भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुक गेला............................ इंग्लंड ७/१ याहूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ

ट्रोट सुध्दा गेला..................श्रीशांत चा बकरा.........पहिल्याच ओवर मधे.........
२३/२

>>ह्म्म्म पण इतक्या लोकांनी सांगूनही धोनीने टॉस जिंकुन फिल्डिंगच घेतली

अनाकलनीय!!! नकारात्मक/बचावात्मक मानसिकता. पहिली फलंदाजी घेवून दडपणाखाली न खेळता धावफलकावर भरपूर धावा जमवल्यास आपल्या गोलंदाजांना अधिक मानसिक बळ मिळाले असते. असो..
हवामानाचा फायदा आपले गोलंदाज कसा ऊठवतात यावर सर्व अवलंबून आहे. ऊपाहारानंतर हीच खेळपट्टी फलंदाजी ला मस्त पुरक होईल.. तेव्हा केपी अन स्ट्राऊस टिकले तर आपले काही खरे नाही.
----------------------------------------------------------------------------
ता.कः खेळप्पटी आता ऊपाहारानंतर पुढील दोन दिवस नक्कीच फलंदाजीला पुरक असेल असे वाटते. ते दोन्ही दिवस ईं. ने वापरले तर पुन्हा आपल्यासमोर ५०० चा डोंगर असू शकतो. अवघड आहे. सेट झालेला स्ट्राऊस अन केपी नक्कीच मोठी धावसंख्या ऊभारू शकतात.. धोक्याची घंटी.
भज्जी आहेच.. Sad

पण बॉलिंग अगदीच वाईट नाहीये.. कदाचित फार स्कोर होणार नाही... श्रीशांत त्याच्या स्टाईल नुसार मार खातोय.. पण विकेट काढेल दोन चार तरी..

मॉर्गन पण गेला Happy

स्ट्रॉउस ला जबरी काढला पण प्रविण ने.. मस्त सेटप केले त्याला.. आख्खे षटक बहेर टाकून त्याला फ्र्स्ट्रेट केले आणि पुढच्या षटकात बॉल जरा जवळ पडताच त्याने ड्राईव केला बॉल.. मस्तच...

<< सी के नायडू फारतर १९४० पर्यंत खेळले असावेत. >> मास्तुरेजी, १९५२-५३ ला बंगालला हरवून होळकर संघ रणजी विजेता होता. त्या होळकर संघातून सी.के. नायडू खेळले होते. क्रिकइनफो त्यांचा फर्स्ट क्लास क्रिकेटचा कालखंड १९१६ ते १९६४ दाखवतो ! [१९३३ला ते विजडन 'क्रिकेटर ऑफ द इयर' होते.]

पण बॉलिंग अगदीच वाईट नाहीये.. कदाचित फार स्कोर होणार नाही... श्रीशांत त्याच्या स्टाईल नुसार मार खातोय.. पण विकेट काढेल दोन चार नंतरच्या?? >>> सर्वांनी हिम्याच्या ह्या पोस्टच्या आधीच्या नि नंतरच्या आपापल्या पोस्ट्स वाचून घ्या Lol

इशांतला लय सापडत नाहीये. इतर दोघे फार मस्त टाकत आहेत. मे बी अजून ६ ओव्हर्स नंतर परत श्री येईल २-३ ओव्हर्ससाठी. हा वेळ महत्त्वाचा आहे. इथे ढिले पडू नये.

९८-६ !
श्रीसंथ ३ बळी. धोनीचा क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय माझ्यासकट बर्‍याच जणाना चपराक मारणार तर !!

पीके.. जबरी बॉलिंग करतोय..

सहज म्हणुन एक-दोन ओव्हर भज्जी किंवा युवीला देऊन बघायला हरकत नाही..

पीके क्या खाके आयेला है?

एकंदरच टीका करताना जेवढे लोक सुटतात तेवढे कौतुक करताना सुटत नाहीत!

Pages