भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< दुसरे म्हणजे सचिनचा मैदानावरील प्रत्येक क्षण इतका ओव्हर अ‍ॅनेलाईज केला जातो की कधीकधी असे काहीतरी सोडून देण्याचीही गरज आहे. >>> याची दुसरीही बाजू अशी आहे कीं 'अ‍ॅनलाईज' तेंच केलं जातं ज्यातून कांही तरी अर्थपूर्ण निघण्याची शक्यता असते ! Wink

एका मागे एक हरता दोष ना धोनिचा !
पराजीत आहे जगती संघ भारताचा !!

अमोल केळकर
---------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

गेल्या कित्येक मालिकांत आपण गोलंदाजीची बाजू लंगडी आहे अस म्हणत आलोय, पण ही मालिका फलंदाजीमुळे हरलोय. आणि अलीकडे जिंकलेल्या मालिकांत आपल्याच फलंदाजांनी प्राण कंठाशी आणले होते.

<< पण ही मालिका फलंदाजीमुळे हरलोय. >> मयेकरजी, या मालिकेत आपली फलंदाजी ढेपाळली हे मी मान्यच केलंय . पण जलद गोलंदाजांसाठी स्वप्नवत असणार्‍या विकेटसवर व हवामानात इंग्लंड आरामात ४००च्या वर धांवा नियमितपणे काढताहेत हे कशाचं लक्षण आहे ? आपली गोलंदाजी टाकाऊ आहे असं अजिबात नाही मी म्हणत ; फक्त जागतिक स्पर्धेत, विशेषतः चांगली फलदाजी असलेल्या संघांविरुद्ध, ती भेदक ठरत नाही, किंबहुना निष्प्रभ होते, एवढंच मला म्हणायचं आहे. सामने पहाताना, एक झहीर व प्रविण कुमार सोडला तर इतर जलद व फिरकी गोलंदाज यांत्रिकपणे गोलंदाजी करताहेत असं सारखं नाही वाटत रहात ? निदान मला तरी असं तीव्रपणे जाणवतं.

भाऊ गेल्या काही मालिकांत आपला संघ गोलंदाजीत अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगली गोलंदाजी करत आलाय, तर फलंदाजी मात्र अपेक्षेपेक्षा खराब होत आलीय, असं मला म्हणायचं होतं.

या सर्वात अजून एक महत्वाची गोष्ट ज्याचा अभाव होता:
ईं. च्या फलंदाजांच्या खेळाचा अभ्यास करून त्यांना बाद करण्यासाठी सापळा रचणे आणि त्यानुसार गोलंदाजी करणे. मला वाटते अगदी पहिल्याच सामन्यापासून हे कुठेच दिसलं नाही. आपले कोच साहेब काय करत होते असे विचारावेसे वाटते.
याऊलट ईं. ने आपले फलंदाज कसे बाद केले पहा. बरोबर प्रत्येक प्रमुख फलंदाजाच्या खेळातील कच्चा दुवा हेरून तो फलंदाज सेट होण्या आधीच बहुतांशी त्याला सापळ्यात अडकवले. ज्यामूळे निव्वळ मानसिक दबावात येवून फलंदा़जांनी चूका केल्या.
ऊ.दा:
१. द्रविड हा डावाच्या सुरुवातीला ऊजव्या यष्टीबाहेरील थोड्याश्या ऊसळत्या चेंडूला शरीरापेक्षा दूर खेळून बाद होण्याची शक्यता अधिक असते. (जेव्हा तो सेट होवून बाद झाला तेव्हा अशक्य चेंडूवर बाद झाला होता.. तो सापळा नव्हता!)
२. सचिन सुरुवातीला ऊजव्या यष्टीबाहेरील फूल लेंथ चेंडूवर ड्राईव्ह मारायला जाऊन समोर किंवा स्लिप मध्ये झेल देवून बाद होतो, तशी शक्यता अधिक असते
३. रैना ला ऊसळते चेंडु सुरुवातीलाच टाकून सेट न होवू देता मग अगदी साध्या फूल लेंग्थ चेंडूवर देखिल त्याचा बकरा बनवता येतो हे जिमी ने पहिल्या डावात दाखवून दिले
४. लक्षमण हा पाठी ऊभे राहून चेंडू खेळणारा फलंदाज आहे. त्याला डावाच्या सुरुवातीस पुढे टप्पा टाकून पुढे खेळायला लावून चूक करायला भाग पाडले गेले किंवा ते नाही तर नेहेमीचा डिप फाईन लेग चा पुल चा सापळा होता ज्यात तो दोन वेळा बाद झाला.
५. गंभीर ऊसळते चेंडू व ऊजव्या यष्टीबाहेर जाणार्‍या चेंडूवर डावाच्या सुरुवातीस खूप व्हलनरेबल असतो.
६. सेहवाग हा असाही मटका आहे पण नेहेमीच तो डावाच्या सुरुवातीस स्लिप मध्ये (डोक्याच्या ऊंचीवर) झेल देवून बाद होतो त्या अनुशंगाने त्याच्या अंगावर् येणारा चेंडू (पहिल्या डावात) वा त्यला सोडून ऊजव्या यष्टीबाहेरचा चेंडू (दुसर्‍या) डावात टाकला गेला.
७. धोणी सुरुवातीला फिरकी विरुध्द खूपच व्हलनरेबल असतो.. युवी चेही तेच.
८. बाकी ऊरले शेपूट त्यांच्यासाठी हमखास बाऊंसर वा यॉर्क्रस तयार होते. प्रवीण कुमार ने मात्र तिथेही जिगरबाज प्रवृत्ती ही अशा सापळ्यांवर मात करू शकते हे दाखवून दिले.

धोणी ने काल अचूक निदान केले: आम्ही चांगले चेंडू सोडू शकलो नाही- थोडक्यात सापळा लावून विकेट घेणारे चेंडूवर आम्ही बाद झालो त्याच बरोबर खराब चेंडूंना मारून धावा करूही शकलो नाही.

आपल्या संघाने असे काही अभ्यासपूर्वक सापळे रचले असते तरिही झहीर च्या अनुपस्थितीत चित्र वेगळे दिसू शकले असते. सापळे रचल्याने विकेट्स घेण्याची कंसीस्टंसी वाढते हेही महत्वाचे. डंकन फ्लेचर आणि गॅरी कर्स्टन च्या अ‍ॅप्रोच मधिल हा फरक ठळकपणे समोर येतो अन्यथा द्रविड, सचिन, लक्षमण कंपनीला कोण काय सल्ले देणार असते..? सल्ला त्यांना बाद कसे करता येईल याबाबत देता येईल जे अँडि फ्लॉवर ने केले (ईं कोच) आणि ईं. च्या अशा कंडीशन मध्ये नेमकी आपले फलंदाजीचे तंत्र कसे अ‍ॅडजस्ट करायचे हा सल्ला फ्लेचर आपल्या प्रमूख फलंदाजांना देवू शकला असता- तशी अपेक्षा होती. पण तिथेच सर्व फसले!
या खेरीज प्रत्त्येक डावाच्या सुरुवातीला व दिवसाच्या सुरुवातील पहिला तास निव्वळ ऊभे राहून काढणे ईतका किमान अ‍ॅप्रोच ठेवला असता तरी खूप वेगळे चित्र पहायला मिळाले असते. ई. च्या फलंदाजांनी नेमके तेच केले आणि मग फलंदाजीस नंदनवन झालेल्या खेळपट्टीवर धावा कुटल्या. यामूळे दोन गोष्टि झाल्या- त्यांच्या विकेट्स झटपट न पडल्याने आपल्या गोलंदाजांचे खच्चीकरण झाले आणि नंतर भरपूर धावा कुटल्याने आपल्या विजयाची शक्यता संपुष्टात आली. ही खरी मॅच विनींग स्ट्रॅटेजी होती.. बाकी सर्व गप्पा, वाद, चर्चा याचे काही विशेष महत्व मला दिसत नाही. कारण स्ट्रॅटेजी असेल तर खेळही त्याच अनुशंगाने होतो... स्ट्रॅटेजीच नसेल तर "पाट्या टाकणे किंवा बचाव" एव्ह्डेच पर्याय ऊरतात. पाट्या टाकून आपण जिंकणार नव्हतोच आणि बचाव अभेद्य नसल्याने आपण हरलोच!
(या खेळपट्ट्यांवर आणि ईम. च्या गोलंदाजी समोर नैसर्गिक वा आकमक केळ केल्यास त्यांचेही खांदे पडतात हे धोणी ने दोन्ही डावात दाखवून दिले. पण तोवर ऊशीर झाला होता!)

दमलेले चेन्डू मजूर आणि फळी मजूर असल्यानन्तर काय करनार? जिल्हा क्रिकेटमध्ये एवढे मानधन मिळाले तर हे जिल्हा संघातूनही खेलतील. नाहीतरी आता फ्लड लाइटम्ध्ये रात्रपाळी करताहेतच ना हे मजूर?रच्याकने, आता कुठल्या कामावर जानार आहेत हे मजूर?

>>> वाचा....................... हे.............. बेल ला परत बोलावुन जे पुण्य केले त्याचे फळ असे मिळते........

भाषा जरा तीव्र आहे, पण जे लिहिलं आहे त्यात फारसं काही चूक वाटत नाही. बेलला परत बोलविण्याचा आणि हे लिहिण्याचा काय संबंध आहे ते समजलं नाही.

अहो मास्तुरे............
संबंध आहे.... आपल्या संघाला चक्क पळापुटा कुत्रा म्हणुन संबोधले आहे.. ठीक आहे आपण हारलो फार वाईट पध्दती ने हारलो..अशीच हार जर इंग्लंड च्या संघाची भारतात येउन झाली आणि भारतीय वृत्तपत्रांनी असे लिहिले असते तर किती गरोदळ घातला असता इग्रजी मिडीया ने...............

डेली मेलमधले आर्टिकल.
http://www.dailymail.co.uk/sport/cricket/article-2025084/Martin-Samuel-S...

हिंदुस्थानी मिडिया ब्रिटिश मिडियावर भडकलीय? Look who's talking!
मग आता काय इंग्लिश क्रिकेट संघला वानखेडेवर खेळायला बंदी का?

आपल्या संघाने असे काही अभ्यासपूर्वक सापळे रचले असते तरिही झहीर च्या अनुपस्थितीत चित्र वेगळे दिसू शकले असते. सापळे रचल्याने विकेट्स घेण्याची कंसीस्टंसी वाढते हेही महत्वाचे. डंकन फ्लेचर आणि गॅरी कर्स्टन च्या अ‍ॅप्रोच मधिल हा फरक ठळकपणे समोर येतो अन्यथा द्रविड, सचिन, लक्षमण कंपनीला कोण काय सल्ले देणार असते..? सल्ला त्यांना बाद कसे करता येईल याबाबत देता येईल जे अँडि फ्लॉवर ने केले (ईं कोच) आणि ईं. च्या अशा कंडीशन मध्ये नेमकी आपले फलंदाजीचे तंत्र कसे अ‍ॅडजस्ट करायचे हा सल्ला फ्लेचर आपल्या प्रमूख फलंदाजांना देवू शकला असता- तशी अपेक्षा होती. पण तिथेच सर्व फसले!>>तुला खरेच वाटते आज काल Video analysis च्या युगात अशी strategy नसेल ? strategy नक्की होती, ती implement करणे जमले नाहि for whatever reasons.

दुसरे म्हणजे सचिनचा मैदानावरील प्रत्येक क्षण इतका ओव्हर अ‍ॅनेलाईज केला जातो की कधीकधी असे काहीतरी सोडून देण्याचीही गरज आहे>> Happy

>> strategy नक्की होती, ती implement करणे जमले नाहि for whatever reasons.
तू थेट ड्रेसिंग रूम मध्ये बसल्यासारखा बोलतो आहेस.. Happy
या अख्या मालिकेत कुठलीच स्ट्रॅटेजी दिसलीच नाही.. ती होती पण अमलात आणली गेली नाही ही पळवाट वाटते. (चिदंबरम अलिकडे मुंबई स्फोटाबद्दल म्हणले होते: there was no intelligence input so there is no intelligence failure.. oxymoron?) Happy

>>> संबंध आहे.... आपल्या संघाला चक्क पळापुटा कुत्रा म्हणुन संबोधले आहे..

पळपुटा कुत्रा असे संबोधणे कदाचित अतिशयोक्ती असेल, परंतु, त्या लेखात लिहिलेले चुकीचे आहे का?

- तिसर्‍या कसोटीत भारताचे दोन्ही डाव ५ तासांच्या आत संपले. दोन्ही डावात मिळून भारताने जेमतेम १२० षटके फलंदाजी केली. म्हणजे प्रत्येक ६ षटकात भारताचा एक गडी बाद होत होता.
- भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा होत्या, तर कुकने एकट्याने २९४ धावा केल्या.
- दुसर्‍या कसोटीतल्या दुसर्‍या डावात बेलने एकट्याने १५९ धावा केल्या, तर भारताच्या ११ खेळाडूंच्या एकत्रित धावा त्याच्या धावांपेक्षा कमी होत्या (१५८ सर्वबाद).
- भारताने आतापर्यंतच्या ६ डावात एकदासुध्दा ३०० चा आकडा गाठला नाही.

भारताने अत्यंत सामान्य दर्जाचा खेळ केला, भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार दर्जाचे झाले, भारताला जलदगती गोलंदाजी अजिबात खेळता आली नाही व भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करणे अत्यंत अवघड जात आहे. ही सर्व कटु सत्ये त्या लेखात (कदाचित तीव्र शब्दात) मांडली आहेत. शब्द कसेही वापरले (तीव्र किंवा सौम्य), तरी, वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

>>> डंकन फ्लेचर आणि गॅरी कर्स्टन च्या अ‍ॅप्रोच मधिल हा फरक ठळकपणे समोर येतो अन्यथा द्रविड, सचिन, लक्षमण कंपनीला कोण काय सल्ले देणार असते..?

डंकन फ्लेचर भारतीय संघाचा कोच नुकताच झाला आहे. त्याला संघातल्या खेळाडूंची बलस्थाने व कमकुवत स्थाने समजण्यास जरा वेळ लागणारच. भारताच्या सुमार कामगिरीचा दोष त्याच्यावर अल्पांशाने सुध्दा टाकता येणार नाही.

तू थेट ड्रेसिंग रूम मध्ये बसल्यासारखा बोलतो आहेस.>> Happy अरे तू आधीचे interview वाचले नाहिस का कोणाचेच ?

या अख्या मालिकेत कुठलीच स्ट्रॅटेजी दिसलीच नाही.. ती होती पण अमलात आणली गेली नाही ही पळवाट वाटते.>> अमलात आणली गेली नाहि असे नाहि. चिकीची असू शकते किंवा चुकीची अमलात आणलेली असू शकते. स्ट्रॅटेजी नव्हतीच असे म्हणणे अगदीच naive वाटते.

भारताच्या सुमार कामगिरीचा दोष त्याच्यावर अल्पांशाने सुध्दा टाकता येणार नाही.>> पूर्ण सहमती नाही पण त्याचा दोष एका मर्यादेपलीकडे नाहि दाखव्ता येणार असे मलाही वाटते. पण त्याचबरोबर त्याच्यावरही जबाबदारी येतेच. अधिक दोष खेळाडूंकडे जातो. सर्वात अधिक supporting infrastructure कडे जातो.

चॅपेल म्हणतोय कि रोहित शर्माला न्यायला हवे होते कारण सगळ्या तरून खेळाडूंमधे तो techinically competent (short ball खेळण्यामधे) आहे. मागे Eng नि WI मधल्या T-20 World cup मधे त्याला बघून तसे वाटले नव्हते. तो हि तितकाच चाचपडताना दिसला होता. पण त्याच बरोबर २००८ मधे Aus मधे ODI मधे तो अतिशय comfortably खेळला होता हे हि खरे. इतरांपेक्षा तो बॉल अधिक उशिरा खेळतो हे पण आहे त्यामूळे technically he can get into better position to handle short ball. कि Form चा भाग असावा का ? तुम्हाला काय वाटते ?

सर्वात पहिल्यांदा बीसीसीआय वर पैसे खाण्याकरता नागोबासारख्या वेटोळे घालून बसलेल्या पुढार्‍यांना घालवले पाहिजे. एकापाठोपाठ मालिका व आयपीएलसारखे तमाशे आयोजित करून खेळाडूंना अजिबात विश्रांती न देणार्‍या व सरावासाठी वेळ न देणार्‍या व आयुष्यात हातात कधीही बॅटबॉल न धरलेल्या पवार, शुक्ला, शहा, मनोहर, इ. बीसीसीआय पदाधिकार्‍यांना पृष्ठभागावर लाथ घालून हाकलले पाहिजे.

>>> चॅपेल म्हणतोय कि रोहित शर्माला न्यायला हवे होते कारण सगळ्या तरून खेळाडूंमधे तो techinically competent (short ball खेळण्यामधे) आहे.

Rofl

रोहीत शर्माचे तंत्र अतिशय सुमार आहे. नुकत्याच संपलेल्या विंडीज दौर्‍याचा व २००८ मधल्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यातील काही सामन्यांचा अपवाद वगळता तो बहुतेक वेळा अपयशी ठरलेला आहे.

<< भाऊ गेल्या काही मालिकांत आपला संघ गोलंदाजीत अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा चांगली गोलंदाजी करत आलाय, तर फलंदाजी मात्र अपेक्षेपेक्षा खराब होत आलीय, असं मला म्हणायचं होतं. >>मयेकरजी, हें एकदम मान्य. पण आपल्या फलंदाजीची इतकी दाणादाण होऊनही इंग्लंडला डाव घोषित करताना मात्र तीन तीनदा विचार करावा लागतो कारण आपल्या फलंदाजीची अंगभूत व सिद्ध झालेली गुणवत्ता त्यानाही माहीत आहे. इंग्लंडमधे आपली गोलंदाजी चालली नाही यापेक्षां आपल्या फलंदाजीसारखा तीचा वचक जागतिक क्रिकेटमधे निर्माण झालेला नाही, एवढंच मला अधोरेखीत करायचं होतं.

अनेक वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या झिम्बाब्वेने चांगली सुरूवात केली आहे. आपल्यापेक्षा तुलनेने वरचढ असलेल्या बांगलादेशाला एकमेव कसोटी सामन्यात हरविल्यावर लागोपाठ दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात देखील झिम्बाब्वेने विजय मिळविलेला आहे. त्यांच्या व्हिटोरी ह्या डावखुर्‍या मध्यमगती गोलंदाजाने पदापर्णातल्या पहिल्या दोन्ही सामन्यात ५ बळी मिळवून एक नवीन विक्रम केलेला आहे.

दुसरीकडे विश्वचषकातल्या पराभवानंतर ऑसीज सावरलेले दिसत आहेत. आज लंकेला त्यांनी त्यांच्याच भूमीवर लागोपाठ दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात हरवून कमबॅक साजरा केलेला आहे.

वसिम अक्रम माझीच कॉपी कां मारतोय कळत नाही - Wink
"The Indian bowling has looked very ordinary in the three Tests so far. Praveen Kumar and Sreesanth may be swinging the ball but the control is missing. Ishant Sharma looked jaded. I have not seen or heard a side scoring more than 700 runs in England recently," he said of the Indian attack, which allowed the hosts to post a mammoth 710/7 declared in the first innings at Edgbaston.

"English conditions are conducive to swing bowling but the Indian bowlers just could not seize the opportunity. They were all over the place," Akram told Mobile ESPN.

एकापाठोपाठ मालिका व आयपीएलसारखे तमाशे आयोजित करून खेळाडूंना अजिबात विश्रांती न देणार्‍या व सरावासाठी वेळ न देणार्‍या व आयुष्यात हातात कधीही बॅटबॉल न धरलेल्या पवार, शुक्ला, शहा, मनोहर, इ. बीसीसीआय पदाधिकार्‍यांना पृष्ठभागावर लाथ घालून हाकलले पाहिजे.

च्च च्च! जरा विचार करा! खेळाडूंना विश्रांति, सराव करायला वेळ कशाला??
खेळाडू म्हणजे काय विमानाचे पायलट आहेत? का डॉक्टर? जर दमल्यामुळे काम नीट केले नाही तर इतर लोकांचे प्राण धोक्यात यायला!
नाही जमला खेळ तर काय झाले? लोक येतातच, हज्जारो रुपये देऊन येतात. मग खेळाडूंनाहि पैसे मिळतात नि कदाचित पवार, शुक्ला यांनाहि काही मिळत असेल त्यातून, म्हणून असे करतात!

उद्या कुणाला नालायक आहे म्हणून कामावरून हाकलून देण्या ऐवजी, जरा सुट्टी घे, सराव कर, तुझा पगार चालूच ठेवतो असे म्हणतील का? मग खेळाडूंनाच का?

<< आयुष्यात हातात कधीही बॅटबॉल न धरलेल्या पवार, शुक्ला, शहा, मनोहर, इ. बीसीसीआय पदाधिकार्‍यांना ......... >> शिक्षण, संस्कृति, शेती, इ.इ. चा गंधही नसलेले शिक्षणमंत्री, सांस्कृतिक मंत्री , कॄषिमंत्री इ.इ. चालतात; मग इथंच बॅटबॉल धरलेली असलीच पाहिजे, हा हट्ट का ? Wink

शिक्षण, संस्कृति, शेती, इ.इ. चा गंधही नसलेले शिक्षणमंत्री, सांस्कृतिक मंत्री , कॄषिमंत्री इ.इ. चालतात;

'चालत' नसावेत, पण करणार काय ना? सगळेच हातपाय गाळून बसले आहेत. कुणितरी काहीतरी करेल मग आपल्याला चांगले दिवस येतील अशी आशा धरायची! जोपर्यंत आपल्या हातात आपण काही घेत नाही, तोपर्यंत अशीच सरकारे नि त्यातल्या लोकांचा, जिथे पैसा तिथे धुडगूस चालायचाच.

आपण आपले स्ट्रॅटेजी, 'सापळे लावणे' अश्या खेळासंबंधित गोष्टींची चर्चा करू. फार तर कुणि भेटले कधी पवार वगैरे लोक तर त्यांच्याशी चर्चा करू. निदान, भोगले, संझगिरी, मांजरेकर अश्या लोकांना भेटून चर्चा केली तर कदाचित् जास्त माहिती मिळेल.

कुणितरी वरील सर्व चर्चेचे सार काढून कुठे प्रसिद्ध करता येईल का बघा! काही अर्थ असेल तर लक्ष जाईलच कुणा महत्वाच्या व्यक्तीचे.

४थ्या टेस्ट मधे --
एका इनिंग मधे तरी ३०० च्या वर रना केल्या तर जरा बरं वाटेल.
दोन्ही इनिंग्ज मधे ३०० च्या वर रना केल्या तर (बरं वाटेल)++.
आलेले सगळे कॅच पकडले तर (बरं वाटेल)++.
त्यांच्या २० विकेटी काढल्या तर (बरं वाटेल)++.
मन लावून फिल्डिंग केली तर (बरं वाटेल)++.
मॅच ड्रॉ केली तर (बरं वाटेल)++.
मॅच जिंकलीच चुकून तर (बरं वाटेल)++.

मी उगीचच, काही कळत नसताना, आपण चौथा कसोटी सामना जिंकू असे लिहीले होते. केवळ आशावाद, सदिच्छा यांच्या जोरावर. नि आता म्हणताहेत बहुतेक अँडरसन या सामन्यात खेळणार नाही, बिचारा अँडरसन, पण बीसीसीआयच्या संघासाठी आशादायक बातमी.

चिमण यांना बरे वाटावे ++ ही सदिच्छा.

AREEEREEE REEE ....TUMHI LOK AJUN YAA DHAGYA VAR CHARCHA KARAT AAHAT....?
DHONI NE BAAYAKO GHARI PATHAVLI... Happy

JINKE PARYANT TARI SUTAK PALA NIDAAN ... Happy

AREEEREEE REEE ....TUMHI LOK AJUN YAA DHAGYA VAR CHARCHA KARAT AAHAT....?
DHONI NE BAAYAKO GHARI PATHAVLI... स्मित<<<<<<<<
कुणाच्या घरी ...????? Biggrin

Pages