भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अरे मी आपण हा आख्खा दिवस आज खेळून काढू असे म्हणत आहे.
बघू या! नवीन बॉल घेतल्यावर काय दंगा करतात त्यावर आहे सगळं!

ऑनलाईन स्कोअर पाहिला - सचिन ९१. मिश्रा जस्ट आऊट झाला होता. लगेच जाऊन टी.व्ही. लावला. टी-टाईम संपवून खेळाडू पुन्हा मैदानात येत होते. म्हटलं आता सगळी कामं बाजूला ठेवून सचिनची सेंच्युरी बघायची... तर सचिन त्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला Sad
आता उरलेल्या २९ रन्समध्ये उरलेल्या ५ विकेट्स पडू शकतात Sad

माझे सर्व प्लॅन्स, स्ट्रेटेजी वाया गेले. असो. आत ते लोक भारतात आल्यावर चांगला इंगा दाखवू.

सध्या हे व्हॅसेलिन प्रकरण काय आहे ते समजले नाही, कुणि कृपया सांगाल का? म्हणजे बॅटला व्हॅसेलिन लावून फलंदाजाला काय फायदा होतो, किंवा गोलंदाजी करणार्‍या संघाचा काय तोटा होतो?

ब्रॉडचे एका षटकात दोन बळी!
याच ब्रॉडच्या एका षटकात युवराज सिंगने सहा षटकार ठोकले होते ना? आठवण येऊन उगाच वाईट वातते. गेले ते दिन गेले!

अरेरे...! आज पण हुकली सेंच्युरी.. आणि थोडक्यात हुकली आज.

जाउ द्या हो. तुम्ही महर्षी केदार यांचे विचार वाचा:

आपण हारलो. ओके, बिग डील. खेळणे म्हणले हे होणारच. तर अभी रात गयी, बात गयी,

सर्वात प्रथम वन डे साठी हा धागा वापरू नये. हा अमावास्येच्या दिवशी शनी आणि मंगळ यांची बाचाबाची चालली असताना राहूच्या प्रेरणेने केतुचा की बोर्ड वापरून निर्माण करण्यात आला होता. त्यामुळेच भारतियांचे पानिपत झाले.. 'दोन मोती गळाले, खुर्दा किती गेला त्याचा हिशेबच नाही' असं काहीतरी कुणीतरी त्या लढाई नंतर म्हणालं होतं ना? तसं झालंय.

एकाच पद्धतीने तीनेक वेळा आउट होण्याची कमाल केल्याबद्दल लक्ष्मण आणि रैनाला काय सजा द्यावी?

इतके चान्सेस मिळूनही सचिनला सेंचरी मारता आली नाही यालाही वरचा कुमुहूर्तच जबाबदार आहे.

सेहवागने ४ इनिंग्ज मधे ८/१०च बाउंडर्‍या मारल्या असतील. पण काय मारल्या राव! अगदी इंग्लंडच्या बॉलिंगची पिसं निघाली. इतकी की त्या पिसांमधे आपली सगळी फलंदाजी हरवली! Proud

>> वनडे मालिका आपण ३-२ अशी जिंकू. २०-२० चा एकमेव सामना पण जिंकू.
ठीक आहे. पण रन्स कोण करणार?

<< मग कशाला आहे ? म्हणजे जर England मान्य करतेय कि त्यांनी टेक्नॉलॉजी चा वापर केलाय, आपण बर्‍यापैकी Dear caught in headlights phase मधे वावरलोयत. तर मग नक्की कशाला अमान्य करायचे ? >> अजून मालिका संपायची असूनही " आम्ही सचिनसाठी हा सांपळा लावला " असं इंग्लंड छाती काढून ओरडत सुटेल का ? आतांपर्यंत १६ वर्षात जगातले सगळे संघ सचिनला सुरवातीला मुद्दाम
'ऑन साईड'ला खेळतां यावं असे चेंडू टाकत होते का ? कीं त्याना तशाच चेंडूने तो बाद होण्याची अधिक शक्यता दिसत होती ? सरावाच्या अभावी किंवा इतर कोणत्याही कारणाने सचिन 'बॅड पॅच'मधून जातोय हें निश्चित ; त्याला अभ्यासपूर्वक 'ऑफ साई‍ॅड बोलींग'चा सापळा लावून आम्ही बाद केला, असल्या बालीश बढाया मारणं म्हणजे सचिनचीच नाही तर सचिनविरुद्ध गोलंदाजी केलेल्या मॅग्रा, वॉर्न, वासिम, इ.इ. अनेक महान गोलंदाजांची चेष्टा करण्यासारखेच आहे !

व्हाईटवॉश! बहुधा २००० नंतर पहिल्यांदाच. आणि ३+ मॅचेस मधे तर मला आठवतच नाही - बहुधा आम्ही क्रिकेट पाहू लागल्यानंतर नसावेच. कदाचित ७४ वगैरे साली असेल.

सचिन चे शतक हुकल्याचे अजिबात वाईट वाटत नाही - वन डेत मारेल तो. पण १५० वगैरे केले असते तर सामना वाचला असता कदाचित.

१९९८ च्या भारताविरूद्ध पराभवानंतर स्टीव वॉ म्हंटला होता तेच आता धोनीने म्हंटले पाहिजे "They wanted it more than we did"

Team India...cha TEAM ANNA NA PATHIMBAA....

TEAM INDIA NE AADHESH DILA AAHE...JO PARYANT ANNAN CHE UPOSHAN CHALU AAHE...JO PARYANT JAN LOKPAL BILL PASS HOT NAHI....TO PARYANT EK HI MATCH JINKAY CHI NAHI...SADHI PRACTIS MATCH SUDDHA NAHI..JASTI JAST RUNS NE HAARANYA CHA PRAYANT KARAYCHA...JENE KARUN INDIA GOVT CHE NAAK KAPALE JAYIL...
YAA EKI NE MAZE DOLE, NAAK.. BHARUN AALE AAHE

JAY HIND...JAY BHARAT...

त्याला अभ्यासपूर्वक 'ऑफ साई‍ॅड बोलींग'चा सापळा लावून आम्ही बाद केला, असल्या बालीश बढाया मारणं म्हणजे सचिनचीच नाही तर सचिनविरुद्ध गोलंदाजी केलेल्या मॅग्रा, वॉर्न, वासिम, इ.इ. अनेक महान गोलंदाजांची चेष्टा करण्यासारखेच आहे >> मला तसे नाहि वाटत. उलट असे समजा कि Eng was aware of their limitations and they had to come up with plan to content Sachin. There is a difference in the way you are interpreting it, IMHO. सचिन 'ऑफ साई‍ॅड बोलींग' मधे ऑऊट होण्याचे chances जास्ती असतात हे सर्वांना माहित आहे. मधे त्या analysis मधे पूर्ण वेगळी गोष्ट पुढे आली ती हि कि getting him out with on side line is not only tough but also works well for him as he can do bulk of scoring easily. This may effectively result in giving up momentum for balling team. अशा वेळी better approach will be to deny him that opportunity and force him to play false stroke on offside. आणि अशा प्रकारचा अ‍ॅप्रोच घेतला गेलाय हे उघड दिसतेय. राहिता राहिले "हे आत्ता का उघड केले ?" त्याचे उत्तर त्याच लेखात आहे कि. दुसर्‍या टेस्ट्नंतर सचिनच्या हे लक्षात येऊ लागले नि त्याने stance adjust केला. I would rather say England was very well aware of their strength and limitations and forced use to play accordingly. Take it as honor for Sachin that they have to come up with new methodology to contain him. (त्या लिस्टमधे warne का आहे ? donald किंवा pollock चे नाव समजू शकतो).

सरावाच्या अभावी किंवा इतर कोणत्याही कारणाने सचिन 'बॅड पॅच'मधून जातोय हें निश्चित>> आठ innings सरावाचे कारण ? Sad

जाऊद्या हो भाऊ. सगळ्यांनाच त्याला बोलायला आवडते, चालायचेच. त्या लेखाचा अनुल्लेख करा.>> केदार तू ही ? त्यात सचिनवर टिका नाहिये.

<< त्या लिस्टमधे warne का आहे ? donald किंवा pollock चे नाव समजू शकतो). >> कारण वॉर्न उलट सचिनला 'लेग-ट्रॅप' लावायचा !! Wink

Pages