भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॉर्डस वरची मॅच ड्रॉ होण्याचीच जास्त शक्यता आहे. पहिल्या मॅचमधे भारत जनरली मार खातो किंवा कशीबशी ड्रॉ करतो पण सहसा जिंकत नाही. खेळपट्टीचा बाउंस चांगला आहे पण बाकी विशेष मदत मिळत नाही. श्रीलंकेची मॅच इथे नुकतीच ड्रॉ झाली आहे. भारताच्या फलंदाजीमुळे इंग्लंडला नक्की कधी डिक्लेअर करावं ते कळणार नाही हा फायदा आहे. पण सचिनचं शतक होणार नाही असं मला उगीचच वाटतंय. या मॅचची तिकिटं जानेवारीतच संपली आहेत.

लॉर्डसभोवती अजूनही एक वलय आहेच. विनू मंकडपासून अनेक व्यक्तीगत अप्रतिम खेळी इथं भारतीय खेळाडूंकडून नोंदवल्या गेल्या आहेत. पाहूं कोण नवोदित खेळाडू आतां या पंक्तीत बसतात तें !
बाऊन्स चांगला असेल तर तिथला विशेष सराव न मिळाल्याने भारतीय फलंदाज सुरवातीला अडचणीत येऊं शकतात.

चिमण, सिरिज मधली एकतरी मॅच बघायला प्रत्यक्ष जाणार आहेस का???

एकूण मज्जा येईल असे वाटते आहे.. पण आपल्या लोकांचे आणि त्यांचेही काही सांगता येत नाही.. कोणत्या दिवशी ढेपाळतील ते...

हिम्या, एक चांगली गोष्ट म्हणजे इकडे टेस्टमॅचच्या पहिल्या ४ च दिवसांची तिकीटं आधी विकतात. ५ व्या दिवसाची तिकीटं ऐनवेळी फक्त स्टेडियमवर मिळतात. तेव्हा हा सामना ५ दिवस चालला (तसा तो चालेलच कारण पावसाची भाकितं आहेत) आणि शेवटच्या दिवशी पाऊस नसला तर जायचा विचार आहे.

मी आत्ता लॉर्डसच्या साईटवर पाहीलं तर हॉस्पिटॅलिटी पॅकेजची तिकीटं अजून आहेत.. पण चांगलीच फणस आहेत... http://www.lords.org/lords-ground/inspiring-occasions/match-day-hospital...

सगळ्यात कमी तिकीट ४थ्या दिवसाचं आहे £299 + व्हॅट म्हणजे £360.

मला वाटतं , अजित आगरकरच्या नावावर असलेलं एकमेव शतक लॉर्डवर आहे..

सचिन जे शोधतोय ते आगरकरला २००२ साली सापडलं.. कमाल क्रिकेटची.

चिमण.. अगदी बरोबर आहे.. पण वेंगसरकर फळीधर होता संघात.. आगरकर नक्की कशासाठी होता यावर अजून संशोधन चालू आहे..

तो एकेकाळी गोलंदाज होता. आणि त्यापूर्वी एकदा आणि त्यानंतर एकदाही नाही अशी उदाहरणं त्याच्या खेळीत आली.. Happy

मला या बॉलर लोकांची फार दया वाटते. बॉलिंगही करायची, फिल्डिंगही करायची आणि वर बॅट्समनांची लाज राखण्यासाठी बॅटींग पण!

तो एकेकाळी गोलंदाज होता. आणि त्यापूर्वी एकदा आणि त्यानंतर एकदाही नाही अशी उदाहरणं त्याच्या खेळीत आली..>>हे फारसे बरोबर नाहि. मूळात आधी तो बॅट्स्मन होता u-17 पर्यंत. नंतर u-१९ मधे श्रीकांतच्या क्रुपेने तो all-rounder झाला. नंतर बॉलर म्हणून राहिला. चिमण म्हणतो ते बरोबर आहे, त्याला जेव्हढा vilify केला तेव्हढा वाईट गोलंदाज नव्हता. ODI मधे fastest 50 wickets चा विक्रम त्याचा होता. त्याला handle करणारा चांगला captain असता तर कामाचा माणूस होता. Consistency was his biggest foe, ओव्हरमधले ४-५ बॉल चांगले टाकल्यावर एक half volley, loosner टाकण्यात गडी पटाईत होता. तो over expectation चा बळी आहे.

आगरकरचं बॅटींग मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध रेकॉर्ड आहे...>>माझ्या मते हे अतिशय क्रूर विधान आहे. तो शून्यावर बाद होत होता ह्याचा जेव्हढा issue केला गेलाय त्यामागे media sensalization अधिक आहे. भले भले असे Aus विरुद्ध गंडले आहेत पण जेव्हढा आगरकरचा बोलबाला झाला तेव्हढा कोणाचाच नाहि.

आगरकर बद्दल गमतीने लिहिलेलं असलं तरी तो मला आवडायचा...
तो तेवढा वाईट गोलंदाज नव्हता.. >>>> बरोबर. पण त्याला कित्येकदा संधी मिळूनही त्याला Consistency ठेवता आली नाही.

फलंदाजीमधे त्याच्या नावावर दोन Fantastic records आहेत.
१. लॉर्ड्स वर टेस्ट्मॅचमधे शतक.
२. २१ चेंडूत अर्धशतक..
पण त्यानंतर कधीही त्याच्यावर भरवसा ठेवता आला नाही..

काय फरक पडेल त्या आकडेवारीने? क्रिकेट नेहमीच वन बॉल गेम असतो. झाल आउट तर झाला. Happy

http://www.espncricinfo.com/ci-icc/content/current/story/523745.html वाचले का? लोकांनी हैदास घातला आहे प्रतिक्रियांचा.

हे तू म्हणावस ना केदारा? अरेरे! अरे तू तर आकडेवारींचा गुरू! तुला आवडतच आकडेवारी पुढे करून मुद्दे मांडायला! Proud

आगरकर बद्दल असाम्याला अनुमोदन.

अरे तू तर आकडेवारींचा गुरू! तुला आवडतच आकडेवारी पुढे करून मुद्दे मांडायला! >>>> Happy

People's Dream XI हा खरच मोठा विनोद आहे. फक्त व्होटिंगच्या जोरावर अशी टीम बनवणे शुद्ध मूर्खपणा आहे. ह्या टीमसाठी दिलेले मूळ options बघायला आवडले असते.

लॉर्ड्स चा पण उगाच बोलबाला केलेला आहे असे माझे मत. समजा नाहि मारली तिथे सेंचुरी तर काय मोठा फरक पडतो. भले भले मिस करून गेले आहेत तेंव्हा ह्यात नुकसान असेल तर Lords चे आहे असे मी म्हणेन Happy

लॉर्ड्स वर ईं. ने पहिली फलंदाजी घेतली तर सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागायची शक्यता मला अधिक वाटते याचे कारण त्यांची गोलंदाजी आपल्यापेक्षा निश्चीत सरस आहे आणि गंभीर, सचिन, युवी, झहीर वगैरे फळी विशेष सराव्/फॉर्म नसताना खेळणार आहे. शिवाय सलामी ला "गेम चेंजर" विरू नसल्याने आपली एरवी सकारात्मक होणारी सुरुवात बचावात्मक असेल, निदान पहिल्या दोन सामन्यात तरी.
सचिन चे माहित नाही, लॉर्ड्स वर लक्षमण शतक ठोकेल असे ऊगाच वाटते आहे. सचिन बहुतेक दुसर्‍या सामन्यापासून फॉर्मात येईल.
पण एकंदरीत मालिका अत्यंत चुरशीची होईल असेच वाटते. मालिका सुरू व्हायच्या आधी आकडे लावताय का कुणी? Happy
माझा: १-१

तुला आवडतच आकडेवारी पुढे करून मुद्दे मांडायला! >> हो. पण ते क्रिकेट इतिहासाबाबतीत. Happy क्रिकेट हा नेहमीच वन बॉल गेम असतो त्यामुळे भविष्याबद्दल सांगने अवघड. Happy त्यामुळे सच्या आज शतक ८० बॉल मध्ये मारणार असे मी कधीच लिहित नाही.

कुठल्याही प्रकारची ड्रीम टीम बनवणं आणि त्यावर चर्चा करणं म्हणजे वैचारिक XXXX आहे. काय उपयोग असल्या चर्चांचा? >> बरोबर सगळी बकवास. अन त्यावरून लोक भांडत बसतात.

लॉर्ड्स चा पण उगाच बोलबाला केलेला आहे असे माझे मत >> सहमत. गावस्कर म्हणाला लॉर्डस पेक्षा इडन गार्डन्स कितीतरी सुंदर आणि चांगले मैदान आहे.

>>बरोबर सगळी बकवास. अन त्यावरून लोक भांडत बसतात

त्यासाठीच असतो सगळा ऊपद्व्याप :).

तिकडे डॅरेल हार्पर ने देखिल धोणी, आयसीसी आणि बिसीसीआय विरुध्द गरळ ओकली आहे.
http://www.espncricinfo.com/west-indies-v-india-2011/content/story/52326...
आज रेडीयोवर त्याच्या मुलाखतीतला भाग ऐकला: त्याचे म्हणणे होते की भारतावि. गेल्या १० सामन्यात त्याच्याकडून फक्त ५ चूका झाल्या आहेत (सामन्यानंतर प्रत्त्येक अंपायरच्या चूकीच्या निर्णयाची आयसीसी कडून मोजणी होते अशी काहितरी पध्दत आहे!). पण आयसीसी ने त्याला पाठींबा दिला नाही खेरीज भारत क्रिकेट बोर्डाकडे सर्वात जास्त पैसा असल्याने ते सर्वांवर दादागिरी करत आहेत असे त्याचे म्हणणे होते.
बळी तो कान पिळी हे ईं., ऑ. यांच्याकडूनच ईतर लोक शिकले आहेत हे काय त्याला वेगळे सांगायला हवे का? चांगले आहे ना फॉर अ चेंज भारत दादागिरी करतोय. किती दिवस सहन करणार? Happy

ईंग्लंड विरुध्द कोण पंच असणार आहेत? माझी पसंती पुन्हा एकदा अलीम दर (पाक) व सायमन टौफेल (ऑसी असला तरी).

खेरीज drs वापरणार आहेत का?

Pages