असो.

सत्यजित, धन्यवाद, तुम्हाला माझा मुद्दा नेमका कळला Happy
सध्या मी लिम्बीकरता देवीउपासनेकरता सुक्ते/गोन्धळ/आरत्या इत्यादिक सन्ग्रहाची पीडीएफ करतो आहे, तयार झाली की त्यातील आरत्या इथे जरुर देईन Happy [ए४ कागदावर वन बाय टू प्रिन्ट घेउन मध्यात दुमडुन स्टेपल करुन पुस्तक तयार होते, एका ए४ वर चार पाने बसवुन हा उपद्व्याप करतोय तिच्या भिशी मण्डळासाठी Happy ]

Pages