भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कस काय मंडळी. बर्‍याच दिवसांनी भेटतोय.
आपण मॅच जिंकणार आहोत. (आत्ता चालू असलेली दुसरी इंग्लंड विरूद्धची.) Happy
एकाची डबल सेंच्यूरी.

>>धोनी गाढव आहे
धोणी धूर्त आहे! कारण कालच्या त्या "वादग्रस्त" प्रसंगात त्याने "मी संघाला विचारूनच तसा निर्णय घेतला" असे म्हणू शकतो. मात्र कप्तान म्हणून निर्णय शेवटी "त्याचाच" असे.
भज्जी प्रमाणेच लॉर्ड्स मध्ये लक्षमणलाही असेच "संधी साधून" यष्टीचीत केले गेले. तेव्हा कुठे गेले होते खेळाचे स्पिरीट? मला वैयक्तीक खेळाचे स्पिरीट बद्दल आदर आहेच आणि ते दुसर्‍याने दाखवले तरच मी दाखवेन हा तर्कही मला पटत नाही. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा, बस्स! (केवळ त्या आधारावर, काल सन्नीभाय ओरडून सांगत होता की दर वेळी भारतानेच हे स्पिरीट दाखवायचा अट्टहास का? हा त्याचा मुद्दा मला तरी समर्थनीय वाटत नाही.) कालच्या घटनेत मात्र तसे करताना क्रिकेट नियमांचे सामुहीक उल्लंघन झाले असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. बेल वर किमान, पंचांनी चहापान घोषीत न करताच मैदान सोडून जाण्यासाठी सामन्याची फी वा ईतर दंडात्मक कारवाई केली जावी असे मला वाटते.
मास्तुरे म्हणतात तसे मलाही थोडेफार यात पूर्वग्रह दिसतो. कारण धोनी च्या त्या निर्णयाने सामन्याच्या निकालात काहीच फरक पडणार नव्हता. (आपण जिंकलो/हरलो तरी) मग अशा वेळी हा निर्णय म्हणजे "कातडी बचाव" धोरण वाटते. एकंदरीतच पहिल्याच सामन्यापासून कालच्या दिवसापर्यंत मला आपल्या संघाची एकंदर देहबोली नकारात्मक वाटली.. कदाचित तसे नसेलही!

(भज्जी च्या पोटात नमेकी कशामूळे गोळे येत असतील ते वेगळे सांगायला नको! त्याला ९ महिने गर्भारपणाच्या रजेवर पाठवून द्यावे!)

विक्रम,
असे सरळ मैदानात ऊतरा पाहू... "एकाची" कशाला कुणाची तेही सांगून टाका. आम्ही आनंदाने बघू!
त्या आधी ईं. चा डाव कितीवर संपेल तेही सांगून टाका बरे Happy

>>> आपण मॅच जिंकणार आहोत. (आत्ता चालू असलेली दुसरी इंग्लंड विरूद्धची.) एकाची डबल सेंच्यूरी.

भारताच्या कालची देहबोली बघता भारत जिंकणे अशक्य आहे. सामना वाचविला तरी ती मोठी कामगिरी ठरेल. या स्थितीला भारतच जबाबदार आहे. ८ बाद १२४ वरून इंग्लडला २२१ पर्यंत मजल मारून देणे व नंतर ४ बाद २६७ वरून सर्वबाद २८८ अशी हाराकिरी करणे हीच याची मुख्य कारणे आहेत. त्याला पंचांनी सुध्दा चुकीचे निर्णय देऊन हातभार लावला..

ही मॅच गेल्यात जमा आहे.. कशाला उगाच डोकेफोड करताय.. डायरेक्ट तिसरी मॅच सुरू झाली कीच इथे पोस्टी टाका...

वॉनने हॅसलीनची डबी उघडलीय.

ब्रॉडने घेतलेली हॅटट्रिक ही भारताविरुद्धची कोणत्याही संघाने नोंदवलेली पहिली हॅटट्रिक होती.
द्रविडने शतक केलेय आणि भारत सामना हरलाय असे दौर्‍यापूर्वी फक्त एकदा झाले होते. हा रेकॉर्डही धुळीस मिळाला. पुन्हा मिळेल?

नाहीतरी ड्रॉ करायला गेले तर हरणारच, तेव्हा सरळ जिंकण्यासाठी खेळायला हवं.
युवराजने ब्रॉडला जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायला हवी.

हिम्स,
पेक्षा या मालिकेचा हा खास बा.फ. च बंद करूयात व थेट पुढच्या मालिकेचा ऊघडू Happy
...
थोडा धीर धरायला हवा, अजून तब्बल दोन दिवसाचा खेळ बाकी आहे... glorious uncertainties of cricket! Happy

भारताच्या कालची देहबोली बघता भारत जिंकणे अशक्य आहे. सामना वाचविला तरी ती मोठी कामगिरी ठरेल. या स्थितीला भारतच जबाबदार आहे. ८ बाद १२४ वरून इंग्लडला २२१ पर्यंत मजल मारून देणे व नंतर ४ बाद २६७ वरून सर्वबाद २८८ अशी हाराकिरी करणे हीच याची मुख्य कारणे आहेत. त्याला पंचांनी सुध्दा चुकीचे निर्णय देऊन हातभार लावला.>> हे सगळ झाल, गेल गंगेला मिळाल.

कालची विकेट आणि पहिल्या दोन दिवसांची विकेट या मध्ये जमिन अस्मानाचा फरक होता. काल इंग्लंडनी एका दिवसात ४०० धावा काढल्या ते केवळ आपण बंडल बॉलिंग टाकली किंवा धोनीची फिल्ड प्लेसमेंट अगम्य होती म्हणून नव्हे तर त्यात बॅटिंगसाठी अनुकूल असणार्‍या विकेटचा जास्त भाग होता. बेलही छानच खेळला.

चौथ्या दिवशी सुद्धा पूर्ण बॅटिंग विकेट राहिल असे दिसते. या विकेट वर ४५० धावा जगातील आज पर्यंतची सर्वोत्कॄष्ट बॅटिंग लाइन (सेहवाग, गंभीर नसले तरी) चेस करणार नाही तर कोण करणार. याच विकेट वर न्युझिलंडने पहिल्या डावात ९६ ऑल आउट नंतर चेस करताना चौथ्या डावात ४४० केल्या आहेत. ते हरले होते ही गोष्ट वेगळी.

सचिन ची डबल. Happy

>> सलग विजयाची सवय लागलीये आपल्याला दुसरं काही नाही.
मला असं म्हणायचं नाहीये की आपण सतत जिंकायलाच पाहीजे. ते शक्य पण नाही! पण हरत असलो तरी दुसर्‍याला सहज जिंकू देऊ नये, फाईट करावी इतकी माफक अपेक्षा असते माझी! आपण सॉलिड फाईट देऊन हरलो आहोत अशी उदाहरणं कमी आहेत. ऑस्ट्रेलियाकडे बघा. कुठलाही खेळ कुठलाही ऑस्ट्रेलियन खेळत असला तरी फाईट गॅरंटीड! तेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. त्या फाईटच्या आधारावरच ते हरत आलेल्या काही मॅचेस जिंकतात.

मधे गांगुलीने द्रवीड वर केलेली कॉमेंट (मला वाटतं लॉर्डसच्या मॅचमधे केलेली) मला मुळीच आवडली नाही. त्या वेळेला द्रवीड फाईन लेगला फिल्डिंगला होता आणि त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे बॉल गेला तर सहज २ धावा काढत होते. तेव्हा गांगुली म्हणाला 'यू जस्ट हॅव टू लुक अ‍ॅट द फिल्डर. इटिज द्रविड! सो इटिज नॉट सर्प्राजिंग दॅट दे आर टेकिंग २ रन्स!'. हरामखोर लेकाचा! या गांगुल्यानं कधी चांगली फिल्डिंग केली होती आयुष्यात? एकदा तर मला आठवतंय.. गांगुली मिडविकेटला होता आणि सचिन मिडॉफला! गांगुलीला एक बॉल अडवता आला नाही तर तो बाउंडरी जाणार म्हणून पळालाच नाही. तो बॉल बाउंडरीला पोचलाच नाही. सचिन मिडॉफवरून पळत पळत गेला बॉल साठी. जाता जाता त्यानं गांगुलीला शिव्या घातल्या! तेव्हा गांगुलीच कॅप्टन होता.

>>> पण हरत असलो तरी दुसर्‍याला सहज जिंकू देऊ नये, फाईट करावी इतकी माफक अपेक्षा असते माझी! आपण सॉलिड फाईट देऊन हरलो आहोत अशी उदाहरणं कमी आहेत.

अगदी बरोबर. नुसते हरणारे सामनेच नव्हेत, तर ज्या सामन्यात सहज विजय शक्य असतो, तिथे सुध्दा भारत नांगी टाकीन सामना अनिर्णित राखण्यात (खरं तर न हरण्यात) धन्यता मानतो. २०११ मध्येच अशी २ उदाहरणे दिसली.

चिमण, तू ३ री आणि ४ थी टेस्ट पहायला जा आणि आपल्यातले कोणी घाण खेळले तर त्यांना माझ्या वतीने शिव्या घाल.

>>> या गांगुल्यानं कधी चांगली फिल्डिंग केली होती आयुष्यात?

हे पण अगदी बरोबर. पण गांगुलीने २०१० च्या आयपीएलमध्ये १-२ खूप अवघड झेल घेतल्याचे पाहिले होते.

आपण सॉलिड फाईट देऊन हरलो आहोत >> आपण सॉलिड फाईट देउन हरलेल्या मॅचेस गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलिया, श्री लंका व न्युझिलंड विरूद्ध जिंकलो आहोत महाराजा. Happy

कालच्या बेलच्या रन आउट वर बॉयकॉटचं म्हणणं

In the end Dhoni and the Indian team did a good thing for cricket because there would have been such ill feeling between the teams for the rest of this Test, the series and the one-dayers to come.

I played in the famous match at Port-of-Spain in Trinidad in 1974 when Alvin Kallicharan was run-out off the final ball of the day’s play. He turned away thinking it was the close and Tony Greig threw the stumps down.

It was the same as yesterday. The umpire did not call time. The batsman assumed wrongly and was given run-out. Overnight the England manager and captain, Donald Carr and Mike Denness, were asked to revoke the appeal. We did it for the good of the game.

Some Indian supporters will say Dhoni was weak because it did affect them as, after tea, the bowling, fielding and attitude of India’s players all suffered.

>> तू ३ री आणि ४ थी टेस्ट पहायला जा आणि आपल्यातले कोणी घाण खेळले तर त्यांना माझ्या वतीने शिव्या घाल.

त्यासाठी टेस्ट कशाला पहायला जायचं! इथे बसूनच घालतो ना! शिवाय तिकीटं आधीच संपली आहेत. साधारणपणे शेवटच्या दिवसाची तिकीटं अ‍ॅडव्हान्समधे विकत नाहीत. त्या दिवशी ग्राउंडवरच मिळतात. मी लॉर्डसला जायचा विचार करत होतो. पण बर झालं नाही गेलो ते कारण पहाटे २ वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या होत्या असं नंतर समजलं.

>> पण गांगुलीने २०१० च्या आयपीएलमध्ये १-२ खूप अवघड झेल घेतल्याचे पाहिले होते.
झेल घेणं वेगळी गोष्ट आहे. झेल येतोय म्हंटल्यावर तो थोडा जास्त प्रयत्न करतो. पण प्रत्येक सुसाट बॉल वेगात पळत जाऊन, प्रसंगी शरीर झोकून अडवून लगेच फेकणे याला स्ट्राँग कमिटमेंटच हवी! ती त्याच्याकडे मुळीच नाही.

आपण आत्तापर्यंतच्या ३ इनिंग्समधे ३०० च्या वर गेलोच नाही, द्रविडची २ शतकं होऊन सुद्धा! साधारणपणे एकाच शतक झालं की धावसंख्या ३०० च्या वर जाते! आकडेवारी एक्सपर्ट सांगतीलच याबद्दल! Proud

याही वेळेला आपण ३०० च्या वर जाणार नाही कारण दुसरा नवीन बॉल युवराज पासून खालपर्यंत कुणीच खेळू शकत नाहीयेत!

ज्या खेळपट्टीवर ब्रेसनन सारखा प्राणी ७५-१०० धावा काढू शकतो त्यावर आपल्या फेमस त्रिकूटाने शतके ठोकावीत ही किमान अपेक्षा. Happy
खेळपट्टी चा फायदा जो आपल्या फलंदाजांनी घ्यायला हवा होता तो ईं. घेत आहेत एव्हडेच Happy

स्वान ब्रॉड ब्रेस्नन यांच्यापैकी ज्यांना शतकं ठोकायची आहेत त्यांना खुले आमंत्रण! आणखी राखीव लोकांपैकी कुणाला ठोकायचं असेल तर धोनीशी बोलून खास तजवीज करणेत येईल! Proud

>> त्यावर आपल्या फेमस त्रिकूटाने शतके ठोकावीत ही किमान अपेक्षा.
द्रविड ठोकतोय की! पण लक्ष्मण ५० नंतर 'आपला कार्यभाग उरकला' अशा थाटात खेळतो. सचिनला आपण आपल्या आनंदासाठी खेळतोय की संघासाठी यात कन्फ्युजन झालंय. २००७ साली तो भले खांद्यावर बॉल का बसेना पण टिकून रहायचं अशा वृत्तीने खेळत होता. लॉर्डसवर तो आजारी होता म्हणून बोलण्यात अर्थ नाही पण त्याची ट्रेंट ब्रिजची पहिल्या इनिंगची खेळी मला तरी जरा बेजबाबदार वाटली!

हममम...
"धुलाई" हा शब्द फारच सौम्य वाटतोय आपल्या संघासाठी Happy
तोड, फोड, खुर्दा, चिंधड्या कसं वाटतय...? या सामन्याला टेस्ट२० म्हणता येईल Happy
आपल्या तमाम संघाने अगदी अशाच थेट अवतारात फलंदाजी केलेली पहायला आवडेल. अर्थात मनगटांतून तेव्हडा जोर शिल्लक राहिला असेल तर...
या खेळपट्टीवर विरूची अनुपस्थिती ही गदर मध्ये सनि देओल च्या अनुपस्थिती सारखी आहे..

will the God of Cricket finally show up? याही डावात/सामन्यात सचिन फेल गेला तर माझी वैयक्तीक श्रध्दा ढासळायची दाट शक्यता आहे. म्हणतात ना जो बूंद से गयी वो हौद से नही आती...
---------------------------------------------------------------------------------
I am still serious.. would like to see Raina/Sachin open the innings with Mukund! at least show the intent!

>> would like to see Raina/Sachin open the innings with Mukund! at least show the intent!
त्यानं कसा काय इंटेट दिसणार बुवा? ही काय वनडे नाहीये जिथे पहिली १५ ओव्हर्स फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स असतात. उलट मी म्हणेन की एखाद्या बॉलरला पाठवावं मुकुंद बरोबर, नवीन बॉलच्या जास्तीत जास्त ओव्हरी खायला!

आपण सॉलिड फाईट देउन हरलेल्या मॅचेस गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलिया, श्री लंका व न्युझिलंड विरूद्ध जिंकलो आहोत महाराजा.
हो ना. मागे सुद्धा काही काही सामने जिंकलो आहोत. म्हणजे काय. आज जरी दुसरीत नापास झालो असलो तरी, मगे पहिलीत एक दिवस माझे गणित बरोबर आले होते!!

चला, ४७७ च करायचे आहेत. वेळ भरपूर आहे.

प्रत्येक षटकात फक्त चार धावा घेतल्या तरी आरामात जिंकू. म्हणजे उगाच घाई करण्यात अर्थ नाही.
धीर धरी, धीर धरी, जागृत गिरीधारी!
टेन्शन नहि लेनेका, क्या!
सचिनचे द्विशतक, रैना, लक्ष्मण, धोनी यांची शतके! की जिंकलो!!!

या खेळपट्टीवर विरूची अनुपस्थिती ही गदर मध्ये सनि देओल च्या अनुपस्थिती सारखी आहे.. >>> :d

या खेळपट्टीवर विरूची अनुपस्थिती ही गदर मध्ये सनि देओल च्या अनुपस्थिती सारखी आहे.. >> Rofl खरंय

या खेळपट्टीवर विरूची अनुपस्थिती ही गदर मध्ये सनि देओल च्या अनुपस्थिती सारखी आहे..>>> Lol
योग्या हे वाक्य वाचून गडाबडा लोळतोय....

झक्की ओव्हरला ३.५ चा अ‍ॅव्हरेज पण पुरणार आहे.. फक्त सगळ्या ओव्हर खेळणे गरजेचे आहे.. आणि आपले लोक कुठल्याही क्षणी कोषात जातात की त्याच्यामुळे अचानक सगळ्या ओव्हर काय पुढच्या १० ओव्हर तरी खेळतील की नाही अशी शंका यायला लागते..

For whatever reasons, if we do not loose easy wickets then barring 10-15 overs around each new ball change (and changing weather) , is English balling strong enough to win the match on this pitch ? That will be interesting to see.

द्रवीड गेला! गळती सुरू! आता तर २०० पण होणार नाहीत!

लंच मधे विकेट पडू शकत नाहीत हे किती चांगलं आहे ना? Proud

द्रविड दोन्ही कसोटीतला ९० टक्के वेळ मैदानावर आहे. थकला असेल बिचारा.
लंच टाइममधे विकेट जाऊ शकत नाही पण गेलेली विकेट टी टाइममधे परत येऊ शकते Happy

Pages