भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्यापासून बीसीसीआय्चा संघ भारतात परत जाईपर्यंत इंग्लंडच्या डावखुर्‍या फलंदाजांनी म्हणून नि राईट हँड बॅट्स्मन नी डावखुरा फलंदाज म्हणून खेळावे. तसेच प्रत्येक बीसीसीआय फलंदाजाला तीनदा बाद झाल्यावर एकदा बाद धरावे.
मग बघा दाखवतो की नाही इंगा!!

आपल्या अहिंसक गोलंदाजी व फलंदाजीमुळे आतां ब्रिटीश बहुतेक १९४२च्या 'चले जाव ! ' चळवळीचं उट्टं काढताहेत !! Wink

>> बॉलर्सना काय दोष द्यायचा ? सलग सहावी मॅच आहे जिथे दिवसेंदिवस बॉलिंग करताहेत.

अरे हो पण म्हणून टप्पा, दिशा सगळेच विसरून जायचे काय? त्याच खेळपट्टीवर ईं ची गोलंदाजी कशी चालते?
असो. सचिन सकट अख्ख्या संघाला परत पाठवा.. अती झाले आणि आता हसूही येत नाही.. ज्या प्रकारे सचिन या अख्ख्या मालिकेत बाद झाला आहे, मला वाटते सूर्यास्ताची वेळ जवळ आहे. लाली आहे तोवर निवृत्त व्हावे, अन्यथा काळोख. स्पष्टच लिहायचं तर त्या १००- १०० चं काहीही कौतूक शिल्लक नाही आणि घरच्या पाट्यावर १००-१०० केले काय २००-२०० केले काय, तो एक निव्वळ आकडा म्हणून पुस्तकात नोंदला जाईल.. the curse continues... when India needs most, its not there.. Sad
राहुल द्रविड मात्र धृव तारा ठरला निश्चीत!!

सचिन इंग्लंडच्या बोलिंग च्या दर्जामुळे अपयशी होतोय असे वाटतेय का तुम्हाला? जे काही आहे ते त्याच्या डोक्यात आहे. त्याची मागची दोन टेस्ट शतके आफ्रिकेविरूद्ध त्यांच्याच देशात आहेत. मागची दोन वन डे शतके याच इंग्लंड वि. एक व आफ्रिकेविरूद्ध एक आहेत - बर्‍यापैकी लाईव्हली पिचेस वर, जेथे स्टेन ला हुक करण्याएवढा बॉल उंच उडत होता. या दोन्ही वन डे शतकांच्या डावात (लक्षात असेलच, फार पूर्वीची गोष्ट नाही) बाकीचे भिकार खेळल्याने आपला स्कोर मॅच जिंकण्याएवढा झाला नव्हता. त्यानंतर आयपीएलही तो मस्त खेळत होता. आता एकदम रिटायर करण्याएवढा वाईट झाला का? Happy

सचिन कोणताही माईलस्टोन जवळ आला की आजकाल गडबडतो. पण तरीही लॉर्ड्स वर पहिल्या इनिन्ग मधे आणि ट्रेन्ट ब्रिज वर दुसर्‍या इनिंग मधे तो मस्त खेळत होता. तसे त्याने खेळावे, लौकर आउट झाला तरी हरकत नाही.

जे तुम्ही आत्ता सचिनबद्दल बोलताय ते गेल्या दोन वर्षात एकदा तरी द्रविडबद्दल खरे केले असते तर आज द्रविड इंग्लंड मधे भारताकडून खेळताना दिसला नसता. गेले दोन वर्षे द्रविड भिकारच खेळत होता. त्याचाही प्रॉब्लेम त्याच्याच डोक्यात होता हे आता सिद्ध झाले.

आपण वेळ काढून मॅच बघितली आणि हे लोक असे खेळले की राग येणे साहजिक आहे (मॅच बघतानाच्या माझ्या कॉमेण्ट्स ऐकल्या असत्या तर सचिन कधीच रिटायर झाला असता Happy ), पण बांगलादेश, रिटायर वगैरे जरा टोकाचे झाले Happy

>>सचिन इंग्लंडच्या बोलिंग च्या दर्जामुळे अपयशी होतोय असे वाटतेय का तुम्हाला? जे

फारेंडा,
असे म्हणायला मी काही मा़ंजरेकर नव्हे.. Happy माझ्या सचिन बद्दलच्या या मालिकेतील सर्वच पोस्ट मध्ये सचिन दबावाखाली खेळतोय असं म्हटलय.. पण याचा अर्थ असा नाही की या मह्त्वाच्या सिरीज मधले अपयश त्याला माफ असावे..? सचिन सारख्यासाठी ही ईं. ची गोलंदाजी काही फार विघातक या कॅटेगरीतील नाही.. पण त्याचे काय बिनसलय हे त्यालाच माहित असले तरीही सचिन सारख्या महान फलंदाजाकडून "त्या" गोष्टीवर मात करून खेळात लक्ष देणे अपेक्षित आहे.
बाकी वेळ देवून सामने बघतोय म्हणून चिडचिड नाहिच रे.. खेळ म्हणून बघताना अजूनही आनंद मिळतोच आहे.. पण ईतक्या शाळकरी दर्जाचा आपला खेळ बघून मग सचिन असो वा सेहवाग असेच म्हणावेसे वाटते की पुरे झाला तमाशा!
आणि सचिन बद्दल असे लिहीताना त्रास होतोच..
असो.

<< पण बांगलादेश, रिटायर वगैरे जरा टोकाचे झाले >> खरंय ! डोक्यावर घेणे किंवा आपटणे हे दोनच पर्याय नसतात क्रिकेटमधे किंवा इतरत्रही ! वैताग सगळ्यानाच येतो पण भारताच्या [किंवा कोणत्याही देशाच्या] संघात कठीण स्पर्धेतून येण्यासाठी [व तिथं टि़कण्यासाठीही] निर्विवाद गुणवत्ता व अपार परिश्रम लागतातच, हे लक्षात घेऊनच टीकेची धार वापरावी हें योग्य.

>> हे लक्षात घेऊनच टीकेची धार वापरावी हें योग्य.
बरं..

आपल्या गोलंदाजी/गोलंदाजांबद्दल हा एक चांगला लेखः
http://www.espncricinfo.com/england-v-india-2011/content/current/story/5...

भाऊ,
खेरीज जर याच सामन्यात किमान सामना वाचवण्यासाठी सचिन ची शतकी खेळी कामी आली तर ते (शंभरावे) शतक अधिक सार्थकी लागणार नाही का..? तो तसे करू शकतो यावर मला अजूनही विश्वास आहे.
आपल्या सलामीच्या जोडीने दमदार सलामी दिली तर आपसूक ईं. च्या गोलंदाजांचे थोडे खच्चीकरण होते व दबाव ऊलट ईं. वर येतो, ज्याचा फायदा खालील फलंदाजांना मिळतो... तशी सलामी मिळाली तर या सामन्यात त्रिमूर्ती पुनः चमत्कार करू शकतात यात शंका नाही.

>>> ज्या प्रकारे सचिन या अख्ख्या मालिकेत बाद झाला आहे, मला वाटते सूर्यास्ताची वेळ जवळ आहे. लाली आहे तोवर निवृत्त व्हावे,

सचिनने इतक्यात निवृत्त व्हायची गरज नाही. सचिनच्या जागी कोणीही आला तरी तो या मालिकेत अपयशीच ठरेल. सचिन या मालिकेत चांगला खेळलेला नाही. पण द्रविड सोडला तर इतर सर्वजण वाईटच खेळत आहेत. लक्ष्मणने २ वेळा पन्नाशी गाठली, पण तिथून तो पुढे सरकला नाही. उरलेले ३ ही डाव तो स्वस्तात गेला. गंभीर, रैना, धोनी, मुकुंद इ. सर्वजण फ्लॉप आहेत. गोलंदाज सुध्दा फ्लॉप आहेत. धोनी तर कर्णधार, यष्टिरक्षक व फलंदाज या तीनही भुमिकेत फ्लॉप आहे.

हे काही नवीन नाही. १९८१ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात संदीप पाटील व चेतन चौहान सोडले तर उरलेले सर्व फलंदाज (गावसकर, वेंगसरकर, विश्वनाथ, यशपाल शर्मा, किरमाणी, कपिल इ.) फ्लॉप होते.

सचिन व इतर जण फ्लॉप होण्याचे कारण ते संपले आहेत हे नसून, या दौर्‍याची अजिबात तयारी न करता व पुरेसा सराव न करता अत्यंत कॅज्युअली ते मैदानात उतरले, हे आहे. यापुढे तरी डोळे उघडतील अशी आशा करूया.

योग... असंच व्हावं असं मनपासून वाटतं.. पण त्यासाठी आधी इंग्लंडनी डाव घोषित तरी केला पाहिजे किंवा आपण त्यांच्या उरलेल्या ७ विकेट घ्यायला पाहिजेत.. घोषित लवकर करणे जरा अवघडच आहे.. कारण पेपरवर आपली फलंदाजी मजबूत आहे आणि त्याची भिती इंग्लंडला आहेच... त्यामुळे ४०० वगैरे धावांचा लीड झाल्याशिवाय आपण काही खेळायला येत नाही.. आणि त्यावेळेस पीच अजून वाट लागून मस्त वळायला लागलेले असणार.. मग मज्जाच मज्जा...

नंतरची कत्तल १९९९-२००० मध्ये ऑसीजविरूध्द्च (०-३ आणि १-७) >>> ही सिरीज ऑस्ट्रेलियात होती का? कारण शेवटच्या कसोटीतील शेवटच्या डावातील लक्ष्मणच्या १५०+ पुण्याईवर त्याला एकदिवसीय मालिकेत निवडले नसतानाही BCCIने त्याला ऑस्ट्रेलियात रहाण्याची मुभा दिली होती.

>>> ही सिरीज ऑस्ट्रेलियात होती का?

होय. याच मालिकेत आगरकर लागोपाठ ७ डावात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता.

>> नंतरची कत्तल १९९९-२००० मध्ये ऑसीजविरूध्द्च (०-३ आणि १-७)
दुर्देवाने, या कतलीच्या वेळी मी ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन मधे होतो. ब्रिस्बेन मधे पहिल्या सराव सामन्यासाठी संघ दाखल झाल्यावर (सचिन कॅप्टन होता) एका ऑसीने मला एकूण निकालाबद्दलचा माझा अंदाज विचारला. मी त्याला भारत तीनही सामने हरणार असं सांगितल्यावर तो उडालाच. त्याला ती अपेक्षाच नव्हती, आणि मला तेव्हा आपल्या संघाबद्दल अजिबात अपेक्षा नव्हत्या. सचिनने १/२ शतकं ठोकली तेव्हढंच, बाकी सगळी बोंब होती. यावेळेला अपेक्षा होत्या त्यामुळेच बल्ल्या झाला.

पण आता मी परत तटस्थपणे स्कोअर बघायला लागलोय. पुढच्या मॅचला इंग्लंडला चिअरिंग पण करेन कदाचित! Proud

आपली टीम मला वेळच देत नाही तर मी तरी काय करणार. आता चौथ्या व पाचव्या दिवशी चांगली मांड ठोकून मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार होतो तर मॅच तिसर्‍याच दिवशी संपल्या सारखी असेल तर आम्ही तरी काय करणार. Happy

बर हँग ओव्हर का कुणाला येत नाही. वर्ल्ड कप एकतर २८ वर्षांनी जिंकला. आता घेतली थोडी जास्ती आपल्या टीम नी , अगदी सचिन नी सुद्धा, टिकला जरा हॅग ओव्हर, त्याच येवढ ते काय मनावर घ्यायच.

तुम्हाला पण कारण नको का काही. घ्या थोडीशी, इस बार गम में Happy

आमच्या चिरंजीवांनी चौथ्या दिवसाच तिकिट काढलय. मी त्यांना आधिच सांगितल होत. धोका आहे.

>> काही वेळापूर्वीच स्रिसांथने पॉईंटवर मॉर्गनचा अत्यंत सोपा झेल सोडला.
बराच वेळ विकेट पडण्याची चिन्ह नसली की असं होतं रे मास्तरा! मी एका गल्ली मॅचमधे खेळत होतो तेव्हा बराच वेळ विकेट पडत नव्हती. मी मिड ऑफ वर होतो. मग खिशातून सिगरेट काढून पेटवली आणि मजेत झुरके घेत होतो तो अचानक कॅच आला. मला सिगरेट तर टाकायची नव्हती म्हणून ती घाईघाईत तोंडात ठेवता ठेवता बोटाला चटका बसला व कॅच सुटला. म्हणजे स्रिसांथचा प्रॉब्लेम मी समजू शकतो, आय हॅव बिन देअर, यू सी! Lol

चिमणराव,
अशा अ‍ॅक्सेसरीज घालून फिल्डींगला ऊभे रहाल तर चटकेच बसतील ना.. Happy
असो.. द्रविड ने सोडलेल्या दोन्ही झेलांत, आधीच चेंडू हवेत ऊडवून जल्लोश करायचा ऊत्साह नडला असे दिसते.. ते तरी किंवा त्याने रंगीत चष्मा बदलावा.
हिम्स,
ईं. ची ४५०+ ची आघाडी अपेक्षित आहेच.. बाकी कागदावर भारी म्हणशील तर आपल्या संघातील नावे असलेला कागद या मालिकेत पेपर वेट म्हणून देखिल कामास आलेला नाही. Happy
-----------------------------------------------------------------------------
दिवार २०११:
धोंडू: अंडे, हम दोनो एक ही फूटपाथ से ऊठे थे लेकीन आज मेरे पास सब कुछ है, पैसा, शोहरत, स्पाँसर्स, वर्ल्ड कप, सचिन, सेहवाग, द्रविड.. लेकीन तुम्हारे पास क्या है?
अंडू: काँफीडन्स!

काय सुंदर खेळत आहे भारत........नजर लागावी अशी क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी चालु आहे........उगाच तुम्ही त्यांना नजर लाउ नका...........इंग्लंड ला ५०० करावे या साठी कीती प्रयत्न करत आहेत

-=============================================
५०० झाले तर आपण १ डाव ३५० रन्स ने हारु
५५० झाले तर आपण १ डाव ३७० रन्स ने हारु
६०० झाले तर आपण १ डाव ४०० रन्स ने हारु
६५० झाले तर आपण १ डाव ४२० रन्स ने हारु....

सचिन इंग्लंडच्या बोलिंग च्या दर्जामुळे अपयशी होतोय असे वाटतेय का तुम्हाला? जे काही आहे ते त्याच्या डोक्यात आहे>> दोन्हीचे उत्तर हो आहे असे मला वाटते रे. England व्यवस्थित planning करून उचलतय त्याला, असे वाटते, जे जास्ती खुपते. इतरांचे ठिक आहे रे पण तेंडल्याला ? बाकी त्याच्या डोक्यात काय चालते ते आपण कोण सांगणार रे Happy
बोलिंग बद्दल मला असे वाटतेय कि england is really balling supremely in pack. There is no respite from any baller. RSA मधे तसे नव्हते, स्टेन नि मॉर्केलला सांभाळले कि बाकीचे उरलेले त्यांच्या दर्जाचे नव्हते. english ballers स्टेन च्या आसपास नाहित पण Together they are forming bigger sum ( at least on english wickets)

>> बॉलर्सना काय दोष द्यायचा ? सलग सहावी मॅच आहे जिथे दिवसेंदिवस बॉलिंग करताहेत.
अरे हो पण म्हणून टप्पा, दिशा सगळेच विसरून जायचे काय? त्याच खेळपट्टीवर ईं ची गोलंदाजी कशी चालते?>>अरे तसे नाहि, हे सगळे तसे नवशिके आहेत नि consistency was never our forte. Shoulders dropping is not new phenomenon for us. पण त्यांचे हाल समजू शकतो असे मी म्हणतोय.

आणि पावसानी कृपा केलेली आहे सध्या तरी.... पावसाचा अंदाज होताच.. तो तसाच पडू दे म्हणजे झालं... उरलेले तिनही दिवस वाया गेले तरी चालतील...

रच्याकने.. तिकडे झिम्बाब्वे मस्त धुतय बांग्लादेशला.. त्यांच्या डेब्युटन्ट बॉलरनी ५ विकेट्स काढल्या..

काल संध्याकाळी खेळ संपल्याबरोबर बीसीसी आय च्या कोच ने हुकुम दिला - ती बीअर, व्हिस्की, बाजूला राहू द्या. आत्ताच्या आत्ता इथे मीटींग घेऊन या गंभीर परिस्थितीची चर्चा करून काहीतरी मार्ग काढा नाहीतर सगळ्यांचे पगार बंद होतील, असा बीसीसीआय च्या अध्यक्षांचा फोन आला आहे.

बर्‍याच खेळाडूंना वाटले गंभीर परिस्थिती म्हणजे पगार बंद! मग सचिन म्हणाला, जाउ दे, माझे चांगले पॉश रेस्टॉरंट आहे, ते चालवीन मी. द्रवीड म्हणाला, माझी बायको डॉक्टर आहे, मला काही काळजी नाही. इतर जण मात्र संप करावा का राडा, का दयेचा अर्ज करावा याबद्दल चर्चा करू लागले. अर्ध्या तासानंतर कोच ने सांगितले - अहो गंभीर परिस्थिती म्हणजे खेळात आपल्याला धुताहेत त्याबद्दल बोलताहेत अध्यक्ष!
मग हळू हळू लोक सावध झाले. 'पण जरा बीअर, व्हिस्की नि भजी, चिकन टिक्का,काजू वगैरे आणल्याशिवाय डोके कसे चालेल? मग नाईलाजाने कोचने त्याची सोय केली.
प्रथम श्रीसंथ ने गाल चोळत चोळत सुचवले की भज्जीने जाऊन इंग्लंडच्या खेळाडूंना एक एक चपराक हाणावी, मला हाणली तशी. सेहेवाग, रैना, युवी, म्हणाले दोन्ही हातात एकेक बॅट घेऊन त्यांची टाळकीच फोडू. धोणी म्हणाला मी Strauss कडे जाऊन त्याला सांगतो, you owe me one!
इकडे लक्ष्मण म्हणाला (भाविक आहे तो) आपण 'यग्य' करू. 'यग्यात् भवति पर्जन्यः' असे गीतेत म्हंटले आहे, पाउस आला की हा सामना टळेल, मग पुढचे पुढे.
सचिन नि द्रवीड मात्र बराच वेळ काही बोलत नव्हते. शेवटी कोचने विचारले अहो तुमचे काय मत आहे?
सचिन म्हणाला एकच उपाय दिसतो आहे. सर्व संघातील लोकांनी मिळून 'जाउ द्या ना घरी आता वाजले की (पुरे) बारा' या गाण्यावर जबरदस्त नाच करून त्याचा व्हिडीओ पाठवून देऊ, इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाकडे, नि आपल्या अध्यक्षांकडे.

तसा व्हिडिओ तयार करण्यात आला, पण तेव्हढ्यात लक्ष्मणचा 'यग्य' संपला नि असे ठरले की बघू, आधी पाऊस येऊन काम भागेल का?
तो व्हिडिओ काही दिवसात यु ट्यूबवर काही दिवसातच येईल असे म्हणतात!! लक्ष ठेवा नि इथे त्याची लिंक द्या.

Happy Light 1

जागतिक क्रमवारीत अग्रेसर रहायचं असेल तर आपल्याकडे इंग्लंडचं हवामान नाही आणतां आलं तरी चेंडू उसळून वर येईल अशा खेळपट्ट्या बनवण्याची निकड या मालिकेने पुन्हा एकदां अधोरेखीत केली आहे. आणि, अशा खेळपट्ट्या फिरकीला बाधकच असतात हाही गैरसमज सोडून देणं आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज अशाही खेळपट्ट्यांचा फायदा उठवतातच.

चेंडू उसळून वर येईल अशा खेळपट्ट्या बनवण्याची निकड या मालिकेने पुन्हा एकदां अधोरेखीत केली आहे>> भाऊ ह्यात मी थोडा बदल सुचवेन. consistent bounce हवा. dust bowl नको हेहि पूर्ण मान्य पण फक्त bouncy खेळपट्ट्या हा निकष योग्य वाटत नाहि. एक गोष्ट नजरेआड करता येत नाहि कि sub continental pitches वर जेंव्हा लोकल बॅटसमन खोर्‍याने धावा काढतात तेंव्हा इतर विशेषत: english batsman चे पण हाल होत आले आहेत (sppiners विरुद्ध तर अधिकच), गेल्या काहि वर्षांमधे त्यांचे exposure वाढल्यानंतर हे कमी झाले (ह्याबाबत नासीर हुसेन ने केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे होते ज्याचा पुरेपूर फायदा थोर्प नि वॉन ला मिळाला. they were talented enough as well). sub continental batsman चे असेच bouncy pitches चे exposure वाढले तर त्यांनाही सुसह्य होईल. हि पिचेसमधली variety असणे जरुरी आहे. त्या शिवय complete batsman कोण हे कसे कळणार ? Happy

असामीजी, आपल्या हवामानात 'बाउन्सी' खेळपट्ट्याही तिसर्‍या चौथ्या दिवशीं फिरकीला साथ देणार्‍या होतीलच, असं नाही वाटत ? म्हणजे एकाच खेळपट्टीवर फलंदाजांची दोन्ही तर्‍हेची गोलंदाजी खेळण्याची कुवतही कळेलच. <<गेल्या काहि वर्षांमधे त्यांचे exposure वाढल्यानंतर हे कमी झाले >> हेंही पूर्ण सत्य नाही म्हणता येणार; आपल्याकडच्या फिरकीचा दर्जा खूपच खालावला आहे व त्यामुळे फिरकी आक्रमकपणे वापरण्यावरचा आपल्या कप्तानांचा विश्वासही कमी झाला आहे, हींही कारणं आहेत. [वाडेकर इंग्लंडमधे दूसर्‍या-तिसर्‍या षटकापासून आक्रमक क्षेत्ररक्षण लावून फिऱकी गोलंदाजी सुरू करत असे व ती भेदकही ठरत असे ! ]. त्याचप्रमाणे, आपल्याकडे 'पाटा' विकेट असूनही अगदीं विनू मंकडपासून गावस्कर , वेंगसरकरपर्यंत अनेक भारतीय फलंदाज इंग्लंडमधे यशस्वी ठरलेच ना ! तेंव्हा, असामान्य तंत्रशुद्ध फलंदाज दोन्ही तर्‍हेची गोलंदाजी कोणत्याही खेळपट्टीवर थोड्याफार सहजतेच्या फरकाने कां होईना पण खेळूं शकतात. सध्याचे इंग्लंडचे कांही फलंदाज याच पंक्तीत बसतात एवढंच. पण प्रश्न असा आहे कीं तुमची संपूर्ण फलंदाजीची फळीच जर ठरावीकच पद्धतिच्याच विकेटसवर फक्त ठराविक तर्‍हेचीच गोलंदाजी खेळूं शकत असेल, तर जागतिक क्रमवारीत अग्रेसर रहाणं शक्य व समर्थनीय आहे का ?
फार आगाऊपणाचं वाटतं का माझं हे विश्लेषण? मलाच शंका येतेय !

तरी यावेळेस जुलै पासून सुरू होणारा दौरा आहे. तेथील मोसमाच्या सुरूवातीला स्विंग आणखी जास्त असतो (आणि थंडीही) आणि तेव्हा भारतीयांना आणखी अवघड जाते असे निरीक्षण ८५-८६ च्या सुमारास करून गावसकरने बोर्डाला आपला दौरा त्यांच्या समर च्या उत्तरार्धात करायचा सल्ला दिला होता आणि नंतरचे बरेच दौरे असे उशीराच ठरवले होते.

यावेळेस केलेली एक मोठी चूक म्हणजे कसोटी सामने आधी ठरवलेत. २००२ मधे वन डे आधी होते, त्यामुळे तेथील वातावरणाची, पिचेस ची सवय आधीच झाली. त्यात वन डे मधे बोलिंग ला असलेली लिमिट्स आणि विकेट्स घेण्यापेक्षा रन्स रोखण्याचे प्राधान्य - त्यामुले बॅट्समन ला सेट व्हायला वेळ मिळतो. एकदा दोन तीन आठवडे अशा मॅचेस खेळल्या की मग कसोटी सामने चालू होईपर्यंत लोक तयार झालेले असतात. अर्थात २००२ मधे लॉर्ड्सला हरलेच होते, पण बाकी तीनही टेस्ट चांगले खेळले होते. एकूण आधी वन डे असणे जास्त चांगले.

भाऊ, आगाउपणा काय त्यात. मुद्दा चुकीचा नाही. पण तसे कोणीच नसते सहसा. वैयक्तिकरीत्या द्रविड, सचिन सारखे बॅट्समन त्यांच्या तंत्रामुळे खेळू शकतात. सगळे नाही. इंग्लंड, न्यू झीलंड मधला स्विंग आणि थंडी, विंडीज, लंका मधल्या "स्लो अ‍ॅण्ड लो" खेळपट्ट्या, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील बाउन्स अ‍ॅन्ड कॅरी असलेली पिचेस आणि भारत्/पाक मधले ड्स्ट बाउल्स किंवा पाटा पिचेस आणि प्रचंड उकाडा इतके वैविध्य आहे (थोडेफार अपवाद असतातच - सप्टेंबरमधले ओव्हल (इंग्लंडच्या सीझन ची शेवटची मॅच सहसा सप्टे. मधे ओव्हल ला होते), आपल्याकडचे मोहाली ई. या सगळीकडे खेळू शकणारे लोक फार कमी आहेत, भारतीयच नव्हे तर इतर संघांतही. सचिन आणि द्रविड नक्कीच येतात त्यात. बहुधा कॅलिस असेल आणि पॉन्टिंग.

आणि भाऊ सध्याचे इंग्लिश लोक यात बसतात का ते या वर्षाच्या अखेरीस भारतात समजेल Happy पण हा इंग्लिश संघ गेल्या काही वर्षातील सर्वोत्तम आहे हे नक्की. नं १. सुद्धा डिझर्विंग आहे.

आपल्याकडच्या फिरकीचा दर्जा खूपच खालावला आहे व त्यामुळे फिरकी आक्रमकपणे वापरण्यावरचा आपल्या कप्तानांचा विश्वासही कमी झाला आहे, हींही कारणं आहेत.>>मी एकंदर सर्व sub continental pitches बद्दल बोलत होतो जिथे bounce बरेचदा consistent नसतो. खेळपट्टी वळण्याचे चान्सेस अधिक असतात. श्रीलंकेकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज होतेच कि. पण aus, english players चे त्यांना handle करण्याचे प्रमाण अधिक चांगले वाढले असे नाहि वाटत ?

तेंव्हा, असामान्य तंत्रशुद्ध फलंदाज दोन्ही तर्‍हेची गोलंदाजी कोणत्याही खेळपट्टीवर थोड्याफार सहजतेच्या फरकाने कां होईना पण खेळूं शकतात. >>हाच तर माझा मुद्दा झाला. कुठल्याहि पिचवर adopt होउ शकणारा खेळाडू हवा, फक्त bouncy pitches वर अधिकार गाजवणारा नको. I demand consistent pitches rather than bouncy pitches. If there is high bounce it has to be consistent. If it's not there, that also has to be consistent.

पण प्रश्न असा आहे कीं तुमची संपूर्ण फलंदाजीची फळीच जर ठरावीकच पद्धतिच्याच विकेटसवर फक्त ठराविक तर्‍हेचीच गोलंदाजी खेळूं शकत असेल, तर जागतिक क्रमवारीत अग्रेसर रहाणं शक्य व समर्थनीय आहे का ?>> हा प्रश्न आपल्या संघाबाबत असेल तर असे उत्तर देता येईल. जागतिक क्रमवारी हि आपण बनवलेली नाही. ICC ने बनवलेली आहे. तिच्या FTP प्रमाणे गुणांकन होऊन आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचलो. जरी आपली संपूर्ण फलंदाजीची फळीच जर ठरावीकच पद्धतिच्याच विकेटसवर फक्त ठराविक तर्‍हेचीच गोलंदाजी खेळत असली तरी गेल्या काहि दौर्‍यांमधे त्यांनी प्रतिकुल परिस्थितीमधे remarkable resilience दाखवला होता हे हि तेव्हढेच खरे आहे. त्यामूळे पहिल्या क्रमांकावर जाणे शक्य नि justifiable आहे. तसेच आता तिथून खाली येणेही. ह्याच कारणासाठी England deserves to be number one at the moment. They are playing consistent, dominating cricket. Can they stay there for long ? Can they be as dominating once they land in say, SL or India ?. आपल्या दौर्‍याच्या आधी त्यांच्या बहुतेक major series (exclude BL) ह्या त्यांच्या बॉलिंगला समर्थक अशा ठिकाणी होत्या त्याचा त्यांना पुरेपूर फायदा झाला आहे. This is not to say that is under achievement. They have been consistent. पण sub continent pitches वर काय होणार हे बघणे नक्कीच मनोरंजक असेल. विशेषतः Andy Flower सारखा फिरकी उत्तम खेळू शकणारा खेळाडू कोच असताना.

Pages