भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< DHONI NE BAAYAKO GHARI PATHAVLI... >> असं तो म्हणतो ? जरा त्याच्या बायकोकडून खरं काय तें समजून घ्यायला हवं; अहो, आमच्यासारख्या बर्‍याच क्रिकेटवेड्यांच्या बायका [ अर्थात, प्रत्येकीं एकेकच !] केवळ अजूनही आम्हीं हे सामने टीव्हीवर बघतो म्हणून आम्हाला सोडून जायच्या विचारात असाव्यात !!! Wink

चला.. ह्या बाफला जरा जागे करुया....

आजपासून सलग चवथी मॅच हारण्याच्या दृष्टीने आपली टीम खेळणार की लाज वाचवण्यासाठी ही मॅच जिंकणार..
अँडरसन आणि प्रविणकुमार दोघेही बाहेर बसणार.... सेहवाग किंवा गंभीरच्या ऐवजी मुकुंद खेळणार की.. लक्ष्मणला बसवून मुकुंदला खेळवणार... इंग्लंड अँडरसनच्या ऐवजी ज्या गोलंदाजाला घेणार तो आपल्यासाठी नवीनच असणार म्हणजे त्यालाच आपले खेळाडू जास्ती विकेट देणार...

आपल्या गोलंदाजाना ७ ते ११ क्रमांच्या फलंदाजांची जास्त भिती असते!

त्यामुळे मल वाटते अस नियम करायला हवा की आमच्याप्रतिस्पर्धी संघाच्या बोलर्स ना बॅटिंग नॉट अलाऊड!

आज इकडे सकाळ पासून पाऊस चालू आहे. पावसानेच बर्‍याचशा ओव्हरी खेळून काढल्या तर बरंच आहे! Proud

इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाचे उप्तन्न भारताशी मॅचेस ठेवल्या तरच भरपूर असतं. त्यामुळे प्रत्येक मॅच मधे भारताची अशी धुलाई करणं त्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारं नाही. Wink

बरोबर.. आणि नेमकी सचिन शतक करेल... Happy (शेवटच्या सामन्यात त्याला मस्त लय सापडली होती.. खेरीज मालिका गेलीच आहे त्यामूळे दबाव नाही.)

आशेला वाव आहे.. कारण इंग्लंडचे बॉलर पूर्वी इतक्या खुन्नसने बॉलिंग करतील असं वाटत नाही कारण नं १ रँकिंग मिळालेलं आहे. दुसरं म्हणजे द्रवीड सोडता बाकी सगळे पूर्ण फेल होणं (६ वेळा) हे स्टॅटिस्टिकली बरोबर वाटत नाहीये.

सचिनने करू नये या टेस्ट मधे. ८०-९० मात्र जोरदार मारावेत ज्यामुळे मॅच जिंकण्यास मदत होईल. ९० आणि ११० मधे फार फरक नाही संघाला होणार्‍या मदतीत. त्याचे शतक मात्र एखाद्या जिंकलेल्या वन डे मधे व्हावे, शक्यतो लॉर्ड्सवर Happy

तो द्रविडचा खुलासा वाचलात का क्रिकईन्फो वर? लॉजिकल वाटला. सचिनालाही त्याने विचारले होते असे तो म्हणाला व सचिननेही त्याला हेच सांगितले की आवाज नक्की आला. हे बहुधा तो "सचिनने दुसरीकडे बघण्याचा" तो शॉट दाखवायच्या आधी झाले असावे.

मात्र या मॅच ला छोटी लेस घेउन नाहीतर वेल्क्रो वाले शूज घालून खेळ म्हणावं Happy द्रविडची बॅट बर्‍याच वेळा त्याच्या पॅडवर आपटते आणि ती निक आहे असा समज होतो.

इंग्लंडची बॅटींग म्हणजे परत एकदा आपण डावाने हारायची तयारी करायला हरकत नाही... प्रविणच्या ऐवजी आरपी.. म्हणजे अजून एक बॅट्समन कमी.. गरज पडलीच तरी धोनी काही ६०-७० करु शकणार नाही म्हणजे..

सचिनने करू नये या टेस्ट मधे. ८०-९० मात्र जोरदार मारावेत ज्यामुळे मॅच जिंकण्यास मदत होईल. ९० आणि ११० मधे फार फरक नाही संघाला होणार्‍या मदतीत. त्याचे शतक मात्र एखाद्या जिंकलेल्या वन डे मधे व्हावे, शक्यतो लॉर्ड्सव>>नको ते एकदा होऊन जाऊ दे. ताप नुसता.

सगळ्यात महान सेशन आख्ख्या सिरीज मधले... आपली लोकं पाट्या टाकतायेत.. धोनी कॅप्टन म्हणून नको आहे की काय सगळ्यांना.... का फ्लेचर नको आहे..

काहीही त्रास न होता इंग्लंडच्या नाबाद ७५ धावा...

तो गनिमी कावा आहे! आधी सोपी गोलंदाजी, इतर जणहि जणू इंटरेस्ट नसल्यासारखे गप्प आहेत, नेहेमीसारखे, चौकार मारला नाही की 'वा, वा, छान' असे म्हणून गोलंदाजाला उत्तेजन देणे नाही. त्यांना वाटेल, चला, कसेहि खेळावे, धावा मिळतील, बादहि होणार नाही. नि एकाएकी एकदम मिश्रा येऊन चमत्कार घडवेल! जरा सहा सात जण बाद झाल्यावर ते जागे होतील. तेंव्हा मात्र सगळे भारतीय दमून जातील नि मग पुनः आठवी, नववी, दहावी या जोड्या साडेतीनशे पर्यंत नेतील. तोहि गनिमी कावा!! हे गोलंदाज दमले की सेहेवाग इ. लोक भरपूर झोडपतील त्यांना!!

काय आहे की नाही स्ट्रॅटेजी? उगाचच 'स्ट्रॅटेजी नाही' म्हणणार्‍यांनी आणि 'स्ट्रॅटेजी अंमलात आणत नाहीत' म्हणणार्‍यांनी नोंद घ्यावी. आपणच शेवटी जिंकणार!

निदान ह्या सामन्यात तरी स्रिसांथ ऐवजी मुनाफला घ्यायला पाहिजे होते. तसेच सेहवाग किंवा गंभीर ऐवजी मुकुंद चालला असता.

पाहिलत्? काय दबदबा आहे भारतीय संघाचा इंग्लंडमधे! काय एव्हढासा पाउस पडला नि लगेच तंबूत पळून गेले. आमच्या मुंबईत बघा, केव्हढा पाउस पडतो! आम्ही घाबरतो का?

मारताहेत, मारताहेत. जे दनाद्दन मारताहेत. विश्रांति म्हणून नाही. एआचे शतक झाले, दुसर्‍याचेहि लवकरच होईल, तरी खेळताहेत.
आधी बाद करून बेलला परत बोलावल्यावर एव्हढा गोंधळ घातला निरनिराळ्या मतांचा, की तसे नकोच म्हणून या वेळी शक्यतो त्यांना बादच करायचे नाही असे ठरवले आहे.
त्यातून चिमण तिकडे इंग्लंडमधे जातीने हजर आहेत, ते म्हणतात १००० धावा करा. करू देत पण जरा इतरांनाहि फलंदाजीची संधि द्या की. कसोटी सामन्यात जास्तीत जास्त धावांचा काय विक्रम आहे? आनि आय पी एल, ओडीआय, २०-२० नि रणजी नि काउंटी क्रिकेट हे सगळे धरून काय विक्रम आहे? बहुतेक बेलला तो विक्रम मोडायचा आहे.

Dear ANNA JI,
Thank you for taking public
attention away from test series.

Regards,
M.S.Dhoni.

band kara ho aata.....ha dhagha ughalya paasun ek hi divas changle khelale nahi....to WORLDCUP cha koni chalu kelela...tyala sanga chalu karayla...mhanje kiman shetachi tarijinktil.....

ek bhobadhi AASHAVAADI.........PLSSS

AASHAVAADI
ते तर आपल्या हाती आहे ना!! मग तेच.

आता बघा, अजून तीन दिवस आहेत. उद्या सकाळी एका तासात इंग्लंडचे उरलेले फलंदाज बाद करायचे. मग ओडी आयसारखे खेळून पाचव्या दिवशी सकाळपर्यंत, इंग्लंडवर २५० ची आघाडी घ्यायची. आणि पाचव्या दिवशी चहापानानंतर एका तासाच्या आत त्यांचे सर्व गडी बाद करायचे.

अशी स्ट्रॅटेजी कशी वाटते? एक डावाने विजय!!

तसे झाले तर भारतात सगळेजण अण्णा हजारे, रामदेवबाबा वगैरे विसरून आनंदी आनंद करत रस्त्यावर येतील. प्रत्येक खेळाडूला दहा कोटी रु. नि पवार वगैरेंना प्रत्येकी शंभर कोटी रु.

यानंतर सर्व सामन्यांच्या तिकीटांना करमाफी.

अमेरिकेत हा महोत्सव साजरा करण्यासाठी भारतातले पाचशे लोक येतील. (कुणी बोलवा वा न बोलवा!) लास व्हेगास ला ठेवायचा हा मेळावा. चांगला दहा दिवस!! त्या राज्यात जुगारच काय, जगातला सर्वात जुना धंदा म्हणतात तो हि कायदेशीर आहे.

ITHE JEVDHYA POST AALYAT TEVADHE TAR RUNS SUDDHA NAHI ZALET 3 TEST MATCH MADHE... Happy

उद्या सकाळी एका तासात इंग्लंडचे उरलेले फलंदाज बाद करायचे.
जमले नाही. ते अजून खेळतातच आहेत.
पण हरणार नाही हा आशावाद कायम आहे.
आता प्लान बी. त्यांना सामना जिंकून काहीच विशेष मिळणार नाही, त्या ऐवजी कसोटी सामन्यात एका डावात जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम करा असे त्यांना सुचवावे. मग ते चार दिवस संपेपर्यंत खेळत रहातील. मग पाचव्या दिवशी हळू हळू खेळावे, दर दोन चेंडूंनंतर पॅड बदलावे, ग्लोव्ह बदलावे, बॅट बदलावी, साईड स्क्रीन इकडचा तिकडे, आणि वेळ घालवण्याची काही नवीन कारणे शोधून काढावीत. असे करून कसा बसा दिवस काढावा. बहुधा जमेल. निदान २० तरी बाद होणार नाहीत अशी आशा दृढ धरून खेळावे. लक्षात ठेवा, धावा करणे महत्वाचे नाही, बचेंगे तो औरभी लडेंगे (और फिरसे मार खायेंगे!) मग सामना अनिर्णित.
परत आनंदी आनंद! प्रत्येक खेळाडूला अर्धा कोटी रु. पवारांना अर्थातच दोनशे कोटी, कारण पैसे वाचवून त्यांनी मोठेच काम केले! पुढील सर्व सामन्यांना ५० टक्के करमुक्ति.
फक्त लास व्हेगास ची सहल होणार नाही. आणि भारतापासून दूर असलेल्या आपल्यासारख्यांना भारताच्या महान नेत्यांचे दर्शन होणार नाही, त्यांचा उपदेश ऐकण्याची संधि मिळणार नाही!
हरकत नाही. आसामीच्या बॉस्टनला पुढचे बृहन्महाराष्ट्र संमेलन आहे. त्याला बोलावतील ते, राहुल गांधी, दिग्विजय अश्या थोर, सुसंस्कृत, सुशिक्षित नेत्यांना!!
Light 1

अरे अजून लिहीताय का ईथे? Happy

या मालिकेत भारताला फॉलॉ ऑन देवून शिवाय परत डावाने हरावायचे बाकी होते.. या सामन्यात ईं. ते ही करेल Happy

पहिल्या ३ सामन्यांचीच पुनरावृत्ती चालू आहे. त्यामुळे नवीन लिहिण्यासारखे काहिही नाही. हा धागा आता बंद करावा.

<< हा धागा आता बंद करावा. >> धागा बंद केल्याने इंग्लंडच्या धांवा काढणं बंद होणार नाही किंवा भारताचं धापा टाकणंही ! प्रश्न हरण्या-जिंकण्याचा नाही; पण, अपेक्षांच्या अत्युच्च शिखरावरून पराजयाच्या इतक्या खोल दरीत एखादा संघ जातो, याची कांही तरी कारणं असतीलच ना ! अपेक्षाच साफ चूकीच्या होत्या ? अति क्रिकेटमुळे संघाची झालेली दमछाक ? इंग्लंडचे सर्वच खेळाडू एकाच वेळीं अत्युच्च फॉर्मात येणं ? आपल्या संघात कांही धुसपूस ? मला वाटतं आपल्यासाठी ही मालिका अत्यंत दु:खदायक असली तरी जगातील क्रिकेटप्रेमीनाही ती बुचकळ्यातच टाकणारी आहे.

नेहमीसारखा द्रवीड अजुन टिकून आहे.... तरीही बाकीची फलंदाजी बघता फॉलऑन नक्की Sad
प्रवीण, झहीर, भज्जी वगैरे असते तर जरा तरी आशा होती!

हो पण या धागावर आल्यापासुन एक ही सामना जिंकलो नाही...........आपण.. दोष धाग्याचाच आहे
बंद करा हा धागा नाही तर मी उपोषण करेन.. मी जनता आहे माझ्या मर्जी प्रमाणे चालवावे.. बंदच करा Happy

>>मी उपोषण करेन
चालेल.. लंडन ब्रीज वर बसणार का? Happy

>>अपेक्षांच्या अत्युच्च शिखरावरून पराजयाच्या इतक्या खोल दरीत एखादा संघ जातो, याची कांही तरी कारणं असतीलच ना ! अपेक्षाच साफ चूकीच्या होत्या ? अति क्रिकेटमुळे संघाची झालेली दमछाक ? इंग्लंडचे सर्वच खेळाडू एकाच वेळीं अत्युच्च फॉर्मात येणं ? आपल्या संघात कांही धुसपूस ?

उत्तरः all of the above (असा पर्याय ऊपलब्ध असेल तर!) Happy

भाऊ,
क्रिकेट मध्ये "सराव" याला पर्याय नाही मग तुम्ही सचिन असा, सेहवाग असा वा प्रविण कुमार. हे मी नाही सन्नीभाय ना काल म्हटले, "सचिन" चे नाव घेवून! (यावरून गावसकर किती चिडला आहे हे लक्षात यावे) Happy त्यातही ३५ च्या वर वय झालेल्या खेळाडूने सरावाशिवाय मैदानात ऊतरणे हे कधीच योग्य नाही अशीही टिपणी त्याने केली.
आपले पहिले ६ फलंदाज (द्रविड लक्ष्मण सोडता) जवळ जवळ कुठल्याही सरावाशिवाय ईं. मध्ये मैदानात ऊतरले होते. असो. ईतके सामने झाल्यावर ईं. ने खरे तर ४०० लाच डाव घोषित केला असता तरी चालले असते Happy आपण दोन दिवस काय ४ सत्र देखिल टिकत नाही! आपल्याला डावाने हरवल्यावर अजून एक दोन शतके ठोकायची हमखास संधी चुकली म्हणून ईं. चे फलंदाज हळहळतील बाकी काही नाही.

रच्याकने: सराव नसला तर माधुरी बाईंना देखिल आता ठुमके घेता येत नाहीत, खेरीज वय झालं, तिथे धोणी कंपनीची काय कथा ? Happy

Pages