भारत वि. इंग्लंड - २०११ -

Submitted by नंद्या on 3 July, 2011 - 22:15

England v India 2011

इथे या मालिकेसंदर्भात चर्चा करूयात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> धागा बंद केल्याने इंग्लंडच्या धांवा काढणं बंद होणार नाही किंवा भारताचं धापा टाकणंही ! प्रश्न हरण्या-जिंकण्याचा नाही;

बरोबर आहे. पण ४ था सामना पहिल्या ३ सामन्यांची पुनरावृत्ती आहे. काहिही नवीन घडत नाहिय्ये. आनंदाची गोष्ट अशी द्रविडने आपले मालिकेतले ३ रे शतक झळकावले. सगळे अतिरथी-महारथी धारातिर्थी पडत असताना मुरारबाजीप्रमाणे एकहाती झुंज देऊन भारताची थोडीशी लाज राखली.

सर्वात जास्त अपेक्षाभंग व निराशा सचिनने केली. त्याचे १०० वे शतक झाले असते तर आनंद झाला असताच. पण नसते झाले तरी निदान त्याने मोठ्या खेळ्या करून सामने वाचवायला पाहिजे होते. या मालिकेतल्या अनेक डावांना त्याने खूप चांगली आत्मविश्वासपूर्वक सुरूवात करून व स्थिरावून मोठ्या खेळीची अपेक्षा निर्माण केली आणि प्रत्येक वेळी तो लगेच बाद झाला. पहिल्या कसोटीतल्या ३४ (८ चौकार), दुसर्‍या कसोटीतल्या ५६, तिसर्‍या कसोटीतल्या ४० (८ चौकार), ४ थ्या कसोटीतल्या २३ . . . या सर्व खेळींचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्याला अपयश आले. सचिनभक्तांसाठी हा फार मोठा अपेक्षाभंग होता.

असो. ६ बाद २१८ वरून फॉलोऑन वाचविण्याची शक्यता धूसर आहे. निदान हा सामना भारताने वाचवला पाहिजे.

<< क्रिकेट मध्ये "सराव" याला पर्याय नाही मग तुम्ही सचिन असा, ....>> योगजी, मालिका सुरूं होण्याआधी पासून इथं मी सरावाचं महत्व व त्याच्या अभावाचे परिणाम अधोरेखित करतोय ! पण तीन कसोटी खेळूनही सतत इतक्या अनुभवी फलंदाजीची इतकी धुळधाण होत रहाणं, हें मात्र अश्चर्यकारक आहे,असं अजूनही मला वाटतं.

योगजी, मालिका सुरूं होण्याआधी पासून इथं मी सरावाचं महत्व व त्याच्या अभावाचे परिणाम अधोरेखित करतोय ! पण तीन कसोटी खेळूनही सतत इतक्या अनुभवी फलंदाजीची इतकी धुळधाण होत रहाणं, हें मात्र अश्चर्यकारक आहे,असं अजूनही मला वाटतं. >> नसावे, हे वाचा
http://www.rediff.com/cricket/slide-show/slide-show-1-india-england-take...

आता जर फॉलोऑन मिळाला तर कोण येणार ओपनिंगला?
द्रवीड इतका वेळ खेळल्यामुळे त्याला परत लगेच उतरवणे योग्य नाही... He needs rest!
गंभीर अजुनही फिट वाटत नाहीये.... सहवागच्या जोडीला कोण? धोनी की रैना? की लक्ष्मण?

<< नसावे, हे वाचा >> असामीजी, हल्ली प्रत्येक संघ असे अभ्यासपूर्वक डांवपेंच आंखतच असतो व प्रत्येक फलंदाज ते ओळखून आपला खेळही 'अ‍ॅडजस्ट' करतच असतो; तेंडुलकरसारख्या फलंदाजाला तीन कसोटी सामने हे साधे डांवपेंच कळलेच नाहीत, हे पटणं खूपच कठीण आहे.

असाम्या,

त्यासाठी एव्हडी फँसी टेक्नोलॉजी आवश्यक आहे असे मला वाटत नाही. एखाद्या खेळाडूचा खेळ तुम्ही बराच काळ पाहून, निरीक्षण करत असाल तर अशी स्ट्रॅटेजी ठरवता येते.
रच्याकने: ही माझी आधीची पोस्ट पहा त्यातील सचिन संबंधी भाग:
योगयोग | 14 August, 2011 - 12:04
या सर्वात अजून एक महत्वाची गोष्ट ज्याचा अभाव होता:
याऊलट ईं. ने आपले फलंदाज कसे बाद केले पहा. बरोबर प्रत्येक प्रमुख फलंदाजाच्या खेळातील कच्चा दुवा हेरून तो फलंदाज सेट होण्या आधीच बहुतांशी त्याला सापळ्यात अडकवले. ज्यामूळे निव्वळ मानसिक दबावात येवून फलंदा़जांनी चूका केल्या.
ऊ.दा:
१. द्रविड हा डावाच्या सुरुवातीला ऊजव्या यष्टीबाहेरील थोड्याश्या ऊसळत्या चेंडूला शरीरापेक्षा दूर खेळून बाद होण्याची शक्यता अधिक असते. (जेव्हा तो सेट होवून बाद झाला तेव्हा अशक्य चेंडूवर बाद झाला होता.. तो सापळा नव्हता!)
२. सचिन सुरुवातीला ऊजव्या यष्टीबाहेरील फूल लेंथ चेंडूवर ड्राईव्ह मारायला जाऊन समोर किंवा स्लिप मध्ये झेल देवून बाद होतो, तशी शक्यता अधिक असते

मालिकेत पहिल्यांदाच सामना अनिर्णित ठेवण्याची अंधुक आशा जिवंत आहे. सेहवाग व लक्ष्मण अप्रतिम चेंडूवर बाद झाले. पण द्रविडला खोटे बाद दिले नसते, तर अजून हायसे वाटले असते.

त्यासाठी एव्हडी फँसी टेक्नोलॉजी आवश्यक आहे असे मला वाटत नाही. >>अरे तुला नसेल वाटत, andy flower ला वाटतेय Happy jokes apart, ह्यात आज तरी काही fancy उरलेले नाहि. mathematical modelling is used almost in every field nowadays. Cricket is not more exception असे दिसतेय. तूही काहि वेगळे लिहिले नाहियेस फक्त England अशा गोष्टी professionally करतेय असे दिसतेय. त्या विषयातील experts कडून करून घेतेय. म्हणजे specialized coaching चीच पुढची स्टेज. modelling मुळे अतिशय सूक्ष्म बारकावे सहज लक्षात येत असतील जे नुसत्या निरीक्षणातून निसटू शकतात.

तेंडुलकरसारख्या फलंदाजाला तीन कसोटी सामने हे साधे डांवपेंच कळलेच नाहीत, हे पटणं खूपच कठीण आहे.>> असे का ? जे झालय ते तर आपल्या समोरच आहे.

असो.
आज रैना, सचिन, धोणी काय दिवे लावतात पाहुया..
सचिन चं शतक आज होणार असं वाटतय आणि नियमाप्रमाणे भारत हरणार..? Sad

बाकी, द्रविड ला या अख्ख्या मालिकेत एक तर पंच व हॉट स्पॉट दोघांनी मिळून ढापलाय किंवा "ऊच्च" बॉल वर त्याची विकेट गेली आहे. प्रत्येक सामन्यातील चेंडूवर भारतीयांच्या रक्ताचे डाग किंवा द्रविड च्या "क्लास" चा शिक्का निश्चीत सापडेल!

रच्याकने: "तो" झेल घेताना गंभीर चे हात चक्क कापत होते... नको नको म्हणत होता का स्वताला वाचवत होता कळेना.. रिप्ले मध्ये असले "बारकावे" भाव खाऊन जातात. Happy

असो. मालिका संपली की सारांश लिहीन म्हणतो.

<< जे झालय ते तर आपल्या समोरच आहे.>> ते निर्विवादच आहे; त्याचं श्रेय टेक्नॉलॉजी प्रणीत डावपेचाना आहे का, हे विवाद्य आहे !

द्रविड ला या अख्ख्या मालिकेत एक तर पंच व हॉट स्पॉट दोघांनी मिळून ढापलाय किंवा "ऊच्च" बॉल वर त्याची विकेट गेली आहे. >>> टोटली सहमत! द्रविड बद्दल कायमच आदर होता आणि या एकाच सिरीज ने तो दुप्पट झाला. मी बर्‍याच दिवसांनी त्याची बॅटिंग बघितली या सिरीज मधे, आता पुन्हा तो जुना द्रविड दिसला, जो मधे २००७ च्या उत्तरार्धापासून गायब होता.

आणि दोनदा खोटे आउट आणि एकदा नाबाद धरून फक्त ५ वेळाच आउट झाला तो Happy

ओपनिंग ला येउन "कॅरी द बॅट" करून पुन्हा लगेच फॉलो ऑन मुळे दुसर्‍या डावात ओपनिंग ला.
गेले तीन चार वर्षे मी त्याच्या सपोर्ट मधे बरेच लिहीले होते, येथे, ब्लॉगवर ई. पण खरे सांगायचे तर त्याला जेव्हा जेव्हा मैदानावर पाहिले तेव्हा मला शंका आली होती की हा परत पहिल्यासारखा खेळू शकेल का. या सिरीज मधे त्याला उत्तर मिळाले. _/\_

आपण हारलो. ओके, बिग डील. खेळणे म्हणले हे होणारच. तर अभी रात गयी, बात गयी, वन डे सिरीज मध्ये तरी ठोकावे त्यांना. नाहीतरी आपल्याला सध्या टेस्ट चांगली खेळता येत नाही हे विंडीज मध्येच नक्की झाले होते. उगाच आपल्या आशा मात्र जिवंत होत्या.

सच्या बॅडपॅच मध्ये आला आहे असे वाटण्यास वाव आहे, वनडे सिरिज ठरवेल.

हॅटस ऑफ टू द्रविड. जय हो! आता तो रिटायर झाला तरी हरकत नाही. (पण आपल्याकडे त्याची जागा भरून काढणारा कोणी नाही, हे दुर्दैव)

द्रविड काल जबरीच खेळला... पण त्याला बाद दिले तेव्हा आणि नंतर त्याच्यावर बर्‍यापैकी गदारोळ चालू होता... थर्ड अंपायरनी तंत्रज्ञानाचा वापर न करता त्याला बाद दिले असे म्हणणे होते.. प्रत्यक्षात बघितल्यावर बॉल बॅटची कड घेऊन मगच पॅडवर आदळल्यासारखे दिसत होते असे असताना जर थर्ड अंपायरने प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते आहे त्याच्या आधारावर निर्णय दिला तर त्यात चूकीचे काय आहे हे मला अजूनही समजलेले नाही..

फर्स्ट इनिंगमध्ये त्यानी जबरदस्त खेळ केला.. डाव संपल्यावर आत जाऊन त्याने सगळ्या खेळाडूंना फटके टाकायला पाहिजे होते.. भिकार खेळल्याबद्दल असे सारखे वाटत होते..

दुसर्‍या इनिंगमध्ये त्याच्या ऐवजी लक्ष्मणला ओपनिंगला पाठवले असते तरी चालले असते.. किंवा धोनी स्वत:च यायला पाहिजे होता.. पण द्रवीड बाबा महान आहेत.. तेच म्हणाले असतील मीच जातो परत म्हणून...

मिश्रानी चांगली साथ दिली पहिल्या डावात दुसर्‍या डावात सुद्धा देईल असे दिसते आहे.. कालचा त्याचा खेळ बघता.. आणि अ‍ॅव्हरज पण बरा आहे आपला.. त्यामुळे कदाचित इंग्लंड दुसर्‍यांदा खेळायला येऊन आपल्याला हारवतील डावाचा पराभव कदाचित टळेल ह्या वेळेस पण पराभव नक्कीच...

रिप्ले मधे बॅटला किंचित लागल्यासारखा वाटतो हे खरे आहे, पण अगदी १००% आउट देण्याएवढे निर्विवाद वाटले नाही, त्यामुळेच मग हॉट स्पॉट वर भरवसा होता, पण त्याच्यात तो ठळक पांढरा स्पॉट दिसत नाही. त्यामुळे बेनिफिट ऑफ डाउट शुड गो टू... Happy

अजून एकाही इंग्रजी पत्रकाराने व्हॅसलिन काढले नाही? Happy

द्रवीडच्या विरुद्ध तसे करणे जरा विचित्र वाटेल.. त्यामुळे "काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही" Happy

आणि बहुतेक थर्ड अंपायरलाच द्रवीडची दया आली असावी.. किती वेळ खेळणार हा एकटाच म्हणून बेनेफिट ऑफ डाऊट इंग्लंडला दिला असेल..

प्रत्यक्षात बघितल्यावर बॉल बॅटची कड घेऊन मगच पॅडवर आदळल्यासारखे दिसत होते >> हिम्या.. रेफरल मागितल्यावर तंत्रज्ञानाची मदत घेउन पुरावाबघून निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर बॅटची कड लागून गेल्यासारखा वाटत असेल तर ऑन-फिल्ड अंपायरला कड लागून गेल्यासारखा वाटला. ऑन-फिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठवायला पाहिजे या केसमध्ये..

३०० चा टप्पा गाठल्याबद्दल ३ चिअर्स!

बॅटिंगवाइज ही टीम पूर्वीच्या टीमसारखीच आहे. तेव्हाही गावसकर आणि वेंगसरकर सारखे एक दोघेच इकडच्या स्विंगशी जमवून घ्यायचे. फरक इतकाच आहे की यंदा आपलं टेल १०० च्या वर धावा करतंय.

जेव्हा केव्हा आपल्या टीममधे एकाच वेळी २ गावसकर, २ द्रवीड, २ तेंडुलकर, १ इंजिनिअर, २ कपिल, १ झहीर, १ बेदी/प्रसन्ना खेळतील तेव्हा आपण खरेखुरे १ नंबर रँकिग वाले होऊ शकू.

आता मला वनडे सीरिज पण ५-० हरू अशी शक्यता दिसते आहे. चांगली गोष्ट इतकीच आहे की द्रवीड टीम मधे असल्यामुळे ५० ओव्हरीच्या आत ऑल आउट होण्याची शक्यता कमी आहे. Proud

मला वाटतंय आज ड्रॉ होईल. सच्याने टिकून राहावे, १०० आपोआप होतील. होऊन जाऊदे म्हणजे वेळेमुळे निदान आपण हारणार नाही.

मिश्राने कसला खतरणाक शॉट मारला. गो मिश्राजी!! दोन चौकार.

१०० होण्या साठी खुर्ची न सोडता ऑफिस मध्येच बसावे काय.?

१००चा उपयोग एकच. पुढच्या मॅचेसला तरी ही तलवार मानेवर रहाणार नाही.

शिवाय ही मॅच ड्रॉ होईल की. Happy म्हणजे होऊदेत. विक्रमशेट खुर्ची मत छोडो. किंवा आत्ता घरी जाऊन लगेच जागा धरा. लंच आहे. Happy

गो मिश्राजी! ५० काढले. बॅटर लोकांनी जरा शिकावे. आणि हो चक्क १०० ची पार्टनरशिप वगैरे.

>> १०० आपोआप होतील. होऊन जाऊदे म्हणजे वेळेमुळे निदान आपण हारणार नाही.

केदारकाका, १०० व्हायला अजून ३० रना हव्या आहेत. त्या टी पर्यंत होऊ शकतील. एकूण अजून ६८ ओव्हरी खेळायच्या आहेत. त्यातल्या समजा ५ इनिंग चेंज मधे जातील. पुढे काय? एकूण ६० ओव्हरी खेळल्या शिवाय (टु बी ऑन द सेफर साईड ६० म्हंटलं मी) हरणं कसं टळणार?

ते निर्विवादच आहे; त्याचं श्रेय टेक्नॉलॉजी प्रणीत डावपेचाना आहे का, हे विवाद्य आहे !>> मग कशाला आहे ? म्हणजे जर England मान्य करतेय कि त्यांनी टेक्नॉलॉजी चा वापर केलाय, आपण बर्‍यापैकी Dear caught in headlights phase मधे वावरलोयत. तर मग नक्की कशाला अमान्य करायचे ? मला समजले नाहि.

जर बॅटची कड लागून गेल्यासारखा वाटत असेल तर ऑन-फिल्ड अंपायरला कड न लागून गेल्यासारखा वाटला. ऑन-फिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठवायला पाहिजे या केसमध्ये..>>अरे पण त्यांनी निर्णयच घेतला नव्हता म्हणून तर referral होते.

आता मला वनडे सीरिज पण ५-० हरू अशी शक्यता दिसते आहे.>>थांब रे. एव्हढा वाईट नसेल.

>>> आता मला वनडे सीरिज पण ५-० हरू अशी शक्यता दिसते आहे

वनडे मालिका आपण ३-२ अशी जिंकू. २०-२० चा एकमेव सामना पण जिंकू.

>>> अरे पण त्यांनी निर्णयच घेतला नव्हता म्हणून तर referral होते.

मैदानावरील पंचांनी द्रविडला नाबाद दिले होते. त्याविरूध्द स्ट्रॉसने तिसर्‍या पंचाकडे दाद मागितली होती.

, १०० व्हायला अजून ३० रना हव्या आहेत. त्या टी पर्यंत होऊ शकतील. एकूण अजून ६८ ओव्हरी खेळायच्या आहेत. त्यातल्या समजा ५ इनिंग चेंज मधे जातील. >>> अरे मी आपण हा आख्खा दिवस आज खेळून काढू असे म्हणत आहे. (काढावा) त्यांना बोलावायची गरज नाही.

Pages