भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि सप्टेंबरमधे इंग्लंड दौरा संपला की लगेच ऑक्टोबरमधे इंग्लंड परत भारतात! क्रिकेट प्रेमींची नि त्याहि पेक्षा क्रिकेटबद्दल लिहिणार्‍यांची मज्जा!
कारण जरी घरचीच विकेट असेल तरी 'दमले' म्हणून पुनः हारतील. मग सांगायचे की आम्ही पूर्वी किती चांगले खेळलो होतो एकदा!

तुम्हाला टेबलाखालून कट हवा असल्यास देतो.
चुकलो मस्तुरे, लिहून लिहून तुमची बोटे दुखावली असे मला कुणितरी सांगितले म्हणून आयत्या वेळी बदल केला.

असा कट घेण्याचे देण्याचे जमत असते तर भारत सोडून इकडे कशाला आलो असतो तडफडत! तिथेच राहिलो असतो नि मोप पैका मिळवून दररोज क्रिकेट बघायला गेलो असतो! आजकाल म्हणे बीअरपण मिळते तिथे, मग काय? आणि उघड उघड नसेल, कायदेशीर नसेल तरी आपल्याला काय, द्यायचे हजार दोन हजार पोलीसला की काय वाट्टेल ते मिळेल. भारतातले कायदे म्हणजे काय, प्रत्यक्ष ईश्वरच. मानले तर आहेत नाहीतर नाहीत.

झक्की मला घेतले म्हणून मी सांगून ठेवतो, मी फक्त न्यू बॉल बॉलिंग करेल. उगाच ऐनवेळी घोळ नको. (चिमण छडी जरा जपून हाणरे भौ. )

झक्की, मला संभाव्य संघात घेतल्याबद्दल धन्यवाद. फक्त भाऊंबरोबर ओपनिंग म्हणजे जरा अवघड आहे. मी कोठे शॉट मारला व "यस" किंवा "एक/दोन" असे म्हणून पळू लागलो आणि त्यांच्याकडे बघितले तर ते तेथे तो स्टॅण्ड व कागद लावून कोणाचेतरी व्यंगचित्र काढण्यात दंग, असे व्हायचे Happy

केदार, मला पहिल्यांदा ब्याटिंग ला जाऊ दिलेस तर तुझ्या सर्व अटी मान्य Happy

<< केदार, मला पहिल्यांदा ब्याटिंग ला जाऊ दिलेस तर तुझ्या सर्व अटी मान्य >> या 'बॅटींग लाईन-अप'मधे ओपनींगला येण्याचा मोठ्ठा फायदा - फिल्डींगला येण्यापूर्वीं निदान पॅड सोडायला तरी थोडा वेळ मिळेल !! Wink
इंग्लंडमधे होणार्‍या या 'गटग'मधे सहभागी व्हायला मला खूप आवडेल व सध्याच्या टीमला "शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात " असं इंग्लंडला 'कोरस'मधे गात सांगताना ऐकालाही !!! Wink
<< कागद लावून कोणाचेतरी व्यंगचित्र काढण्यात दंग, असे व्हायचे >> त्याची गरज भासणार नाही; माझाच स्टंपपासून पळतानाचा फोटू एक 'अजरामर व्यंगचित्र' म्हणून लॉर्डसच्या ऐतिहासिक गॅलरीत
झळकेलच, अर्थात आपल्यातलाच दुसरा कुणी माझ्याहूनही लांब पळाला नसेल तरच !!! Wink

हरण्या-जिंकण्याला योग्य 'परस्पेक्टीव्ह' दिल्याबद्दल झक्कींच्या पोस्टला मानलं !

हाऽऽ आता कसं... सगळे अट्टल माबोकर शोभतात खरे... पंचाच्या खांद्यावर हात ठेऊन पायचीतचे अपिल करणारे. Wink

छे! अट्टल मायबोलीकर पंचांच्या छाताडावर पाय ठेवून अपिल करतात Happy

बाकी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसण्याचा एक मोठा फायदा हा असतो की आपले फलंदाज ऊसळत्या चेंडूवर कसे पळपुटेपणा करून वा तंत्र नसल्याने बाद होतात याबदल टीका करता येते- गांगुली ला विचारा Happy

योग वो कॉमेंटेटर की हैसियत से बोल रहा है. बॉयकॉट, शास्त्री, मांजरेकर ई. नाही का वन डे मधे रन रेट मेन्टेन करण्याबाबत बोलत? चॅपेल बंधू नाही का एथिक्स शिकवत? उद्या भारताने निगेटिव्ह बोलिंग केली तर कॉमेंटेटर नासिर हुसेन ते कसे क्रिकेटच्या स्पिरीट मधे नाही ते ही सांगेल Happy

मला नंबर ४थाच हवा.............दुसर्या कोणत्या ही नंबर वर खेळनार नाही........हवे तर माझा ट्रॅक रेकॉर्ड बघावे.. Happy

फारेंडा,
थोडक्यात काही माणसे जन्मजात नशीबवान असतात- प्रत्यक्ष कृती करताना एक, नंतर त्याबद्दल बोलताना दुसरे- दोन्ही साठी त्यांना रग्गड पैसा मिळतो. अशा नशीबवान जीवांना कधीच भ्रष्टाचार करायची गरज भासत नसावी- हा मुद्दा माझ्या लेखात नव्याने अ‍ॅड करता येईल! Happy
याखेरीज हर्षा भोगले सारखी ही काही माणसे असतात जे निव्वळ अनेक वर्षांच्या ऐकीव व दृष्य अनुभवाच्या जोरावर (अशा वरील लोकांच्या पंक्तीस बसून) दोन्हीकडून बोलू शकतात- त्या बदल्यात पैसेही कमावतात. हे म्हणजे कालांतराने कटरीना कैफ बॉलीवूड मधील सुपरस्टार होते तसे आहे.

माझा वैयक्तीक कुणीही (रग्गड) पैसे कमवण्यावर कसलाही आक्षेप नाहीये हे नमूद करतो.. फक्त कटरीना ला "सौ गुन्हे माफ" एव्हडीच माझी कमजोरी आहे! Happy

>>बॅटिंगची कला बॉल खेळण्यात नसून सोडण्यात आहे याची प्रचिती इथे आणि इंग्लंड मध्ये येत आहे
हो ना! पण कुठला सोडायचा ते कळायला हवे त्याचे काय?

मॅचचं काय झालं शेवटी ?>>>>>>>>>>>>

जगज्जेते मॅच जिंकले.......अगदी थाटात........... भारतात आल्यावर ओपन बस मधे त्यांची मिरवणुक काढणार आहे............

हो ना! पण कुठला सोडायचा ते कळायला हवे त्याचे काय? >>> उजव्याने डाव्या यष्टीवरचा नी डाव्याने उजव्या यष्टीवरचा :p

(अशा वरील लोकांच्या पंक्तीस बसून) >>> आजतक वर तर चक्क तो 'इट क्रिकेट... स्लिप क्रिकेट'वाला डोक्यावर गोळा शेकल्यासारखा काहीबाही बरळत असतो कपिलच्या जोडीला...

झमोऑन
निदान ते खेडाळू आहेत... हक्क आहे त्यांना बोलायचा (फिस्कायचा) पण पवारांच काय?

आले पवारच्या मनी (इंग्रजीतला मनी नव्हे :p)
झमोऑफ

>> तुम्हाला टेबलाखालून कट हवा असल्यास देतो
मास्तरा, ही तुझी अशी नेहमीचीच कट कट टीम स्पिरीटच्या विरोधात आहे.

>> मी फक्त न्यू बॉल बॉलिंग करेल.
केदार, आकडेवारी प्रमाणे तुझ्या बॉलिंग वर विकेट पडत नाहीत. त्यामुळे, कधी तरी प्रतिस्पर्ध्याचा स्कोअर कमी वाटला तर जुन्या बॉल वर न्यू असं लिहून तुला बॉलिंग करायला सांगू! टीमचा मंत्र आहे .. मिळेल तो बॉल आणि पडेल ती विकेट!

Lol

आनंदाची बातमी - भज्जी जखमी असल्यामुळे (की राजकीय आजारामुळे) तिसर्‍या कसोटीत खेळणार नाही. युवी देखील जखमी आहे. म्हणजे मुकुंद, भज्जीच्या ऐवजी झहिर व सेहवाग आत येणार. पण गंभीरसाठी कोण बाहेर जाईल? कदाचित युवी? फिरकी गोलंदाज मिश्राला घ्यायचे असल्यास स्रिसांथ किंवा शर्माला बाहेर पडावे लागेल (झहीर साठी).

लोकहो, तुमच्या शिव्याशापाने बिचार्‍या हरभजनच्या पोटातील स्नायूंना जखम झाली. पुढच्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही! गंभीर, झहीर यांच्या जोडीला तो हि! आता त्यातल्या त्यात, काढून टाकल्याच्या अपमानापेक्षा हे बरे, असे समजून त्याला लवकरच आराम पडो, ही प्रार्थना करायची!

या लोकांना किती सिक लीव्ह असते हो?? मास्तुरे म्हणतात तसे टेबलाखालून कट देऊन मलाहि भारतात क्रिकेट बोर्डाच्या पगारावर नोकरी मिळेल का, हरभजन सारखी? म्हणजे काय, सध्या माझे जास्तीत जास्त खर्च औषध व डॉक्टर यांच्यात जातात, त्यापेक्षा कमी पैशात कट देऊन जमले तर बरे. मग भारतात रहाण्याचा त्रास नको म्हणून मी कायम इंग्लंड नि ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाईन, कॅनडाच्या सुद्धा!

बघा कुणाच्या ओळखीने जमले तर.

माझ्या मते रैनाला पण काढून त्या ऐवजी मिश्राला घ्यावे. कारण वरचे सगळे बॅट्समन फेल गेले असतील तर रैना असून नसून सारखाच आहे. मग ५ बॉलर होतील आणि त्यांच्या विकेट्स काढायची शक्यता वाढेल.

असच खेळायचं असेल तर बिहारी ठेकेदाराकडून सोळा मजूर न्यावेत. शंभर रूपये रोजावर मिळतात. हॉटेलमधे खायला घातलंत तर पाया पडतील आणि राहण्याची सोय केली तर ओढतीलही Proud

जुन्या बॉल वर न्यू असं लिहून तुला बॉलिंग करायला सांगू! टीमचा मंत्र आहे >>> Lol तू म्हणशील ते. छडी तुझ्या हातात आहे.

अनिल बिहार्‍यांच्या भावना दुखावल्याबद्दल अर्ध बिहारी माही खटला भरेल. Happy

मिश्रा किंवा ओझा हा भज्जीच्या जागी हवा.

Pages